नंदीग्राम: कोसंबी : टॉयन्बी

नंदीग्राम: कोसंबी : टॉयन्बी
इतिहासाच्या घटनांचा जास्तजास्त अभ्यास करत गेल्यास सामान्यजनांवर विनाकारण लादल्या गेलेल्या त्रासाबद्दलचे आपले आश्चर्य वाढतच जाते. आपण जी काही प्रगती साधली आहे असे मानतो ती अनेक चुकीच्या आणि अन्याय्य वाटावळणांनी साधली आहे. आपण कितीही नैसर्गिक नियम (natural law) आणि अटळ विकास (inevitable development) यांबद्दल सामान्यीकृत विधाने केली तरी हे सत्य दृष्टिआड करता येत नाही. याबाबतचे सर्वांत दृश्य उदाहरण जमीन-व्यवहाराचे आहे. ह्या आणि इतर बाबींचा इतिहास तपासला तर आपले व्यवहार जास्तजास्त क्रांतिकारक होत जातील. आपल्याला वाटते की आजचे अर्थशास्त्राच्या आधाराने अभ्यास करणारे इतिहासकार पुराणी स्मारके तपासत आहेत. प्रत्यक्षात ते आजच्या अनेक संस्थांचे आधार हादरवत असतात.
[317fcs Petreftty Bitalfoton shirt (Lectures on the Industrial Revolution of the Eighteenth Century in England, लाँगमन-ग्रीन, १८८४/१९२८) या ग्रंथातून. कोसंबींची परंपरा हीच. आणि नंदीग्राममधला अन्यायही जुन्याच विकास-नमुन्याचा!]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.