अराजक म्हणजे काय?

ऐतिहासिक दृष्टीने पाहता अराजकवाद (Anarchism) ही सध्याच्या समाजव्यवस्थेवर टीका करणारी, तिला ‘हवासा’ पर्याय सुचवणारी आणि इथपासून तिथपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवणारी विचारप्रणाली आहे. अविचारी बंडे अराजकवादी नसतात. आजच्या ऐहिक शासनाला तात्त्विक किंवा धार्मिक भूमिकेतून नाकारणेही अराजकवादी नाही. गूढवादी व स्टोइक (mystics & stoics) यांना अराजक नको असते तर इतर कोणते तरी राज्य हवे असते. अराजकवाद मात्र इतिहासात नेहेमीच केवळ माणूस आणि समाज या संबंधांवर रोखलेला आहे. त्याचा हेतू नेहेमीच सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा असतो. तो नेहेमीच सध्याच्या सामाजिक रचनेला दुष्ट मानतो. हे मानणे माणसांच्या स्वभावाच्या व्यक्तिवादी आकलनातूनही येत असेल, पण अराजकवादाच्या पद्धती मात्र नेहेमीच सामाजिक बंडखोरी करण्याच्या असतात, मग त्या हिंसेचा आधार घेवोत वा न घेवोत.

[जॉर्ज वुडकॉकच्या ॲनार्किझम या पुस्तकातून (पेलिकन, १९६२ व नंतर १९७०, १९७१ व १९७५)या मांडणीनुसार म. गांधी, आगरकर, भगतसिंग, मेधा पाटकर इ. सगळे अराजकवादी ठरतात पण धार्मिक दहशतवाद, वंशवाद, व त्यांना दिले जाणारे प्रतिसाद मात्र अराजकवादात बसत नाहीत.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.