वर्गांतर्गत प्रक्रियेची गुणवत्ता

‘शिक्षणाची गुणवत्ता’ याची नेमकी व्याख्या करणे अवघड असले तरी गुणवत्तेची एक ढोबळ कल्पना आपल्या सर्वांच्याच मनात असते. त्या कल्पनेत शाळेतील भौतिक सविधांपासून ते मुलांच्या यशापयशापर्यंतच्या अनेक बाबींचा समावेश असतो. आपल्या जनातल्या कल्पनेच्या आधारेच आपण शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत, समाधान, असमाधान, चता वगैरे व्यक्त करत असतो. गणवत्तेच्या या आपल्या कल्पनेत मुलांना कसे शिकवले जावे, वर्गातले वातावरण कसे असावे, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे सबंध कसे असावेत याबाबतच्या धारणांचाही समावेश असतो. या मांडणीपुरते आपण या सगळ्या धारणांना एकत्रितपणे वर्गांतर्गत प्रक्रिया असे म्हणूया आणि गुणवत्तापूर्ण वर्गांतर्गत प्रक्रियेची काही ढोबळ लक्षणे काय असू शकतील याचा शोध घेऊया. अर्थातच हा शोध आपल्याला आधुनिक शिक्षणशास्त्रातील काही तत्त्वांच्या आधारे घ्यायचा आहे .
अ. भयमुक्त वातावरण : गुणवत्तापूर्ण वर्गांतर्गत प्रक्रियेची पूर्वअट
शिकण्याचे काम विचार करण्याशी निगडित आहे. विचार करण्याचे काम मेंदूच्या काही विशिष्ट भागात चालते. जर आपल्याला भीती वाटली तर विचाराचे काम करणाऱ्या नंदूच्या भागाचे काम तात्पुरते बंद किंवा मंद होते. परिणामतः मुलांची शिकण्याची प्रक्रियासुद्धा तात्पुरती कुंठित होते. शिकताना समजा एखादी चूक झाल्यामुळे जर मुलाला कोणी ओरडले , अनेकांना आला असेल. याचे मुख्य कारण हे म्हणजे ओरडल्याने वा धाक घातल्याने येणारी भावनिक अस्थिरता आणि त्यामुळे थांबणारी विचारप्रक्रिया हेच आहे. वर्गात जर भीतीचे वातावरण असेल तर मुले विचार करू शकणार नाहीत आणि पर्यायाने शिकणार नाहीत अर्थातच गुणवत्तेला बाधा येईल.
वर्गात मुलांना कशाची भीती वाटू शकते याचा शिक्षक म्हणून आपण शोध घेणे महत्त्वाचे ठरेल. शारीरिक शिक्षांची भीती हा तर उघडच भाग आहे, त्यामुळे अशा शिक्षा टाळायला हव्यातच. मात्र मुलांनी केलेल्या चुकांबद्दल त्यांना लागेल असे बोलणे किंवा अपमान वा चेष्टा करणे कटाक्षाने टाळायला हवे. शिकताना एखादी चूक झाल्यास इतर मुलांकडून चेष्टा केली जात नाही ना याकडेही शिक्षक म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. खरे तर शिकताना चुका करण्याचा मुलांचा हक्क आपण मान्य करायला हवा आणि तो अबाधित राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. भावनिक स्थिरता असल्याविना मुले शिकती होणार नाहीत हे तत्त्व पारंपरिक छडी लागे छमछम या तत्त्वाच्या अगदी विरुद्ध आहे याचे भान येणे व त्यातून वर्गात विश्वासाचे वातावरण तयार होणे, हे गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रक्रियेकडे टाकलेले पहिले पाऊल असेल.
मुलांच्या चुकांकडे त्यांच्या शिक्षणातील एक पायरी म्हणून पाहायला हवे
मूल शिकत असताना जेव्हा चुका करते तेव्हाही ते काही विचार करत असते. हा विचार समजून घेणे शिक्षक म्हणून महत्त्वाचे आहे. कारण हा विचार समजला तर चुका सुधारणे कठीण राहणार नाही. मात्र यासाठी शिक्षकाने फारच सजग असावे लागते. चुका करण्यामागचा त्यांचा विचार कसा समजून घेता येईल हे आता एका उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊ.
