मनुस्मृतीच्या दावणीला डार्विन-मेंडेल!

[आनुवंशिक गुणसंच आणि परिस्थितीमुळे येणाऱ्या मर्यादा यांच्या परस्परपरिणामांमधून सजीव सृष्टी घडत जाते, ही डार्विनच्या नैसर्गिक निवडीमागची मर्मदृष्टी (insight). तिला बळ पुरवले मेंडेलला सापडलेल्या आनुवंशिकतेच्या यंत्रणेने. या यंत्रणेचा गाभा म्हणजे आनुवंशिक गुण रेणूंच्या, जीनसंचांच्या रूपात व्यक्तींकडून त्यांच्या संततीकडे जातात.

नैसर्गिक निवड अखेर असे गुणसंच निवडते. यात त्या गुणसंचांची व्यक्तींमधून होणारी अभिव्यक्ती (expression) महत्त्वाची असते. आणि निवड दिसून येते ती जीवजातीच्या वैशिष्ट्यांमधून.

इथे निवडले गेलेले गुण चांगले न मानता केवळ बदलत्या परिस्थितीच्या सध्याच्या टप्याशी अनुरूप मानणे, ही झाली वैज्ञानिक शिस्त. ती शिस्त विसरली गेली, की आहे तेच चांगले असा भाव उपजतो. हर्बर्ट स्पेन्सरचा सामाजिक डार्विनवाद, वंशवाद, जातींना उच्च-नीच मानणे, हे सारे अशा शिस्तभंगातून येते.

माणसांच्या बुडत्याला मदतीचा हात देण्याच्या कृतींनी उत्क्रांतीला खीळ घातली जाते, ही समजूतही शिस्त मोडणारी, आडमार्गाने वंशवादी/श्रेणीवादी असते.

अशा शिस्त ढळण्याचे उदाहरण शेषराव मोरे यांना पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या संस्कृति-चिंतन या पुस्तकात आढळले. शासनपुरस्कृत मनुवादी : पांडुरंगशास्त्री आठवले (सुगावा, २००१) या पुस्तिकेतून मोऱ्यांनी केलेल्या विश्लेषणाचा काही भाग खाली देत आहोत. मोऱ्यांची पुस्तिका व संक्षेपाची परवानगी आम्हाला पुण्याच्या प्रदीप रावतांनी मिळवून दिली. – सं.]

आनुवंशिक गुण म्हणजे वंशपरंपरेने पूर्वजांकडून आलेले रक्तातील गुण. याला शास्त्रीजी ‘पिंडगत गुण’ असेही म्हणतात. कर्मगत गुण म्हणजे कर्म वा व्यवसाय करीत राहिल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी निर्माण झालेले गुण. सभोवतालच्या परिस्थितीमुळेही असे गुण व्यक्तीच्या ठिकाणी निर्माण होतात. यालाच शास्त्रीजी ‘संस्कारगत गुण’ असेही म्हणतात. हे गुण संपादित केलेले (रलींळीशव) व त्या व्यक्तीपुरते असतात; ते त्याच्या पुढील पिढीत अनुवंश म्हणून संक्रमित होत नाहीत. थोडक्यात, आनुवंशिक गुण पूर्वजांचा वारसा वा ठेवा, तर कर्मगत गुण ही त्या व्यक्तीची स्वतःची स्वतःपुरती कमाई असते.

‘आनुवंशिक गुणात वाढ करणे आपल्या हातात नसते; परंतु त्यांत दुर्गुण मिसळू नयेत, त्यांची शक्ती कमी होऊ नये, त्यांचे अधःपतन होऊ नये याची काळजी (हातात असल्यामुळे) आपण घेतली पाहिजे’, असे शास्त्रीजी सांगतात. ‘चातुर्वर्ण्यव्यवस्थेत याच आनुवंशिक गुणांचा विचार केलेला होता.’ असे सांगून ‘आज ही चातुर्वर्ण्यव्यवस्था मृतप्राय झालेली आहे, याचे कारण अशा आनुवंशिक गुणांचा विचार न करता पाश्चात्त्य विचारवंतांकडून आपण समाजव्यवस्थेचे विचार घेत आहोत; ज्यांच्याजवळ हे (आनुवंशिक सिद्धान्ताचे) दिव्य विचार नव्हते ते पाश्चात्त्य पंडित आमचे गुरु झाले आहेत, हे होय’, असे ते सांगतात. यासंबंधात त्यांनी हर्बर्ट स्पेन्सर, स्टुअर्ट मिल यांची नावे घेतली आहेत. आपल्या आनुवंशिक सिद्धान्ताच्या बाजूने मात्र त्यांनी मेंडल, फ्रान्सिस गाल्टन, फ्रेडरिक नित्शे, डार्विन, स्प्रेगलर प्रभृति पाश्चात्त्य विचारवंतांचा आधार दिलेला आहे.

