सारे काही जीनदत्त?

पाश्चात्त्य देशांत सतरा-अठराव्या शतकात घडलेल्या राज्यक्रांत्या समता प्रस्थापित करण्यासाठी होत्या, असे त्यांची घोषवाक्ये सांगतात. पण या क्रांत्यांमधून आकार घडलेल्या सर्व समाजांमध्ये काही व्यक्तींचा सत्ता-संपत्तीतील वाटा इतरांपेक्षा खूप जास्त आहे, हे सतत दिसत असते. या विरोधाभासातून उद्भवलेले सामाजिक क्लेश गेली दोनशे वर्षे पाश्चात्त्य देशांमध्ये जाणवत आहेत, विशेषतः उत्तर अमेरिका खंडाच्या राजकीय इतिहासाचा मोठा भाग या अंतर्विरोधाच्या निरसनाभोवती केंद्रित आहे.

याबाबत दोन शक्यता सुचतात – एक अशी, की प्रचंड विषमता हा आपल्या राजकीय – सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे, आणि क्रांत्यांची घोषवाक्ये केवळ जन्माधिष्ठित सत्ता हटवून संपत्त्यधिष्ठित सत्ता प्रस्थापित करण्यापुरतीच होती. ही संकल्पना शिक्षक, प्राध्यापक, वृत्तपत्र संपादक, यशस्वी राजकारणी – थोडक्यात म्हणजे सामाजिक जाणिवा घडवणाऱ्या कोणालाच आवडत नाही. ही मूलभूत धारणांशी गद्दारी मानली जाते.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून एक वेगळा, पर्यायी दृष्टिकोन वापरात आहे. त्यानुसार समता परिणामांबाबतची नसते, ती असते संधीं बद्दल. या दृष्टिकोनाने सध्याची विषम स्थिती आह्वानित न होता आधारितच होते. रिचर्ड हर्नस्टाइन या हार्वर्डच्या मानसशास्त्र्याने हे स्पष्टपणे मांडले – पूर्वीचे सत्ताधारी वर्ग बहुधा जीवशास्त्रीय दृष्टीने पददलितांपेक्षा फार श्रेष्ठ नव्हते. यामुळेच क्रांती यशस्वी होणे शक्य होत असे. वर्गावर्गांतील कृत्रिम भेदभिंती काढून टाकल्याने (आज) जीवशास्त्रीय भेदभिंती घडण्याला चालना मिळाली आहे. जेव्हा लोक समाजातली आपापली नैसर्गिक स्थाने ग्रहण करतील तेव्हा उच्चवर्गीय निम्नवर्गीयांपेक्षा निश्चितच जास्त सक्षम असतील.

एकोणिसाव्या शतकापासून आजवर समाजशास्त्री हेच वारंवार म्हणत आले आहेत. परंतु जीवनाची स्पर्धा न्याय्य तत्वांवर बेतली आहे, आणि तिच्यात भाग घेणाऱ्यांच्या अंगभूत क्षमता वेगवेगळ्या असतात, येवढेच सांगण्याने आजच्या विषमतेचे स्पष्टीकरण मिळत नाही. मुले ढोबळमानाने आपल्या आईबापांच्या वर्गातच राहतात. पेट्रोल पंपांवर काम करणाऱ्यांची मुले कर्जे घेतात, आणि तेलसम्राटांची मुले कर्जे देतात. समाजातील श्रेणींमध्ये फारसे चलनवलन नसते.

जर आपला समाज गुणाधारित आहे, ज्यात प्रत्येक जण आपल्या अंगभूत गुणांना न्याय देणाऱ्या स्थानापर्यंत पोचू शकतो, तर सामाजिक सत्ता आईबापांकडून वारशाने मुलांकडे कशी जाते? निसर्गवादी (परींगीरश्रळीींळल) स्पष्टीकरण असे, की अंगभूत क्षमता वेगवेगळ्या तर असतातच, पण त्या पिढी-दर-पिढी जीवशास्त्रीय पद्धतीने वारसांना मिळत असतात-त्या जीनदत्त असतात. म्हणजे मुळातील सामाजिक-आर्थिक वारशाची कल्पना आता जैविक वारशात साचेबद्ध केली गेली आहे.