आ. मुलांच्या घरच्या भाषेचा स्वीकार
शिकण्याची प्रक्रिया ही विचार करण्याशी जवळून जोडलेली आहे हे आपण पाहिले. आपला बहुतेक सारा विचार भाषेच्या माध्यमातून होतो. एका विशिष्ट वयात मूल परिसरात बोलली जाणारी भाषा अगदी नैसर्गिकपणे अवगत करते. आपण या भाषेला मुलाची घरची भाषा असे म्हणू. सामान्यपणे शाळेत शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरली जाणारी भाषा ही त्या त्या राज्याची प्रमाण बोली किंवा संपर्क भाषा असते किंवा इंग्रजीसारखी एखादी परभाषा देखील असते. शाळेत माध्यम म्हणून वापरल्या जाणाऱ्या भाषेला आपण शाळेतली भाषा म्हणू या. शाळेत माध्यम म्हणून वापरली जाणारी भाषा ही मुलाची घरची भाषा असेलच असे नाही. आदिवासी भागात घरची भाषा आणि शाळेतली भाषा यात बरेच अंतर असते. अशा परिस्थितीत घरच्या भाषेकडून शाळेतल्या भाषेकडे येण्यासाठी मुलांना अवधी तर द्यावा लागतोच, शिवाय मदत पण करावी लागते. यात सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण घरच्या भाषेचा आदर आणि स्वीकार करणे. सुरुवातीच्या तीन चार वर्षांत बोलण्यात वा लेखनात प्रमाण भाषेचा आग्रह न धरता अभिव्यक्तीला महत्त्व देणे गरजेचे आहे. काही उदाहरणांच्या आधारे हा मुद्दा आपण थोडा विस्ताराने पाहू या.
‘माकडाने लाकूड कशाने कापले?’ या प्रश्नाचे उत्तर वारली मुलाने ‘लाकूड करवती खाल कापेल.’ असे दिले वा लिहिले तर ते स्वीकारायला हवे. मुलाच्या घरच्या भाषेत हे वाक्य पूर्णपणे स्वीकारार्ह आहे. तुम्ही काल रात्री काय करत होतात? याचे उत्तर “काल रातचे आमी जान्यामामासांचे पत्ते खेलत” असे मिळाले तर वाडा तालुक्याच्या पूर्व भागात हे जाच्यातील बरोबर उत्तर मानायला हवे. कारण मराठीच्या प्रमाण बोलीसारखी ‘खेळत होते जात होतो’ अशी क्रियापदांची जोडी या भागातल्या मराठी बोलीत ऐकायला मिळत नाही. वाक्य ‘खेलत’ वा ‘जात’ पाशीच संपते. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांचे आदल्य शाळेत दाखल झाले पाहिजे. यासाठी त्यांच्या आसपास दिसणाऱ्या घडणाऱ्या घटनाबाबत आपण मुलांना बोलते व लिहिते करायला हवे. गावात येणारा भंगारवाला, जनाललीवाला, मासेवाली या सर्वांबाबत मुले भरभरून लिहितात व त्यांचे हे अनुभव अतिशय शीतपणे मांडतात, असा अनुभव आहे. नमुन्या दाखल पुढील लिखाण पाहा.

अमच्या डाएन पायाला शेती सोयोटोनशेतो भाले रस्त्याच्या तुला वाला रो रे। तो जारवा पायोले। मजे या लोकांना भावाजलो तो मागजला भार आ अटेनटारी,सूलमाया तामातोशाला आलो अतः आपल मोडलेल्या अन्नाला दिलो नि – हा लहान को करने आशिया लत बात का नागना प्रमाणावर दिलेल्या तारा भी ना तशत रचन बने भा”TT देशो सम्पन्न …२ १३ १. मो. जल मसाज केल्यानर आपल्स दिलेला शास्त्र मा पोलादो शान तेसातशमला उनलोगोमा पलाना रोतले यो मी जेन्यामा की याचना करना राजन को माता जेनासे मोजाना साधना शितो होयाकीतो लफोन । मानिनन मटेला सोमपरे मामा आमाको सलनालो अंगरक्षाका तिने मशीया नाव – प्रमिला रवींद्र पारधी
मुलांच्या घरच्या भाषेचा वापर व स्वीकारण्याबाबत काही जण म्हणतात की मुलांना शों (परच्या भाषेत लिहिण्याची) सवय लागली तर पुढे प्रमाणभाषेत ती कशी लिहू शकतील? हाटकोण भाषा ही फक्त सवय आहे’ या समजेवर आधारित आहे. खरे तर एकदा मुलांची भावामा चिहव्यवस्थेची समज नीट विकसित झाली की मग प्रमाण बोलीचा व प्रमाण लिखाणाचा हळ परिचय करून देता येतो. साधारणपणे पाचवीत येईपर्यंत आपल्या घरात बोलली जाणारी मामाही शाळेच्या पुस्तकाल्या भाषेपेक्षा वेगळी आहे, याची समज विकसित झालेली असते. अांतच यासाठी शिक्षकाने मुलाच्या भाषाविकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. समज विकसित झाली की बहुदा मुले आपसूकच दोन्ही भाषांचा वापर त्या त्या परिस्थितीत करू समतात. आदिवासी मुलांच्या निवासी शाळेत चार पाच वर्षे घालवलेली मुले आपापसात चालीत आणि पाहुण्यांशी मराठीच्या प्रमाणबोलीत बोलताना दिसतात.
