‘स्वातंत्र्य आणि ‘मान्यता’

‘स्वातंत्र्य आणि ‘मान्यता’
ब्याण्णव साली तुम्ही पुरस्कार नाकारायला कशा उद्युक्त झालात? आपली स्वतंत्र ओळख टिकवायच्या गरजेतून का ?
आमच्यासारख्या देश आणि समाजाबाबत हळव्या शिपीळींळींश) कल्पनांच्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांनी स्वतंत्र भूमिका राखायला हवी, असे मला वाटते. आणि दुर्दैवाने आपण व्यावसायिक पुरस्कारांना पुरेसे महत्त्व देत नाही. अखेर मान्यता आपल्या क्षेत्रातल्या समकक्ष लोकांकडूनच मिळायची असते. भारतीय इतिहास परिषदेने मला काही वर्षांपूर्वी सामान्य अध्यक्षपद दिले. मला हाच पुरस्कार वाटतो.
पद्मभूषण पुरस्कार दोनदा नाकारणाऱ्या इतिहासाच्या अभ्यासक रोमिला थापर याची या नकारांबद्दलची मुलाखत इंडियन एक्स्प्रेसने (२ फेब्रु.२००५) छापली.
विचारवंतांनी, अभ्यासकांनी संशोधनातील स्वातंत्र्य टिकवणे आणि आपल्या क्षेत्रातील मान-मान्यतांनाच महत्त्व देणे यापासूनही इतरही क्षेत्रांनी धडा घेण्यासारखा आहे.