IPCC – AR – 4

पृथ्वीचे तापमान वाढते आहे आणि त्यामुळे भविष्यात हवामान बदलणार आहे, अशी चर्चा वैज्ञानिकांमध्ये अनेक वर्षे सुरू आहे. या चर्चेत एक महत्त्वाचा प्रश्न असा, की हे मानवी व्यवहारांमुळे घडते आहे की मानवेतर निसर्गातील बदलच यामागे आहेत.
हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जर वाढणारे तापमान आणि बदलणारे हवामान अनिष्ट परिणाम घडवत असेल, तर त्याबाबतची जबाबदारी ठरवायला हवी, आणि उपाय ही सुचवायला हवेत. काही देशांच्या व्यवहारांमुळे सर्व मानवजातच नव्हे, तर सर्व सजीव सृष्टीही धोक्यात येते आहे, असे म्हणणारे वैज्ञानिक बराच काळ अल्पमतात होते. “ते उगीच घाबरवत आहेत. खरे तर नैसर्गिक कारणांमुळे थोडेफार बदल होत आहेत. त्या बदलांमध्ये माणसांचा हात तर मुळीच नाही आणि त्यामुळे आपण काही करायची गरज नाही,’ ही भूमिका घेणारे शास्त्रज्ञ बहमतात होते. हे बहतेक शास्त्रज्ञ अमेरिका, युरोप, जपान वगैरे श्रीमंत देशांमधले होते आणि खरे तर श्रीमंत देशांनाच हवामानाचा अभ्यास परवडतो!
पण गरीब देशांमध्ये हवामान जास्त महत्त्वाचे असते, कारण त्या देशांमध्ये शेतीवर अवलंबून असलेल्यांचे प्रमाण श्रीमंत देशांमधील शेतकऱ्यांच्या प्रमाणाच्या कैक पट असते. हळूहळू गरीब देशच नव्हे, तर पर्यावरणाला महत्त्वाचे मानणारे श्रीमंत देशांमधील शास्त्रज्ञही हवामानबदलाची जबाबदारी मानवी व्यवहारांवर टाकू लागले. जर हवामानबदल अनिष्ट असतील, तर मानवी व्यवहारांमध्ये बदल करून अनिष्टपणा सौम्य करणे, हा एक महत्त्वाचा उपाय ठरतो. आणि एकूण चित्र असे दिसू लागले की मानवी व्यवहारांपैकी सर्वांत प्रभावी भाग होता तो श्रीमंत देशांच्या ऊर्जावापराचा. आणि श्रीमंत देश आपल्या ऊर्जावापरावर निर्बंध घालून घ्यायला तयार नव्हते. सर्वांत तीव्र विरोध होता अमेरिकेकडून. ओझोन या वायूच्याबाबतीत संरक्षण उपाय आखून देणाऱ्या क्योटो करारावर (Kyoto Protocol) अमेरिकेने आजही सही केलेली नाही. जॉर्ज डब्ल्यू. बुश म्हणतो की अमेरिकनांच्या नोकऱ्यांना धोका उत्पन्न होईल असे काहीही तो करणार नाही. याचे ‘उपप्रमेय’ असे की जग खड्डयात गेले तरी चालेल!
पण अमेरिका आणि इतर श्रीमंत राष्ट्रे जगभरातल्या माहितीच्या प्रवाहाचे नियंत्रण करतात. विसाव्या शतकाच्या शेवटच्या चौथाईत सर्व तंत्रे वापरून पर्यावरणवादी मतांना जवळपास दहशतवादाजवळ नेऊन ठेवले गेले! या कोंबडे झाकण्याने सूर्य उगवायचा मात्र थांबला नाही. जागतिक हवामानशास्त्र संघटना (वर्ल्ड मीटिऑरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन, थचज), आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण कार्यक्रम (यूनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम UNEP) यांनी मिळून एक आंतरशासकीय हवामानबदल आयोग (इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज, IPCC) घडवला. या आयोगाने आजवर चार अहवाल जगापुढे मांडले आहेत. पहिल्या (१९९०), दुसऱ्या (१९९५), तिसऱ्या (२००१) अहवालानंतरचा हा चौथा (२००२) अहवाल मात्र आधीच्या अहवालांपेक्षा बराच नावाजला गेला.
