मुस्लिमांची सुधारणा शक्य आहे काय?

[श्री इब्न व क (Ibn Warraq) हे मी मुस्लिम का नाही (Why I am not a Muslim) ह्या ग्रंथाचे प्रसिद्ध लेखक आहेत. ते अमेरिकेच्या ‘द सेंटर फॉर एन्क्वायरी’मध्ये काम करतात. त्यांनी आजवर केलेल्या लिखाणात, ‘कुराण’, ‘कोणते कुराण ?’, ‘इस्लाम सोडणे’… इ. लेखन प्रसिद्ध आहे. ते मूळचे भारतीय, आधी युरोपात स्थलांतरित आणि आता अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. त्यांच्या रॅडिकल ह्यूमॅनिस्ट ह्न मार्च २००७ मधील लेखाचा मुक्त अनुवाद ] माझ्या युक्तिवादाची मांडणी :
धर्म-सुधार काय आहे?
1.वैश्विक-मानवाधिकाराचा उद्घोष Universal Declaration of Human Rights (UDHR) जो १९४८ मध्ये करण्यात आला त्याहून हा सुधार वेगळा कसा?
२. मानवाधिकार हे जर साध्य असेल, तर तो इस्लाम UDHR शी सुसंगतच आहे अशी बतावणी करण्यापेक्षा कारण ते कुराणाचे मायावी ह्न अर्थनिरूपण आणि कारागिराने झिलई द्यावी तसे व्यर्थ कृत्य होईल, मानवाधिकाराची सगळी चर्चा मुळापासून धर्माच्या कक्षेबाहेरच नेणे योग्य होईल.
३. UDHR चे निर्णय अमलात आणण्याचा रास्त मार्ग म्हणजे मस्जिद आणि राज्यसंस्था ह्यांची पूर्ण फारकत करणे. लोकशाहीची स्थापना आणि सर्व नागरिकांची आर्थिक स्थिती ह्न जाति, धर्म आणि लिंगभेद निरपेक्ष सुधारणे हहा आहे.
पाश्चात्त्य देशात धर्मनिरपेक्षता कशी रुजली ह्यापासून धडा घेऊन, पुढीलप्रमाणे प्रोत्साहन देणे : कुराणाची समीक्षा करणे. विवेकाला प्रोत्साहन देणारे धर्मनिरपेक्ष शिक्षण देणे. मुस्लिम समाजात राहणाऱ्या भिन्न धर्माच्या भिन्न पंथानुयायांना संरक्षण देऊन अनेकता राखणे.
(iv) हुकुमशाही ऐवजी धर्मनिरपेक्ष लोकशाहीची बाजू घेणे.
(v) आत्मसमीक्षेची गरज मान्य करणे.
४. १९४८ च्या UDHR च्या संदर्भात धर्मसुधार असेल ?
इस्लाममध्ये पोप नाही किंवा धर्माधिकाऱ्यांची संघटित यंत्रणा नाही. त्यामुळे इस्लाममध्ये कधीकाळी धार्मिक सुधार झाला की नाही हे आपल्याला कसे कळणार ? एकाचे उज्जीवन दुसऱ्याला विघातक होऊ शकेल. माझा दृष्टिकोण युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्यूमन राइटस् म्हणजे मानवाधिकारांचा वैश्विक पातळीवर स्वीकृत (१९४८) उद्घोष हा राहील. आता हे खरे की पुष्कळ मुस्लिम तो अजूनही स्वीकारीत नाहीत. जे णक मान्य करतात ते हेही कबूल करतील की, इस्लामी समाजांमध्ये व्यवहारतः (de facto) परिवर्तन झाले आहे. उदा. पाकिस्तान किंवा इजिप्त घ्या. पुढील गोष्टी तेथे आढळतील तर याची शंकाच नको.
