एकास एक, एकास दोन

आज प्रत्येक ग्रामीण व्यक्ती स्वतःसोबतच एका शहरी व्यक्तीपुरतेही अन्न पिकवते आणि जगभरात शेतीची कामे मुख्यतः स्त्रिया करतात. जर शहरांमध्ये परसबागांची पद्धत सार्वत्रिक झाली नाही, तर पन्नास वर्षांच्या आत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीला स्वतःसोबत दोन शहरी माणसांपुरते अन्न पैदा करावे लागेल. शहरे अन्नाची मागणी उत्पन्न करतील आणि नवे तंत्रज्ञान पुरवतील. जर ग्रामीण शेती जास्त सघन झाली तर या मागणी-तंत्रज्ञान जोडीने शेतकरी दारिद्र्यातून बाहेर पडेल श्रीमंत देशांत आज हे झाले आहे. पण जर ‘सघन शेती’ याचा अर्थ फक्त रासायनिक खते आणि तृण-कीटकनाशके असा करून शेतीची उत्पादकता वाढवायचा प्रयत्न झाला, तर पर्यावरणावर प्रचंड ताण येतील.
[ सायंटिफिक अमेरिकनचा सप्टेंबर २००५ चा अंक क्रॉस्रोड्ज फॉर प्लॅनेट अर्थ या नावाचा विशेषांक आहे. त्यातील जोएल इ. कोहेनच्या ह्यूमन पॉप्युलेशन ग्रोज अप या लेखातील हा उतारा येत्या शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था विशेषांकाचा ‘ट्रेलर’ समजावा ! ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.