नोबेल पारितोषक समितीने अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती अॅल् गोअर आणि खझउउ यांना संयुक्तपणे शांततेचा नोबेल पुरस्कार दिला. खझउउ अहवाल कोणत्याही राष्ट्राची पत्रास न ठेवता लिहिला गेला आहे, आणि अॅल् गोअर आपल्या अॅन इन्कव्हीनियंट ट्रथ या सिनेमातून आणि अनेक भाषणांमधून श्रीमंत राष्ट्रांची जीवनशैली कशी विनाशकारी ठरू शकेल हे सांगत आहेत.
एकूण पृथ्वीच्या तापमानवाढीमागचे विज्ञान असे सूर्याकडून पृथ्वीवर येणाऱ्या ऊर्जेपैकी काही ऊर्जा ढग व वातावरणाने वरच्यावर ‘टोलवली’ जाते, आणि उरलेली पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पोचते. यामुळे जमीन व सागर यांचे तापमान वाढते आणि तेही ऊर्जा बाहेर टाकू लागतात. पण ही ऊर्जा मात्र वातावरणातले अनेक वायू ‘पकडतात’, आणि वातावरण तापते. आता वातावरण जर सूर्याकडून येणाऱ्या ऊर्जेला थेट जमीन-सागरांकडे जाऊ देते, तर जमीन सागरांकडून येणारी ऊर्जा वातावरण का पकडते? याचा संबंध आहे ऊर्जेच्या रंगा’शी किंवा तरंगलांबीशी (wavelength). सूर्याची ऊर्जा मुख्यतः दृश्य रंगपटातली (visible spectrum) असते, तर जमीन-सागर ऊर्जा अवरक्त (infra-red) किरणांद्वारे सोडतात. ऊर्जेचा हा प्रकार अनेक वायू पकडून ठेवतात. काचही अवरक्त किरणांना अडवते, म्हणून भांडी उन्हात ठेवली तर जराशीच तापतात, पण काचेआड बंद पेटीत ठेवली तर सौरचूल बनते. असेच पूर्वी युरोपात झाडांना वाढायला मदत व्हावी म्हणून काचेच्या खोल्यांमध्ये वाढवत, ह्या खोल्या हिवाळ्यातही ऊर्जा पकडून उबदार राहात. एकूण शुभ्र बर्फाने झाकलेल्या जमिनीत मध्येच या खोल्यांमधल्या वनस्पतींचा हिरवा रंग दिसे, त्यामुळे या खोल्यांना ‘हरितगृहे’ greenhouses, हे नाव पडले. आज जमीन-सागर यांनी सोडलेली ऊर्जा पकडणाऱ्या वायूंना ‘हरितगृह वायू’, greenhouse gases (GHG) म्हणतात.
आणि वातावरणातल्या GHG वायूंचा मोठा भाग आज मानवनिर्मित आहे. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, हे सारे जळून कार्बनडायॉक्साइड् (CO2) बनतो. पेट्रोल-डिझेल वाहने नायट्रोजनॉक्साइड (NO) हवेत सोडतात. भातशेती आणि मोठ्या प्रमाणातले पशुपालन हवेत मीथेन (CHA) सोडतात. या साऱ्यामुळे वातावरण तापते आणि हवामान बदलते.
IPCC चा चौथा अहवाल ‘आडाखा अहवाल चार’ (Assessment Report No. Four, AR-4) या नावाने प्रकाशित झाला आहे. त्याचा सारांश व चौकोनी कंसातील स्पष्टीकरणे असे आता देत आहोत.
अहवालाची रूपरेषा
हा अहवाल चार स्पष्टपणे वेगवेगळ्या मुद्द्यांबाबत आहे. प्रत्येक भागाचा सारांश ‘धोरणे ठरवणाऱ्यांसाठीचा सारांश’ (Summary for Policymakers, SPM) या नावाने प्रकाशित केला गेला आहे. संपूर्ण अहवालही अर्थातच प्रकाशित केले गेले आहेत.
i) कार्यगट एक (Working Group I, WG-I) हा पायाभूत भौतिक विज्ञानाच्या दृष्टीने काढलेले निष्कर्ष देतो. ii) कार्यगट दोन (WG-II) हवामानबदलाचे परिणाम, अनुरूप बदलांबाबत आडाखे आणि हळव्या मुद्द्यांबद्दलचे आडाखे मांडतो. iii) कार्यगट तीन (WG-III) हवामानबदल सौम्य करण्याच्या शक्यता तपासतो. iv) संश्लेषण अहवाल (Synthesis Report, SYR) हा धोरणे ठरवणाऱ्यांसाठीच्या सारांशाचा, डझच चा गाभा आहे.
कार्यगट एक: WG-I
“हवामानबदलाची नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे तपासून त्यांची आजची स्थिती ठरवण्यासाठी उपलब्ध वैज्ञानिक ज्ञान तपासणे, हवामान बदलांचे निरीक्षण करणे, बदलांमधील विविध कारणांचा सहभाग निश्चित करणे आणि भविष्यातील हवामानबदलाचे प्रक्षेप शोधणे” या कामासाठी हा WG-| गट घडवला गेला. चाळीस देशांमधील सहाशे शास्त्रज्ञांनी तो लिहिला, आणि सहाशेवीस शास्त्रज्ञ व सरकारी अधिकाऱ्यांनी तो तपासला. एकूण एकशे तेरा देशांच्या सरकारांनी पॅरिसमध्ये आपले प्रतिनिधी पाठवून ओळ अन् ओळ वाचून डझच चे अंतिम रूप घडवले. हा शेवटी ५ सप्टेंबर २००७ ला अद्ययावत् करवून घेतला गेला. अहवालाची प्रमुख निरीक्षणे अशी * १७५० सालापासून आजपर्यंत औद्योगिक व्यवहारांमुळे CO2, NO व CHA यांची हवेतली प्रमाणे लक्षणीय स्तराने वाढली आहेत. * गेल्या ६,५०,००० वर्षांमध्ये CO2 चे प्रमाण दर दशलक्षात १८० ते ३०० भाग असे. आज ते ३७९ भाग आहे (२००५). गेल्या ६,५०,००० वर्षांमध्ये CHA चे प्रमाण दर अब्जात ३२० ते ७९० असे. आज ते १,७७४ आहे. (२००५). CO2 वाढीचे प्राथमिक कारण खनिज इंधनांचा वापर हे असले तरी जमीनवापरातील बदल [जंगले कापली जाणे] हा घटकही महत्त्वाचा आहे.
CHA वाढीत शेती आणि खनिज इंधनांचा वापर हे दोन्ही घटक आहेत, पण त्यांची प्रमाणे निश्चित करता आलेली नाहीत.
* NO वाढ औद्योगिकपूर्व दर अब्जात २७० भागांपासून ३१९ भाग (२००५) झाली आहे, आणि तीपैकी एक तृतीयांशाहून जास्त वाढ मानवी व्यवहार, विशेषतः शेती, यातून झाली आहे.
* गेल्या शंभर वर्षांतील सरासरी तापमान वाढ ०.६० अंश से. आहे. असे २००१ साली वाटले होते. प्रत्यक्षात ती ०.७४ अंश से. आहे.
* शहरांमध्ये तापमान जास्त वाढते, पण याचा जमीन व सागरी सरासऱ्यांवर फारसा परिणाम होत नाही. एकूण जादा उष्णतेपैकी ८०% समुद्रात सामावली जाते, आणि याचे परिणाम तीन किलोमीटर खोलीपर्यंतच्या तापमानवाढीच्या रूपात दिसतात.
* आर्क्टिक (उत्तर ध्रुवीय) तापमानातली गेल्या शतकातली वाढ जागतिक सरासरीच्या दुप्पट आहे. मानवनिर्मित धूळ व फवारे (aerosols) आणि ज्वालामुखींची धूळ नसती तर तापमानवाढ आणखी जास्त असती.
* उत्तर गोलार्धातली १९५०-२००० या काळातली सरासरी तापमाने १३०० सालानंतरच्या कोणत्याही अर्धशतकापेक्षा जास्त होती.
* जगभरात हिमनद व बर्फाच्छादन घटले आहे.
* १९९३-२००३ या दशकात ग्रीनलंड व अंटार्क्टिका या भूमीवरील बर्फ वितळल्याने समुद्राची पातळी वाढली आहे, असे ९०% खात्रीने म्हणता येते. सागरी तापमानवाढीने पाणी प्रसरण पावते, त्यामुळेही समुद्राची पातळी वाढली आहे. १९६१-२००३ या काळात समुद्रपातळीतली सरासरी वाढ वर्षाला १.८ मि.मी. होती, पण १९९३-२००३ मध्ये ती ३.१ मि.मी. दरवर्षी, इतकी होती. [१९६१-१९९३ या काळात १.४ मि.मी. दरवर्षी वाढ होती, ती नंतर दुपटीहून जास्त झाली आहे. पण हा दीर्घकाल टिकेल असा ‘कल’ आहे का, ते स्पष्ट नाही.
