पत्रसंवाद

दत्तप्रसाद दाभोळकर, ‘या’ सदर बझार, सातारा. स्थिरध्वनी (02162)239195), भ्रमणध्वनी : 9822503656 id : dabholkard@dataone.in .
सूर्यापोटी शनैश्वर…? पण कोण…?
आजीव वर्गणीदारांची व्यथा मांडणाऱ्या माझ्या पत्राची खिल्ली उडवीत मला तर्कट तिरकस भाषेत दिलेले आपले उत्तर (आ.सु.494, फेब्रुवारी 2012) वाचले. आम्ही संपादक आहोत. मासीक आमचे आहे. तुमचे पैसे बुडवून वर आम्ही, तुमचीच आमच्या मासीकात खिल्ली उडव शकतो हा तमचा अहंकार मी समजू शकतो. पण रस्त्यावरचे गंड ज्याप्रमाणे आई, वडील, जात यांचा उद्धार करीत एखाद्यावर हल्ला करतात. त्याप्रमाणे माझे कुटुंब, परिवार यांचा उद्धार आपण करावयास नको होता. कारण आ.सु.च्या कार्यकारी संपादकांचे घर, कुटुंब, परिवार, वंश या गोष्टी पण थोर आहेत. त्यात लोकांना दिलेला शब्द विसरून, त्यांचे पैसे बुडविण्याचा कुलवृत्तांत नाही. त्यामुळे अजूनही माझा मूळ प्रश्न व त्यामागची कारणे लक्षात घेऊन आपण उत्तर द्यावे ही नम्र विनंती.
(1) एखादा करार एकतर्फी मोडण्याचा नैतीक अधिकार आपणाला कोणी दिला? गावातील बिल्डर असे करतात. – वैचारिक मासिके चालविणाऱ्यांनी असे करावे का?
(2) मराठीत वर्गणीदार होणारे कमी असतात. आजीव वर्गणीदार होणारे तर फारच कर्मा असतात आणि अभिजन संपादक त्यांना छान फसवत असतात. ह. मो. मराठे यांनी तर हे काही महिन्यांत करून दाखविले होते.
(3) हा व असले कटू अनुभव बरोबर असल्याने ‘अंतर्नाद’ मासिकाने 95-96 च्या सुमारास, दोन हजार रुपयात आजीव वर्गणीदार ही योजना सुरू केल्यावर मी त्यांना दोन हजार रुपयांचा ‘ड्राफ्ट’ (चेक नव्हे!) पाठवून कळविले होते. ‘आपले मासीक आवडले. ते ‘सांस्कृतिक संवर्धना’साठी काम करते आहे. त्यामुळे तुमच्याकडून फसवले जाऊ नये असे वाटते. म्हणून हा ड्राफ्ट आजीव वर्गणी म्हणून नव्हे तर देणगी म्हणून पाठवीत आहे. एक वर्षाची वर्गणी वेगळी पाठवीत आहे.’
(4)’अंतर्नाद’च्या संपादकांनी तो ड्राफ्ट लगेच परत पाठविला. ‘आम्ही देणगी स्वीकारीत ब्द आम्ही पाळू व आमच्यावर विश्वास ठेवून फक्त आजीव वर्गणी देणार असाल तरच हा ड्राफ्ट परत पाठवा’ मी त्यांना ड्राफ्ट परत पाठविला. त्यांनी माझी त्यावर्षीची पाठवलेली वर्गणी परत पाठविली. (5) त्यानंतर काही वर्षांनी हे आजीव वर्गणीदार प्रकरण आपणाला झेपणार नाही हे लक्षात आल्यावर, ‘अंतर्नाद’च्या संपादकांनी आजीव वर्गणीदारांना कळविले की ही योजना आम्ही बंद करत आहोत व तुमचे दोन हजार रुपये परत पाठविणार आहोत.