शास्त्रीजी म्हणतात : “सर्वप्रथम हिटलरचे गुरु नित्शे यांनी जर्मनीच्या जनतेचे लक्ष आनुवंशिक गुणविकासाकडे आकर्षित केले… नित्शेला मनूविषयी आदर होता व त्याचे विचार मान्य होते…. आधुनिक जगात मनूच्या विचारांना प्रकाशात आणण्याचे सर्वाधिक श्रेय नित्शे यांचेच आहे.

” जगातील विविध प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या, पण वैदिक संस्कृती तेवढीच शिल्लक का उरली, असा प्रश्न उपस्थित करून त्याचे शास्त्रीय कारण सांगताना शास्त्रीजी म्हणतात की, नष्ट झालेल्या संस्कृतींची समाजव्यवस्था आनुवंशिक तत्त्वावर आधारित नव्हती म्हणून त्या नष्ट झाल्या. ‘आनुवंशिक गुणांकडे लक्ष न दिल्यामुळे ग्रीक आणि रोमन यांसारख्या महान संस्कृती लयाला गेल्या’ ; म्हणून ‘संस्कृती टिकवायची असेल तर वंशपरंपरा टिकविणे आवश्यक आहे’, असे ते म्हणतात. वंशपरंपरा टिकविण्यासाठी ‘आज आपल्या समाजाला मनूची ‘उसकी समाजव्यवस्था कि’ सर्वप्रथम आवश्यकता आहे. ‘डशी चरपी लोश षळीीं रपव हिशप हिश णरिपळीहरवरी’ असे ते आग्रहपूर्वक सांगतात. ते म्हणतात : “प्रजोत्पादनाची शक्ती उत्तम असली पाहिजे. शुद्ध आणि स्वच्छ रक्ताचा विचार केला गेला पाहिजे. सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा संबंधातील कोणत्याही संकटाला तोंड देऊन आपले रक्षण करण्याचे सामर्थ्य रक्तगुणात असणे आवश्यक आहे.’ अशा आनुवंशिक गुणसिद्धान्तावर आधारलेली चातुर्वर्ण्यव्यवस्था उत्कृष्ट आहे हे मान्य न करणे ‘बौद्धिक अधःपतन आहे’, असा शास्त्रीजींचा अभिप्राय आहे.

“आनुवंशिक गुणाधारित समाजव्यवस्था ज्यांनी दिली ते मनुप्रभृति ऋषी व महापुरुष यांच्यासमोर खरोखरच आमचे मस्तक नत होते. ‘चातुर्वर्यं मया सृष्टम्’ असे गीतेत म्हणणारे श्रीकृष्ण भगवान हे किती प्रगल्भ बुद्धीचे असतील! त्यांच्या बुद्धीची झेप (उडान) किती प्रचंड असेल!! त्यांच्यासमोर यासाठी नतमस्तक होऊनच राहिले पाहिजे.” युरोप-अमेरिकेशी तुलना करून मग ‘आमच्या येथे वर्णव्यवस्था कशाला पाहिजे?’ असे म्हणणे ‘बौद्धिक गुलामगिरीचे लक्षण’ आहे, असेही शास्त्रीजी म्हणतात. त्यांच्या मते, वर्णव्यवस्थेला विरोध करतो तो पाश्चात्त्यांचा बौद्धिक गुलाम होय.

आनुवंशिक गुण टिकविण्याचे स्पष्टीकरण करताना ते म्हणतात : “रक्तातील गुण टिकविण्यासाठी स्त्री-पुरुष संबंधाची योग्य व्यवस्था लावली पाहिजे. उदाहरणार्थ, जो बुद्धिमान वर्ग (म्हणजे ब्राह्मण) असतो त्याची जीवनव्यवस्था बौद्धिक गुणांवरच आधारित असते; परंतु हे बौद्धिक गुण टिकविण्याकडे पूर्ण लक्ष न दिल्यास ते समाप्त होऊन जातील. प्रत्येक वर्गातील (म्हणजे वर्णातील) प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक काम करण्याची बुद्धी नसते, यासाठी ज्या वर्गाकडे जे कार्य करण्याची बुद्धी नाही, ते कार्य त्या वर्गाने केल्यास तो गुण नष्ट होऊन जाईल… ज्या जातीत वा वर्गात जो गुण आहे, त्या गुणाला अनुकूल व्यवसायच त्या जातीने वा वर्गाने करणे उचित आहे. हा भेद मनूने केला नसून निसर्गानेच केला आहे.” शास्त्रीजींचे मनुप्रणीत म्हणणे असे की, गुण हे व्यक्तीजवळ नसतात, तर जातीजवळ असतात, वर्णांजवळ असतात. एखादी व्यक्ती घेऊन तिचे प्रत्यक्ष गुण पाहायचे नसतात, तर ती व्यक्ती ज्या जातीची वा वर्णाची आहे, त्या जाती-वर्णाचे (मनुस्मृतीत उल्लेखिलेले) गुण पाहायचे असतात. म्हणून शास्त्रीजी व्यक्तीचे गुण टिकविण्याचे बोलत नाहीत, तर जातींचे-वर्णांचे गुण टिकविण्याविषयी बोलत आहेत. त्यांना चिंता जाती-वर्णांच्या गुणांची, बुद्धीची वाटते; व्यक्तीच्या गुणांची वा बुद्धीची नव्हे! ब्राह्मणवर्ग हा बुद्धिमान आहे या गृहीतावर हे सारे विवेचन आधारलेले आहे. आमची समाजव्यवस्था व्यक्तीला महत्त्व देत नाही, समाजाला देते असे शास्त्रीजी का म्हणतात याचे कारण हे होय.

