विज्ञानाने श्रद्धेशी बोलावे का?

क्राऊसःतुम्ही आणि मी दोघेही या विश्वाबद्दलच्या आपापल्या वैज्ञानिक आकलनासंबंधी आणि लोकांना विज्ञानात रस यावा या हेतूने बरेच बोलत-लिहीत असतो. यामुळे वैज्ञानिक धर्माबद्दल मते व्यक्त करताना त्यांचे उद्दिष्ट काय असते, हा प्रश्न विचारणे योग्य ठरते. कशाला जास्त महत्त्व द्यावे याबद्दल माझा जरा गोंधळ आहे, विज्ञान आणि धर्म यांच्यातला फरक सांगताना विज्ञानाबद्दल काही शिकवावे, की धर्माचे स्थान ठरवून द्यावे, ह्यांमध्ये. बहुधा माझा भर विज्ञान समजावून देण्यावर असतो, तर तुमचा धर्माची जागा दाखवून देण्यावर.
मी असे का म्हणतो ते सांगतो. लोकांना काही शिकवायचे असेल तर त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या भूमिका, धारणा समजून घ्याव्या लागतात, आणि मगच त्यांना आपल्या भूमिकेकडे आकर्षित करून घेता येते. मी शिक्षकांना नेहेमी सांगतो, की त्यांच्या विषयांत विद्यार्थ्यांना रस आहे असे मानणे चुकीचे असते. शिकवणे हे डशीलींळेप सारखे, वशीकरणासारखे असते. उलट दिशेला लोकांना त्यांच्या धारणा चुकीच्या आहेत असे सांगणे, “मी खरे काय ते सांगतो’ असे म्हणणे ; याने शिकवणे अशक्य होऊन बसते. पण त्याचवेळी हेही मान्य करायला हवे, की धर्माला योग्य अशा संदर्भचौकटीत बसवायच्या दृष्टीने धक्कातंत्राने त्यांना त्यांच्या श्रद्धा तपासायला लावणेही उपयोगी आहेच.
डॉकिन्सः माझा कल आहे ‘धर्म हे वाईट विज्ञान आहे’ असे म्हणण्याकडे, तर तुमचा आहे ‘धर्म विज्ञानाला दुय्यम असतात’ असे म्हणण्याकडे. त्यामुळे आपल्या वृत्तींमध्ये थोडातरी फरक असणारच. शिकवणे हे वश करून घेण्यासारखे असते, आणि त्यामुळे सुरुवातीलाच श्रोत्यांना धक्का देऊन दुरावा उत्पन्न करणे हे वाईट धोरण असू शकते, हे तुमचे म्हणणे मला मान्य आहे. एखादेवेळी मी माझे वशीकरण-तंत्र सुधारू शकेन. पण खोटारडा वशीकरण करणारा कोणालाच आवडत नाही. आणि तुम्हीही ‘लोकांपर्यंत पोचण्यासाठी’ काय कराल, याला मर्यादा आहेत. पृथ्वी सपाट आहे म्हणणाऱ्यांशी तुम्ही बहुधा संवाद साधायचा प्रयत्न करणार नाही. पृथ्वी सहाएक हजार वर्षे जुनी आहे आणि सारी जीवसृष्टी देवाने घडवली, असे मानणाऱ्यांशीही तुम्ही भिडणार नाही. पण देवाने खूप पूर्वी विश्व सुरू करून दिले, आणि अधूनमधून उत्क्रांतीत हस्तक्षेप केला, असे मानणाऱ्यांपर्यंत पोचायचा प्रयत्न तुम्ही कराल. मला वाटते की आपल्यातला फरक गुणात्मक नसून प्रमाणाचा आहे. तुम्ही माझ्यापेक्षा जरा जास्त लोकांजवळ जाल, पण फार नाही.
