साहित्यातून विवेकवाद (३) – होम्स ते हॅनिबल : इंग्रजी डिटेक्टिव्ह कथा

नववी ते अकरावी या वर्गात शिकत असताना मी एक सुयोग भोगला. आमच्या वर्गशिक्षिकाच ग्रंथालयप्रमुख होत्या. त्यावेळी एका विद्यार्थ्याला एका आठवड्यात एकच पुस्तक वाचायला घरी नेता येत असे. आम्हा काही जणांना मात्र तीनचार दिवसांनीच पुस्तक बदलायची मुभा मिळाली! बरीच पुस्तके आम्ही कर्तव्य म्हणून वाचत असू (उदा. शेक्सपिअरची हिंदी भाषांतरे); पण काहींची मात्र प्रेमाने पारायणे होत. यांत प्रमुख होती ती आर्थर कॉनन डॉइलची शेरलॉक होम्स ह्या नायकाभोवती रचलेली पुस्तके.

सर आर्थर कॉनन डॉइल (१८५९-१९३०) पेशाने डॉक्टर होते, आणि त्यांना वैद्यकाच्या वेगवेगळ्या शाखा शिकायला आवडत असे. उदा., काही वर्षे जनरल प्रॅक्टिस केल्यानंतर ते नेत्रतज्ज्ञही झाले. अशा तऱ्हेने वारंवार ते नवनव्या विशेष प्रकारांच्या वैद्यकाचे दवाखाने काढत. दरवेळी नव्याने काम करू लागताना नाव होऊन रोगी मिळू लागण्यास वेळ लागे. कॉनन डॉईल ही पुन्हापुन्हा येणारी उमेदवारी कथा-कादंबऱ्या लिहून सत्कारणी लावत असत. त्यांनी ऐतिहासिक कथा, विज्ञान कथा, विनोदी कथा, परामानसशास्त्रीय कथा वगैरे बरेच वाङ्यप्रकार हाताळले. त्यांची कीर्ती मात्र शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथांमुळेच झाली. १८९७ पासून १९२७, अश्या तीस वर्षांत त्यांनी छप्पन्न कथा आणि चार कादंबऱ्यांमधून होम्स, त्याचा भोळसट जोडीदार डॉक्टर जॉन वॉटसन, त्याचे २२१-बी बेकर स्ट्रीटवरील घर वगैरेंना अजरामर केले. आजही होम्स-कथांवर एक मासिक चालते, व त्याच्या चाहत्यांच्या अनेक संघटनाही आहेत. आजही छद्म शेरलॉक कादंबऱ्या प्रकाशित होत असतात.

होम्सचा काळ ब्रिटिश साम्राज्याच्या बहराचा काळ होता. पहिल्या महायुद्धाची उचकी लागलीही, पण होम्सचे विश्व मुख्यतः एका महासत्तेतील उच्च-मध्यमवर्गाचेच राहिले. मुळात ब्रिटिश समाजात हिंसा कमी असे. सुबत्ता, एकमेव महासत्ता असणे, या साऱ्याने समाजांतर्गत ताणतणावही कमी होत. अनेक होम्स-कथांमध्ये रक्ताचा थेंबही भेटत नाही. अनेक कथांमध्ये ज्यांवर कोर्टात जाता येईल असे गुन्हेही नसतात. एकूणच इंग्रजीत डिटेक्टिव्ह कथांना लोकप्रिय करणारा पहिला लेखक कॉनन डॉइल बहुतांशी अहिंसक आहे!
पण ब्रिटिश साम्राज्यही डोकावत राहतेच. अनेक कथांमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, साऊथ आफ्रिका वगैरे वसाहतींचे संदर्भ भेटतात. द व्हॅली ऑफ फिअर या कादंबरीत तर होम्सचे अमेरिकेतील एक श्रमिक संघटना फोडायला जाणेच केंद्रस्थानी आहे. ज्या मॉली मॅग्वायर्स संघटनेत शिरून होम्स तिला फोडतो, तिचा बंदोबस्त करण्यासाठी पिंकर्टन्स ही जगातली पहिली डिटेक्टिव्ह एजन्सी घडली, आणि पुढे तिचेच राष्ट्रीयीकरण होऊन एफबीआय (फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स, FBI) घडली! एकूण होम्स कथांची राजकीय पार्श्वभूमी अशी साम्राज्यवादी-भांडवलवादी आहे.