१) (क) स्त्रियांच्या दुय्यम दर्जाच्या जागी त्यांना सामाजिक आणि कायदेशीर समानता लाभलेली आहे. त्यांना कृतिस्वातंत्र्य आहे. त्या एकट्याने प्रवास करू शकतात. आपले चेहरे उघडे ठेवू शकतात. आणि त्यांना पुरुषांइतकेच मालमत्तेचे आणि वारशाचे हक्क आहेत, आणि न्यायालयात त्यांची साक्ष पुरुषांच्या बरोबरीची मानली जाते.
(ख) कोणत्याही तरुणीला लग्नाची सक्ती नाही. आणि ती शरीराने उपवर झाल्याशिवाय तिला लग्न करू देत नाहीत. स्त्रीला आईवडिलांच्या किंवा रूढीमान्य पालकांच्या परवानगीशिवाय स्वेच्छेने कोण्याही पुरुषाशी लग्नाची मोकळीक असते. मुस्लिम स्त्रियांना गैरमुस्लिमांशी लग्न करता येते. त्या नवऱ्याला सोडचिठ्ठी देऊ शकतात आणि तसे झाल्यास त्यांना पोटगी मिळू शकते.
(ग) पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना निधार्मिक शिक्षणाची संधी आहे. उच्चशिक्षणाची आणि हवे ते अभ्यासक्रम निवडण्याची मोकळीक आहे. त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे कामधंदाहआयुष्यक्रम निवडता येतो आणि सार्वजनिक जीवनात भाग घेता येतो ह्यात राजकारण, क्रीडा आणि कला व विज्ञान हे आले.
(घ) कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत मग त्यांचा वंश, धर्म, संप्रदाय किंवा लैंगिक दर्जा काहीही असो. दुसऱ्या शब्दांत गैरमुस्लिमांना (ख्रिश्चन, ज्यू, लहानमोठे-पंथ-संप्रदाय मानणारे, पारशी, हिंदू, बुद्धिस्ट आणि नास्तिक) आणि समलैंगिक संबंध करणाऱ्या जमातींना मुसलमानांइतकेच मानवी अधिकार आहेत.
(ङ) धर्मयुद्ध, लष्करी अर्थाने त्याज्य आहे. कारण त्यात मुस्लिमेतरांचे हक्क नाकारलेले आहेत.
(च) भाषणस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, स्वेच्छेने विश्वास ठेवण्याचे स्वातंत्र्य, बौद्धिक आणि वैज्ञानिक शोध घेण्याचे स्वातंत्र्य, निष्ठा -स्वातंत्र्य. यांत धर्मांतर करण्याचे स्वातंत्र्य आले आणि धर्म न मानण्याचेही स्वातंत्र्य आले. देवदेवतांवर विश्वास न ठेवण्याचे स्वातंत्र्य इत्यादी सर्व अधिकार संरक्षित असतात आणि पाखंडीपणा हा तेथे गुन्हा नसतो. ह्या उल्लेखित स्वातंत्र्यात इस्लामचे ऐतिहासिक आधार तपासण्याचा अधिकार गृहीत आहे. तसेच इस्लामचा उत्कर्ष व अपकर्ष, सामान्य इतिहासाचे निकष वापरून त्यांच्या आधारे ते ठरविण्याचा हक्क मान्य असतो. तसेच इस्लाम किंवा कुराण यांची आलोचना करण्याचा अधिकारही निहित असतो.
(छ) कोण्याही व्यक्तीला चोरीसाठी हात तोडणे, किंवा बदफैली कृत्याबद्दल एखादा अवयव छाटणे किंवा दगडांनी ठेचून मारणे हे क्षम्य असत नाही.
(ज) सलमान रश्दीच्या The Satanic Verses आणि इब्न वर्राक (Ibn Warraq) यांचे Why I am not a Muslim ही पुस्तके सहजपणे मिळू शकतात.