क्राऊराः गला लोकांपर्यंत पोचण्याची गाझी कल्पना जरा स्पष्ट करू द्या. गी गैररागजुतींना शरण जाणार नाही, पण गैरसगजुती दाखवून द्यायचे आकर्षक गार्ग शोधेन. उदाहरण देतो गी देवाने राजीव सृष्टी उत्पन्न केली म्हणणाऱ्यांशीही वाद घातले आहेत, आणि परग्रहावरची ‘माणसे’ इथल्यांना पळवून नेतात असे म्हणणाऱ्यांशीही भिडलो आहे. दोन्ही गटांची, स्पष्टीकरण म्हणजे काय याबाबतची, धारणा चुकीची असते. त्यांना वाटते की सारे काही समजले नसेल तर काहीच समजलेले नाही. वाद घालताना कुठली तरी फारशी ज्ञात नसलेली घटना शोधून काढतात. १९६२ साली आऊटर मंगोलियातल्या काही लोकांना एका चर्चवर तरंगती उडती तबकडी दिसली, हे मला माहीत आहे का, असे ते विचारतात. मी जर ‘नाही’ म्हटले, तर ते म्हणतात की अशा सगळ्या घटनांचा अभ्यास न करता मी परग्रहवासी पृथ्वीवरच्यांचे अपहरण करणे असंभवनीय आहे असे म्हणू शकत नाही.
मी एका गटाचा वापर करून दुसऱ्या गटाला स्वतःचे म्हणणे तपासायला लावू शकतो. मी उत्पत्तिवाद्यांना िदेवाने सर्व सजीव सृष्टी रचली असे मानणाऱ्या, उीशरींळेपळी लोकांना से विचारतो, “तुमचा उडत्या तबकड्यांवर विश्वास आहे का?” ते नेहेमीच “नाही’ म्हणतात. मग मी विचारतो, “का बरं? तुम्ही उडत्या तबकड्यांचे सगळे दावे तपासले आहेत?’ असेच उडत्या तबकड्यावाल्यांना मी सहा हजार वर्षांची पृथ्वी आणि उत्पत्तिवादाबद्दल विचारतो. तेही आपण वैज्ञानिक वृत्तीचे आहोत असे दाखवायला “नाही’ म्हणतात. मग मी त्यांना सगळे दावे तपासले का ते विचारतो.
मुद्दा असा, की दोन्ही गट उपलब्ध पुराव्यांच्या प्रचंड साठ्याच्या तात्त्विक अपेक्षांबद्दल जाणतात, आणि हे विरोधी पुराव्याच्या सर्व घटना न तपासताही घडते. ही युक्ती बहधा लागू पडते फक्त तबकड्यावाले जर उत्पत्तिवादीही असले, तर मात्र ती वाया जाते!
डॉकिन्सः मला आवडली तुमची ‘लोकांपर्यंत पोचण्याची’ उकल, पण एक सूचना देऊन ठेवतो, की गैरसमज फार सहजपणे उद्भवतात. मी न्यूयॉर्क टाइम्स साठी एका पुस्तकपरीक्षणात लिहिले, “तुम्हाला जर उत्क्रांतीवर माझा विश्वास नाही असे सांगणारा कोणी भेटला, तर तो अज्ञानी किंवा मूर्ख किंवा वेडा (किंवा दुष्ट पण मी त्यात शिरत नाही) आहे, असे म्हणण्यात काही धोका नाही.” हे वाक्य पुनःपुन्हा मी असहिष्णु, मनाची कवाडे बंद असलेला, तापट, भकेल माणूस आहे, याचा पुरावा म्हणून सांगितले गेले आहे. पण वाक्य नीट पाहा ते वशीकरणाच्या हेतूने घडवलेले नाही, पण ते साधे तथ्यवचन आहे, हे तुम्ही जाणता.
अज्ञान हा गुन्हा नाही. कोणी अज्ञानी असण्याचा उल्लेख करणे हा त्याचा अपमान नाही. ज्ञानाच्या कक्षेत येणाऱ्या बहुतेक गोष्टींबद्दल आपण सगळेच अज्ञानी असतो. मला बेसबॉलबद्दल काहीही माहीत नाही, आणि तुम्ही बहधा क्रिकेटबद्दल अज्ञानी आहात. जेव्हा हे विश्व सहा हजार वर्षेच जुने आहे असे सांगणाऱ्याला मी अज्ञानी म्हणतो, तेव्हा मी तो मूर्ख नाही, वेडा नाही, दुष्ट नाही, असे म्हणून त्याची स्तुतीच करत असतो.
