गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मार्गदर्शक आराखडा

प्रास्ताविक
1 एप्रिल 2010 रोजी शिक्षण हक्क अधिनियम लागू झाला आणि 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क घटनेने बहाल केला. शिक्षण हक्क अधिनियमातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया म्हणून ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा’ ला शासन मान्यता देण्यात आलेली आहे. या आराखड्याने शिकण्या-शिकवण्यासाठी ज्ञान रचनावादी पद्धत वापरण्याचे सुचवले आहे. या पद्धतीला धरून केवळ अभ्यासक्रम, पाठ्यसाहित्य व शिकवण्याची तंत्रे यातच नाही तर शिकण्या-शिकवण्याच्या संपूर्ण यंत्रणेतही बदल होणे आवश्यक आहे. आजपर्यत विविध बदल करूनही सर्व म्हणजे 100% बालके शिकलेली नाहीत आणि ज्यांना शाळेत जाण्याची संधी मिळाली त्यांच्याही शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रश्नचिह्नच आहे. हे लक्षात घेता यंत्रणेतील प्रक्रिया, पद्धती, वातावरण, कार्यसंस्कृती या सगळ्यात आमूलाग्र बदल करावे लागतील.प्रत्येकापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याचे उत्तरदायित्व मानून शासनातील प्रत्येक घटकाने पद्धतशीर काम करायला हवे. शासनाने या पद्धतीने काम करावे यासाठी सक्रिय मदत तसेच गरज पडल्यास दबाव आणण्याचे काम समाजाने करायला हवे..
याचाच एक भाग म्हणून सर्व बालकांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याचा एक संभाव्य मार्गदर्शक आराखडा आम्ही येथे सुचवीत आहोत. गुणवत्तेत सतत सुधारणा करीत करीत परिपूर्णतेकडे जाण्याची संकल्पना गाभाभूत मानून या आराखड्याची रचना करण्यात आलेली आहे.
मार्गदर्शक आराखड्याची गरज
शिक्षणविषयक धोरणे, अभ्यासक्रम, पाठ्यसाहित्य, शिक्षकांची सेवापूर्व य सेवांतर्गत प्रशिक्षणे, लोकसहभाग, शिक्षणखात्याची कार्यपद्धती यांसारखे अनेक घटक शिक्षणाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम करीत असतात. आजपर्यंतच्या कार्यपद्धतीतून बरीच मुले शिकली हे जरी खरे असले तरी बरीच, विशेषतः वंचित गटातील मुले शिक्षणापासून विन्मुख राहिली हेही तितकेच खरे आहे. आजच्या शिक्षणव्यवस्थेच्या प्रारूपातील सर्वात मोठा दोष म्हणजे अभ्यासक्रम, पाठ्यसाहित्य निर्मिती, शिक्षक प्रशिक्षण व सबलीकरण आणि शिक्षणखात्याचे काम या गोष्टींचा स्वतंत्रपणे केला जाणारा विचार. या चार महत्त्वाच्या घटकांचे सुसूत्रीकरण अत्यावश्यक आहे. या चार घटकांना एकत्र गुंफणारे प्रारूपच संपूर्ण शिक्षणव्यवस्थेची गुणवत्ता सुधारू शकेल असा आमचा विश्वास आहे.
आज हे सुसूत्रीकरण न झाल्यामुळे प्रत्येक घटक आपले आपले वेगळे काम करीत राहतो व त्यामुळे काम एकसंध न होता तुकड्या तुकड्यात व बरेचदा अर्थहीन होते. आणि म्हणून शिक्षणव्यवस्थेचा सर्व अंगांनी विचार करून बनविलेल्या मार्गदर्शक आराखड्याची आज गरज निर्माण झाली आहे.