पण जीनदत्त अंगभूत क्षमतांमुळे समताधिष्ठित समाज घडवण्याला बाधा येत नाही. आपण घरे रंगवणारा रंगारी आणि चित्रे रंगवणारा कलाकार यांना समान वेतन देऊ शकतो. मग आपल्या ध्वजांवर प्रत्येकाकडून त्याच्या (तिच्याही) क्षमतेनुसार, प्रत्येकाला त्याच्या (तिच्याही) गरजांनुसार, असे लिहावे लागेल.

विषमता असलेल्या समाजावर हा आक्षेप घेतला जाऊ नये यासाठी मानवी स्वभावाची एक जीवशास्त्रीय थिअरी घडवली गेली आहे. तिची तीन अंगे अशी – १) आपल्या अंगभूत गुणांमधल्या फरकांमुळे आपल्या मूलभूत क्षमतांमध्येही फरक असतात; २) हे अंगभूत गुण जैविक वारशामुळे, जीनदत्त असे असतात; आणि ३) मानवी स्वभावच श्रेणीबद्ध समाज घडवतो. या त्रिसूत्रीला जीवशास्त्रीय नियतवादाची विचारधारा (ideology of biological determinism) म्हणता येईल.

बरे, अंगभूत गुणांमधले फरक केवळ व्यक्तींमध्येच असतात असे मानण्यावर ही विचारधारा थांबत नाही. देशांमध्ये आणि वंशांमध्येही असे फरक असतात, असेही मानले जाते. केवळ वंशवादी, फॅसिस्ट वृत्तीचे लोकच असे मानतात, असेही नाही. अमेरिकन विचारवंत, मानसशास्त्री व समाजशास्त्री प्रस्थापितही अशी मते मांडताना दिसतात. यांपैकी टोकाचे उदाहरण आहे, एच. एफ. ऑस्बोर्नने (अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी चा अध्यक्ष) १९२४ साली न्यूयॉर्क टाईम्स मध्ये लिहिलेल्या लेखातील – (युरोपाच्या) उत्तरेकडील वंशांनी दक्षिणेवर स्वारी केली. ते केवळ जेतेच नव्हते. एका दुर्बल, विलासी, मरू घातलेल्या संस्कृतीला त्यांनी प्रबळ नैतिक व बौद्धिक अंगे दिली. इटलीत आलेल्या या नॉर्डिक (उत्तर युरोपीय) लाटेतून रॅफेल, गॅलिलिओ, लिओनार्दो, टिशिआनो, यिथर, गिओटो, बाँतिचेली, पेट्रार्क व टासो यांचे पूर्वज घडले. कोलंबसचे अर्धपुतळे, वास्तव असोत की काल्पनिक, त्याचे नॉर्डिक असणेच दाखवतात.” (तिरपा ठसा माझा – आर.सी.एल.)

दुसऱ्या महायुद्धाच्या आगेमागे अंगभूत दुबळेपणाचे उल्लेख करणे नात्झी गुन्ह्यांमुळे मागे पडले. पण तो एक काळ सोडता जीवशास्त्रीही जीवशास्त्रीय नियतवादाला बांधील राहिलेले आहेत. आणि या दाव्यांमागे तसूभरही जीवशास्त्रीय किंवा जनुकशास्त्रीय पुरावा नाही.

