अब्राहम कोवूर

२० व्या शतकातील भारतातील विवेकवादी चळवळीचे पितामह म्हणून डॉ. अब्राहम कोवूर ह्यांचा उल्लेख करावा लागेल. अमोघ वक्तृत्व, वैज्ञानिक विचारसरणी, परखड टीका आणि चमत्काराची प्रात्यक्षिके ह्यामुळे त्यांची भाषणे गाजत. श्रोतृवर्गाचा त्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळे. चमत्कार ही बाबाबुवांची केवळ हातचलाखी आहे हे ते दाखवीत आणि तथाकथित अध्यात्म आणि संघटित धर्मावर तुटून पडत. १९६० ते १९७० च्या दशकात त्यांनी भारताच्या गावागावांतून आणि शहराशहरांतून अशी शेकडो भाषणे दिली. बाबाबुवांना चमत्कार करून दाखविण्याचे खुले आह्वान ते देत. त्या काळीही पुट्टपूर्तीच्या सत्य साईबाबांचे बरेच प्रस्थ असे. आपल्या भाषणात डॉ. कोवूर प्रामुख्याने सत्य साईबाबांना लक्ष्य करीत. सत्यसाईबाबाप्रमाणे हवेत हात फिरवून ते हातातून विभूती काढून ती श्रोतृवर्गाला वाटत. थोड्या सरावाने आपण पण असे प्रयोग करू शकाल असे ते आवर्जून सांगत. आजपण अंधश्रद्धा निर्मूलनाचे हजारो कार्यकर्ते त्यांची चमत्कार सादरीकरणाची प्रभावी पद्धत अनुसरताना आढळतात. दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या अनेक बाबाबुवा, ज्योतिषी ह्यांना त्यांनी समोरासमोर विरोध केला. ‘ह्या जगात कुणाकडेही दैवी शक्ती नाही. आणि कधीही नव्हती. अशा त-हेच्या वावड्या केवळ धर्मग्रंथात अथवा सनसनाटी करणाऱ्या वृत्तपत्रातच असतात’ अशा निष्कर्षाप्रत ते आले. १९६३ साली डॉ. कोवूर ह्यांनी योग्य देखरेखीखाली बंद लिफाफ्यातील नोटेचा नंबर ओळखणे, पाण्यावर चालणे, हवेतून वस्तू काढणे इत्यादी २३ चमत्कारांच्या यादीतील कुठलाही चमत्कार करणाऱ्यास १ लाख रु.चे बक्षीस जाहीर केले.
*(१९५९ मध्ये त्यांनी The Indian Committee for Scientific Investigation of claims of the Paranormal. (CSICOP) ची स्थापना केली. त्या वेळी विवेकवादासाठी झटणारे त्यांचे एकमेव व्यक्तिमत्त्व होते व भारतातील अनेक विवेकवादी त्यांच्याभोवती गोळा झाले) श्रीलंकेत असताना त्यांनी Ceylon Rationalist Association भरभराटीस आणली. ह्या संघटनेचे ते तहहयात अध्यक्ष होते. ढहश उशूश्रेप ठरींळेपरश्र आलसीरवी नावाचे वार्षिक ते काढत. १९६१ मध्ये युरोपला जाऊन त्यांनी World Union of Freethinkers शी संपर्क साधला. स्वतःच्या जीवनात पूर्णपणे बुद्धिवादी असलेल्या प्रा. डॉ. अब्राहम कोवीर ह्यांनी निवृत्तीनंतर अथकपणे दोन दशके अंधश्रद्धा निर्मूलनाची प्रभावी जनचळवळ केली. त्यांची ‘इशसेपश वेवाशप रपव क्रेवी’ आणि ‘शोपी रपव डळिीळीी’ ही पुस्तके आजही लोकप्रिय आहेत. सच्च्या विवेकवाद्यांप्रमाणे ते आपल्या मृत्युपत्रात लिहितात., “मी मरण आणि पारलौकिक जीवनाबाबत भीती बाळगत नाही. एक चांगला आदर्श म्हणून माझ्या प्रेताचे दफन न करता ते मेडिकल कॉलेजला विच्छेदनासाठी द्यावे. माझे डोळे नेत्रपेढीला द्यावे आणि माझ्या हाडांचा सांगाडा कॉलेजच्या प्रयोगशाळेस द्यावा’ त्याप्रमाणे Thurston कॉलेजमधील विद्यार्थी आजही शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांच्या सांगाड्याचा उपयोग करतात.