२) मानवाधिकार हे जर साध्य असेल तर सच्चा इस्लाम णक्य शी सुसंगत आहे असा आव आणण्यापेक्षा, कारण त्यामुळे कुराणाचे लंगडे समर्थन आणि अप्रामाणिक मोड-तोड करावी लागते. मानवाधिकाराचा पूर्ण वाद एकूणच धार्मिक क्षेत्राच्या कक्षेबाहेर ठेवावा. परंतु वर्तमान मुसलमानी समाजामध्ये एवढे वैचारिक परिवर्तन कितपत शक्य आहे? इस्लाममध्ये ही परिवर्तने आणल्यावर तो धर्म ‘इस्लाम’ राहील? काही थोडे भटकलेले उदारमतवादी मुस्लिम आहेत. त्यांना आपली केक खायची आहे आणि जपूनही ठेवायची आहे असे दिसते. हे उदारमतवादी नेहमी म्हणत असतात की खरा इस्लाम मानवाधिकाराशी सुसंवादी आहे, खरा इस्लाम स्त्री-स्वातंत्र्यवादी आहे, खरा इस्लाम समतावादी आहे, आणि खरा इस्लाम परधर्माबाबत सहिष्णू आहे. आणि त्याला अन्य धर्म अन् श्रद्धा चालतात. ही पवित्र संहिता काही प्रमाणात नवा अर्थ आणि नवे भाष्य यांना दाद देईल पण तिचा लवचीकपणा अमर्याद नाही. आणि तसे करणे एक पवित्रा म्हणूनही समर्थनीय नाही. कारण मूलतत्त्ववाद्यांच्या तोंडावर कुठलीही वचने फेकणे म्हणजे त्यांच्या पेचात अडकणे होईल ! त्यांच्या सोयीच्या युद्धभूमीवर त्यांच्या पकडीत जाणे होईल. कारण उदारमतवादी जे जे म्हणून वचन समोर करील त्याला बाधक, डझनांनी विरोधी मथितार्थ काढणारे निष्कर्ष, व्युत्पत्ती, भाषाशास्त्रीय आणि ऐतिहासिक दाखले तो उभे करील. ही वादपद्धती अचल आहे. उदारमतवादी मुस्लिम कितीही बौद्धिक कोलांटउड्या मारोत त्यांना हे कबूल करावेच लागेल की पारंपरिक इस्लाम मानवाधिकारांशी विसंगत आहे. काही मवाळ मुस्लिम असतील आहेत. हे खरे, पण इस्लाम स्वतः मवाळ नाही. इस्लाम ही सनातन, परंपरावादी उजवी हुकुमशाही विचारसरणी आहे. इस्लाम आणि इस्लामी मूलतत्त्ववाद (Islam and Islamic Fundamentalism) यांच्यात फरक नाही. फारतर थोडा मात्रेचा फरक असेल पण प्रकारभेद नाही. इस्लामी मूलतत्त्ववादाचे सर्व सिद्धान्त कुराण, सुन्ना आणि हदीस यांच्यापासून निष्पन्न होतात. इस्लामिक मूलतत्त्ववाद ही एकतंत्री विचारव्यवस्था असून मुस्लिम न्यायविदांनी तिचे मुसलमानांच्या मूलभूत आणि अधिकृत ग्रंथांपासून मंथन केले आहे.
३) UDHR चे पालन करण्याचा मार्ग म्हणजे मस्जिद आणि राज्यशासन यांच्यात पूर्ण फारकत करणे, लोकशाही स्थापणे आणि धर्म, लिंग असा भेदभाव न करता नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारणे.
