मूल्यव्यवस्थेचा विकास

आमच्या मूल्यव्यवस्थेत मान्य व हव्याशा बदलांना जर विकास म्हटले, तर आम्ही विकासाचे केवळ विकास म्हणून विरोधक नाही. आमचा विकासाबाबतचा दृष्टिकोन श्रम-सघन, बेकारी उत्पन्न न करणाऱ्या तंत्रज्ञानांना महत्त्व देतो. अशी तंत्रज्ञाने संसाधनांच्या वापरात उपजीविकेच्या संधी उत्पन्न करतील. आम्ही नैसर्गिक संसाधने नष्ट किंवा प्रदूषित न करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पक्षाचे आहोत. आजच्या ग्रामीण समाजांच्या साध्या, उपभोगवादी नसलेल्या जीवनशैलीत ही संसाधने सुरक्षित आहेत. तंत्रज्ञानाची निवड अपरिहार्यपणे जीवनशैली व जीवनमानाच्या विकासाच्या दृष्टिकोनाशी निगडित असते.
मेधा पाटकरांची रॉबर्ट जेन्सेन यांनी घेतलेली मुलाखत मॉन्फकीरा (Monfakira) या कोलकात्याहून निघणाऱ्या नियतकालिकाने त्याच्या मे-जून २००६ च्या अंकात प्रकाशित (जुलै ७-१३, २००६) केली. हा उतारा आम्हाला ताहिरभाई पूनावालांनी पाठवला.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.