थोडेसुद्धा ‘बहु’ आहे

“शेतकीतून मिळालेले थोडेसुद्धा ‘बहु’ आहे. कारण ते थोडे झाले तरी नवीन पैदाशीचे आहे. बुद्धी विकण्याचे व्यवसाय करून धनाचे ढीग मिळवले तरी. त्यात नवीन कमाई नाही. द्रव्याचे नुसते स्थलांतर आहे. त्याने एक पिशवी भरल्याने दुसरी पिशवी रिकामी होण्यापलीकडे जगाच्या समृद्धीत भर अशी पडत नाही. परंतु शेतकऱ्याच्या कमाईच्या हरएक कणात साक्षात् लक्ष्मीचा निवास आहे. लक्ष्मी निराळी, पैसा निराळा, पैसा काय! चोरीने मिळतो, लुटीने मिळतो, सट्टेबाजीने मिळतो, लबाडीने मिळतो, तोंडपाटीलकीने मिळतो, दंडुक्याने मिळतो, राजाच्या शिक्क्याने मिळतो; आणि कशाने मिळत नाही? पण लक्ष्मींचा एक कणही मिळवण्याचे सामर्थ्य कोणत्याही पंडिताच्या तोंडपाटीलकीत नाही, कोणत्याही दांडगोबाच्या दंडुक्यात नाही किंवा कोणत्याही राजराजेश्वराच्या शिक्क्यात नाही.’ — विनोबा

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.