पण ह्याचा एकमेव उपाय हा दिसतो की मानवाधिकाराचे प्रश्न धार्मिक कक्षेबाहेर पण आणि नागरी शासनाच्या कक्षेत आणले पाहिजेत. दुसऱ्या शब्दांत धर्माला राज्यशासनापासून विभक्त केले पाहिजे. आणि असे निधार्मिक राज्यशासन बनविणे की ज्यात इस्लाम व्यक्तिगत पातळीवर अमलात असेल. त्याद्वारे अर्थात लक्षावधींना दिलासा
सागरण देणे/आराम मिळणे आणि जीवन अर्थपूर्ण आहे असा विश्वास वाटणे शक्य होईल. प्रश्न आहे, इस्लामिक समाजगट धर्म-निरपेक्ष करणे शक्य आहे का ? उत्तर आहे होय. मला असे वाटते त्याची कारणे पुढील प्रमाणे हह्न
सप्टेंबर ११ पासून जो तो पत्रकार हे दाखविण्याच्या स्पर्धेत पुढे आहे की इस्लाममध्ये शासनसंस्था आणि मस्जिद यांच्यात अंतर नाही. जुन्या अरबी भाषेतील शब्दसंहितेत ‘धर्माधिकारी’ आणि ‘साधा अनुयायी’ अशा प्रतियोगी म्हणण्यासारख्या शब्दांच्या जोड्या नाहीत. तसेच ‘ऐहिक आणि पारलौकिक’, धर्मानिष्ठ आणि धर्मातीत’ अशाही शब्दांच्या जोड्या नाहीत. तरी इस्लामी इतिहास म्हणजे अखंड चाललेल्या धर्मनिष्ठांच्या राजवटींचा इतिहास असे नाही. याउलट, कार्ल ब्राऊनने नुकतेच दाखविल्याप्रमाणे, मुस्लिम इतिहासात व्यवहारतः राज्यशासन आणि धर्माधिकार ह्यांच्यात पूर्ण दरी असल्याचे कालखंड होऊन गेले आहेत. मुसलमानी संस्कृतीचा दावा करणारे कित्येक नेते ह्र त्यांचे शासन आधुनिक औद्योगिक इतिहासात धर्म आणि राज्यसंस्था यांच्यात फारकत असल्याचीच उदाहरणे आहेत.
पाकिस्तानातील मुहम्मद अली जिना, इजिप्तमधील नासेर, इंडोनेशियातील सुकार्णो, अशा राज्यकर्त्यांची उदाहरणे घ्या. हे आधुनिक औद्योगिकीकरणात गुंतलेल्या समाजांचे प्रश्न सोडविण्यात व्यस्त होते. हे सांस्कृतिक अर्थाने इस्लामी असलेल्या देशांतील नेतृत्व होते. आणि तरी त्यांनी धर्मनिरपेक्ष दृष्टिकोण स्वीकारला. दुर्दैवाने भ्रष्टाचार, वशिलेबाजी, लायकीचा अभाव आणि सर्वांत जास्त मुल्ला मौलवींची मनधरणी तसेच आर्थिक आघाड्यावरील पराभव ह्यातून मुस्लिम मूलतत्त्ववादाचा उदय व उत्कर्ष झाला. त्यांनीही हीच वेळ आहे असे मानून सार्वजनिक जीवनात इस्लामचा अधिकाधिक शिरकाव करून घेतला.
मुसलमानी समाज धर्मनिरपेक्ष वागू शकतात याची चिह्ने इराण इस्लामिक रिपब्लिकमध्ये दिसतात हे नवल म्हटले पाहिजे. पाश्चात्त्य लोकशाहीमधील अनेक तंत्रे आणि व्यवस्था इराणने स्वीकारल्या आहेत. त्यांचा तत्त्वतः म्हणा किंवा ऐतिहासिक वास्तव म्हणून म्हणा इस्लामशी काही संबंध नाही. उदा. सार्वजनिक निवडणुका, घटना समिती, लोकसभेचा अंगीकार इतकेच नव्हे तर १९५८ च्या फ्रेंच राज्यघटनेपासून प्रेरणा घेऊन बनविलेली आपली (इराणची) राज्यघटना.