जीवशास्त्रीय नियतवादाच्या दाव्यांमधील गफलत समजावून घेण्यासाठी आपल्याला सजीव रचनांच्या घडणीत सहभागी असणारे घटक तपासायला हवे. एक म्हणजे आपले जीन्स आपल्या घडणीवर परिणाम करत असले तरी केवळ तेच आपल्या घडणीचे नियामक नाहीत. घडणीच्या काळातील तापमान, आर्द्रता, पोषण, वास, दृश्ये, आवाज, आपण ज्याला शिक्षण म्हणतो ते, या साऱ्यांचा परिणामही आपली घडण ठरवतो. जरी मला एखाद्या जीवाच्या सर्व जीन्सची माहिती असली, तरी मी जीव कसा होईल याचे भाकित वर्तवू शकत नाही. त्या जीनसंचातून गाय घडेल की शेळी हे सांगता येईल, पण एकाच जीवजातीतील व्यक्तिव्यक्तींमधले फरक हे जीन्स आणि घडणीच्या काळातील भोवतालची परिस्थिती यांच्या सततच्या परस्परप्रक्रियांमधूनच घडतात. गंमत म्हणजे, जीन्स आणि परिस्थितीचा पूर्ण क्रम हे दोन्ही माहीत असले, तरी मी जीव कसा होईल ते सांगू शकत नाही.

फळांवरील केंबरांच्या (माश्या, चिलटे, fruit flies) पंखांखाली केस असतात. कधी डावीकडे केस जास्त असतात, तर कधी उजवीकडे – सरासरीने दोन्हींकडे केसांची संख्या सारखीच असते. प्रत्येक केंबरातील केसांची प्रमाणे मात्र त्याच्या घडणीतील स्वैरपणामुळे (developmental noise) ठरतात. केसांचे प्रमाण जीन्स, पर्यावरण आणि स्वैरपणातून ठरते. माणसांमध्ये चेतापेशींचा (neurons) विकास किती प्रमाणात स्वैरपणे होतो, हे आपल्याला माहीत नाही. पं. रविशंकरांच्या चेतापेशींमध्ये काही वैशिष्ट्य असते, आणि त्यामुळे ते उत्कृष्ट सतारवादक आहेत, असे आपण मानतो. पण याचा अर्थ ते वैशिष्ट्य जीन्समध्ये सांकेतिक रूपात नोंदले होते, असा मात्र नाही. विकासाच्या जनुकीत (developmental genetics) एक मूलतत्त्व आहे, की प्रत्येक जीव हा जीन्स आणि पर्यावरण यांच्या परस्परपरिणामांमधून घडणारी एकमेवाद्वितीय रचना असतो, आणि पेशीविभाजन आणि वाढीमधील स्वैरता त्या परस्परसंबंधांवर परिणाम घडवत असते.

जीवशास्त्रीय नियतवादाची एक जास्त तरल आवृत्ती सांगते की व्यक्तींमधले फरक क्षमतां च्या बाबतीत जीनदत्त असतात. आपली घडण वेगवेगळ्या मापांच्या रिकाम्या भांड्यांसारखी असते, आणि भांड्यांचा आकार जीन्स ठरवून देतात. या भांड्यांमध्ये पाणी किती भरते हे परिस्थितींचा इतिहास ठरवतो. जेव्हा भरपूर पाणी असते तेव्हा सर्वच भांडी पूर्ण भरली जातात.

ह्या युक्तिवादातही जीवशास्त्रीय दृष्टीने अर्थ नाही. एका प्रकारच्या परिस्थितीत ज्येष्ठ ठरणारे जीव वेगळ्या परिस्थितीत कनिष्ठ ठरू शकतात. परिस्थितीमुळे क्षमता याचा अर्थच बदलू शकतो. जीनदत्त क्षमता परिस्थितीपासून सुटी करताच येत नाही.

ह्यापेक्षाही तरल आणि गुंगवणारा एक युक्तिवाद वापरात आहे. त्यात जीन्स व परिस्थिती यांच्या प्रभावांची प्रमाणे काढण्याचा प्रश्न कळीचा आहे, असे सांगितले जाते. ही प्रमाणे अर्थातच सुट्या व्यक्तींसाठी काढता येत नाहीत. एक व्यक्तीची उंची पाच फूट साडेअकरा इंच असल्यास यापैकी पाच फूट दोन इंच जीनदत्त आणि उरलेले साडेनऊ इंच परिस्थितीने दिलेले, असे म्हणणे निरर्थक ठरते. त्यामुळे हा युक्तिवाद एखाद्या समूहातील गुणधर्मांमधले वैविध्य (variation) किती प्रमाणात जीनदत्त आणि किती प्रमाणात परिस्थितिजन्य, असा फरक करू पाहतो.