(6) आपण असे काही करावे अशी माझी माफक अपेक्षा होती. पण मी चुकलोच! आपण सांस्कृतिक संवर्धनासाठी काही करत नाही. – तर आपणाला इतरांचे स्वकष्टार्जित पैसे बुडवून, स्वतःभोवतालच्या चार मित्रांच्यामधील ‘शुष्क तात्वीक चर्चा’ सुरू ठेवावयाची आहे…. सूर्यापोटी शनैश्वर कोण? आपण की मी?
* आसुचे आदरणीय संपादक हे पत्र छापून त्याला उत्तर देतील अशी खात्री नसल्याने,
या पत्राच्या प्रती या अंकातील लेखकांना पाठवीत आहे. नाहीतर तुमचे पैसे हडप करून वर तुमचीच खिल्ली उडविली या ‘विवेकवादी समाधाना’त संपादक राहतील.

III

माझ्या काही नैतीक प्रश्न विचारणा-या पत्राला, अनैतिक भाषेत, कमरेखाली सपासप वार करणारे आपले उत्तर वाचून मी आपणाला लगेच उत्तर पाठवले आहे. माझी तक्रार पैशाबद्दल नाही तर लोकांचे पैसे बुडविण्याची जी बिल्डर संस्कृती वैचारीक मासिकात घुसलेली जी भयावह संस्कृती आहे त्याबद्दल आहे. ते आपल्या नीट लक्षात यावे म्हणून आणखी दोन गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात.
(1) गेल्या वर्षी ‘मुक्त शब्द’ हे नवे सुंदर मासिक सुरू झाले. त्याची सहा वर्षाची वर्गणी 1800, रुपये होती. मी त्यांना लगेच 1800 रुपयांचा धनादेश पाठविला. पत्रात लिहिले ‘मासिक सहा वर्षात बंद पडले तर पैसे बुडाल्यापेक्षा येवढे चांगले मासिक बंद पडले याचे दुःख होईल’ – (अर्थात त्यावेळी मला कल्पना नव्हती की महाराष्ट्रात नवी ‘आदर्श सुधारकी पद्धत’ निर्माण करण्यात येत आहे. त्याला बळी पडले तर ते कळविणार ‘आम्ही या वर्षाची वर्गणी 18 हजार रुपये केली आहे. उरलेले पैसे पाठवा’, नाहीतर तुमचे 1800 रुपये जप्त!)!
(2) आपण केवढा भयावह पायंडा पाडीत आहात हे समजावून घ्या. मराठीतील मासिके अस्तित्वात असावीत म्हणून मी बहुतेक मासिकांची वर्गणी (वा आजीव वगणी) पाठवतो. एक गोष्ट सांगतो. प्रथम माझी 5-6 पुस्तके ‘राजहंस प्रकाशन’ या संस्थेने प्रसिद्ध केली होती. नंतर मी ‘मनोविकास प्रकाशन’कडे वळलो. त्यांनी माझी दोन पुस्तके प्रसिद्ध केली. त्यांचे ‘इत्यादी मासिक प्रसिद्ध झाल्यावर वर्गणी पाठविली. मासिक बंद!
एक भयावह नवा पायंडा पाडत, आजीव वर्गणीदारांचे पैसे बुडवत, आपले संस्थापक-संपादक दि.य.देशपांडे यांच्या नावाला काळीमा फासणारे कृत्य करण्याऐवजी आपण आजीव वर्गणीदारांसमोर खालील तीन पर्याय ठेवावेत.
(1) ज्यांना आमचे म्हणणे मान्य नाही त्यांना ते वा मासिक हयात असेपर्यंत मासिक पाठविले जाईल.
(2) ज्यांना आमच्या खऱ्या खोट्या अडचणीबाबत सहानुभूती आहे तयंना आजीव वर्गणीसाठी भरलेली रक्कम परत घेऊन आम्हाला आमच्या शब्दापासून मुक्त करावे.
(3) ज्यांना आमच्याबद्दल सहानुभूती आहे त्यांनी तीन हजार रुपयांमधून भरलेले पैसे वजा करून उर्वरीत पैसे पाठवावेत.