इस्लामची निर्मिती आर्थिक वैफल्यातून झाली. ही इस्लामची पारंपरिक भलावण करणारी समजूत प्रत्यक्ष प्रमाणांच्या कसोटीला उतरत नाही. उलट इस्लामी जगतातील जवळ जवळ सर्व राज्यकर्त्यांच्या ज्या चुका झाल्या (राजकीय-तसेच आर्थिक) त्याचे इस्लामी धर्मधुरीणांनी चांगलेच भांडवल करून आपले स्तोम वाढवण्यात चांगलीच हषारी दाखवली. यावरून दिसते की जे जनतेला उत्तरदायी प्रातिनिधिक लोकशाही सरकार तेच काय ते आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि कट्टरतावाद्यांच्या शिडातील हवा काढून घेऊ शकते. नागरिकांना आपल्या वाजवी तक्रारी व्यक्त करायला लोकशाहीत वैध मार्ग असतो त्यामुळे दोष दूर करून सुधारणा शक्य होते. त्यांचे जीवन सुसह्य होते. तुर्कस्तानचा आंशिक अपवाद सोडला तर संपूर्ण इस्लामिक जगतात एकही स्थिर लोकशाही नाही. दडपशाही राजवटींमधील मुस्लिम नागरिक मग इस्लामी धर्मधुरीणांकडे आर्थिक आणि नैतिक आधारासाठी डोळे लावून बसतात. (४) पाश्चात्त्यांमध्ये निधर्मीकरण कसे आले यापासून धडा घेणे, पुढील उपायांना अधिक चालना देणे.
(i) कुराणाची चिकित्सा.
2.विवेकीपणाला साधक होईल असे धर्मनिरपेक्ष शिक्षण.
3.मुस्लिम समाजांमधील गैरमुस्लिमांना संरक्षण देऊन धर्मबहुलतेचे समर्थन.
(iv) निधर्मी लोकशाहीला उत्तेजन देणे ह्र हुकूमशाहीला नाही.
(v) आत्मसमीक्षेची गरज पाश्चात्त्य ख्रिस्ती समाजात निधर्मीकरण कसे झाले?
त्यातली काही कारणे अशी :
एकूणच ज्ञानभांडारात वाढ होणे आणि विशेषतः विज्ञानविषयक ज्ञानात भर पडणे. परिणामी विवेक हा निकष धार्मिक सिद्धान्तांनाही लावता येणे. ज्यामुळे भयंकर उलथापालथ झाली. बायबलमधील वाक्ये-वचने अक्षरशः सत्य आहेत असे समजण्याच्या वृत्तीला बायबल ह्नसमीक्षेने आळा बसला. धार्मिक विविधता व आपोआप परधर्मसहिष्णुता वाढली. चॅडविक हे व्यासंगी विद्वान म्हणतात की एकदा का एका गटात तुम्ही समता प्रदान केली की, तुम्ही तेथेच (त्या गटात) थांबू शकत नाही. उदा. तुम्ही तो अधिकार प्रॉटेस्टंटानाच बहाल करून भागत नाही; पुढे कक्षा वाढवून ख्रिस्ती-धर्म ही मर्यादाही ठेवू शकत नाही; आणखी पुढे जाऊन ईश्वर मानणारे ह्र आस्तिक तेवढे आपले ह्र असे म्हणू शकत नाही. एखाद्या पंथामधील विचारस्वातंत्र्य पुढे अख्ख्या धर्माचेच विचारस्वातंत्र्य बनून जाते. ख्रिस्ती मतातील सदसद्विवेकाची उत्क्रान्ती समस्त युरोपला धर्मनिरपेक्ष बनवून गेली. याचा अर्थ राज्याने एकतर सर्वधर्मसमभाव ठेवावा नाहीतर ‘धर्मनिरपेक्ष व्हावे’.
ह्न कोणाही नागरिकाला सामूहिक दडपणाला बळी पडावे लागू नये ह्याची खबरदारी घ्यावी.
