भारतीय स्त्रीजीवन

भारतीय स्त्रीजीवन
एकोणिसाव्या शतकाच्या प्रबोधनाच्या उलाढालींमध्ये स्त्रियांचे प्रश्न केंद्रस्थानी होते. राम मोहन राय, विद्यासागर, अक्षयकुमार दत्त, केशवचंद्र सेन अशा अनेक धुरंधर व्यक्तींनी स्त्रियांना कौटुंबिक दडपणातून बाहेर काढून सुशिक्षित व सुरक्षित करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजामध्ये सामील झालेल्या व्यक्तींनी स्वतःच्या घरातही स्त्रीशिक्षणाचे प्रयोग केले. याशिवाय देवेंद्रनाथ टागोरांच्या घराण्यात एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच घरातल्या स्त्रियांना इंग्रजी, बांगला धर्मग्रंथ वगैरे वाचायला-लिहायला शिकवण्यासाठी परदेशी शिक्षिका व वैष्णवी नेमल्या जात असत. तसेच देवेंद्रनाथ कर्मठ विचारांचे होते व घरातल्या मुलीबाळींना शिक्षणासाठी घराबाहेर पाठविणे त्यांना मंजूर नव्हते. १८४९ साली कलकत्त्यास बेथ्यून स्कूल ही मुलींची शाळा उघडण्यात आली, पण पुढे वीसेक वर्षे विद्यार्थिनींची संख्या अत्यल्प असे, कारण सुधारणावादी मंडळीही बायकांना घराबाहेर पाठवायला कचरत.
[तीन आत्मकथा (तीन वंगकन्यांची अनुवादित आत्मचरित्रे) अनुवादक : वीणा आलासे, प्रास्ताविकेमधून,]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.