वर्णसंकराचा किंवा वर्णांतराचा (म्हणजे एका वर्णाच्या व्यक्तीने अन्य वर्णांतील व्यक्तीशी विवाह केल्यामुळे वर्ण बदलण्याचा) कोणता समाजघातक परिणाम होतो याविषयी ते म्हणतात : “एखाद्या व्यक्तीने वर्णांतर केल्यामुळे काय होईल, याचा अभ्यास केला पाहिजे. गेट्स म्हणतो की, “…वर्णसंकराचे परिणाम समाजाकरिता अत्यंत दुःस्सह होत असतात.’ गेट्सने इंग्लंडमधील ड्यूक आणि अर्ल या वंशांचा अभ्यास केला. वर्णांतराच्या कारणानेच हे दोन्हीही वंश नष्ट झाले (असा त्यांचा निष्कर्ष आहे).” [ड्यूक आणि अर्ल ही पदे आहेत, वंश नव्हेत!- सं.]

जन्मजात असलेला व्यवसाय बदलल्यामुळेही (याला ते ‘व्यवसाय-संकर’ म्हणतात) वंश नष्ट होतो हे शास्त्रीजी दाखवून देतात. यासंबंधी ते म्हणतात : “(ज्याप्रमाणे) रक्तसंकर झाल्यामुळे वंश समाप्त होत असतो, त्याचप्रमाणे व्यवसाय-संकर झाल्यामुळेही वंश नष्ट झाला असे मानले जाते.” ते पुढे लिहितात : “वर्णसंकरामुळे (जरी नावापुरता) वंश राहिला तरी तो निर्वीर्य बनतो. आणि निर्वीर्य मानववंश काय कामाचा?

” समाजरचनेमध्ये कोणकोणत्या शास्त्रीय गोष्टी आवश्यक आहेत हे क्रमांक देऊन शास्त्रीजी प्रतिपादतात. त्यांतील काही गोष्टी थोडक्यात अशा : (१) “समाजाचे वर्गीकरण (उदा., विविध वर्णांत किंवा जातीत) केल्यानंतर ‘असेच वर्गीकरण का केले?’ असे विचारण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला असता कामा नये… ज्याने शास्त्राचा अभ्यास केला नाही, ज्याला जीवनाचा अनुभव नाही असा माणूस शास्त्राच्या संबंधात मत कसे देऊ शकेल? आणि दिले तरी त्याला किंमत तरी काय?” थोडक्यात, असा हक्क विद्वान ब्राह्मणांनाच असावा, असे शास्त्रीजींना म्हणायचे आहे. (२) “समाजव्यवस्था निर्माण झाल्यावर त्या समाजात वर्णव्यभिचार (म्हणजे वर्णसंकर) तसेच व्यवसाय-संकर यासारख्या वंशनाशक व वंशदोषक गोष्टी घडता कामा नयेत.” (३) “आचार-विचारांचे नियम अत्यंत कठोर असले पाहिजेत. त्यांची अंमलबजावणी तशीच कडक झाली पाहिजे… त्यात कोणत्याही व्यक्तीची आवड-निवड (रुची-अरुची) याला स्थान असता कामा नये.” (४) “अनुवंशाचे नियम सर्वांना कळण्या-समजण्यासारखे नसले तरीही सामाजिक रीतिरिवाजात ते रूढ झाले पाहिजेत.” (५) “विवाहसंबंधाचे नियम शास्त्रीय आधारावर निश्चित केले पाहिजेत व कुणाच्याही व्यक्तिगत लाभासाठी त्यांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.’ अर्थात शास्त्रीजींना हे नियम आनुवंशिक तत्त्वाधारित जन्मजात जातिसंस्थेचेच अभिप्रेत आहेत हे उघड आहे. शेवटी ते सांगतात की : “वरील साया नियमांचे पालन वा अंमलबजावणी करण्याचे काम धर्मसत्तेकडे सोपविले पाहिजे. राज्यसत्तेकडे नव्हे!” अर्थात यासाठी फौज व पोलीस लागणार. म्हणूनच राज्यसत्ता ही धर्मसत्तेच्या अंकित असली पाहिजे, असे ते म्हणतात.

