बाजारपेठा एक व्यवस्था

१. तुमच्या हातात चहाचा कप येतो. त्याच्यामागे काय-काय घडलेले असते?
कोणीतरी चहाच्या मळ्यात चहा पिकवत असते, कोणीतरी चहाची पानं खुडून, त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची चहापत्ती बनवलेली असते.
मग ती बडे व्यापारी, छोटे व्यापारी, दुकानदार करत आपल्यापर्यंत येते. तिकडे ऊस शेतकरी, तोडणी कामगार, साखर कारखाना करत साखर घरी येते. आणिक कोणी म्हैस पाळतो, दूध काढून डेअरीला घालतो, पिशवी बंद होऊन आपल्याकडे येते. याशिवाय सिंचन व्यवस्था, पशुखाद्य, मोटारउद्योग, वाहतूक-व्यवस्था अशा अनेक गोष्टी असतात. चहाची भांडी, गॅस असतोच. कपबश्या असतात.

इतके सगळे होते आणि आपल्या हातात चहाचा कप येतो. २. तुम्ही सायकल विकत घेता. रु. १०००/- ला तुम्हाला सायकल मिळते. विकणाराला रु. १०००/- मिळतात. त्याचा तपशील असा. रु. ७००/- ठोक व्यापाऱ्याला जातात. रु. २००/- दुकान भाडे, नोकर-चाकर, दिवाबत्ती रु. १००/- नफा. या नफ्यातून परत, कर वगैरे जातात. रु. ७००/- चा तपशील पहा – सामानसुमान, सुटे भाग, त्यांची जोडणी(रीीशालश्रू) कामगार, वीज, पाणी…..

या सर्वांनी मिळून बाजार-व्यवस्था उभी राहते. ती कोणी एकट्यादुकट्याने नियोजनपूर्वक उभी केलेली व्यवस्था नव्हे. अनेक व्यक्तींनी आपापल्या आकलनातून पुढाकारातून खटपट केलेली असते. त्याचे हे दृश्य स्वरूप. एका अर्थाने हीपण एक परिसंस्थाच (ecosystem) असते परस्परावलंबनावर आधारित आणि प्रत्येक वेळीच्या पेक्षा स्वतंत्र, परिपूर्ण व एकसंध अशी.
विकास हा काही केवळ मुक्त बाजारपेठा आणि जागतिक व्यापार यावर अवलंबून नसतो. शिक्षण, आरोग्य-सेवा, पायाभूत सोयी, विज्ञान-तंत्रज्ञान संशोधन हेही तितकेच महत्त्वाचे आहेत. ते नसतील तर केवळ अनुदानित, लाचार, आत्मभान हरविलेली, ज्यांचा कशातच सहभाग नाही (non-empowered) अशी बेरोजगार १५-२०% लोकसंख्या कायमची पोसावी लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.