मेंदू : व्युत्पत्ती आणि तुलनात्मक भाषाशास्त्र

सजीवसृष्टीतले सगळ्यांत गुंतागुंतीचे इंद्रिय जो मेंदू, त्याला इंग्रजी भाषेत Brain म्हणतात. Brain या शब्दाचे मूळ काय? नव्या ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये (1998) Brain ची व्याख्या, “पृष्ठवंशीय प्राण्यांच्या कवटीमध्ये असलेले, जाणिवांचा समन्वय आणि बौद्धिक व चैतीय क्रिया पार पाडणारे मृदू चेता-उतीपासून बनलेले इंद्रिय” अशी केली आहे. इ.स.पूर्व 5 व्या शतकात ‘मेंदू हा संवेदनांसाठी आवश्यक आहे.’ असे ग्रीक तत्त्वज्ञ (क्रोटनचा) अल्कमायन याने शरीरशास्त्राच्या पुराव्याधारे सुचवले होते. (डॉटी, 2007) परंतु या मर्मज्ञतेचा प्रभाव ‘विचार करण्याच्या इंद्रिया’च्या संदर्भात पुढे वापरल्या गेलेल्या शब्दांच्या व्युत्पत्तीवर पडला नाही. Brain या शब्दाचे मूळ शोधताना आपल्याला इतर इंडो-युरोपियन भाषांशी असलेले मजेशीर संबंध सापडतात. त्याच्या अर्थाबाबत बोलायचे तर (मेंदू ज्यात असतो ती) कवटी हा त्यातला समान धागा राहतो.
Brain चे जुने इंडो-जर्मेनिक मूळ Mregh किंवा Mrogh असावे. M या अनुच्चारित व्यंजनाची जागा B या मृदू व्यंजनाने घेतली आणि Mregh चा Bregh झाला (क्लुज, 1913). मेंदूसाठी हाय जर्मन, डच आणि नॉर्डिक भाषांमध्ये वापरल्या गेलेल्या शब्दांचे मूल त्याच्या शरीरातल्या स्थानात आहे. उदाहरणार्थ, Gehirm किंवा Him, ‘Hersenen’ (डच) किंवा ‘Hiama’ (स्वीडिश). या शब्दाचे मूळ मागे जन्या हाय जर्मन ‘Hirni’ मध्ये सापडते. त्याचा अर्थ डोके, शिखर, मूर्धा किंवा प्राण्यांच्या कवटीचा सगळ्यात वरचा भाग असा आहे आणि तो सस्तन प्राण्यांच्या ