वर्तमानकाळ आणि भूतकाळ

एखादी प्रतिमा एखाद्या कलाकृतीत कशी सादर केली जाते यातून पाहणाऱ्यांच्या कलाक्षेत्राबद्दलच्या अनेक समजुती घडत असतात. सौंदर्य, सत्य, ‘विलक्षण’ कलाकार, संस्कृती, आकार (रूप), सामाजिक स्थिती, अभिरुची अशांबाबतच्या समजुती प्रतिमांच्या आधारे घडतात. जुन्या कलाकृती आज पाहणाऱ्यांच्या समजुती कलाकृती घडतानाच्या समजुतींपेक्षा वेगळ्या झालेल्या असतात. पूर्वीचे जग कसे होते याबद्दलच्या आजच्या समजुती भूतकाळाला स्पष्ट करण्याऐवजी ‘गूढ’ करतात.
आपल्याकडे पाहणाऱ्याला आपण नेमके दिसावे अशा रूपात भूतकाळ पाहणाऱ्याची वाट पाहत बसलेला नसतो. इतिहास हा नेहमीच वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांच्या संबंधाच्या रूपात असतो. आजची भीती, आजच्या आस्था नेहमीच भूतकाळाला धूसर करत असतात. आज भूतकाळ ‘जगता’ येत नाही. फक्त आज कसे जगावे, कसे वागावे याबाबतच्या शक्यता भूतकाळाच्या विहिरीतून आज ‘उपसता’ येतात. हा धूसरतेचा पडदा सांस्कृतिक आकलनात दोन प्रकारच्या अडचणी आणतो. एकतर कलाकृती आपल्याला दूरच्या वाटू लागतात आणि आज कसे वागावे याबद्दलचे भूतकाळाच्या आकलनातून सुचणारे मार्ग कमी होतात.
[जॉन बर्जरच्या वेज ऑफ सीइंग (Ways of Seeing), पेंग्विन, १९७२ या पुस्तकातला हा उतारा ‘इतिहास तटस्थ असू शकतो का?’ या प्रश्नावर प्रकाश टाकतो.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.