संकलित, नैदानिक मूल्यमापन मुलांबद्दल काय सांगू शकते?

मापन हा नेहमीच एक वादाचा विषय राहिला आहे. मूल्यमापन कसे करायचे, कुणी करायचे, कधी करायचे यावर अनेक मत-मतांतरे आहेत. मुलांच्या भावनिक स्वास्थ्याशी जवळचा संबंध असल्यामुळे हा विषय विशेष महत्त्वाचा आहे. आणि भारतासारख्या देशात जेथे बहुतेक शाळांमध्ये मूल्यमापनासाठीच अध्यापन केले जाते तेथे वर यावर चर्चा होणे आवश्यकच आहे. जगभरातल्या अभ्यासानंतर हे दिसून आले आहे की शिक्षकांनी स्वतः केलेले सातत्यपूर्ण सर्वंकष आकारिक मूल्यमापनच मुलांना किती येते याबद्दल नेमका अंदाज देऊ शकते. आज शिक्षण हक्क अधिनियम आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा यांतही हाच आग्रह धरला आहे. संकलित मूल्यमापनाचा उपयोग आजपर्यंत पास नापास ठरवण्यासाठीच होत आलेला आहे. मुलांची बलस्थाने जाणून घ्यायला, ती कुठे कमी पडत आहेत हे पाहायला, किंबहुना अध्यापनात सुधारणा व्हावी यासाठीही या प्रकारच्या मूल्यमापनाचा वापर होताना दिसत नाही. शिवाय वर्ष अखेरच्या परीक्षांमधील बहुतांश प्रश्नांचा भर केवळ स्मरणशक्तीवर असतो.

आजकाल आठवीपर्यंत नापास तर कुणी होत नाही. पण मुले पुढच्या वर्गात गेल्यानंतर आधीच्या वर्षीच्या कोणत्या संकल्पनांवर त्यांना अधिक काम करणे गरजेचे आहे यावर शिक्षकांकडून मुलांना नेमके काही कळत नाही. नवीन वर्गात कच्च्या पायावरच नवीन ज्ञान संपादन करण्याची अपेक्षा आपण मुलांकडून करत राहतो.

संकलित, नैदानिक मूल्यमापनाची वैशिष्ट्ये
एखाद्या वर्गाची एखाद्या विषयाची सरासरी समज काय आहे, कोणत्या संकल्पना बहुतेक मुलांना प्रामुख्याने अवघड वाटतात हे जाणून घेण्यासाठी संकलित व नैदानिक (ciagnostic) मूल्यमापन खूप उपयोगी ठरते. एक तर हे मूल्यमापन शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला केले पाहिजे. मुले दीडेक महिन्यांच्या सुट्टीनंतर शाळेत आलेली असतात. त्यांना मागच्या वर्षीचे खरोखर काय समजले आहे हे आपल्याला अश्या परीक्षेवरून कळू शकेल. दुसरे म्हणजे या परीक्षेत शक्यतो मागच्या वर्षीच्या सर्व संकल्पनांचा समावेश होईल असा भर असावा. प्रश्नांची भाषा सरळ सोपी व रचना मुलांच्या परिचयाची असावी. प्रश्न मुलांच्या जीवनाशी निगडित असावेत. लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अशा तीनही रूपांमध्ये परीक्षा घेतली तर मुलांच्या वेगवेगळ्या कौशल्यांना योग्य न्याय मिळेल.

नवनिर्मिती या संस्थेबरोबर मूल्यमापनावर काम करताना मी अशा प्रकारची गणित समजविण्याची चाचणी तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केली होती. प्रत्यक्ष मूल्यमापन करताना वर्गातील कुठल्याही ५ मुलांची (random selection) निवड केली. महत्त्वाचे म्हणजे मुलांना जेथे जेथे प्रश्न समजायला अडचण आली तेथे-तेथे त्यांना मदत केली कारण मूल्यमापनाचे मुख्य ध्येय त्यांची गणिताची समज तपासणे हे होते, त्यांच्या वाचण्यालिहिण्याचे कौशल्य नव्हे. याच कारणामुळे एखाद्या मुलाने अंक शब्दात लिहा या प्रश्नात तेवीस ऐवजी तीवीस किंवा सत्त्याहत्तर ऐवजी सतेहतर असे लिहिले असले तरी आम्ही ते बरोबर दिले.

डाटा विश्लेषण
सर्व पेपर तपासून झाल्यावर मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पुढीलप्रमाणे मांडणी केली.

प्रश्न १

प्रश्न २

प्रश्न ३

प्रश्न ४

एकूण

विद्यार्थी अ

विद्यार्थी ब

विद्यार्थी क

एकूण

१३

किती पैकी

२४

%

१००

३३.

८३.

५४.१६

या प्रकारच्या मांडणीमुळे आडव्या ओळीत शेवटी प्रत्येक विद्यार्थ्यांचे एकूण गुण मिळतात तर उभ्या स्तंभामध्ये प्रत्येक प्रश्न कितीजणांनी अचूक सोडवला आहे ते कळते. प्रत्येक प्रश्न हा एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असल्यामुळे एखादी संकल्पना वर्गातील अंदाजे किती टक्के मुलांना सोपी वाटते हे कळून येते. उदाहरणादाखल एका वर्गाचा गणिताच्या चार संकल्पनांबद्दलचा तक्ता खाली दिला आहे.

प्रश्न क्रमांक

संकल्पना

प्रश्न २

किती % मुलांना सोपे वाटते

हातच्याची बेरीज

१००

अपूर्णांक

३३.

घनफळाची बेरीज

८३.

हातच्याची वजाबाकी

अशी माहिती मिळाल्यानंतर अधिक वर्गाची व अधिक शाळांची तुलनाही करता येते.

शाळा १    शाळा २
तिसरी    चौथी    तिसरी    चौथी
हातच्याची बेरीज
हातच्याची वजाबाकी
घनफळाची बेरीज
अपूर्णांक
अवघड – सोपे I खूप सोपे ।।।

एकदा अशा प्रकारची माहिती नैदानिक चाचणीतून मिळाली की त्या वर्गासाठी किंवा शिक्षकांसाठी काय करता येईल हे ठरवता येऊ शकते. अशा नैदानिक चाचण्या तयार करणे मात्र सोपे काम नाही. त्या बनवताना प्रश्रांच्या भाषेवरती बरेच काम करावे लागते. तसेच कोणत्या प्रकारच्या प्रश्नांमधून मुलांच्या समजेबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल याचाही खूप विचार करावा लागेल. अशा विश्वसनीय नैदानिक चाचण्या सर्व विषयांसाठी तयार झाल्या की त्या सर्वांना उपलब्ध होणे आवश्यक आहे. मग स्थानिक भाषा, जागा, मुलांच्या परिचयाच्या गोष्टी यांनुसार त्यात बदल करता येतील. अशा चाचण्या शिक्षकांना मुलांबद्दल आणि आपल्या शिकवण्याबद्दलही खूप काही सांगू शकतील.

प्रगत शिक्षण संस्था, फलटण

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.