कॉनन डॉइल त्याचा नायक तर्कशुद्ध विचार करणारा, विज्ञानाचा वापर करणारा असल्याचे सांगत राहतो. सत्तरेक प्रकारचे चिरूट आणि सिगरेटी केवळ राखेवरून कसे ओळखावे यावर होम्सने एक निबंध लिहिल्याचेही सांगितले जाते. पण सोबतच होम्सला पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे माहीत नसल्याचाही उल्लेख भेटतो! होम्सच्या काळात गुन्हेगार शोधायला विज्ञानाचा वापर केला जाऊ लागला होता. फॉरेन्सिक सायन्स हा शब्दप्रयोग घडला होता. होम्सचे डिडक्टिव्ह डिटेक्शन मात्र आज काहीसे अंदाजपंचे मानले जाते.

होम्स-कथांशी काहीश्या समकालीन कथा (लेखनकाल १९०५-३२) एडगर वॉलेसने (१८७५-१९३२) लिहिल्या. वॉलेसने तब्बल १७५ कादंबऱ्या व २४ नाटके लिहिली. पण जर कॉनन डॉइल हृषिकेश मुकर्जी असेल, तर एडगर वॉलेस आवाराकर्ता राज कपूर आहे. जिथे होम्स-कथा पोलिस ऑफिसर्सना विनोदी रूपांत दाखवतात, तिथे वॉलेसच्या अनेक कथांमध्ये सुपरिटेंडेंट साँडर्स अनेक गुन्हे उकलतो. होम्स-कथांच्या उच्च-मध्यमवर्गाऐवजी वॉलेसमधले वातावरण खिसेकापू आणि भुरट्या चोरांचे आहे. पण वॉलेसला जास्त वास्तववादी आणि प्रस्थापितविरोधी मानता येत नाही. आज तो कोणाला आठवत असेलच तर द फोर जस्ट मेन मालिकेसाठीच आठवत असेल. या कथांची भूमिका अशी : काही गुन्हेगारांपर्यंत पोलिस व न्याययंत्रणा पोचू शकत नाही. काहींच्या कृती तर घोर अनैतिक असूनही (सहा हजार कोटींचे महाल!) बेकायदेशीर नसतात. तर चार स्वघोषित न्यायदाते अशा गुन्हेगारांना शिक्षा करतात! हा प्रस्थापितविरोध!
वॉलेसच्या नावावर आणखी एक थोर काम नोंदता येते. किंगकाँग च्या अनेक आवृत्त्यांपैकी पहिल्या आवृत्तीची कथा आणि सिने-संहिता एडगर वॉलेसने लिहिली! हे सारे असूनही वॉलेस वाचणे हीन दर्जाचे समजले जाई. शाळेच्या ग्रंथालयात वॉलेस भेटत नसे. कोणा मित्रांकडून त्यांच्या वडलांच्या, काका-मामांच्या आरोप करणाऱ्या नजरा भोगतच वॉलेसची पुस्तके उसनी आणता येत! एकूणच लोकप्रियतेतही आणि समीक्षकप्रियतेतही वॉलेस होम्स-कथांना डावा आहे.

कॉनन डॉइल-वॉलेस यांच्या लेखनकाळाच्या उत्तरार्धात मात्र इंग्लंडमध्ये साम्राज्य धोक्यात येऊ लागल्याची स्पष्ट जाणीव सर्वांनाच होत होती. जर्मनीसारखे देश इंग्लंडच्या एकमेव अशा महासत्तापदाला आव्हान देत होते. कम्युनिस्ट रशिया जन्मला होता, आणि युरोपातील अनेक देशांना ती विचारधारा मोहवत होती, उदा. जर्मनी, स्पेन. हा प्रभाव १९३० नंतर जगभर पसरला. १९३०-४० च्या दशकाला पिंक डिकेड म्हटले गेले, ते फिकट लालपणामुळे प्रेमामुळे नव्हे.

खुद्द इंग्लंडमध्ये एक कालचक्राचे आवर्तन संपतानाचा ऐय्याश, decadent भाव होता. मध्यमवर्ग हावरटासारखा परदेशप्रवास, मेजवान्या वगैरेंमध्ये गुंतत होता. पी.जी. वुडहाऊसच्या सामान्यांपासून फटकून असलेल्या विनोदी कथांची चलती होती. यातच एक बहुप्रसव लेखिका उपजली, अॅगाथा ख्रिस्टी (१८९०-१९७६).

काही अंदाजांनुसार ही जगातली सगळ्यात जास्त वाचली जाणारी लेखिका आहे. तिच्या पुस्तकांच्या चार अब्ज प्रती छापल्या गेल्या आहेत. भाषांतरांमधून ती एकशे तीन भाषांमध्ये पोचली आहे. तिच्या कथांवर अनेक नाटके आणि तेहेतीस चित्रपट बनले आहेत, ज्यांत हिंदी गुमनाम ही मोजला जातो. तिच्या कथांवर बेतलेले व्हिडिओ गेम्सही आहेत, आणि ग्राफिक नॉव्हेल्स (ऊर्फ कॉमिक्स) ही आहेत. ख्रिस्टी लिहायला लागली १९२० साली, जवळपास शतकभरापूर्वी. पण आजही ती वाचली जाते.