मुलाच्या भाषेचा आणि पर्यायाने व्यक्तिमत्त्वाचा आदर हे गुणवत्तापूर्ण वर्गांतर्गत प्रक्रियेचे महत्त्वाचे लक्षण आहे.
इ. मुलांचा परिसर व शिक्षण यांची जोडणी
मुले ज्या परिसरात राहतात त्याच्याशी जोडून घेणे हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्वाचे लक्षण आहे. अशा जोडणीमुळे मुलांना वास्तवाचे भान येते. त्यांच्या शिकण्याला एक संदर्भ मिळतो. स्वतःच्या परिसराशी जोडून घेणे म्हणजे काय हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. ठाणे जिल्ह्यातील दाढरे नावाच्या छोट्याशा गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक संसाधने व ऊर्जाबचत हा भाग शिकताना गावाच्या पातळीवर वीज आणि रॉकेलची बचत कशी करता येईल याचा अभ्यास करायचे ठरवले. गावातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून त्यांनी माहिती गोळा केली. जर गावातले टंगस्टनचे दिवे बदलून सी.एफ.एल. दिवे वापरले तर किती ऊर्जा बचत होईल याचे गणित घातले. वीज नसताना गावात वापरण्यात येणाऱ्या 12 प्रकारच्या बत्ती व वात (तीन प्रकारच्या बत्त्या व चार प्रकारच्या वाती) यांच्या जोडीतील कोणती जोडी सर्वांत कार्यक्षम आहे हे शोधून काढले. कार्यक्षम बत्तीस साध्या बत्तीच्या पन्नास टक्के केरोसीन लागते हे प्रयोगाने दाखवून दिले आणि आपले म्हणणे ग्रामसभेसमोर मांडून लोकांना टंगस्टन दिवे व बत्त्या बदलण्यास प्रवृत्त केले. या सर्व प्रक्रियेतील मुले गणित व विज्ञानातील अनेक संकल्पना तर शिकलीच पण त्याचबरोबर आपले म्हणणे लेखी व तोंडी मांडणे, एका छोट्या बदलासाठी का होईना लोकांना प्रवृत्त करणे त्यासाठी पुढाकार घेऊन नेतृत्व करणे या बाबीही त्यांनी अवगत केल्या.
मुलांच्या या प्रयत्नाला दाद मिळाली आणि त्यांनी आपल्या छोट्याशा गावाहून थेट राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. या स्तरावर त्यांना पॅन आय आय टी अलुम्यनाय या संस्थेचे पारितोषिकही मिळाले. आपल्या परिसरातील समस्येचा शास्त्रीय, अभ्यास करण्यातून मुलांचे जे शिक्षण झाले ते कदाचित अनेक तासांच्या भाषणांतून वा परीक्षा देऊनही झाले नसते. म्हणून शिक्षणाची जोडणी परिसराशी करायलाच हवी. ई. समजून-उमजून शिकण्यावर भर
एखादी गोष्ट शिकताना ती मुळापासून समजून घेण्यावर भर देणे आवश्यक आहे. याचा नेमका अर्थ काय हे आपण भूगोलातील एका उदाहरणाच्या आधारे पाहू या. चंद्राच्या परिवलनाचा आणि परिभ्रमणाचा काळ एकच असल्याने चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते” हे पाठ्यपुस्तकातील वाक्य मुळापासून समजून घेण्यासाठी काय काय समजावे लागेल याची यादी पुढे दिली आहे.
1. परिवलन म्हणजे स्वतःच्या आसाभोवती फिरणे हे समजण्यासाठी पंखा चाक यासारख्या वस्तूंच्या आधारे आस ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. अशाप्रकारे फिरणाऱ्या सर्वच वस्तूंचा आस कसा व कुठे आहे याची कल्पना यावी लागेल. स्वतःभोवती फिरणाऱ्या माणसाचा आस कसा व कुठे आहे हे कळावे लागेल..
2. परिभ्रमण म्हणजे एखादी वस्तू दुसऱ्या एखाद्या वस्तूभोवती फिरणे ही कल्पना समजून घ्यावी लागेल, एखादी वस्तू स्वतःभोवती फिरत-फिरत दुसऱ्याभोवती फिरते म्हणजे कसे ते समजून घ्यावे लागेल.
3. प्रदक्षिणेसारखे उदाहरण घेऊन देवळाभोवती फेरी मारता मारता आपण त्याच देहात स्वतःभोवतीही एक फेरी पूर्ण करत असतो हे लक्षात घ्यावे लागेल.