(i) पाश्चात्त्यांनी केलेल्या निधर्मीकरणाच्या प्रक्रियेपासून आपण कोणता बोध घेऊ शकतो? पहिली गोष्ट म्हणजे आपण (इब्न वर्राक) जे मुक्त पश्चिमी मुलखांमध्ये राहतो आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि विज्ञाननिष्ठ सत्यशोधनाचे स्वातंत्र्य उपभोगतो ह्र त्या सर्व मुस्लिमांनी इस्लामकडे चिकित्सक बुद्धीने पाहण्याला, कुराणाच्या समीक्षेला उत्तेजन द्यावे. कुराणाची समीक्षा हीच काय ती मुसलमानांना धर्मग्रंथाकडे अधिक विवेकपूर्ण अन् वस्तुनिष्ठपणे पाहायला प्रवृत्त करेल; त्यामुळे कुराणातल्या थोड्या असहिष्णु आयातींनी धर्मांध होऊन जाण्यापासून परावृत्त करेल. इस्लाममध्ये धर्मसुधारणेला वावच नाही असे खेदाने म्हणायचे आणि त्याचवेळी थहू ख रा प अ चीीश्रळा सारख्या ग्रंथावर बहिष्कार घालायचा ह्र ते न करता राजकीय नेते, पत्रकार अन् विद्वानदेखील मुस्लिमांच्या हळव्या धार्मिक समजुतींना न दुखावण्याबद्दल विशेष दक्ष असतात. प्रबोधनाच्या मूल्यांपासून दूर राखून आपण इस्लामची सेवा बजावीत नाही आहोत.
(ii) इस्लामी समाजांमध्ये गैरमुस्लिमांना संरक्षण देऊन आपण धर्मबहुलतेच्या तत्त्वाला उत्तेजन देत आहोत. त्यातूनच पुढे सार्वत्रिक बहुविधतेला आवाहन होईल. णऊक्ठ च्या कलम १८ चा आग्रह धरण्यात हह्न प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहे, तसेच सदसद्विवेकाची आणि धर्माचरणाची मोकळीक आहे. “ह्यात धर्म वा विश्वास बदलता येण्याचे स्वातंत्र्य निहित आहे.” गह्न असे म्हणण्यात आपण धर्मांधांची पकड सैल करत असतो. चॅडविक्च्या शब्दांत आपण सर्व (धर्म)मतांना मुक्तद्वार दिलेले असते ह्न ह्यालाच मतमतांतरांची लोकशाही म्हणतात.
(iii) आपण शिक्षणाने विवेकशक्तीची वाढ करू शकतो. अर्थात निधर्मी शिक्षणाने. ह्याचा अर्थ धार्मिक मद्रशांना टाळे लावणे. तेथे गरिबांची छोटी मुले केवळ कुराण पाठ करत असतात. ती जिहादचा सिद्धान्त घोकत असतात. थोडक्यात ती धर्मांधतेचे धडे गिरवत असतात. उदा. पाकिस्तानी सरकार आपल्या सर्व नागरिकांना मोफत शिक्षण, आर्थिक सुस्थिती पुरवण्यात असमर्थ झाले. त्यातून मद्रशांचे पेव फुटले. तेथे गरीब मुलांना थोडे फार शिक्षण अन् फुकट जेवण दिले जाते. त्यांचे आईबाप तेवढेही देऊ शकत नाहीत. पाकिस्तानातील हे बहुतांश मद्रसे सौदी अरेबियाच्या पैशावर चालतात हे उघड आहे.
पाश्चात्त्य (उदा. अमेरिकन) सरकारांनी सौदी अरेबियांचा हा तात्त्विक अन् आर्थिक प्रभाव सर्वशक्तीनिशी दूर केला पाहिजे. त्याऐवजी ह सर्व बाल-बालिकांना मोफत धर्मनिरपेक्ष शिक्षण पुरविण्याच्या कामी मदत केली पाहिजे. हे सूत्र ठेवून पाश्चात्त्य मदत दिली जावी. शिक्षण कसे ? तर जे शिक्षण विवेकयुक्त विचार करायला शिकवते, चिकित्सक विचारसरणी वाढवते, असे हवे.
