‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’

कार्ल मार्क्सने सुमारे दीडशे वर्षांपूर्वी म्हटले होते की, बाजारपेठ ही विनिमय व नियमनाची बाब आहे, पण जेव्हा बाजारपेठ हे जीवनाचे तत्त्वज्ञान होते आणि ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’, म्हणजे खासगी संपत्ती हेच सर्व मानवी व्यवहाराचे ‘चलन’ होते, तेव्हा समाजच रानटी स्थितीत जातो. त्या रानटी स्थितीतून समाज बाहेर पडत गेला तेव्हा नैतिकता आणि सांस्कृतिकता जन्माला आली. त्या प्रवासातच साहित्य-संगीत-कला निर्माण झाले. ‘कल्चर’ आणि ‘सिव्हिलायझेशन’ निर्माण झाले. कारण जीवनाचे तत्त्वज्ञान बाजारशक्तींपासून मुक्त झाले. विक्रेय वस्तू आणि अमूल्य वस्तू हा भेद आवश्यक होता. ‘ज्ञान’ ही संकल्पना उदात्त मानली गेली ती त्यामुळेच. म्हणूनच तेव्हा मार्क्सने म्हटले होते की, ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’ व ‘मार्केट’ यांनी त्यांची व्यावहारिक पातळी सोडली की सर्व ‘अमूल्य’ गोष्टी बाजारात येतील विक्रेय होतील आणि मानवी हासपर्व सुरू होईल. मग मानवी नाती आणि कलानंद, ज्ञान आणि निसर्गही ‘बाजारात’ येईल. मार्क्सने त्या अवस्थेचे वर्णन ‘रिटर्न ऑफ बॉर्बरिझम’ असे केले होते.
[ दि.१९ मार्च २०१० च्या लोकसत्ता मधील माया आणि लोभ या संपादकीयांमधून साभार .]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.