यात काय सूचित केले जात असते ते एका उदाहरणातून पाहू. जर एखाद्या मानवसमूहातल्या बुद्धिमत्तांचे वैविध्य ८०% जीनदत्त आणि २०% परिस्थितिजन्य आहे असे ठरले, तर परिस्थिती कितीही सुखकर केली तरी वीसच टक्के भेद नाहीसे होतील. उरलेले ऐंशी टक्के मात्र टिकूनच राहतील. हा संभाव्य वाटणारा, शक्य कोटीतला आहे असे भासणारा युक्तिवादही पूर्णपणे चुकीचा आहे. गुणांच्या फरकांमध्ये जीनदत्त/परिस्थितिजन्य फरक करता आला तरी त्याचे प्रमाण ठरवता येत नाही. जुन्या रोमन काळातील द, त, ख हे अंक वापरणाऱ्यांपेक्षा आजच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थीही अंकांच्या स्तंभाची बेरीज वेगाने करू शकतात. एखाद्या पिढीपूर्वी दोन पाच अंकी संख्यांच्या गुणाकाराला गणिताच्या प्राध्यापकांना जो वेळ लागत असे, त्यापेक्षा कितीतरी लवकर आज एक दीडेकशे रुपयांचा कॅल्क्युलेटर वापरणारा प्राथमिक शाळेतला विद्यार्थी तसा गुणाकार करू शकतो.

इथे सांस्कृतिक परिस्थितीत बदल झालेला आहे, पण तो क्षमतांना कैक पटींनी बदलतो आहे. यंत्रे तर व्यक्तिव्यक्तींमधील फरकांना निरर्थकच ठरवतात. जीनदत्त फरक असतात, पण परिस्थिती त्यांना असंबद्ध ठरवते. एकूणच जीनदत्त फरक व्यवहारात परिस्थिती ठरवते.

कधी काही जीन्स परिस्थितीतील फरकांना फार संवेदनशील प्रतिसाद देतात, तर इतर काही जीन्सना परिस्थितीतले फरक चालतात. आणि असे जीनदत्त फरक परिस्थितीच्या खात्यावर टाकले जाऊ शकतात.

म्हणजे एखाद्या समूहातले फरक जीन्समुळे किती, परिस्थितीमुळे किती, हे प्रमाणही एखाद्या क्षणी, एखाद्या परिस्थितीपुरतेच खरे असू शकते – सदासर्वदा खरे नसते.

जीनदत्त/परिस्थितिजन्य, nature/nurture, हे स्थिर/चल अशा नमुन्याचे भेद नाहीत. जीन्समध्ये फरक आहेत म्हणजे काही बदल शक्यच नाही असे मानणे, हा जीवशास्त्रीय नियतवादाचा तर्कदोष आहे. विल्सनचा रोग नावाचा एक जीनदत्त दोष आहे. हा रोग असलेल्या व्यक्ती शरीरात अन्नावाटे येणारे तांबे निर्विष करून बाहेर टाकू शकत नाहीत. ते शरीरात साठत जाऊन मज्जासंस्था दुबळी होते, आणि कुमारवयापर्यंतच मृत्यूही ओढवतो. पण सदोष विल्सन रोगाच्या जीन असलेले लोक औषधे घेऊन तांब्याला बाहेर टाकून सर्वसामान्यांसारखे जगूही शकतात.

परिस्थितीतील वेगळेपणा आणि जीन्समधील वेगळेपणा ह्या स्वतंत्र कारणपरंपरा नाहीत. Environmental variation and genetic variation are not independent causal pathways.