डॉ. कोवूरांच्या पश्चात अंधश्रद्धा-निर्मूलनाच्या चळवळीत स्वतःला झोकून देणारे दुसरे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे बसवा प्रेमानंद हे होय. केरळमध्ये थिऑसॉफिस्ट मातापित्यांच्या पोटी १९३० साली ते जन्मले. लहान वयात शाळा सोडून ते स्वातंत्र्यचळवळीत सामील झाले. आज गेले ३०-४० वर्षे ते सर्वस्व पणाला लावून विवेकवादी चळवळीत सक्रीय आहेत. डॉ. कोवूरांचा सत्यसाईबाबाविरोधी लढा त्यांनी चालू ठेवला. १९७५ पासून आजतागायत ते सत्यसाईबाबांच्या साम्राज्याशी टक्कर देत आहेत. १९८६ मध्ये आपल्या पाचशे कार्यकर्त्यांना घेऊन पुट्टपूर्ती येथील साईबाबांच्या आश्रमावर त्यांनी मोर्चा काढला होता. त्यात त्यांना अटक झाली. साईबाबा हवेतून सोन्याची अंगठी निर्माण केल्याचा दावा करीत. तेव्हा त्यांच्यावर गोल्ड कंट्रोल अॅक्टखाली खटला भरण्याची भन्नाट कल्पना बी. प्रेमानंद यांचीच आहे. परंतु न्याय आणि शासनाचे हात बाबाबुवांच्या अनैतिक धंद्यापर्यंत पोचताना दिसत नाहीत. ह्याउलट बाबाबुवांच्या संस्था आणि संघटित धर्मसंस्था मात्र विवेकवादी चळवळीतील नेत्यांवर विविध न्यायालयांत वेगवेगळे अब्रुनुकसानीचे खटले दाखल करून त्यांना सळो की पळो करून सोडतात. आजतागायत ते एकही खटला जिंकले नसले तरी त्यांचे उपद्रवमूल्य बरेच आहे.
बी. प्रेमानंद ह्यांनी Federation of Indian Rationalist Associations (FIRA) ची स्थापना केली. देशभरातील वीसहून अधिक विवेकवादी संघटना ऋखठअ च्या सदस्य आहेत. २००५ ला पुण्याजवळ वाघोली येथे त्यांचे संमेलन भरले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे यजमानपद होते. ह्या संमेलनाला नामवंत शास्त्रज्ञ, विचारवंत, माध्यमांचे प्रतिनिधी तसेच देशभरातून आलेल्या अनेक प्रतिनिधींनी हजेरी लावली. विवेकवादी चळवळी खऱ्या अर्थाने लोक-चळवळी कशा होतील ह्यावर विचारमंथन झाले. प्रकृती अस्वास्थ्याला न जुमानता बी. प्रेमानंद संमेलनाला उपस्थित होते.