मार्गदर्शक आराखडा बनविताना गृहित धरलेल्या गोष्टी व वैशिष्ट्ये
सर्व शासकीय शाळांमधील सर्व शिक्षक आपापल्या वर्गात मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण शकतात व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास सर्व मुले शिकू शकतात हे या आराखड्याचे मगहीतक आहे. काही धडपडणारे शिक्षक आपापल्या शाळेत यशस्वीरीत्या बदल घडवून आणू शकतात. त्यांच्याच प्रयोगांपासून सुरुवात करून संपूर्ण शिक्षणव्यवस्थेतच बदल घडवून आणणे शक्य आहे हा या आराखड्याचा पाया आहे. याशिवाय सद्यः परिस्थितीत शासनाकडे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांपर्यत पोचण्याची बऱ्यापैकी व्यवस्थापकीय यंत्रणा जरी असली को गुणवत्तेच्या विविध घटकांमधील आवश्यक त्या मार्गदर्शनासाठी यशस्वी प्रयोग करणाऱ्या जशासकीय व्यक्ती व संस्थांबरोबर शासनाला काम करावे लागेल ही आणखी एक गोष्ट आराखड्यात गृहीत धरलेली आहे. शासकीय व अशासकीय व्यवस्थांच्या एकत्रित कामामुळे है काम अधिक वेगाने अधिक व्यापक पातळीवर पोहोचविता येईल.
मार्गदर्शक आराखड्याची कार्यवाही करण्यापूर्वी सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी किमान काय करायचे आहे याबद्दल सर्व सहभागी घटकांमध्ये बऱ्यापैकी कवाक्यता असेल याची काळजी घेतली जाईल. तसेच सातत्याने गुणवत्तेत वाढ कशी होत जाईल याची चर्चा करण्यासाठी या आराखड्यात अवकाश असेल.
मार्गदर्शक आराखडा संकल्पना
शिक्षण हक्क अधिनियम ही एक चांगली सुरुवात असली तरी त्यात अजून सुधारणेला बाब आहे. असे असले तरीही अधिनियमाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे जे जे निकष दिले आहेत, तेसमजून घेणे व किमान त्यांच्या पूर्ततेसाठी जाणीवपूर्वक व योजनाबद्ध प्रयत्न करण्यासाठीचा हमार्गदर्शक आराखडा आहे. येथील गटाने दोन मार्गदर्शक आराखडे बनविले आहेत. पाहिला आराखडा शासनाच्या सहभागासह व दुसरा शासनाच्या सहभागाशिवायचा असेल. तसेच सस्वात शासनाशिवाय झाली आणि शासनाची नंतर साथ मिळाली किंवा झाले तर तेही अंमलबजावणी होत असताना शिक्षण हक्क अधिनियमात काही आवश्यक बदल झाल्यास हे बादल सहजपणे कवेत घेता येतील अशी लवचिकता या आराखड्याच्या रचनेत आहे.
या आराखड्यांमध्ये शिक्षक प्रशिक्षण, साधन व्यक्ती आणि त्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, साधननिर्मिती, व्यवस्थापन बदल आणि टप्प्याटप्प्याने वाढत जाणारी व्याप्ती यांचा समावेश आहे.
प्रस्तावित डेमो सीड प्रारूप
सर्वप्रथम आपण शासनाच्या सहभागाने हा मार्ग कसा चोखाळता येईल हे पाहू.
सध्याचे शिक्षक-प्रशिक्षणाचे प्रारूप सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ध्येयासाठी मारसे उपयुक्त नाही, कारण त्यात असणाऱ्या उतरंडीमुळे प्रत्येक पायरीवर माहिती व ज्ञानाचा ह्रास होऊन शेवटी शिक्षकापर्यत फारच कमी ऐवज पोचतो. त्या व्यतिरिक्त प्रशिक्षणासाठी राज्य पातळीवर केंद्रीभूत संच व साहित्य तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये प्राथमिक शाळेच्या वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवांचा समावेश नसतो आणि प्रशिक्षणासाठी निवडलेल्या साधनव्यक्तीच्या निवडीमध्ये पारदर्शकता नसते.
या सर्व त्रुटी लक्षात घेऊन आम्ही पुढील डेमो-सीड प्रारूप मांडतो आहोत.
राज्यपातळीवरील तज्ज्ञ
राज्यपातळीवरील प्रशिक्षक –अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्यनिर्मितीचे काम
विभागपातळीवरील प्रशिक्षक —शिक्षण खाते व शाळांमधील भौतिक व व्यवस्थापकीय बदल
जिल्हापातळीवरील प्रशिक्षक
शिक्षक
चित्र 1 : शिक्षक-प्रशिक्षणाचे प्रचलित प्रारूप

राज्यपातळीवरील साधनगट–पथदर्शी शिक्षक व त्यांची शाळा
राज्यपातळीवरील विस्तारित साधनगट—पुढील पथदर्शी शिक्षक व त्यांच्या शाळा, पहिल्या पथदर्शी शाळांमधील इतर शिक्षक
राज्यातील सर्व शाळांमधील सर्व शिक्षकांचे वर्ग गुणवत्तेच्या पहिल्या पायरीवर पोचले. –राज्यपातळीवरील पूर्ण विस्तारित साधनगट
चित्र 2 : डेमो सीड प्रारूपाची सांकेतिक रचना
वरील चित्रातील प्रत्येक पातळीवर असणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या जबाबदाऱ्या याचे विवेचन खाली दिले आहे.