खरे सांगायचे तर आपणाला पर्याय 1 व 2 यांची पुर्तता करणे फारसे कठीण नाही. कारण आपल्या मासिकाचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये यावे असे एक मोठेपण आहे. 30-40 पानाच्या या अंकांत ‘तेवढेच ज्ञानप्रकाशात’ म्हणून कार्यकारी संपादक, संपादक-मंडळ, सल्लागार-मंडळ असे चक्क 14 जणांची नावे असतात. ही मंडळी बंगल्यात व सदनिकेत राहतात. त्यांनी वर्गणी करून ही योजना अमलात आणावी.
माझे आधीचे व हे पत्र प्रसिद्ध करणे खरे तर आपणावर बंधनकारक आहे. कारण मला दिलेल्या उत्तरात ‘विचारावेसे वाटते’ असे आपण लिहिले आहे. पण तरीही आपण माझी ही दोन्ही पत्रे प्रसिद्ध न करता पैसे हडप करून मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. म्हणून या पत्राच्या प्रती पण पहिल्या पत्रात लिहिलेल्या मान्यवरांना पाठवीत आहे. दिलेला शब्द मोडून लोकंचे पैसे बुडविणाऱ्या मासिकात आपण लिहावयाचे का याचा निर्णय मात्र लेखकांनी व सल्लागार मंडळीतील लोकांनी घ्यावा असे वाटते.
**आ.सू चे नवे ब्रिद वाक्य “आम्ही जाहिराती घेत नाही. – लोकांनी विश्वासाने दिलेले पैसे बुडवून आम्ही आमचे छंद जोपासतो!”
(वरील दोन्ही पत्रे -हस्व-दीर्घाचाही बदल न करता मुळाबरहुकूम छापली आहेत.- का.सं.)
[दत्तप्रसाद दाभोळकर यांच्याकडून आलेले दुसरे व तिसरे पत्र वर छापले आहे ह्या पत्रांवरून त्यांनी समंजसपणाशी फारकत घेण्याचे ठरविलेले दिसते. आजचा सुधारकची आजीव वर्गणीदारांविषयीची भूमिका पुढील अंकात देणार आहोत. दरम्यान दाभोळकरांची आजीव वर्गणी रु.500/- त्यांना परत पाठवत आहोत. – प्रकाशक]
सुरेश पिंगळे, (sureshpingalel2@gmail.com).ध्वनी : 09822081000
श्री. दत्तप्रसाद दाभोळकर यांचे तिरकस व तर्कटी भाषेत लिहिलेले पत्र वाचले. आपण अत्यंत आर्जवी भाषेत केलेले कळकळीचे निवेदन त्यांना भयंकर व अनैतिक वाटले, हे मोठे दुर्दैवी आहे.
त्यांच्या कलम 4 मधील उपकलम ‘क’ प्रमाणे त्यांनी दिलेली आजीव वर्गणी साभार परत करावी. त्यासाठी मी सोबत रु.6,000 चा चेक परत पाठवीत आहे. रु.3,000 माझ्या वर्गणीपोटी जमा करावेत व उरलेले अश्या तर्कटी वर्गणीदारांना परत करावेत, यासाठी पाठविले आहेत.
आपण अत्यंत उच्च दर्जाचे सामाजिक काम करीत आहात. मनःपूर्वक शुभेच्छा!
1 – माझ्या नावाशेजारी आ. 425 (पा.6010) असे लिहिले आहे.
2 – सोबत ICICI बँकेवरील चेक नं. 872305/11.02.12
3 – माझे e-mail ID – Sureshpingale12@gmail.com Tel.No.09822081000

प्रकाश बुरटे, मैत्र. प्लॉट नं 5. अंत्रोळीकर नगर नं 3, होटगी रोड. सोलापूर 413003.
मराठीकारण प्रश्नावली शिवसेना व मनसेला का पाठविली?