याचे मुख्य कारण म्हणजे ख्रिस्टीच्या कथांची चौकट वाचणाऱ्यांच्या ओळखीची असते. काही पात्रे बोलभांड आणि आक्रमक, तर काही सोज्वळ आणि मुखदुर्बळ असतात. नवरेबायकांमधले ताण हमखास भेटतात. गोष्टीच्या विकासासोबत संशयाची सुई वेगवेगळ्या व्यक्तींवर सरकते; आणि कुठेकुठे तर “हाच/हीच गुन्हेगार!” असा विचार येताच त्या व्यक्तीचाच खून होतो! गोष्टीच्या शेवटी सर्व पात्रांना एकत्र आणून नाट्यपूर्ण तव्हेने गुन्हेगार उघडकीला आणला जातो.

या चौकटीमध्ये मात्र भरपूर युक्त्या-प्रयुक्त्या वापरून ख्रिस्टी वाचकांना धरून ठेवते. एका कथेत निवेदकच शेवटी आपण खुनी असल्याचे कबूल करतो. एका कथेत दहापंधरा संशयितांपैकी प्रत्येक जणाने खुनात सहभाग घेतल्याचे कळते. या सगळ्यांत बराच तरल तर्क लढवणारे हथूल प्वारो आणि मिस मार्पल हे गुन्हेगारांना पकडतात. वारोच्या तार्किक शिस्तीचे कौतुक तो स्वतःच ‘मेंदूतले लिट्ल ने सेल्स वापर.”, अशा रूपात करतो, मिस मार्पल कथांमध्ये मावशी शोभणारी नायिका आपल्या लहानशा खेड्यातील समांतर घटना आठवून गुन्ह्याचे स्पष्टीकरण देते.

होम्स-वॉलेसपेक्षा जास्त तांत्रिक, जास्त तर्कशुद्ध अशा या कहाण्यांचे चाहते भरपूर आहेत. पण जरी ख्रिस्टीत होम्सपेक्षा विज्ञान-तंत्रज्ञान जास्त असले, तरीही ते केंद्रस्थानी नाही. धादांत (common sense) तर्क, धादांत नीतिकल्पना, येवढेच ख्रिस्टी वाचायला पुरे आहे.
त्यामानाने जास्त तांत्रिक लेखक आहे अमेरिकन अर्ल स्टॅन्ली गार. (१८८९-१९१०). पेशाने वकील असलेला गानर आज मुख्यतः पेरी मेसनचा जनक म्हणून ओळखला जातो. त्याने पेरी मेसन हा वकील, त्याची सेक्रेटरी डेला स्ट्रीट, आणि त्याचा डिटेक्टिव्ह पॉल ड्रेक या त्रयीवर बेतलेली डझनावारी पुस्तके लिहिली. ती कोटींमध्ये खपलीही.

या पुस्तकांची चौकट ख्रिस्टी-कथांपेक्षाही ठोकळेबाज आहे. सव्वाशे-दीडशे पानांच्या पुस्तकांत पहिली नव्वद-शंभर पाने गुन्हा आणि तपास यांच्याशी भेट होते. शेवटची पस्तीस-चाळीस पाने कोर्टात घडणारे व्यवहार नोंदतात. वकिलांनी विरोधी वकिलाच्या प्रश्नांवर “ऑब्जेक्शन!” म्हणून ओरडणे गारने जगाला शिकवले. पुराव्यावर आक्षेप घेताना ‘इम्मटीरियल अँड इरेलेव्हंट’ म्हणणे, एकूण वकिली भाषा व डावपेच, ह्या साऱ्या बाबी आजचे बरेच लोक जाणतात ते गारमुळे. या फॉर्म्युलाबद्ध वातावरणाला खद गार्डनरही कंटाळला असणार. कारण त्याने सात वेगवेगळ्या टोपणनावांनी गैरवकिली डिटेक्टिव्ह कथाही लिहिल्या, आणि त्याही तीनेक डझन. पण पेरी मेसन कथाच गाईनरला रोजीरोटी पुरवत असत. त्याकाळच्या एका फोटोत एका दहाएक फूट उंच स्वतःच्या पुस्तकांच्या मनोऱ्यावर अर्ल स्टॅन्ली गार्ड्सनर आपले ताजे पुस्तक ठेवताना दिसतो. पण एकेकाळी पुस्तकांच्या दुकानांची शेल्फे व्यापणारा गानर आज मात्र ख्रिस्टीच्या तुलनेत झपाट्याने मागे पडला आहे.