कधी कधी अंकपद्धती, कॅल्क्युलेटर्स, औषधे वगैरे वापरून परिस्थिती बदलणे हे असंबद्ध असल्याचे सांगितले जाते; कारण आपण कोठल्यातरी मूलभूत, मदतीविनाच्या, अनावृत क्षमतांबद्दल बोलत असतो. पण हे खरे नाही. तसे जर असते, तर आपण बुद्धिमत्ता निर्देशांक चाचण्यांसाठी (ख Q tests) कागद-पेन्सिल का देतो? अनेक लोक तोंडी (मनातल्या मनात) गणिते करू शकतातच ना? जर आपल्याला सांस्कृतिक मदतीविना क्षमतांमध्येच रस असेल, तर आपण चष्मे का घालतो? वास्तव असे आहे की आपल्याला सामाजिक दृष्टीने रचलेली कामे करण्याच्या क्षमतांमध्येच रस असतो, कारण त्या क्षमताच वास्तविक समाजजीवनात महत्त्वाच्या असतात – मूलभूत, अनावृत क्षमता नव्हेत.

जीन्स आणि परिस्थिती यांचे परिणाम सुटे करण्यात सांकल्पनिक अडचणी तर आहेतच; पण जीन्सचे परिणाम प्रयोगांमधून ठरवण्यातही अडचणी आहेत. आपण व्यक्ति-व्यक्तींच्या तुलना करतो. जवळचे नाते असलेल्या व्यक्तींमधली साम्ये दूरच्या नात्यांनी सांधलेल्या व्यक्तींमधील साम्यांपेक्षा जास्त असतात. आपण ह्याचे श्रेय जीन्सना देतो. पण जवळच्या नातलगांच्या परिस्थितीमध्येही साम्य असते, दूरच्या नातलगांच्या परिस्थितीपेक्षा जास्त. मानवी समाजांमधील कुटुंब व वर्गव्यवस्था ह्याची काळजी घेतात. अपत्ये पालकांसारखी असतात, जवळचे नातेवाईक एकमेकांसारखे असतात, अशा निरीक्षणांमध्ये जीन/परिस्थिती यांच्या परिणामांचा एकत्रित परिणाम असतो. उदाहरणार्थ, उत्तर अमेरिकेत अपत्ये व पालक यांच्यातली, सर्वांत महत्त्वाची सामाजिक साम्ये दिसतात ती धार्मिक पंथ आणि राजकीय पक्ष, या दोन बाबतीत. कर्मठ जीवशास्त्रीय नियतवादीही ही साम्ये जीनदत्त आहेत असे फारशा गांभीर्याने म्हणू शकणार नाही.

यामुळे जुळ्या भावंडांचे अभ्यास जनुकीत महत्त्वाचे ठरतात, विशेषतः वेगवेगळ्या ठिकाणी वाढवलेल्या एकरूप जुळ्यांचे (identical twins). याबाबतचे चारच अभ्यास उपलब्ध आहेत – व त्यांपैकी एक संपूर्णपणे खोटा आहे. इतर दोन अभ्यासांत जुळी भावंडे विस्तारित कुटुंबांमध्ये वाढली होती – जसे, एक आईवडलांकडे तर दुसरे काकाकाकूकडे. इथे परिस्थिती जवळपास एकसारखी होती. भावंडे एकाच खेड्यातल्या एकाच शाळेत जात, आणि एकत्र खेळतही. चौथ्या अभ्यासात मुले वेगवेगळी वाढली होती, पण त्यांच्यातली साम्ये एकत्र वाढलेल्या मुलांसारखीच होती. एकूण पाहता, आज माणसांच्या वर्तणुकीतल्या फरकांमध्ये जीन्सचा भाग किती, हे ठरवण्याचे विश्वासार्ह मापन करता आलेले नाही. (There is at present simply no convincing measure of the role of genes in influencing human behavioural variation.)