बी. प्रेमानंद बाबाबुवांच्या चमत्कारामागील विज्ञान एखाद्या सराईत जादुगाराप्रमाणे प्रयोग करून स्पष्ट करतात. परदेशात त्यांचे टी.व्ही.वर सत्तरावर कार्यक्रम झाले आहेत. बी.बी.सी.ने काढलेल्या Guru Busters ह्या डॉक्युमेंटरीमध्ये ते पारलौकिक सामर्थ्याचा दावा करणारे हवेत तरंगणे, जिभेतून, पाठीतून त्रिशूळ, आकडे खुपसणे अशासारखे प्रयोग करताना दिसतात. त्यांची २६ एक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील Science Versus Miracles इत्यादी पुस्तके व त्याचे खपवळरप डाळिल नावाचे मासिक देशविदेशात प्रसिद्ध आहे. १९७६ मध्ये जेव्हा डॉ. कोवूरांना वयपरत्वे काम झेपेनासे झाले तेव्हा Indian CSICOP ची धुरा बी. प्रेमानंदांनी आपल्या खांद्यावर घेतली. डॉ. कोवूरांच्या पश्चात त्यांचे चमत्कार सिद्ध करण्याचे १ लाख रुपयांचे आह्वान त्यांनी चालू ठेवले. केन्द्र सरकारच्या NCSTC ने (National Council for Science & Technology Communication) त्यांना दक्षिणावृत्ती दिली होती. त्या अंतर्गत त्यांनी उत्तर भारतातील निवडक शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. त्यांची महाराष्ट्रातील १९८२ मधील ‘विज्ञान यात्रा’ आणि १९८७ मधील ‘भारत जनविज्ञान जथा’
चांगलाच गाजला. _ महाराष्ट्रातील ‘विज्ञान यात्रेची’ पार्श्वभूमी मजेशीर आहे. १९८२ च्या सुमारास श्रीलंकेहून केरळात आलेला एक सिद्धम् बाबा केवळ नारळाचे पाणी पिऊन जगत असल्याचा दावा करी. ईश्वराचे अस्तित्व आणि त्याची दैवी शक्ती सिद्ध करण्यासाठी तो आपल्या डोक्याने १०१ नारळ फोडीत असे. सत्यसाईबाबांचे समर्थक असलेल्या मातृभूमी साप्ताहिकाने ह्यासंबंधीचे आह्वान जाहीर केले. बी. प्रेमानंद चांगलेच डिवचले गेले. त्यांना आठवडाभरात आपल्या डझन कार्यकर्त्यांना डोक्यावर नारळ फोडण्याचे प्रशिक्षण दिले. (फोडावयाचे नारळ पुरेसे कोवळे असण्यात सर्व चलाखी होती.) ह्याचे प्रात्यक्षिक आणि अन्य चमत्कार करीत कार्यकर्त्यांनी आख्खा केरळ पिंजून काढला. देशविदेशात ह्याचा बोलबाला होऊन ठिकठिकाणाहून त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रणे येऊ लागली. त्यातील एक होते पुण्याचे. प्रेमानंदांना वाटले पुण्याचा कुणी सनातनी आपली खोड जिरविण्यासाठी आपल्याला जाळ्यात ओढीत आहे. पण ते आमंत्रण निघाले ‘क्लोरोफॉर्म’कार डॉ. अरुण लिमये ह्यांचे. प्रेमानंदांचे सप्रयोग भाषण ऐकून ते इतके अस्वस्थ झाले की अनेक सामाजिक संस्थांच्या आणि स्थानिक शिक्षणसंस्थांच्या मदतीने पुढील तीन महिन्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी विज्ञान यात्रेचे आयोजन केले. नाट्यपूर्ण सादरीकरण, अतीन्द्रिय शक्ती दाखवा आणि १ लाख रु. जिंका ही घोषणा, पाठीत हुक खुपसून गाडी ओढणे, आगीतून चालणे इत्यादी चमत्कार हजारोंची गर्दी खेचून आणत. विज्ञानयात्रेदरम्यानच कॅन्सरग्रस्त डॉ. अरुण लिमये यांचे निधन झाले. प्रेमानंदांनी दौरा चालूच ठेवला. ह्या झंझावाती दौऱ्याचा परिणाम हळू हळू विरत गेला. लोकविज्ञान परिषद व अन्य समाजवादी स्थानिक नेतृत्वाने ह्या यात्रेनंतर अंधश्रद्धा निर्मूलनाचे लक्ष्य पुढे चालू ठेवले नाही.
ह्यानंतर तीन चार वर्षांनंतर १९८६ मध्ये श्याम मानव व डॉ. नरेन्द्र दाभोलकर ह्यांनी विदर्भामध्ये पाच-सहा जणांच्या ट्रस्टच्या रूपात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.