राज्यपातळीवरील साधनगट
या गटात मुलांना शिकवण्याचा यशस्वी अनुभव असणारे व साधनगटात स्वेच्छेने सहभागी झालेले शिक्षक व अधिकारी असतील. यांच्यावर अभ्यासक्रम निर्मिती, एकात्मिक प्रशिक्षणांची आखणी व शाळा पातळीवरील व्यवस्थापकीय अंमलबजावणीची रचना तयार करणे या जबाबदाऱ्या असतील.
पारदर्शी शिक्षक व त्यांच्या शाळा
जानेवारी-फेब्रुवारी 2011 मध्ये SCERT ने एका सुनियोजित निवडप्रक्रियेने संपूर्ण जभरातील प्रत्येक तालुक्यातून 16 अशा सुमारे 6500 शिक्षक-साधन व्यक्तींची निवड केले होती. एकेका विषयासाठी प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे सर्व प्रमुख विषयांसाठी माज्यभरातून सुमारे 816 व्यक्ती उपलब्ध होतात. हे शिक्षक राज्य साधनगटाने दिलेल्या प्रशिक्षणांचा थेट लाभ घेतील व एका वर्षासाठी फक्त आपापल्या वर्गात किंवा शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी घेतील.
आपापल्या वर्गात काम करीत असताना हा गट संतत राज्य साधन व्यक्तीच्या प्रत्यक्ष सवा दूरध्वनी वा संपर्कजालाद्वारे संपर्कात राहील आणि सतत गुणवत्ता सुधार करण्याच्या उबलात राहील. या प्रक्रियेत शाळा-शाळांमधून त्या त्या विषयाची शैक्षणिक साधने तयार होतील. त्या शाळेतील इतर शिक्षकही उत्साहाने या प्रक्रियेत भाग घेतील अशी अपेक्षा आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या या कामाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण खात्याच्या संबंधित यंत्रणांना आपले व्यवस्थापन स्वरूपही काही प्रमाणात बदलावे लागेल. या बदलांमधून सके व्यवस्थापकीय प्रारूप तयार होईल. राज्यपातळीवरील विस्तारित साधनगट
वरील पथदर्शी शिक्षक एका शैक्षणिक वर्षानंतर राज्य साधनगटाच्या सदस्यत्वासाठी भवसिद्ध होतील. त्यामुळे पुढच्या टप्प्यासाठी साधनगटात मूळचे राज्य साधनगटाचे सदस्य पथदर्शी शिक्षक मिळून आठशेपेक्षा जास्त व्यक्ती असतील. त्यापुढील टप्प्यामध्ये याच पद्धतीने दरवर्षी साधनगटांत भर पडत जाणार आहे. यामुळे प्रत्येक टप्प्यात अधिकाधिक शिक्षक व शाळांपर्यत या साधनगटाला पोहचण्याची संधी मिळेल.
पुढील पथदर्शी शिक्षक व त्यांच्या शाळा
पूर्वी उल्लेख केलेल्या SCERT च्या निवडप्रक्रियेत भाग घेतलेल्या परंतु पहिल्या पोट निवड न झालेल्या इतर शिक्षकांना दुसऱ्या टप्प्यात पथदर्शी शिक्षक म्हणून काम याची संधी मिळेल. यात आधीच्या टप्प्यातील पाथदर्शी शाळांमधील इतर शिक्षक प्राधान्याने समाविष्ट केले जातील. पहिल्या टप्प्यातील पथदर्शी शिक्षक प्रत्येकी दहा नव्या सकाची जबाबदारी घेईल. आधीच्या टप्प्यात तयार झालेल्या शैक्षणिक साधनांची पडताळणी
या शिक्षकांद्वारे दुसऱ्या टप्प्यात केली जाईल..