क्राऊसः तुमचे म्हणणे मला पूर्णपणे पटते. अज्ञान ही समस्या आहे, पण ती सोडवणे सर्वांत सोपे आहे. एखाद्या वैज्ञानिक मुझ्याबद्दल अज्ञानी आहे असे म्हणणे, हे शिवी देणे नाही.
डॉकिन्सः आणि मी हे मान्य करतो की मी जास्त सौम्यपणे हे सांगू शकलो असतो. वश करण्याच्या भावनेने लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करता आला असता. पण याला मर्यादा आहेत. तुम्हीही असे म्हणणार नाही, “प्रिय सहा हजार वर्षांची पृथ्वी मानणाऱ्या, मला तुझ्या या विश्वासाबद्दल पूर्ण आदर आहे. परंतु मी नम्रपणे, सौम्यपणे असे सुचवतो की तू भूगर्भशास्त्राची, किरणोत्सर्गातून कालमापनाची, विश्वोत्पत्तिशास्त्राची, पुरातत्त्वशास्त्राची, इतिहासाची किंवा प्राणिशास्त्राची पुस्तके वाच अर्थातच बायबलही वाच. तुला मजा तर येईलच, पण तुला बहुतेक सुशिक्षित लोक, अगदी देवशास्त्रीही, पृथ्वीचे वय हजार वर्षांऐवजी अब्ज वर्षांमध्ये का मोजतात ते कळेल!
“मला श्रोत्यांना वश करायचे एक वेगळे धोरण सुचवायचे आहे. बुडू (वेशि) मतांचा आदर करण्याऐवजी जरा कठोर प्रेम वापरूया? तरुण पृथ्वी-उत्पत्तिवाद मानणाऱ्याला त्याचे विश्वास आणि वैज्ञानिकांचे, यांच्यातली प्रचंड विसंगती नाट्यमय रूपात सांगायची. “सहा हजार वर्षे आणि ४.६ अब्ज वर्षे, हा लहानसाच फरक नाही. मित्रा, तू न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को हे अंतर ३,४०० मैलांऐवजी ७.८ गज आहे, असे म्हणण्यासारखे बोलतो आहेस. वैज्ञानिकांशी मतभेद असण्याचा तुझा हक्क अर्थातच मला मान्य आहे. पण तुझा मतभेद किती मोठा आहे हे सांगणारे अंकगणित सांगण्याने तू कष्टी किंवा अपमानित होणार नाहीस, असे वाटते.’
क्राऊस: तुमचे म्हणणे ‘कठोर प्रेम’ वाटत नाही. ते सर्जनशील वश करण्याचे, गैरसमजांच्या प्रचंड प्रमाणाकडे लक्ष वेधण्याचे माझेच तंत्र आहे. काही लोक नेहेमीच भ्रमात राहणार, मग तथ्ये काहीही असोत. पण आपण त्यांना गाठायचा प्रयत्न न करता खुल्या मनाने विज्ञानाचा विचार करणाऱ्या, पण वैज्ञानिक पुरावे माहीत नसलेल्या बहुसंख्य अशा सामान्य माणसांपर्यंत पोचायचा प्रयत्न करायला हवा. या संबंधात मला एक वेगळा प्रश्न विचारू द्या बहुधा तुमच्या भावना त्याबद्दल आणखीनच तीव्र असतील. विज्ञान श्रद्धेला श्रीमंत करू शकेल का? की नेहेमीच श्रद्धेचे उच्चाटन करू पाहील ?