4.मग या सर्व बाबींचा वापर करून चंद्र पृथ्वीभोवती कसा फिरतो याचे एक प्रतिमान उन्यांसमोर आणावे लागेल आणि मग चंद्राची एकच बाजू आपल्याला का दिसते याचे कारण खऱ्या अर्थाने कळेल.
या सर्व बाबींचा विचार केला तर पाठ्यपुस्तकातले एखादे कळीचे वाक्य उलगडून दाङवण्यासाठी कुशलतेने तयार केलेले, समजेवर भर देणारे शिकवण्याचे नियोजन लागेल. अशा प्रकारचे अध्ययन अनुभव रचणे हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्वाचे लक्षण आहे.
उ.मुलांच्या चुका शिकण्यातील अनिवार्य पायरी
शिकताना मुले जेव्हा चुका करतात तेव्हादेखील ती विचार करत असतातच. जेव्हा मुलाची चूक होते तेव्हा त्याने नेमका काय विचार केला आहे हे शिक्षकाने समजून घेणे गरजेचे आहे कारण हा विचार जर समजला तर चुकांची दुरुस्ती करणे सहज शक्य होते. मुलाने चूक करताना केलेला विचार कसा समजून घेता येईल हे आपण एका उदाहरणाधारे पाहू या.
1- आकृतीत रंगवलेला भाग हा वर्तुळाचा किती भाग आहे ते अपूर्णांकात लिही.

वरील मुलाने चुकीचे उत्तर दिले आहे. असे लक्षात आल्यावर शिक्षकांनी त्याला नला असे का वाटते? असा प्रश्न विचारला. मुलाने लिहिलेल्या उत्तरावरून त्याने रंगवलेला भाग अंश म्हणून तर न रंगवलेले 3 भाग छेद म्हणून दाखवले आहेत हे सहजच लक्षात येईल. एकदा नेमकी काय गडबड आहे हे कळले तर मग मुलाला मदत करणे सहज शक्य होईल मात्र त्यासाठी मुलाला केवळ चूक बरोबर न ठरवता, त्याचा विचार समजून घ्यायला हवा. प्रणवत्तेच्या वाटेवर चालणाऱ्या शिक्षकाला खरे तर बरोबर उत्तरांपेक्षा चुकीच्या उत्तरांत जास्त रस असायला हवा.
5. वाचन-लेखनावर प्रभुत्व
वाचन आणि लेखन ही औपचारिक शिक्षणाची साधने आहेत. आपल्या अभ्यासक्रमानुसार शाळेच्या पहिल्या दोन वर्षांत मुलांनी वाचन लेखनावर चांगले प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे. हे प्रभुत्व जर दुसऱ्या वर्षापर्यंत आले नाही, तर मुले औपचारिक शिक्षणात मागे पडण्याचा धोका निर्माण होतो. वाचलेले समजत नाही म्हणून पाठ करावे लागते वा स्वतःहून लिहिता येत नाही, म्हणून पाहून लिहावे लागते. वाचन-लेखनावर प्रभुत्व
मिळवण्यासाठी पद्धतशीर कार्यक्रमाची आखणी करणे अत्यावश्यक आहे.
वाचन म्हणजे अर्थ लावणे (meaning making) असते. अर्थ न लावता कवण्याला वाचणे म्हणता येणार नाही. त्यामुळे समजून वाचताना मूल दोन वेगवेगळ्या प्रक्रिया एकाचवेळी करत असते. लिपीच्या माध्यमात लिहिलेल्या संदेशातून अर्थ काढत असते आणि आपण काढलेला अर्थ योग्य आहे का, हेदेखील तपासून घेत असते. त्यामुळे वाचनाची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे. तिच्यावर प्रभुत्व हळूहळू येते आणि त्यासाठी विचारपूर्वक प्रयत्नही करावे लागतात.
लिहिताना मुलाला आधी मनात आपल्या विचाराचे संयोजन करावे लागते व त्यानंतर लिपीचा वापर करून आपले म्हणणे कागदावर उतरवावे लागते. ही प्रक्रियाही जटिल आहे. त्यामुळे शिक्षणाचा जिना चढताना मुलाला या पहिल्या पायऱ्यांवर ठेच लागणार नाही. याची खबरदारी घेणे गुणवत्तेचे महत्त्वाचे लक्षण आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण रोज वर्गात काय घडणार हे शिक्षकावर अवलंबून आहे. शिक्षकाने आपले ज्ञान अद्यावत ठेवणे त्यासाठी गरज लागेल तेथे तंत्रज्ञानाचा आधार घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षक म्हणन आपल्याला सतत शिकते राहायला हवे आणि मुख्य म्हणजे मुलांवर नितांत प्रेम असायला हवे. तरच या कामातील जबाबदारी व कष्ट आपण निभावू शकू.
231, वडवली रोड, मु.पो.सोनाले, ता. वाडा, जिल्हा ठाणे 421303

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.