ख्रिस्टी-गार्ड्सनर यांचाच समकालीन लेखक रेमंड चड्लर (१८८८-१९५०). तो बहुप्रसव नाही. १९३३-५९ या सव्वीस वर्षांत त्याने फक्त बावीस कथा आणि सात कादंबऱ्या लिहिल्या. पण आपण नेमके काय करोत आहोत याचे चड्लरला चांगलेच भान होते. आपल्या आधीच्या व समकालीन डिटेक्टिव्ह कथांबद्दल चड्लर लिहितो, “प्रमाण डिटेक्टिव्ह कथांचा भावनिक पाया नेहेमी एकच राहिलेला आहे : खुनाला वाचा फुटतेच आणि शेवटी न्यायदान होतेच. त्यांच्या तांत्रिक धारणेत शेवटची गुन्हा-उकल सोडून सारेच बिनमहत्त्वाचे राहिलेले आहे. तिथपर्यंत पोचते ते केवळ भरताड (passage work).”

तर जिथे ख्रिस्टी-गार्ड्सनर श्रद्धा आणि सबुरीने सटासट लिहीत राहिले, तिथे चड्लरने साहित्यिक मूल्यांकडे, वातावरणनिर्मितीत वास्तविकता आणण्याकडे जास्त लक्ष दिले. मुख्य म्हणजे डिटेक्टिव्ह कथा या साहित्यप्रकाराच्या पायाशी केवळ भावनिक तांत्रिक बाबी नसतात, तर एक नैतिक प्रश्नही असतो; हे चड्लरने ठसवले, आपल्या खाजगी डिटेक्टिव्ह मानसपुत्राबद्दल, फिलिप मार्लोबद्दल, तो लिहितो, “from these mean streats comes a man who is not himself mean.” चडलरचा मार्लो बकालीत वावरूनही बकाल नाही. त्याच्या वावराचे क्षेत्र ख्रिस्टी-गाईनरसारखे केवळ मध्यमवर्गी नाही. ते गर्भश्रीमंतीपासून दळभद्रीपणापर्यंत पसरलेले असते. आणि चिडचिडा, कठोर बोलणारा मार्लो त्या सर्व क्षेत्रांवर एक नैतिक छाप उमटवायचा प्रयत्न करतो. हे जमणे सोपे नसते. मार्लो. चुकाही करतो, सुंदर स्त्रियांमुळे घसरतोही, आणि थेट मारही खातो. पण हे सर्व वास्तविकेतजवळ, नैतिकतेजवळ घुटमळत राहते. यामुळे चड्लरला डब्ल्यू.एच.ऑडेन या कवींसारखे चाहतेही मिळाले.

त्याची शैली अमेरिकन हार्ड-बॉइल्ड या नावाने ओळखली जाते; जास्त उकडलेल्या अंड्यासारखी कडक, चड्लरच्या कादंबऱ्यावर जे चित्रपट निघाले, त्यांत मार्लोचे काम हफ्री बोगार्ट हा उत्तम नट करत असे. त्याने ही हार्ड-बॉइल्ड शैली जिवंत केली. पण मार्लोचा कठोरपणा अमानुष नाही. त्याचा भोवताल प्रवाहपतित, स्खलनशील माणसांचा आहे. माणसांना बकाली नको असते, पण ती टाळणे सोपे नसते, याची जाणीव बड्लरभर दिसत राहते. यामुळेच गुन्हा आणि त्याची उकल यांमधला अवकाश भरताड न राहता रसरशीत होतो.
गाडूनर, बँड्लर वयाने एकसारखे होते. दोघांनी लेखनही एकाच वर्षी सुरू केले. पण दोघांच्या वृत्तींमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. गानरचा पेरी मेसन आपल्या अशिलाच्या सुटकेसाठी सहज अनैतिक मार्ग वापरतो. चड्लरचा मार्लो प्रसंगाच्या नैतिक परिमाणांना महत्त्व देतच पोलिसांशी आट्यापाट्या खेळतो. या वृत्तीला खराखुरा सलाम आहे मॉकिंगबर्ड नावाच्या विज्ञानकथेत.

त्या दूरच्या भविष्यातल्या कथेत मानवजात अणुयुद्धाने जायबंदी झालेली आहे. शेती, खोदकामापासून न्यायदानापर्यंत माणसांना संगणक आणि रोबॉट्सची गरज लागते आहे. अशात एक मानवी पोलिस अधिकारी संगणक-न्यायमूर्तीला कायद्यांच्या मागे नीतिविचार असतो, हे पटवून देऊ पाहत असतो. अणुयुद्धाने खुपसे अभिजात साहित्य आणि दार्शनिक साहित्य नष्ट झाल्याने नीतीतून नियम येतात याला पुरावे देणे अवघड जात असते. तो पोलिस अधिकारी चँड्लरच्या कादंबऱ्यांच्या मदतीने ती अडचण सोडवतो! खरे तर चड्लर समकालीन लेखकांपेक्षा इतका वेगळा कसा झाला, यावरच एखादा आचार्यपदाचा प्रबंध घडू शकतो.