आनुवशिक म्हणजे अपरिवर्तनीय, हा भ्रम प्रसृत करणे, हे लोकांची सामाजिक स्थाने स्थिर आणि न्याय्यही आहेत, असे पटवून द्यायला वापरले जाणारे मोठे वैचारिक हत्यार आहे. आणि हा भ्रम सर्वांत स्पष्टपणे दिसतो दत्तक मुलांबाबतच्या अभ्यासांमध्ये. मुळात हे अभ्यास जीवशास्त्रीय साम्ये तपासण्यासाठी केले जातात. जर दत्तक मूल दत्तक पालकांपेक्षा जीवशास्त्रीय पालकांना गुणधर्मांत जवळ असेल, तर तो गुणधर्म मुख्यतः जीनप्रभावित आहे, असे म्हणणे योग्य ठरते.

दोन बाबींमध्ये जीनदत्तता दिसते. बुद्धिमत्ता निर्देशांकाच्या बाबतीत जीनप्रभाव दिसतो. त्याबाबतच्या चाचण्यांमध्ये | Q उत्तरे लवकर देणे महत्त्वाचे असते, आणि उत्तरे देण्याचा वेग केंद्रीय मज्जाव्यवस्थेच्या कार्याशी निगडित असतो. ज्या मुलांच्या जैविक पालकांचे | Q वरचे असतात, त्यांचे | Q ही वरचे असतात.

दत्तक गेलेल्या मुलांचे | Q त्यांच्या जैविक पालकांपेक्षा सुमारे वीसेक टक्के जास्त असतात – आणि ते दत्तक घेणाऱ्या पालकांच्या ख ट ना सरासरीत जवळ असतात. दत्तक पालकांचे | Q जैविक पालकांच्या ख ट पेक्षा नेहेमीच जास्त असतात. इथे महत्त्व आहे ते संबद्ध असणे आणि एकरूप असणे यांमधील फरकाला (corelation and identity).

जसे, १००, १०१, १०२, १०३ हा अंकांचा क्रम १२०, १२१, १२२, १२३ या क्रमाशी संबद्ध आहे, पण एकरूप मात्र नाही. आणि जनुकशास्त्र्यांना संबद्ध असणे जीनप्रभाव दाखवताना दिसते.

एका पिढीत आणि दुसऱ्या पिढीत सरासरीने संबंध दिसतो, एकरूपता दिसत नाही. एकूणच या अभ्यासांचे निष्कर्ष ख ट चा नेमका अर्थ आणि दत्तकविधानातले सामाजिक वास्तव यांबाबत महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित करतात.

| Q चाचण्या अंकज्ञान, शब्दज्ञान, शैक्षणिक व वृत्तींबाबतच्या भूमिका तपासतात. त्यात बुद्धिमान म्हणून ओळखली जाणारी मुले चाचणी घडवणाऱ्यांना बुद्धिमान वाटलेल्या मुलांसारखी असतात. म्हणजे या चाचण्या शिक्षणसंस्थांच्या सामाजिक पूर्वग्रहांना वैज्ञानिकतेची झिलई देतात, येवढेच.

मुलांना लहान वयांत दत्तक देणारी माणसे बहुतकरून कामगार किंवा बेकार असतात. मध्यमवर्गाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक व्यवहारांत त्यांचा सहभाग नसतो. दत्तक घेणारे लोक मात्र शैक्षणिक-सांस्कृतिकदृष्ट्या मध्यमवर्गी असतात. त्यांचे ख ट सरासरीने दत्तक देणाऱ्यांपेक्षा वरचे असतात. दत्तक मुलांचे | Q वाढणे हेच दाखवते की जीनप्रभाव आहे, पण परिस्थितीचाही प्रभाव आहेच.

जीवशास्त्रीय नियतवादाचे पुरस्कर्ते सांगतात की व्यक्तींमध्ये क्षमतांचे फरक असतात, आणि सामाजिक सत्ता आणि यश यांमध्ये एखादा वंश दुसऱ्या वंशापेक्षा कमीजास्त का असतो हेही त्या जीनदत्त फरकांमुळे ठरते. एका वंशाची मुले दुसऱ्या वंशाच्या व्यक्तींनी दत्तक घेणे फारदा घडत नाही. पण एखाददुसरे उदाहरण भेटतेही.