* अंटार्क्टिक सागरी बर्फावर फारसा दीर्घकाल चालणारा परिणाम जाणवलेला नाही.
* १९७० नंतर उत्तर अटलँटिक क्षेत्रात चक्रीवादळांचे प्रमाण वाढले आहे व हे वाढीव सागरी तापमानाशी निगडित आहे.
* चक्रीवादळांची तीव्रता मात्र हवामानाच्या गणिती प्रतिमानांच्या अंदाजांपेक्षा जास्त आहे. [जगातले हवामान कसे बदलेल याची गणिती प्रतिमाने, ग्लोबल सर्युलेशन मॉडेल्स उर्फ GCM’s; हे आजचे सर्वांत प्रगत भाकिते वर्तवणारे तंत्र आहे. यासाठी महासंगणकीय क्षमता, Supercomputing Power लागते, कारण नेहेमीच सर्व जगाचा एकत्रित विचार करावा लागतो.] जगात इतरत्रही (उत्तर अटलँटिक क्षेत्र सोडून) चक्रीवादळे वाढत आहेत, पण याबाबतचा तपशील भरवशाचा नाही.
* ६६% खात्री देता येते की एकविसाव्या शतकात वादळे वाढतील.
* आणि यात मानवी व्यवहार हे कारण असण्याची शक्यता तसे नसण्याच्या शक्यतेपेक्षा जास्त आहे. जगाच्या एकूण व्यवस्थेतील ऊर्जावाढ वॉट्स प्रतिचौरस मीटर, W/M- या मापात मोजली जाते. १९७० पासून आजपर्यंत ही ऊर्जावाढ १.६० W/M2 झाली आहे. यांपैकी 0.12W/M- सूर्याच्या ऊर्जेतील बदलामुळे झाली आहे, तर इतर सारी GHG वायू, हवेतली धूळ यांच्या नक्त, पशी परिणामांमुळे झाली आहे.
CO2 चे प्रमाण दुप्पट झाल्यास पृथ्वीचे सरासरी तापमान सुमारे ३ अंश से. वाढेल, असा अंदाज आहे परंतु CO2 चे प्रमाण किती वाढेल याचे हे भाकित नाही. GCM प्रतिमानांचा अभ्यास तापमानवाढ १.८ अंश से. ते ४.० अंश से. होईल असे दाखवतो. हवेतील GCM व धुळीचे प्रमाण आहे तेच राहिले तरी येत्या दोन दशकांमध्ये तापमान ०.२ अंश से. वाढेल. यामुळे सागरांची पातळी १८ सें.मी. ते ५० सें.मी. वाढण्याची शक्यता आहे.
* उष्मालहरी (heat waves), पावसाच्या प्रमाणात वाढ, अशा सुट्या घटनांच्या प्रमाणात वाढ होईल याची ९०% खात्री देता येते.
* अवर्षणे, तीव्र वादळे-चक्रीवादळे आणि नेहेमीपेक्षा जास्त भरती-ओहोटी अशा घटना वाढण्याची ६६% खात्री देता येते. * दोन्ही ध्रुवांवरील बर्फात घट होईल. काही प्रक्षेपांनुसार एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर ध्रुवावरचे सर्व बर्फ वितळलेले असेल. यानंतर WG-| अहवाल सहा विशेष संभाव्य प्रक्षेपांचे (computer models) निष्कर्ष नोंदतो. ते आपण कोष्टकाच्या रूपात पाहू प्रक्षेपाचे तापमानबदलाच्या तापमानवाढ समुद्रपातळीत वाढ “नाव”
सीमा- अंश से. – अंश से. – सें.मी.
१.१ – २.९ १.८ १८ ते ३८ अ१ढ
१.४ – ३.८ २० ते ४५
१.४ – ३.८ २.४ २० ते ४३ अ१ इ
१.७ – ४.४ २.८ २१ ते ४८
२.० – ५.४ २३ ते ५१ अ१ऋ?
