भाषा बहता नीर है

कितीतरी शब्द आपण बेफिकिरीने, बेपर्वाईने वापरत असतो. त्यांच्या सांस्कृतिक संदर्भांचा आदर न ठेवता! मध्यंतरी चंद्रपूर जिल्ह्यातील वणव्याची वार्ता देताना एका वृत्तपत्राने ‘आग वडवानळासारखी पसरत आहे’ असे छापले होते. वडवानळसुद्धा अग्नीचाच अवत हे खर तील सुप्त अग्नीचा एक काल्पनिक, पौराणिक प्रकार आहे. त्या ठिकाणी ‘दावानळ’ असा शब्द साजरा नसता का ठरला ? केरळचे थोर मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते ई. एम. एस. नंबुद्रीपाद वर्षभर नियतकालिके काळजीपूर्वक वाचून पुढील वर्षारंभी मल्याळम भाषेतील प्रमाद, विसंगती, नवी वळणे यांचे विवेचन करणारा एक सालगुदस्त आढावा निरलसपणे लिहीत असत. खरे तर प्रत्येक भाषेला असा ‘मॉनिटर’ हवा !
शब्दांना अर्थ असतो, तसेच इंगितही असते. पुन्हा एक शब्द वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळ्या अर्थच्छटा घेऊन अवतरतो. मराठीत ‘बंधू’ म्हणजे ‘भाऊ’, बंगालीत ‘मित्र’, उपन्यास हा शब्द मराठीत “विषयारंभ’, हिंदीत ‘कादंबरी’, तेलगूमध्ये ‘भाषण’ व मल्याळममध्ये ‘निबंध’ या अर्थांनी वापरला जातो. भाषा वापरणारे लोक जसजसे सुबुद्ध, सुशिक्षित, समंजस होत जातात तसतसा त्या भाषेचा मगदूर वाढतो. ‘भाषा बहता नीर है’ असे म्हणतात. ती नदीसारखी वाहत असते. कल्पक जाणकार बांधबंदिस्ती करून व्याकरणाच्या नियमांत तिला ‘तटस्थ’ करतात.
[श्री. बा. जोशी यांच्या गंगाजळी मधून साभार.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.