ब्रिटनमधील डॉ. बर्नार्डो अनाथालय मालिकां मध्ये लहान वयाच्या अनाथ मुलांना घेतले, व सांभाळले जाते. एकाच वयाच्या मुलांना अनेक चाचण्या दिल्या गेल्या. वंशानुसार सरासरी क्षमतांमध्ये काहीही सांख्यिकीय महत्त्वाचे (Statistically Significant) फरक आढळले नाहीत. जिथे फरक होते (बिनमहत्त्वाचे), तिथे काळ्यांच्या क्षमता गोऱ्यांच्या क्षमतांपेक्षा जास्तच होत्या. एकूणच आपण वंश ओळखायला जी लक्षणे तपासतो, त्यांमुळे क्षमतांमधले फरक मोठाले असतील अशी धारणा होते. कातडीचा रंग, केसांची रचना, नाकांचा आकार, अशा बाबींमध्ये नक्कीच जीन्स प्रभावी असतात; पण प्रत्येकच गुण किती जीन्सच्या कोणत्या सामूहिक क्रियेतून घडतो, ते सांगता येत नाही.

उलट ज्या जीन्सचे परिणाम आपल्याला माहीत आहेत (उदा. रक्तगटावर प्रभाव असणारे, वेगवेगळी एंझाइम्स बनवणारे) त्यांचा अभ्यास दाखवतो की व्यक्तिव्यक्तींमधले फरक वंशावंशांमधल्या फरकांपेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. एकूण मानवजातीतल्या जीनदत्त फरकांचा विचार केला तर काय दिसते ते पाहा — ८५% फरक एकाच समूहातल्या व्यक्तिव्यक्तींमध्ये असतात. ८% एकाच वंशातल्या विविध गटांमध्ये असतात. केवळ ७% फरक जगभरातल्या वंशविविधतेच्या खात्यावर असतात.

म्हणजे वर्तणूक, वृत्ती, बुद्धी असल्या गुणांमध्ये जीनदत्त वंशभेद असतात असे मानायला कोणताही पूर्वप्राप्त (a priori) आधार नाही. समाजातल्या विविध वर्गांमध्ये जीनदत्त फरक असतात असे मानून वर्गांच्या आर्थिक स्थितीवरून भेदभाव करण्यासाठी कणभरही आधार नाही. निम्नवर्गी लोक उच्चवर्गीयांपेक्षा जीवपातळीवर खाली असतात, नॉर्डिक वंश दाक्षिणात्य वंशांपेक्षा वरचे असतात वगैरे जीवशास्त्रीय नियतवादी धारणा ह्या केवळ बकवास (पेपीशपीश) आहेत. आपल्या समाजांमधील विषमतेला जीनदत्त मानून, त्यातील परिस्थितिजन्य भागाकडे दुर्लक्ष करून, नेचर नर्चर गोंधळ माजवून सामाजिक कृतीतून कायकाय बदलता येते त्याचे चुकीचे मूल्यमापन करून, प्रस्थापित विषमतेला वैज्ञानिक डूब देण्याचा तो प्रयत्न आहे.

सामाजिक विषमतेला वैधता देणाऱ्या जीवशास्त्रीय पुरस्कर्त्यांनी आनुवंशिकता आणि अविचलता यांच्यात गोंधळ घालणे हे सर्वांत प्रभावी हत्यार बनवले आहे. (The vulgar error that confuses heritability and fixity has been, over the years, the most powerful weapon that biological ideologues have had in legitimizing a society of inequality) हे करणारे जीवशास्त्री आहेत, आणि त्यांना सत्य माहीत असणारच. त्यामुळे शंका येते की विषमव्यवस्थेचा फायदा घेणारे वस्तुनिष्ठ तज्ज्ञ असू शकत नाहीत. [आर.सी.लेवाँटिनच्या द डॉक्ट्रिन ऑफ डी एन ए (The Doctrine of DNA, R. C. Lewontin, पेंग्विन, १९९१) या पुस्तकातील ऑल इन द जीन्स ? या प्रकरणाचा हा संक्षेप.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.