२.४ – ६.४ २६ ते ५९
२.४ इ२ NO TO TOTTA अ२
३.४ ४.०
[ आज या सहांपैकी कोणतेही इतरांपेक्षा जास्त भरवशाचे मानायला जागा नाही.]
WG-I अहवालाने आणखी एका बाबीकडे लक्ष वेधले आहे. येती हजार वर्षे तरी मानवनिर्मित CO2 मुळे, तापमान व समुद्रपातळी वाढण्याला मदतच होईल, कारण हा वायू झटपट हवेतून काढून घेता येत नाही. [पृथ्वीच्या पृष्ठाचे सरासरी तापमान शास्त्रज्ञाना हादरवून टाकण्याइतक्या गुंतागुंतीच्या यंत्रणेने ठरत असते – बरे, यातील अनेक घटक काही वाढवणारे तर काही घटवणारे परिणाम घडवत असतात, आणि एकमेकांवरही परिणाम करत असतात. म्हणजे हा ‘विरचित व्यामिश्रते’चा, Organized Complexity चा प्रकार आहे. असे प्रश्न सोडवण्याची ‘हुकमी’ तंत्रे नाहीत. अनेक प्रक्षेपांचा, projections चा विचार करून, प्रत्येकावर किती भरवसा ठेवता येईल हे ठरवूनच पुढे जाता येते. वर ‘सरासरी’ तापमानवाढ पाहताना जगाच्या कोणत्या भागात किती परिणाम होईल हे सांगण्याचे प्रश्नही असतातच. आज खात्री देता येते ती एवढीच
– – । तापमान वाढते आहे आणि यात मानवी व्यवहाराचा भाग मोठा आहे.
— । तापमानवाढ सहजगत्या आटोक्यात येणार नाही.
– – । तापमानासोबत समुद्रपातळीही वाढेलच.
— । अवर्षण-अतिवृष्टी, वादळे-चक्रीवादळे, अपार भरती-ओहोटी, अशा घटनांची प्रमाणे व तीव्रता वाढेल
या अहवालानंतर शेहेचाळीस देशांनी एक जास्त अधिकार असलेली राष्ट्रसंघ पर्यावरण संस्था (यूनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेन्ट ऑर्गनायझेशन, णछएज) घडवण्याची मागणी केली. परंतु या ४६ देशांमध्ये अमेरिका, चीन, रशिया व भारत नाहीत. हे चार देश GHG वायूंचे सर्वांत मोठे उत्पादक आहेत [आणि यांच्यात जगाच्या लोकसंख्येपैकी चव्वेचाळीस टक्के लोक राहतात! ].
कार्यगट दोनः WG-II
तापमानवाढ व समुद्रपातळीतील वाढीचे आज दिसणारे परिणाम असे [८०% खात्रीच्या बाबी ].
* हिमनद वितळून सरोवरे बनणे व असलेली सरोवरे वाढणे.
* जमिनीतले पाणीही गोठलेल्या ‘पर्माफ्रॉस्ट’, permafrost क्षेत्रांमध्ये भूस्खलन वाढणे.
* पर्वतीय क्षेत्रांमध्ये भूस्खलन वाढणे.
* ध्रुवीय सजीव सृष्टीत बदल होणे.
* सागरी सूक्ष्मजीव (शेवाळे, प्लॅक्टन, plankton) व मासे यांच्यावर वाढत्या सागरी तापमानाचे परिणाम.
* हिमनद्यांपासूनच्या नद्या [गंगा, यमुना!] यांच्यात जास्त पाणी, जास्त लवकर येऊ लागणे. [९०% खात्रीच्या बाबी ]
* वनस्पतींची पाने ‘खुलणे’, पशुपक्ष्यांनी अंडी देणे, पशुपक्ष्यांची स्थलांतरणे, सारे लवकर होत आहे.
* प्राणी व वनस्पती ध्रुवांकडे व पर्वतांमधील उंच क्षेत्रांकडे सरकत आहेत.
* समुद्राची आम्लता वाढली आहे, पण याचे परिणाम नोंदलेले नाहीत. या बदलांची जबाबदारी ठरवण्याबाबत WG-II नोंदतो
“निरीक्षणांच्या मर्यादा व त्रुटींमुळे व्यवस्थांमधली प्रतिसादांची जबाबदारी पूर्णतः मानवी तापमानवाढीवर टाकणे शक्य नाही…. तरीही… गेल्या तीन दशकांमधील मानवी व्यवहारजन्यतापमानवाढीचा भौतिक व जैविक व्यवस्थांवर लक्षणीय परिणाम झाल्याचा निष्कर्ष काढता येतो.” [अत्यंत सावध भाषा आहे, ही.]