याच्यासारखीच एक कहाणी इंग्लंडातही घडत होती. ख्रिस्टीच्या जराशीच लहान एलिझाबेथ मॅकिंटॉश (१८९६-१९५२) ही नाटककार होती. तिने जोसेफीन टे ह्या टोपणनावाने फक्त आठ कादंबऱ्या लिहिल्या, ज्यांतली शेवटची तिच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाली. जिथे ख्रिस्टीच्या कादंबऱ्यांत निवडणूक कट-आऊट्ससारखी ठोकळेबाज पात्रे ननैतिक तऱ्हेने वावरतात, तिथे टेची रसरशीत पात्रे बऱ्याच छान भावनिक-बौद्धिक व्यवहारांत गुंतलेली असतात.

टेची सर्वांत प्रसिद्ध कादंबरी आहे डॉटर ऑफ टाईम; truth is the daugh ter of time या उक्तीवर बेतलेली. पोलिस ऑफिसर नायक पाय मोडून इस्पितळात पडलेला असतो. एक मैत्रीण त्याला वेळ घालवायला म्हणून काही माणसांची चित्रे आणून देते, की त्याने त्यांतील माणसांचे पेशे व इतिहास त्याच्या अनुभवांतून रचून दाखवावा! एक चित्र पाहून नायक ते एखाद्या कर्तव्यकठोर न्यायमूर्तीचे असेल, असा अंदाज सांगतो. ते असते इंग्लिश इतिहासातल्या आपल्या दोन बालपुतण्यांचा खून केल्याचा आरोप असलेल्या रिचर्ड या राजाचे. आपला अंदाज इतका कसा चुकला, हा प्रश्न सोडवायला नायक मैत्रिणीच्या मदतीने बराच इतिहास वाचतो. त्याचा निष्कर्ष असा, की रिचर्डने पुतण्यांचे खून तर केले नाहीतच, पण रिचर्डच्या मृत्यूनंतरही पुतण्ये जिवंत होते! गंमत म्हणजे, जनमानसात ली पुतण्यांना मारण्याची कथा खोटी आहे (कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या कथेसारखीच!), हे इतिहासकारांनी अनेकवार नोंदलेले असते! ही पूर्ण कादंबरी अशी चारपाचशे वर्षांपूर्वीच्या न झालेल्या खुनांची सत्यकथा सांगते. २५, होम्स-वॉलेस, ख्रिस्टी-टे, गार्डनर-चडलर आणि त्यांचे अनेक सह-पेशेवर यांनी गेल्या शतकाचा पहिला तीन-चतुर्थांश काळ व्यापला. याच काळात दोन महायुद्धे, एक शीतयुद्ध आणि अनेक लहानसहान युद्धे घडली. माणसे पायी, बैलगाड्यांनी, घोडागाड्यांनी येतजात असत; त्याऐवजी मोटर-कार्स आणि विमाने वापरात आली. राजकीय साम्राज्यवाद बहरून पुढे संपला. विज्ञान-तंत्रज्ञानात अफाट प्रगती झाली.

इंग्रजी बोलणाऱ्या राष्ट्रांमध्ये भांडवली अर्थव्यवस्था होती. ते देश सुखवस्तू होते. त्यांच्या गरजा बह्वशी पूर्ण झालेल्या होत्या. साम्राज्यवादामुळे भूक आणि गरिबी आऊटसोर्स झाली होती. खुद्द त्या देशांमध्ये विपन्नावस्था कोणीच भोगत नव्हते; कारण विषमतेची तीव्र अंगे परदेशांत होती.

पण राजकीय साम्राज्यवाद संपल्याने ही गरिबी (परदेशांत) हटाओ स्थिती राखणे अवघड झाले होते. सुमारे १९७५ साली हे स्पष्ट झाले होते. यावर उपाय शोधले ते इंग्लंडात मार्गरेट थेंचरने आणि अमेरिकेत रॉनल्ड रेगनने. दोघांचेही अर्थशास्त्र मिल्टन फ्रीडमन या कर्मठ मुक्त-बाजारपेठेच्या पुरस्कर्त्याच्या धारणांवर बेतलेले होते. थेंचर-रेगन याचे कार्यकाळ साधारणपणे सारखे होते; थेंचर १९७५ ते १९८८ इंग्लंडची प्रधानमंत्री होती. तर रेगन १९८० ते १९८८ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता. त्यांच्या आर्थिक धोरणांमळे त्यांच्या त्यांच्या समाजांतील विषमता वाढू लागली; आणि त्यांच्यानंतरही ती कायम राहिली आहे. १९७५ च्या तुलनेत आजच्या इंग्लंड-अमेरिकेत विषमता ३५% – ४०% जास्त आहे.