नुकतेच एका कॅथलिक विद्यालयात विज्ञान आणि धर्म ह्याबाबतचा परिसंवाद ऐकताना मला हा प्रश्न सुचला. मी भाषण देण्याचे मान्य केल्यावर मला सांगितले गेले की विषय विज्ञानातून श्रद्धेचे श्रीमंतीकरण’, Science Enriching Faith, असा आहे. आधी मी अस्वस्थ झालो, पण जास्त विचार केल्यावर मला विषयामागचा युक्तिवाद जास्तजास्त पटू लागला. अनेकांच्या मनामध्ये थेट पुरावा नसतानाही दैवी बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवणारा एक घटक असतो; आपल्याला हे आवडो की न आवडो. आपण मानवजातीतून धर्मश्रद्धेचे उच्चाटन करू शकणार नाही तसे रोमँटिक प्रेमाचेही, आणि इतर अविवेकी पण मूलभूत अशा बोधनाच्या काही घटकांचेही. या बाबी विवेकी वैज्ञानिक घटकांच्या काटकोनात आहेत, म्हणून त्या खोट्या ठरत नाहीत. आपल्या माणुसकीच्या विचारांमध्ये या घटकांचेही कौतुक करणे प्राप्त आहे.
डॉकिन्सः जरा वेगळ्या दिशेने विवेकवाद्यांमध्ये मानवजातीबद्दलच असा निराशा-वादही लोकप्रिय आहे, अगदी आत्मपीडनाच्या, masochism च्या पातळीचा. तुम्ही, त्या परिसंवादातले इतर सहभागी, सारे जणू मानव नेहेमीच अविवेकी असतो या कल्पनेच्या प्रेमात पडलात. पण मला रोमँटिक प्रेम, कविता आवडणे, जगणे सार्थ करणाऱ्या अनेक भावना, यांचा अविवेकाशी संबंध आहे असे वाटत नाही. या बाबी विवेकाशी काटकोनात नाहीत, फारतर त्या स्पर्शरषा, रिपसशपीी आहेत; आणि तुमच्याइतकाच मीही या घटकांचा पुरस्कर्ता आहे; पण थेट अविवेकी विश्वास आणि अंधश्रद्धा या घटकांपेक्षा वेगळ्या बाबी आहेत. अविवेकी श्रद्धा, अंधश्रद्धा कधी हटवताच येणार नाहीत, त्या आपल्या मनुष्यस्वभावाचा अविभाज्य भाग आहेत, हे मात्र खरे नाही ना तुमच्याबद्दल, ना तुमच्या त्या परिसंवादातल्या सहकाऱ्यांबद्दल. मग एकूणच माणसे अविवेक अंधश्रद्धापलिकडे जाऊच शकणार नाहीत असे मानणे म्हणजे माणसांना कमी लेखणे नव्हे का ?
क्राऊसः मी अविवेकी श्रद्धांपासून, कमीत कमी स्वतःबाबतच्या अविवेकी श्रद्धांपासून मुक्त होईन, याची मला तितकीशी खात्री नाही. पण जर धर्मश्रद्धा हा अनेकांच्या जीवनानुभवाचा मध्यवर्ती भाग असेल, तर प्रश्न वेगळा आहे. आपण देवकल्पना जगातून नाहीशी करू शकतो का हा प्रश्न नाही आपण विज्ञानाच्या माध्यमातून ती श्रद्धा सौम्य करून धार्मिक मूलतत्त्ववादाची सर्वांत हानिकारक आणि अविवेकी अंगे किती छाटून टाकू शकतो, हा प्रश्न आहे. विज्ञानातून असे करण्याने श्रद्धा श्रीमंत होईल.
त्या कॅथलिक गटापुढे भाषण देताना मी तुमच्या ताज्या पुस्तकापासून स्फूर्ती घेतली, आणि माहितीत आधीच निवड न करण्याचे उदाहरण दिले. आपण आपल्या मतांशी जुळणारी, सोईस्कर माहितीच फक्त निवडायची, असे करू शकत नाही. बायबल सांगते की समलिंगी व्यवहार अभद्र आहे, या कारणासाठी जर आपण तसे मानणार असलो, तर बायबलातील इतर गोष्टीही मानायला हव्यात आज्ञाभंग करणाऱ्या संततीला जिवे मारायची परवानगी, अपत्यप्राप्तीसाठी इतर कोणी जवळ नसल्यास मुलीने वडलांची शेजसोबत करायची परवानगी, इत्यादी. आणि अनेकदा धर्मग्रंथांचे शब्दश: अर्थ घेणे चुकीचे आहे, हेही विज्ञानाच्या मदतीने सिद्ध करता येते. बायबल स्त्रीला पुरुषाची मालमत्ता माना असे सुचवते, तर जीवशास्त्र स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या जीवशास्त्रीय भूमिका आणि बौद्धिक क्षमतांचे ज्ञान देते. गॅलिलिओ म्हणाला होता की देवाने माणसांना बुद्धी दिली तेव्हा ती निसर्गाच्या अभ्यासासाठी वापरली जावी अशी त्याची इच्छा असणारच. तर यातूनही विज्ञान श्रद्धेला श्रीमंत करू शकते.