भविष्यात काय होईल, हे सांगताना थऋ – खख अहवाल नोंदतो
* कोरडी क्षेत्रे अधिक कोरडी होतील, आणि ओली क्षेत्रे अधिक ओली. उच्च अक्षांशांवर (ध्रुवीय प्रदेशाजवळ) नद्यांमधले पाणी व पाण्याची उपलब्धता शतकाच्या मध्यापर्यंत १० ते ४० टक्के वाढेल. हाच प्रकार ओल्या वृत्तीय क्षेत्रांमध्येही होईल. वृत्तीय व मध्य अक्षांशी कोरड्या क्षेत्रांमध्ये पाण्याची उपलब्धता १० ते ३० टक्के कमी होईल. * अवर्षणग्रस्त क्षेत्रे विस्तारतील.
* मेघफुटीसारख्या प्रचंड पावसाच्या घटना आणि त्यांमुळे येणारे पूर जास्त वेळा घडतील.
* हिमनद व पर्वतीय बर्फाचे साठे घटतील. * हवामानबदल अनेक जैविक (परिसरीय) व्यवस्थांना झेपणार नाहीत इतके मोठे परिणाम घडवतील.
* जमिनीवरील वनस्पतींनी हवेतील CO2 शोषून घेण्याचे प्रमाण शतकमध्याजवळ सर्वोच्च होईल, व नंतर मात्र ते प्रमाण घटेल किंवा वनस्पतीही CO2 सोडू लागतील व हवामानबदल वेगवान होईल.
* एक ते तीन अंश से. तापमानवाढीपर्यंत अन्नोत्पादन वाढण्याची ५०% खात्री आहे. त्यापेक्षा जास्त तापमानांना मात्र अन्नोत्पादन कमी होईल.
* किनारपट्टयांची धूप होणे वाढेल.
* प्रवाळांवर १ ते ३ अंश वाढीचा वाईट परिणाम होईल, व तो विस्तृत क्षेत्रात दिसेल. * पूर व पूरग्रस्तांचे प्रमाण वाढेल.
कार्यगट तीनः WG-III
GHG वायूंचे प्रमाण नियंत्रित करण्याच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम संभावना आहेत. यामुळे नव्याने वातावरणात जाणारे ऋऋ वायू आजच्या पातळ्यांपेक्षा कमी करता येतील. यासाठी आज उपलब्ध असलेल्या आणि २०३० पर्यंत व्यापारी उपयोग होऊ शकेल अशा तंत्रज्ञानांची माहिती खालील कोष्टकात सारांशरूपाने देत आहेत. क्षेत्र आज उपलब्ध तंत्रज्ञान अपेक्षित व्यापारी तंत्रज्ञान ऊर्जा सुधारित उत्पादन व वितरण ; कोळशाऐवजी बायोमास, नैसर्गिक वायू, नैसर्गिक वायूचा वापर; अणु ऊर्जा; पुनर्नूतनीय कोळसा यांमधील CO2 ऊर्जा (सौर, वात, जल, भूगर्भातील उष्णता, आधीच काढून साठवणे; जैविक); वीज व उष्णता यांची मिश्रणे; इतर सर्व ऊर्जास्रोतांच्या नैसर्गिक वायूतील CO2 काढून साठवणे. सुधारित आवृत्त्या घडवणे वाहतूक वाहनांच्या कार्यक्षमतेत सुधार ;
सुधारित हायब्रिड वाहने; हायब्रिड वाहने; जैविक इंधने; सुधारित जैविक इंधने; रस्त्यांऐवजी रेल्वे व खाजगी ऐवजी सुधारित बॅटऱ्या; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, चालणे सुधारित विमाने. व सायकलींना उत्तेजन; जमीन-वापर व वाहतुकीचे नियोजन इमारती कार्यक्षम प्रकाशयोजना ; सूर्यप्रकाश ‘बुद्धिमान’ इमारती घडवणे वापरणे; तापमान नियंत्रणाची व व त्यासाठी संगणकांचा इतर विजेची उपकरणे सुधारणे; वापर करणे. तापमान नियंत्रणात सौर-उपकरणे वापरणे; शीतपेट्यांमध्ये वापरायचे द्रव व वायू सुधारणे व साठवणे. उद्योग सुधारित वीजवापर ; उष्णता व ऊर्जावापरात सुधारणा; विजेच्या वाया जाणाऱ्या भागाची सीमेंट, अमोनिया व लोह साठवण ; वस्तू व पदार्थांचा या उद्योगात CO2 पकडून पुनर्वापर ; CO2 सोडूनच्या वायूंचे साठवणे; अॅल्युमिनम नियंत्रण.