(iv) अनेकता (Pluralism) वाढवण्याकरिता, मला वाटते सर्व बालकांना इस्लामपूर्व ऐतिहासिक वैभवी कालखंडाचा समावेश असलेला अभ्यासक्रम शिकवला जावा. तरीही शिक्षणाने सर्व प्रश्न सुटतील असे नाही. कित्येक लाखोंच्या संख्येने तरुण सुशिक्षित लोक कामधंद्याचा शोध घेण्यासाठी दरवर्षी बाहेर पडतात. पण त्यांनी शिक्षणानंतर ज्या आर्थिक स्थैर्याची स्वप्ने पाहिली तिची दारे त्यांच्यासाठी खुली होत नाहीत. जे शिक्षण संपादन केल्यावर अन्ती कोणतीच आर्थिक संधी मिळत नाही ह्न ते सामाजिक वैफल्याला कारणीभूत होते.
ह्यातून फायदा होतो फक्त मूलतत्त्ववाद्यांचा!
(v) आत्मसमीक्षा:- आपल्या सर्व दुखण्यांचे खापर पाश्चात्त्यांच्या डोक्यावर फोडत राहिले तर इस्लामी देश कधीही प्रगती करू शकणार नाहीत. स्वतःचा काहीएक प्रभाव असून जो वरीलप्रमाणे आत्मसमीक्षा करू शकतो असे नेतृत्व इस्लामला हवे आहे. तो आपल्या चेल्यांना हे म्हणू शकला पाहिजे की, “दोष आपल्या दैवगतीचा नाही, तो आपलाच आहे. आपणच दुय्यम ठरतो. कोणी तथाकथित साम्राज्यवादी अथवा निपुण कपटनीतिनिपुण यहुदी, ह्याला कारण आहे असे नाही; नेते लोकांना लोकशाहीकडे नेऊ शकले पाहिजेत. ते एक सभ्य-सुसंस्कृत राज्य निर्माण करू शकायला हवेत, जेथे सर्वांना समान नागरी कायदा असेल. त्यात धार्मिक संस्थांचा वरचष्मा नसावा. मात्र नागरिकांना धार्मिक श्रद्धा आणि यथेष्ट धर्माचरणाची मुभा असावी. त्यांना कायदे करण्याचा अधिकार असावा. त्यात सर्व नागरिकांचे हह्न स्त्री-पुरुष, मुस्लिम-गैरमुस्लिम-ह्यांचे अधिकार समाविष्ट असावेत. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइटस् (UDHR) च्या नमुन्यावर ते ग्रथित व्हावेत. युनोच्या विविध अंगोपांगांचे निर्देश त्यांत पाळले जावेत. ह्या विधिमंडळांनी मोफत ह्र धर्मनिरपेक्ष शिक्षण हह्न सर्वांसाठी समान दिले जाईल ह्याची खबरदारी घ्यावी. त्यांना World Trade Organisation जागतिक व्यापार संघटनेशी वाटाघाटी वा करारमदार करता यावेत. त्यांना खचक्र जागतिक द्रव्य-निधीच्या मदतीने स्वदेशाला आर्थिक सुबत्तेच्या मार्गावर नेणे शक्य होईल. पाश्चात्त्यांनी आजवर विनाअट, जे अखंड साहाय्य सौदी अरेबियाला दिले ते तपासले पाहिजे. सौदीअरेबियाच (मूलतत्त्ववादी) कट्टर इस्लामच्या वाढीसाठी जबाबदार आहे. टोनी ब्लेअर आणि जॉर्ज बुश ह्यांच्यासारखे दोन बिनीचे नेते, त्यांनी १९४५ नंतर आजवर कोणी केले नसेल इतके धर्माचे सार्वजनिक जीवनात प्रस्थ वाढवले ते पाश्चात्त्य इस्लामी जगात निधार्मिकता वाढवतील ? जेम्स मॅडिसनच्या त्या वचनाची आठवण मी त्यांना देऊ का?
सामान्यांच्याह्नसार्वजनिक सरकारलाह्नलेशमात्र अधिकार नव्हे की त्याने धर्माच्या नावे लुडबूड करावी. त्याने थोडा देखील हस्तक्षेप केला तर ते एक अतोनात दांडगाईचे सत्ताग्रहण ठरेल. [मूळ लेख ताहेरभाई पूनावाला – पुणे, ह्यांच्या सौजन्याने प्राप्त]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.