पण थेंचर-रेगन सत्तेतून पायउतार होतानाच सोव्हिएट रशियाचेही विघटन झाले (१९८९). म्हणजे थेंचर -रेगनच्या मुक्त-बाजारपेठी भांडवलवादाला सक्षम पर्यायही दिसेनासा झाला. भांडवली अर्थव्यवस्थांचे अनेक नमुने युरोपीय देशांमध्ये दिसतात. त्यांपैकी काही तर ठामपणे समतेच्या विचारांतून भांडवली व्यवस्थेवर अंकुश ठेवणारे आहेत. परंतु हे स्कँडिनेव्हियन देश एकूणात लोकसंख्येने महाराष्ट्राच्या अर्धेमुर्धे आहेत. इंग्रजीभाषक एकमेव महासत्ता अमेरिका, हिला ते पर्याय पुरवू शकत नाहीत. म्हणजे जशी आज अमेरिका ही एकमेव महासत्ता आहे, तशीच मुक्त-बाजारपेठी भांडवलवाद ही एकमेव विचारसरणी आहे.

आणि अशी एकमेव विचारसरणी लोकांना पटत गेली, तर तिचे काही अपरिहार्य उपपरिणामही दिसू लागतात. असे वाटू लागते, की “काय करावे?” हा प्रश्न महत्त्वाचा नाही. “कसे करावे?” ह्यालाच महत्त्व आहे. काय करावे. हा प्रश्न उहिष्टांबाबत असतो आणि ते एकमेव असते. मग त्या उद्दिष्टांपर्यंत कसे पोचायचे, हेच महत्त्वाचे ठरते. साध्या चा विचार मागे पडून केवळ साधनां चा विचार होऊ लागतो. मूल्यांचा विचार मागे – पडून केवळ तंत्रांचा विचार होऊ लागतो.’

आणि असे समाज राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांतच नव्हे, तर अगदी डिटेक्टिव्ह कथांपर्यंत जास्तजास्त तांत्रिक होऊ लागतात. गेल्या तीसपस्तीस वर्षांमधल्या इंग्रजी डिटेक्टिव्ह कथांमध्ये ही वाढती तांत्रिकता अगदी स्पष्ट दिसते.

याचे प्रमुख उदाहरण आहे थॉमस हॅरिसचे (१९४०-हयात). याची पुस्तके १९७५ पासन प्रकाशित होत आहेत (थेचरचा कार्यकाळ सरू होताना!). पण त्याची सरुवातीची पुस्तके फार लोकप्रिय झाली नाहीत. त्याच्या १९८८ त प्रकाशित झालेल्या द सायलेन्स
ऑफ द लॅब्स या पुस्तकावर १९९१ मध्ये त्याच नावाने चित्रपट निघाला; आणि त्याने बरीच ऑस्कर पारितोषिके पटकावली.

या पुस्तक-चित्रपटांतले महत्त्वाचे पात्र आहे हॅनिबल लेक्टर. हा मनोवैज्ञानिक मनोवैद्य आपल्याला भेटतो तो खून आणि नरमांसभक्षणासाठी आजीवन तुरुंगात डांबलेल्या स्थितीत. त्याची ख्याती अशी, की तो मनोवैज्ञानिक तंत्रे वापरून इतरांना खून करायला लावू शकतो, आणि प्रसंगी आत्महत्याही करायला लावू शकतो. स्वतः मारलेल्यांचे मांस खाण्याच्या त्याच्या शौकावरून वृत्तमाध्यमे त्याला हॅनिबल द कॅनिबल म्हणतात. एका गुन्ह्यांच्या मालिकेत खुनी माणसाची मनोवृत्ती व वैयक्तिक इतिहास कसा असेल हे जाणून घ्यायला क्लॅरिस स्टालिंग ही FBI ची अधिकारी हॅनिबलला भेटायला जाते. त्याच्या सल्ल्याने ती अखेर खुन्याला पकडतेही.