उद्योगात सुधार. शेती मातीने कार्बन धरून ठेवण्यासाठी हेक्टरी उत्पादन सुधारणे. शेती व चराऊ जमिनींचे व्यवस्थापन; भातशेती, पशुपालन व शेणखत यांचे CHA कमी करण्यासाठी नियोजन; खतांमुळे छज वाढू नये यासाठी नियोजन ; खनिज इंधनांऐवजी जैव इंधनांची शेती. वने/ वनशेती वनीकरण; पुनर्वनीकरण; निर्वनीकरण रोखणे ; लाकूड शेती, जैवइंधन वनशेती कार्बन धरणाऱ्या वनांचे विकसन; माती व जमीनवापर यांची तपासणी करण्याची तंत्रे घडवून कार्बन-पकड सुधारणे कचरा CHA गाळून साठवणे. कचरा डेपोमधून CHA पकडणे कचरा जाळण्यातून ऊर्जा घेणे; कंपोस्टिंग; पाणी पुनर्वापर IPCC च्या अंदाजानुसार वातावरणातील CO2 चे दर दशलक्षात प्रमाण ४४५ ते ५३५ राखण्यासाठी सर्व जगाच्या ठोक अंतर्गत उत्पादनाच्या ०.१२% रक्कम वापरावी लागेल. (मर्यादा सैलावल्यास GDP घट आणिकच कमी होईल). हे CO2 घटवण्याचे खर्च प्रदूषण कमी करून वैद्यकीय खर्च वाचवतील, ऊर्जा सुरक्षा पुरवतील, शेतीचे उत्पादन वाढवतील, पर्यावरणावरचा दबाव कमी करतील, काही देशांची व्यापारी स्थिती सुधारतील, आधुनिक ऊर्जाव्यवस्था घडवतील आणि रोजगार उपलब्ध करतील, यावर विस्तृत एकमत होते. परंतु ठोक अंतर्गत उत्पाद नुसताच कमी होणार नाही, तर एकूण गुंतवणुकीच्या रचनेत मोठे बदल लागतील. ज्यादा गुंतवणूक मात्र नगण्य, फारतर ५%-१०% लागेल. असाही निष्कर्ष निघाला की ऊर्जापुरवठा वाढवण्याच्याऐवजी ऊर्जावापराची कार्यक्षमता सुधारणे अधिक परिणामकारक आहे.
२००५ साली एकूण ऊर्जेचा १८% भाग पुनर्नूतनीय होता. २०३० पर्यंत हे प्रमाण ३०%-३५% नेता येईल. अणुऊर्जा ही १६% पासून १८% करता येईल. याचसोबत एक वेगळा धोकाही संभवतो. खनिजतेलाच्या वाढत्या किंमतींमुळे तेलधारक वाळू (oil sands), तेलधारक खडक (oil shales), जड तेले व कोळसा आणि नैसर्गिक वायूंपासून घडवलेली कृत्रिम तेले वापरात येतील. हे सर्व पर्याय हवेत ज्यादा कार्बन सोडतील. त्यासाठी आधीच कार्बन पकडण्याची व साठवण्याची तंत्रे वापरणे आवश्यक ठरेल. वाहतूक-क्षेत्रात वाहनांचा ज्यादा वापर भरून काढण्यासाठी अनेक उपाय एकाच वेळी वापरावे लागतील. परंतु यात बऱ्याच अडचणी आहेत, व बहुतेक देशांमध्ये सुसूत्र सरकारी धोरणे व यंत्रणा नाहीत, यावर विस्तृत एकमत झाले. इमारतींमुळे सोडले जाणारे ऋक्न वायू कमी करणे शक्य आहे, व यामुळे हवेची गुणवत्ता, ऊर्जासुरक्षा व सामाजिक कल्याण साधले जाईल, यावर बहुतांशी एकमत होते. येत्या काही दशकांमधल्या कृती एकूणच परिणामकारक ठरतील, पण त्यासाठी २०५० पर्यंत GHG उत्सर्जन २००० सालाच्या ५०% ते ८५% कमी करावे लागेल, असे अहवाल नोंदतो. हे करणे जमेल