वर्णव्यवस्था गुणांवर नसून जन्मावरच का आधारित असली पाहिजे, हे सांगताना शास्त्रीजी म्हणतात : “बऱ्याच जणांचे म्हणणे असते की, चातुर्वर्ण्यव्यवस्था राहणारच असेल तर ती गुणांवर आधारित असली पाहिजे. त्यांचे म्हणणे की, जन्म कुठे मिळावा हे व्यक्तीच्या हातात नसते, त्यामुळे त्या आधारावर त्याचा वर्ण (योग्यता, दर्जा, व्यवसाय) ठरविणे अन्याय्य नाही काय? त्यामुळे व्यक्तीचे (प्रत्यक्ष) गुण पाहून हे सारे ठरविले पाहिजे. एवढेच नाही तर, (शास्त्रीजींच्या मते आश्चर्याची गोष्ट ही की) हे लोक असेही तर्क (ट) करतात की, कनिष्ठ घरात (जातीत) जन्म मिळाल्यास त्या व्यक्तीचा दोष काय ?” या आक्षेपाचा प्रतिवाद करताना शास्त्रीजी पुढे म्हणतात : ज्याप्रमाणे जन्म हा आपल्या हातात नाही, त्याचप्रमाणे बुद्धी आणि सामर्थ्य मिळणे हेही हातात नाही. तेव्हा, ज्याप्रमाणे (जन्माप्रमाणेच हाती नसणाऱ्या) बुद्धी व सामर्थ्य या गुणांनुसार वर्ण निश्चित करणे अन्यायकारक होणार नाही काय ? याशिवाय, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान लोकच सर्व क्षेत्रांत आले तर मग निर्बुद्ध आणि कर्तृत्वशून्य लोकांचे काय होईल ? त्यांना कोणते कार्यक्षेत्र शिल्लक राहील?… काय, हे न्यायसंगत ठरेल? यासाठीच गुणांच्या आधारावर वर्ग निश्चित करणे अत्यंत कठीण काम आहे आणि पुन्हा गुणांच्या आधारावर वर्ण-स्वधर्म-निश्चित कोण करणार? केव्हा निश्चित करणार?” थोडक्यात, शास्त्रीजींना असे म्हणायचे की, निर्बुद्ध व कर्तृत्वशून्य जन्मजात ब्राह्मणाला ब्राह्मणवर्णीय होण्याचा हक्क नाकारणे हा त्याच्यावर अन्याय नाही काय?

याच आक्षेपाला उत्तर देताना ते आणखी पुढे म्हणतात की, “वर्ण हा गुणांवर ठरवायचा तर तो वयाच्या तीस वर्षांपर्यंतही निश्चित करता येणार नाही; तोपर्यंत त्या व्यक्तीचा आवडता विषय समजणार नाही…. जर आई-वडिलांच्या मनावर ते ठेवायचे म्हटले तर ते उचित ठरणार नाही; कारण आई-वडील निर्बुद्ध असू शकतात… आणि निर्बुद्ध असणे हा त्यांचा दोष असू शकत नाही. अशा प्रकारे मोठ्या वयापर्यंत त्या व्यक्तीचा (वर्ण) व्यवसाय निश्चित होऊ शकणार नाही… यासाठीच अशा निर्बुद्धांच्या हातात भवितव्य सोपविण्याऐवजी… वर्णव्यवस्थेनुसार (जन्मतःच) वर्ण निश्चित करणे श्रेयस्कर नाही काय ?… नाहीतर निर्बुद्ध आणि दुर्बल लोकांना जगण्याकरिता काहीही शिल्लक राहणार नाही… म्हणून व्यवसाय हा जन्मतःच निश्चित करणे अधिक योग्य आहे. खीं ळी हीीरप पशि लळरश्र ळपीींळपलीं लश्रीळखू शीशी ळीह शिषशीशपलश लळीींह. अनुवंश आणि प्रजननशास्त्राचा अभ्यास केल्यावर हे कळून येते की, वर्ण हा जन्मजातच मानला पाहिजे… त्याला शिक्षण कोणते द्यावे हेही पूर्वनिश्चित (म्हणजे जन्मावरून) असले पाहिजे. तेव्हा, शास्त्रीय आणि व्यावहारिक अशा सर्व कारणांवरून वर्ण हा जन्मावरूनच निश्चित होणे आवश्यक आहे.” हा निष्कर्ष मांडणे हाच या प्रकरणाचा हेतू आहे. (या प्रकरणात रोमन लिपीतील इंग्रजी उल्लेख ७० आहेत.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.