ती FBI च्या ज्या विभागात काम करते त्याचे नाव आहे बिहेवियरल सायन्स ऊर्फ न्यायदानासाठीचे मानसशास्त्र; फॉरेन्सिक सायकॉलजी. लँब्स मध्ये भरपूर विज्ञान आहे. एका खून झालेल्या व्यक्तीच्या तोंडात एक पाकोळी (moth) सापडते. तिचा अंड्यापासून पाकोळीपर्यंतचा प्रवास खुनी माणसाच्या विकाराचे स्वरूप सुचवतो. हा प्रवास जगप्रसिद्ध स्मिथसोनियन म्यूझियमचे शास्त्रज्ञ समजावून देतात. या विज्ञानापासून ते प्रेत तपासताना दुर्गंधीचा त्रास होऊ नये म्हणून नाकाजवळ व्हिक्स लावावे या उच्चतंत्रज्ञानापर्यंतची माहिती पुस्तक देते.

पण हॅनिबल किंवा त्याच्या मदतीने पकडला गेलेला खुनी हे एकामागून एक खून (serial murders) का करत जातात? फॉरेन्सिक सायकॉलजी सांगते की ते सोशिओपॅथ असतात. पूर्वी वापरला जात असलेला सायकोपॅथ हा शब्द अर्थाने सोशिओपॅथपेक्षा वेगळा नाही. दोघेही ASPD (Antisocial Personality Dis order) ऊर्फ समाजविरोधी व्यक्तिमत्त्वविकार याचे रुग्ण आहेत. थोडक्यात म्हणजे ते खुनामागून खून करत जातात! ASPD हा विकार का होतो ते समजून घेण्याऐवजी व्हिक्स महत्त्वाचे ठरू लागते.

लँब्स नंतर हॅरिसची जुनी-नवी पुस्तके कोटींनी खपू लागली. पुढची गोष्ट हॅनिबल या पुस्तकात भेटते, आणि आपल्याला नवेच ज्ञान मिळते की जिवंत माणसाचा मेंदू त्यालाच खायला घालता येतो, कारण मेंदूतल्या इजेचे दुःख मेंदूला जाणवत नाही! या बीभत्सपणाला विटून जोडी फॉस्टर ही लँब्स मध्ये स्टार्लिंगचे काम करणारी नटी हॅनिबल मध्ये नाही. अँथनी हॉपकिन्स हा फॉस्टरच्या तोलामोलाचा नट मात्र विकाराची अभिव्यक्ती करतोच आहे.

हॅरिसच्या यशाने त्याला अनुयायीही मिळाले. पॅट्रीशिया कॉर्नवेलने के स्कार्पेटा ही फॉरेन्सिक पॅथॉलजिस्ट (विकारशास्त्री) उभारली, जिने एकोणीस खपाऊ पुस्तकांत शवविच्छेदने केली आहेत.

कॅथी राईक्स (१९४०-हयात) हिची टेम्परन्स ब्रेनन ही फॉरेन्सिक अँथ्रोपॉलजिस्ट आहे. तिचे काम हाडे आणि सांगाडे यांच्याशी संबंधित आहे. ती हाडांवरून व्यक्तीचे वय, वंश, पोषणस्तर (!), अपघातांचा इतिहास वगैरे सांगू शकते. तिच्या कथांवर आधारित बोन्स ही टीव्ही-मालिकाही बरीच लोकप्रिय आहे.

पण ब्रेननही नुसत्या कवटीवरून मृत व्यक्तीचा चेहेरा कसा होता ते दाखवू शकत नाही. त्यासाठी आयरिस जोहॅन्सनची (१९३८-हयात) ईव्ह डंकर ही फॉरेन्सिक मूर्तिकार लागते!

जिथे यांपैकी कोणतेच फॉरेन्सिक ज्ञान लागत नाही अशा डिटेक्टिव्ह कथा भेटणे आता दुरापास्तच झाले आहे. आज खाजगी डिटेक्टिव्ह ही संस्था नष्टप्राय होऊन FBI व तत्सम सरकारी खाती सातत्याने ASPD झालेल्यांनी केलेल्या खून-मालिका उकलताना भेटतात.
आता येवढी सगळी फॉरेन्सिक शस्त्रास्त्रे बाळगणारी महाकाय शासकीय खाती उभारल्याने गुन्हेगारी तरी कमी व्हावी; तर तेही नाही! उलट या सर्व बीभत्स रक्तरंजित फॉरेन्सिक्समुळे गुन्हे सोडवणेच अवघड होत आहे. गुन्ह्यांच्या स्थळांच्या तपासाबद्दलच्या तीन टीव्ही मालिका गेली काही वर्षे लोकप्रिय ठरत आहेत.