कार्ल सेगनने विज्ञानापासूनच आणखी एक लाभ अत्यंत नेमक्या सुसंगतपणाने सांगितला होता. सेगनही तुमच्या-माझ्यासारखाच अश्रद्ध होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याने १९८५ मध्ये स्कॉटलंडमध्ये दिलेल्या गिफर्ड व्याख्यानांचे पुस्तक निघाले. व्याख्याने विज्ञान आणि धर्म या विषयावर होती. त्यात सेगन म्हणाला की प्रमाण धर्मांनी कौतुकाश्चर्याचा भाव फार मर्यादित, ह्रस्वदृष्टीचा, रोळिल केला. खऱ्या देवाला एकच जग फार लहान ठरेल. विज्ञानाने दाखवलेल्या विश्वाचा प्रचंड पसारा फार महान आहे. आज भौतिकीतली नव्याने सुचणारी तत्त्वे पाहता एकच विश्वही फार लहानखुरे ठरेल, आणि आपल्याला विश्वांच्या संचांचा विचार करायला शिकावे लागले. पण मी याचा अर्थ विज्ञान श्रद्धेला आधार पुरवते असा मात्र घेत नाही विज्ञान तसे करते असे मला मुळीच वाटत नाही.
डॉकिन्सः मला सेगनची मांडणी आवडते. तुम्हीही तोच भाग निवडला याचा मला आनंद वाटतो. त्याच्या पुस्तकाच्या वेष्टनावर प्रकाशकांनी मला लिहायला सांगितले. मी लिहिले, “सेगन धार्मिक माणस होता का ? तो त्यापेक्षा खूप जास्त काही होता. त्याने पारंपरिक धार्मिकांचे मर्यादित, मध्ययुगीन जग मागे टाकले. देवशास्त्री, धर्मगुरु, मुल्लामौलवींचे आत्मिक दारिद्र्यात खितपत पडलेले जग मागे टाकले. हे सारे त्याने त्यागले, कारण त्याला ज्याबद्दल धार्मिक व्हावेसे वाटले ते फार मोठे होते. त्या लोकांच्या कांस्ययुगीन दंतकथा, मध्ययुगीन अंधश्रद्धा, पोरकट इच्छाधारित विचार, सारे त्यागले. त्याला विश्व मिळाले.” विज्ञानाने श्रद्धा श्रीमंत होईल का, याबद्दल मला इतर काही सांगायचे नाही. तुम्ही, सेगन, म्हणता त्या अर्थाने ते घेता येईल. पण मला चुकूनही कोणाला मी श्रद्धेचे समर्थन करतो असे वाटून नको आहे.