वरील प्रश्न पडण्याचे पहिले कारण माणसाच्या ओळखींची माझी संकल्पना, हे आहे. नकाशावर एखाद्या गावाची नेमकी जागा सांगण्यासाठी अक्षांश-रेखांश सांगावे लागतात. नाव आणि अक्षांश-रेखांश या नकाशावरील गावाच्या ओळखी आहेत. वास्तवातल्या गावाच्या आणखीही अनेक ओळखी असतात. अगदी त्याचप्रमाणे माणसाच्याही, जन्मदत्त नर-मादी, या जीवशास्त्रीय ओळखी आहेत. समाजात वाढताना नर-मादीचे. स्त्री-पुरुष, आई-वडील, भाऊ-बहीण, शेजारी होतात. वय, आणि आई वडील या जन्मासोबत मिळणाऱ्या निसर्गदत्त ओळखी आहेत. त्याशिवाय, नाव, गाव, जात, धर्म, देश, रेशनकार्ड, पासपोर्ट, भाषा, चालण्या-वागण्याची ढब, केसांची ठेवण, मित्र परिवार, कपडे, सवयी, रीतीरिवाज … -अशा मानवनिर्मित अनंत ओळखी आहेत. ही यादी कितीही मोठी केली, तरी प्रत्येक व्यक्ती त्याहीवर दशांगुळे उरतेच. ओळखींच्या अशा यादीत सतत नव्या ओळखींची भर पडत असते आणि जुन्या ओळखी पुसट होत असतात. हर गार्डाची न्यारी शिट्टीच्या चालीवर हर माणसाची न्यारी ओळख असे नक्कीच म्हणता येते. एकासारखी हुबेहूब दुसरी व्यक्ती सप्तखंड आणि त्रिकाळ शोधले तरी सापडत नाही. विविधतेने नटलेल्या जगातील प्रत्येक माणसाचे नेमके वर्णन अगणित ओळखींच्या मदतीनेच करयो शक्य आहे. प्रत्यक्षात काही विविक्षित हेतूंसाली ओळखीची चवकशी होते आणि ते स्वाभाविक आहे. अनेकदा ढोबळ वर्णनासाठी मोजक्या ओळखी पुरेश्या असतात. उदाहरणार्थ, आपल्याला रेल्वेत भेटलेल्या सहप्रवाशाशी त्याला समजणाऱ्या भाषेत बोलायचे असते. त्यासाठी सामाईक भाषेचा शोध घ्यावा लागतो. तेव् भाषिक ओळखीची गरज जाणवते.
आपल्या कोठल्याही ओळखीबद्दल अभिमान, कमीपणा, दुरभिमान, गर्व असे काहीच वाटायचे खरे तर काहीही कारण असू नये. जसे एखादी व्यक्ती स्त्री असते, किंवा रंगाने काळी किंवा गोरी असते, किंवा पाकिस्तानी असते. या ओळखीत अभिमान अथवा कमीपणा कशासाठी? ओळखींबाबत अभिमान, न्यूनगंड असे काही असणे हे समाज असंस्कृत असल्याचे लक्षण आहे. त्यातूनच जातीयता, धर्मांधता, वंशद्वेष, गर्व से कहोवाल्या घोषणा बळावतात. माझ्या वागण्यामुळे अभिमान-कमीपणा याची दुसऱ्याला बाधा होऊ नये. तसेच दसऱ्याच्या वागण्यामळे तशी बाधा मी मला होऊ देणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. कुणी कुणाच्या ओळखी सक्तीने पुसू नयेत किंवा आपल्या ओळखी दुसऱ्यावर लादू नयेत. लग्न झाल्यावर स्त्रीचे नाव-आडनाव रीतीरिवाजानुसार बदलणे हे देखील सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे. त्यामागे रीतीरिवाज न पाळल्यास भोगाव्या लागणाऱ्या संकटांची भीती असते.
