‘अंतिम’ इतिहास

भावी पिढ्यांतील इतिहासकार ‘अंतिम’ इतिहासाची अपेक्षा ठेवणार नाहीत. त्यांचे संशोधनाचे काम वारंवार नवनव्या संशोधनाने मागे पडणार आहे, हे त्यांना अपेक्षितच असेल. त्यांना जाणीव असेल, की भूतकाळाचे ज्ञान आपल्यापर्यंत काही माणसांमार्फत, त्यांनी केलेल्या प्रक्रियांमधूनच येते. त्या ज्ञानात मूलभूत, व्यक्तिनिरपेक्ष, अपरिवर्तनीय असे काही मानता येत नाही.
काही उतावळे अभ्यासक तर अशा साशंक भूमिकेला येऊन पोचतील, की ऐतिहासिक ज्ञानाचे निष्कर्ष माणसे व दृष्टिकोन यांतूनच आपल्यापर्यंत येत असल्याने एक मांडणी व पर्यायी मांडणी यांतील कोणतीही मानायला हरकत नाही, कारण वस्तुनिष्ठ ऐतिहासिक सत्य असे काही नसतेच.
द न्यू केंब्रिज मॉडर्न हिस्टरी (१९५७)च्या प्रस्तावनेतून इ. एच. कार यांच्या व्हॉट इज हिस्टरी ? मध्ये उद्धृत

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.