क्राऊसः शेवटी मला वैज्ञानिकांमधल्या धर्माबाबतच्या आजच्या चर्चेला मध्यवर्ती असलेला एक मुद्दा मांडायचा आहे. मुळात धर्म स्वभावतः वाईट असतात का? माझी याबाबतीतली मते काळासोबत बदलली आहेत. तुम्ही एखादेवेळी मी नरम पडलो आहे असे म्हणाल. धर्मांच्या नावाने अनेक अत्याचार झाले आहेत, हे खरेच आहे. मी, तुम्ही, अनेकदा म्हणालो आहोत की देव आपल्या पक्षाचा आहे असे मानल्याशिवाय उंच इमारतींवर विमाने आपटायला कोणी धजणार नाही. वैज्ञानिक म्हणून माझी भूमिका अशी की धर्मश्रद्धेतून लोक जगाचे खोटे चित्र इतरांना शिकवू जातील तेव्हा मी विरोध करायला हवा. याबाबतीत इतर कोणत्याही अध्यात्मिक धारणांसारखेच स्थान धर्मश्रद्धांचेही आहे. विशेषतः या धारणा चुकीच्या असतील तेव्हा त्या धर्मश्रद्धा आहेत म्हणून त्यांचा मान राखणे बरोबर नाही. पृथ्वी सहा हजार वर्षेच जुनी नाही. सूर्य आकाशात थांबत नाही िरामसेतू मानवनिर्मित नाही! स. पण इथे आपण श्रद्धा, धर्मश्रद्धा मिरवत नाही आहोत अज्ञान मिटवतो आहोत. श्रद्धा ज्ञानाला आव्हान देते तेव्हाच ती शत्रु ठरते.
डॉकिन्सः आपल्यांत एकमत आहे. मी नैतिक मुद्द्यांची चर्चा धर्मश्रद्धांच्या खरेखोटेपणापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत, असे मानत नाही. त्या धर्मश्रद्धा खोट्या असतात, असे मी म्हणत नाही, कारण खोटेपणात फसवायची इच्छा असते. नुकतीच माझी दूरदर्शवर माजी तंत्रज्ञानमंत्री असलेल्या, स्वतःला ख्रिस्ती मानणाऱ्या टोनी बेन या ब्रिटिश राजकारण्याशी मुठभेड झाली. चर्चेत असे दिसले की त्याला ख्रिस्ती श्रद्धा खऱ्या की खोट्या ह्यात रस नव्हता, फक्त त्यांच्या नैतिक असण्या-नसण्यात होता. विज्ञानाच्या अभ्यासातून नैतिक काय याबद्दल मार्गदर्शन मिळत नाही, हा त्याचा मुख्य आक्षेप होता. मी विज्ञान नीतीबद्दल नाही असे म्हटले तेव्हा बेनने जवळपास गला “गग त्याचा उपयोग तरी काय ?” असे विचारले. डॅनिएल डेनेट हा तत्त्वज्ञ याला “श्रद्धेवर श्रद्धा असणे’ म्हणतो. आणखी काही लोक धर्मश्रद्धा खऱ्या की खोट्या यापेक्षा त्या श्रद्धा (आपत्तीत) दिलासा देतात आणि जीवनाला कारण पुरवतात, हे महत्त्वाचे मानतात. मला वाटते आपण माणसांनी कुठूनही दिलासा मिळवणे, आधार मिळवणे, याच्या विरोधात नाही. त्यांना नैतिकतेत धर्म हा होकायंत्रासारखा दिशादर्शक वाटत असेल, तर त्यालाही आपला आक्षेप नाही. पण आपल्या विचारांमध्ये धर्मांचे दिलासा-मूल्य, किंवा नैतिकता-मूल्य हे त्यांच्या सत्यासत्यतेपासून वेगळे असायला हवे. मला हे धार्मिक लोकांना पटवून देणे बरेच जड जाते. यामुळे असे वाटते की आपल्यासारख्या विज्ञानातर्फे वशीकरण करणाऱ्यांना खडतर चढाव चढायचा आहे!
[लॉरेन्स एम. क्राऊस, ङ. च. घीमी हे केस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांची विज्ञानावर सात लोकप्रिय पुस्तके आहेत, आणि ते विज्ञान आणि सार्वजनिक धोरण यावर भाषणे देतात. रिचर्ड डॉकिन्स, ठ. अज्ञळपी हे ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांची नऊ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, ज्यांपैकी द सेल्फिश जीन आणि ताजे द गॉड डेल्यूजन ही अत्यंत महत्त्वाची आहेत. डॉकिन्स रॉयल सोसायटी आणि रॉयल सोसायटी फॉर लिटरेचर या दोन्हींचे सदस्य आहेत. त्यांचे हे संभाषण जुलै २००७ च्या सायंटिफिक अमेरिकन मध्ये शुड सायन्स स्पीक टु फेथ ? या नावाने प्रकाशित झाले.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.