CSI (Crime Scene Investigation), CSI-New York 3+1fUT CSI-Miami या तीन मालिका सुरू झाल्यापासून पोलिसांचा गुन्हे सोडवण्याचा दर म्हणे पाच टक्क्यांनी कमी झाला आहे, कारण गुन्हेगार CSI पाहून काय करू नये हे शिकत आहेत!
तंत्राला अवास्तव महत्त्व देणाऱ्या समाजांबाबतच्या टेक्नॉलॉजिकल सोसायटी या पुस्तकाचा लेखक जाक एलूल नोंदतो, की अशा समाजांत नीटसे न तपासलेले परिणाम साधायची तंत्रे सतत सुधारत जातात; continually improved means for carelessly examined results. आज या निरीक्षणाचे पुरावे साध्यविचार हरपलेल्या, साधनविचारांत गुरफटलेल्या डिटेक्टिव्ह कथा देत आहेत.
आपण आत्तापर्यंत इंग्रजीभाषक देश, त्यातही मुख्यतः अमेरिका आणि इंग्लंड, यांचाच विचार करत आहोत. याचे मुख्य कारण म्हणजे इतर भाषांमध्ये डिटेक्टिव्ह साहित्याची परंपरा इंग्रजीयेवढी सबळही नाही, आणि सहजगत्या त्या साहित्याची भाषांतरेही आपल्याला उपलब्ध नाहीत. फ्रेंच डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर मायग्रे (Maigret) या पात्राभोवती रचलेली पुस्तके इंग्रजीत आलीही; परंतु फ्रेंच न्यायपद्धती इंग्लिश पद्धतीपेक्षा बरीच वेगळी आहे. आजची भारतीय पद्धत, आजची अमेरिकन पद्धत, या मुळात इंग्रजी पद्धतीवर बेतलेल्या आहेत. इतर भाषकांच्या कथा व पद्धती आपल्या सवयीच्या नसतात.

परंतु गेल्या वर्षाभरात याला एक महत्त्वाचा अपवाद उत्पन्न झाला आहे. स्वीडनमधला स्टीग लार्सन हा वार्ताहर पन्नासच्या वयात वारला. मृत्यूपूर्वी काही महिने त्याने सुमारे दोन हजार छापील पानांचा एक दस्तऐवज आपल्या प्रकाशकाला दिला. आज ह्यातून द मिलेनियम ट्रायलजी नावाची एक कादंबरीत्रयी घडली आहे : द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू, द गर्ल हू प्लेड विथ फायर आणि द गर्ल हू किक्ड द हॉर्नेट्स नेस्ट, अशा या तीन कादंबऱ्या आहेत. त्या खूप खपत आहेत, त्यांच्यावर चित्रपट निघाले आहेत, आणि दिल्लीत स्वीडिश दूतावासात त्यांच्या जाहीर वाचनाचे कार्यक्रम होत आहेत!

एक प्रमुख पात्र आहे मायकेल ब्लॉक्विस्ट. ते बहुधा स्टीग लार्सनचेच रूप आहे. लार्सन एक्स्पो या शोधपत्रकारितेवर बेतलेल्या मासिकाचा संपादक होता, तर ब्लॉमक्विस्ट मिलेनियम मासिकात काम करताना दिसतो. दुसरे महत्त्वाचे पात्र आहे लिस्बेथ सलँडर, ही तज्ज्ञ कंप्यूटर हॅकर आहे, म्हणजे इतर संगणकांमधली माहिती चोरणारी.

एकूण गोष्ट बरीच किचकट आणि हिंस्र आहे. तिचा गाभा हा, की स्वीडनसारख्या अत्यंत खुल्या, पारदर्शक समाजातही हेरगिरीची गरज असते, आणि अशा हेरगिरीचा भाग म्हणून एक आपल्या CBI किंवा RAW च्या दर्जाचे खाते एका अतिशय विकृत रशियन हेराला संरक्षण देत जाते. या हेराची एका वारंवारच्या बलात्कारातून झालेली मुलगी म्हणजे लिस्बेथ सलँडर,

ब्लॉमक्विस्ट अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा खराखुरा पुरस्कर्ता, आणि लिस्बेथ ‘माझे जगणे इतरांना त्रासदायक ठरत नसेल, तर मला माझ्या पद्धतीने जगायचा हक्क आहे.”, असे मानणारी. या दोघा स्वतः बकाल नसलेल्यांचा आजूबाजूच्या बकालीशी झगडा या कादंबऱ्यांच्या मुळाशी आहे. अल्पवयीनांचे हक्क आणि शोषण, हेरगिरी, पोलिस व हेरखात्यातली बरीवाईट माणसे, खूपसे कंप्यूटर-तंत्रज्ञान आणि त्याहूनही जास्त हिंसा, हा कादंबऱ्यांचा मसाला आहे. मूल्यविचार हरपलेल्या आजच्या इंग्रजीभाषक डिटेक्टिव्ह कथांपेक्षा हे फार वेगळे आहे.

भांडवली व्यवस्थेतच जबाबदार पर्याय तर घडत नाही आहेत?

१९३, शिवाजीनगर, मश्रूवाला मार्ग, नागपूर ४४००१०.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.