या प्रक्रियेतून या टप्प्याच्या अखेरपर्यंत नव्याने या गटात सामील झालेल्या सर्व चौ शैक्षणिक गुणवत्तेच्या निकषांशी चांगली ओळख होईल.आवश्यक शैक्षणिक लाठी लागणाऱ्या शासकीय यंत्रणेतील बदलांवरही शिक्का मोर्तब होईल. या पद्धतीने कटल्यात शिक्षकांच्या संख्येत 10 पटीने वाढ होईल व तीन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात की गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागेल.
दरवर्षी शैक्षणिक साधनांचे मूल्यमापन होईल व सातत्यपूर्ण सुधारणा होत राहतील. दैनदिन चाचण्या वापरून प्रत्येक वर्गात प्रत्येक विषयात सातत्यपूर्ण सुधारणा होत राहील. यातून वर्ग, शाळा, क्लस्टर, तालुका, जिल्हा पातळ्यांवरील विद्यार्थ्यांच्या सरासरी संपादनात वाढ होत जाईल. त्यावेळी महाराष्ट्राचे चित्र कसे दिसेल?
तर स्वानुभवातून सातत्यपूर्ण सुधारणांची कार्यसंस्कृती सर्व शिक्षकांच्या दैनिक व्यवहाराचा भाग बनलेली असेल.
मुलांचा शिकण्याचा अनुभव गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री व व्यवस्थापकीय यंत्रणा उपलब्ध झालेली असेल.
गुणवत्ता पूरक पद्धती शाळेत व संपूर्ण शासकीय यंत्रणेत रुजलेल्या असतील.
राज्यपातळीवरील पूर्ण विस्तारित साधनगट
राज्यातील सर्व शाळा गुणवत्ता निकषांच्या पूर्ततेपर्यंत पोहचतील, तेव्हा या प्रक्रियेतून गेलेले सर्व शिक्षक व बरेचसे अधिकारी साधनगटाच्या सदस्यत्वासाठी अनुभवसिद्ध असतील. या पूर्ण विस्तारित साधनगटात बहुसंख्येने शिक्षक व काही अधिकारी असतील. जवळ जवळ प्रत्येक शाळेत कोणत्या न कोणत्या विषयातील साधनव्यक्ती प्रत्यक्ष सेवेतील शिक्षक म्हणून उपलब्ध असतील व नवीन येणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळेल. या प्रारूपामध्ये राज्य साधनगट ही एक तात्कालिक यंत्रणा नसून कायमस्वरूपी कार्यरत राहणरी व गुणवत्तेच्या अधिकधिक वरच्या पातळ्यांपर्यंत सर्व यंत्रणा जाव्यात यासाठी सतत प्रयत्न करणारी असेल.
दरवर्षीच्या अनुभवातून शैक्षणिक साहित्यात सातत्यपूर्ण सुधारणा होत जातील. गणवत्तेच्या अधिकाधिक परिपूर्ण निकषांच्या पूर्ततेकडे जाण्याचे चक्र सतत चाल ठेवता येईल गुणवत्तेच्या निकषापर्यंत पोचण्याच्या सर्व प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने केल्या जातील, कोणालाही पाहण्यासाठी खुल्या असतील.
या साऱ्या प्रक्रियेतून माहितीच्या देवाणघेवाणीच्या आधुनिक पद्धतीचा वापर करणारे स्थानिक तसेच राज्यस्तरीय गट तयार होतील. संपूर्ण राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवण्यात स्थानिक पातळीवरील गटांचे महत्त्वाचे योगदान असेल,
दोन प्रारूपांची तुलना (तक्ता 3)
प्रचलित प्रारूप डेमो सीड प्रारूप
•निर्णयप्रक्रियेत व प्रशिक्षणाच्या रचनेत • निर्णयप्रक्रियेत व प्रशिक्षणाच्या रचनेत
स्थानिक शिक्षक व अधिकारी यांचा स्थानिक शिक्षक व अधिकारी यांचा
सहभाग नाही. जास्त सहभाग.
•मुलांशी-शिक्षकांशी सतत संबंध येणारे • प्रशिक्षकांचा मुले-शिक्षक यांच्याशी
लोक प्रशिक्षकांमध्ये नाहीत. सतत संबंध आहे.
• एकदाच प्रशिक्षण • सातत्यपूर्ण सबलीकरण
• प्रशिक्षणाचे वर्तनवादी प्रारूप • प्रशिक्षणाचे ज्ञानरचनावादी प्रारूप
• पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याची • सर्व शैक्षणिक साहित्याचे प्रत्यक्ष
वर्गातील अनुभवाद्वारे पडताळणीची वापरातून मूल्यमापन व सातत्यपूर्ण
यंत्रणा नाही. सुधारणा होतात.