यावर बहुतांशी एकमत होते. परंतु यासाठी आजची तंत्रे विकसित करणे, विस्तारित करणे, उपलब्ध करणे यासाठी प्रोत्साहने सुचवावी लागतील. खझउउ ने नवे सरकारी संशोधन गेल्या वीस वर्षांमध्ये घटले आहे, आणि १९८० च्या तुलनेत संशोधन-खर्च अर्धे झाले आहेत, हे नोंदले. यामुळे सार्वजनिक व खाजगी संशोधन व विस्तारसेवा आवश्यक ठरणार आहेत. हे न जमल्यास हवेतील COचे प्रमाण वाढीव पातळीवर स्थिरावेल, आणि अधिक तीव्र हवामानबदलाचा धोका संभवेल. हवेत कार्बन सोडण्यासाठी किंमत आकारावी [ दंड ठोकावा! ] यावर बहुतांशी एकमत झाले. २०३० साली हवेत कार्बन सोडणाऱ्यांना CO2 च्या दर टनामागे ५ ते ६५ डॉलर भरायला लावावे, आणि २०५० पर्यंत हे प्रमाण १५ ते १३० डॉलर्सना न्यावे असे सुचवले गेले. यामुळे हवेतील CO2 चे प्रमाण २१०० सालापर्यंत सुमारे ५५० भाग, दर दशलक्षात, यावर स्थिरावेल. संश्लेषण अहवाल हा अहवाल आजही चर्चापातळीवर आहे. धोरणे घडवणाऱ्यांसाठी एका वाचनीय सारांशात सर्व वैज्ञानिक माहिती गठित करण्याचा तो प्रयत्न आहे.
टीका
अनेकांच्या मते हवामानबदलात मानवी व्यवहाराचा भाग अतिरंजित रूपात मांडला गेला आहे. विरुद्ध पक्षाला या बदलाचे परिणाम पुरेसे ठसवलेले नाहीत असे वाटते. [“काहीतरी वाईट होणार” असे भाकित वर्तवणारे बरेचदा सुखात असतात, कारण खरेच वाईट घडले तर “सांगितले होते!”, असे म्हणता येते. उलटीकडे वाईट न झाल्यास भाकित ऐकणारे टीका करत नाहीत. त्यामानाने “चांगले होऊ घातले आहे”, असे सांगणाऱ्यांना धोका जास्त असतो. भाकित खरे ठरल्याचे कौतुक नसते, पण चुकल्यास मात्र जहरी टीका करत फसवल्याचा आरोपही होऊ शकतो. पण!
पण स्वतःच्या मतांना ‘वैज्ञानिक सत्या’ चे स्थान देणाऱ्यांचा अभ्यास थांबतो. निसर्गात, वास्तवात काय घडते आहे याकडे दुर्लक्ष होते. सध्या जॉर्ज डब्ल्यू. बुशची अमेरिका या भ्रामक आशावादात अडकली आहे. पण ती एकच अमेरिका नाही. पर्यावरणवादी रेचेल कार्सनपासून ‘गैरसोईचे सत्य’ हा पोवाडा गात जगभर फिरणाऱ्या अॅल् गोअरपर्यंत अनेक अमेरिकन आहेत. बुशवर उपहासाचे शस्त्र दांडगाईने वापरणारा मायकेल मूर आहे. सातत्याने अमेरिकन साम्राज्यवादावर टीका करणारा नोम चोम्स्की आहे.
आणि या डोळे उघडे ठेवणाऱ्या, ‘उघड’ सत्यामागचे वास्तव टिपणाऱ्या वृत्ती जगभरातल्या माणसांपाशी आहेत. पर्यावरणवाद हा दहशतवाद आहे, असे हेटाळणीने म्हणणारे आज हवामानबदलावर ठेचकाळत आहेत. त्या प्रकारावरचे सर्वांत स्पष्ट ‘ऑफिशियल’ मत IPCC-AR4 हा अहवाल देतो. यामुळे सर्व विवेकी लोकांपुढे तो अहवाल मराठीतून देत आहोत. सं.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.