परस्परांशी होणारे सहकार्य, स्थलांतर, कुतूहल. व्यवसायाबद्दल, छंद, अशा अनेक कारणांनी आपोआप संकर होत असाहात संतून संस्कृती प्रवाही शहादः सुता संपत्ती सक्तीनेही संकर घडवते ती विकृती असते. माणसाच्या ओळखीची ही संकल्पना आदर्श आणि म्हणून वास्तवात जपणे कठीणही असेल, परंतु सुसंस्कृतता हा विकत घेतल्या शेअर्सवर काहीही न करता आपसुख मिळणारा डिव्हिडंड नसतो. त्यासाठी सायास लागतातच नर-मादीचे स्त्री-पुरुष होताना कोण यातायात होते?). हे मान्य केले की इंतर ओळखींप्रमाणे भाषिक ओळखींबद्दलही चर्चा संभवते. एखादी व्यक्ती जितक्या सहजपणे स्त्री म्हणून जन्मू शकते, तितक्याच सहजपणे एखाद्या व्यक्तीची परिसर भाषा मराठी किंवा मल्याळी असू शकते. ती त्या व्यक्तीची भाषिक ओळख झाली. भाषिक ओळखीत ओळख या पलीकडे अभिमानास्पद किंवा लांच्छनास्पद असे काहीच असू नये.
मराठीत रूढ झालेला अस्मिता हा शब्द ओळखीपेक्षा नक्कीच वेगळा आहे. अशोक शहाणेंनी त्यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे आपणही कुणी कमी नाही ही भावना पसरवायची वृत्ती त्यात गेला बाजार लरी असते. सारे जहाँसे अच्छा कारण तो हिंदोस्ताँ हमारा आहे. हे काही,बरोबर नाही. पुढच्या पायरीवर अस्मितेसाठी राजकारण आणि वरच्या पायरीवर राजकारणासाठी अस्मितेचा वापर सुरू होतो. त्याचे प्रत्यंतर इंग्रजी पाट्यांना डांबर फासणे, रस्ते-स्टेशने-चौक यांची नावे बदलणे यातून मिळते. दाक्षिणात्य, बिहारी, मुसलमान यांच्या विरोधात शिवराळ भाषेत द्वेष पसरवला तोही मराठी अस्मितेचेच नाव घेऊन नंतर दंगली घडविल्या. त्यात अग्रभागी असणाऱ्या राजकीय पक्षांना मराठीकरणाची प्रश्नावली पाठवून त्यांना स्वतःच्या असंस्कृत कृत्यांना किमान सफेदी फासायाची संधी का द्यायची असा प्रश्न आहे. तरी बरे, एकेकाळी असल्या असंस्कृत राजकारणाला विरोध करणाऱ्या नीलम गो-हे आणि अनिल शिदोरे यांनी या प्रश्नावलीला प्रतिसाद दिला. नाही तर ठाकरी भाषेतून द्वेषाचा प्रचार झाला असता. या दोघांच्या टिपणातून माणसाच्या ओळखीतील विविधता मोकळ्या मनाने स्वीकारायला, त्यातून समृद्ध व्हायला काय हाती लागले याचा शोध घेतला तर पदरी निराशा येते.
जाता जाता आणि कायदे, सक्तो; आक्रमकता, परभाषाद्वेष, प्रमाणभाषेच्या व्याकरणाचे नियस, यांनी स्वभाषेचा विकास होत नसतो, तसाच तो केवळ पारितोषिके, सन्मान आणि संस्था यामुळेही होत नसतो. महाराष्ट्रातून काही माणसे बंगाली शिकायला गेली ती कुठल्या पैशाच्या आमिषाने किंवा भीतीने नाही. ती गेली मोहात पाडणारे बंगाली साहित्य, रवींद्र संगीत, शांतिनिकेतनचा प्रयोग, चित्रपट ह्यामुळे. दोस्तोव्हस्कीच्या कादंबऱ्या समजाव्यात म्हणून कुणी रशियन शिकले. शिवराम कारंथ मुळातून वाचावेत म्हणून कन्नड शिकावी. भाषा आणि संस्कृती समृद्ध होतात. त्या दोस्तोव्हस्की, काफ्का, रवींद्रनाथ, शरच्चंद्र, खांडेकर, पु.ल., बाबा आमटे, सत्यजित रे, अपर्णा सेंना अशा व्यक्तींमुळे. अशी माणसे फतवे काढून निपजत नाहीत, फतवे काढून रश्दींना जगणे तेवढे अवघड करता येते. मराठीकारणाच्या या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर भाषिक राजकारणाची आठवण जागविणारा मराठीकारण हा शब्द तपासायलाही हरकत नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.