• सर्व शिक्षकांपर्यंत दरवर्षी एकदा
पोहोचता येते. • पहिल्या वर्षी फक्त पथदर्शी शिक्षकांपर्यंत,
पण टप्प्याटप्प्याने सर्व शिक्षकांपर्यंत सर्वकाळासाठी पोहोचणार.
•चर्चा, सहभागाला वाव नाही. त्यामुळे • चर्चा, सहभागाला वाव नाही. त्यामुळे
शिक्षकांचा अनुभव व स्थानिक समज शिक्षकांचा अनुभव व स्थानिक समज’ वापरली जात नाही.
वापरली जात नाही,
•वेगवेगळ्या शैक्षणिक घटकांच्या •वेगवेगळ्या शैक्षणिक घटकांच्या
एकात्माकरणाला वाव नाही. एकात्माकरणाला वाव नाही..
• शाळेत व व्यवस्थेत बदल आपोआप •- शाळेत व व्यवस्थेत बदल आपोआप
होतील असे गृहीत धरले आहे. होतील असे गृहीत धरले आहे.
शासनाच्या सहभागाशिवायचा आराखडा
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पहिल्या आराखड्याची रचना शासनाचा सहभाग गृहीत पर केलली असली तरी पर्यायी व्यवस्थेची आखणीदेखील महत्त्वाची आहे. त्यासाठी आपले
डेमोसीड प्रारूप कसे असेल ते थोडक्यात पाहू. .
•जे शिक्षक व शाळा स्वेच्छेने पुढे येतील, त्यांना पथदर्शी शिक्षक व पथदर्शी शाळा बनवण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात उपक्रम राबवता येतील. •पहिल्या वर्षानंतर प्रत्येक जिल्ह्यात एखादीतरी पथदर्शी शाळा तयार व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. ,
• यासाठी राज्य साधनगटात स्वेच्छेने वेळ देऊ इच्छिणाऱ्या, मुलांच्या शिकण्याचा यशस्वी अनुभव असणाऱ्या तज्ज्ञांचा सहभाग असेल.
• तालुक्यातील शासकीय यंत्रणेला सहकार्याचे आवाहन केले जाईल.
•कार्यक्रम राबवण्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करणे आवश्यक आहे.
शासनाशिवाय कार्यक्रम करताना
* पहिल्या वर्षी प्रत्येक जिल्ह्यात किमान पाच विषयवार पथदर्शी शिक्षक असतील.तसेच
प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पथदर्शी शाळाही असेल.
• दुसऱ्या वर्षी विषयवार, प्रत्येक जिल्ह्यात पथदर्शी शिक्षकांची संख्या किमान पन्नासापर्यंत जायला हवी. तसेच पथदर्शी शाळा प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा असायला हव्या.
अशाप्रकारे आपल्याला आपल्या कार्यक्रमातून किमान काय साधायलाच हवे हे तर ठरवायला लागेलच, त्याच बरोबर आपले आर्थिक अंदाजपत्रक व निधी उभा करण्याचे मार्ग यांवरही विचार विनिमय करावा लागणार आहे.
समारोप
हे दोन्ही मार्गदर्शक आराखड़े अजून कच्चे आहेत. या कामात सहभागी होणाऱ्या शिक्षकांच्या व अधिकाऱ्यांच्या सहभागाने त्यात आणखी सुधारणा होतील. शिक्षकांच्या विविध गटांशी सल्लामसलत करून आपल्याला आपला रस्ता ठरवावा लागेल. बदलासाठी तयारी ठेवावी लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असेल. सूचनांचे स्वागत असेल. कामाचा एक आराखडा करणे, काम सुरू करणे, इतरांच्या सूचनांनुसार व प्रत्यक्ष अंमल-बजावणीच्या अनुभवानुसार त्यात सतत सुधारणा करीत गुणवत्तेचे उद्दिष्ट गाठले जाईल.
द्वारा समुचित एनव्हिरोटेक प्रा. लिमि., फ्लॅट क्र.6, एकता पार्क को-ऑप.हौसिंग सोसायटी, निर्मिती शोरूमच्या मागे, अभिनव शाळेजवळ, लॉ कॉलेज रोड, पुणे 411004.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.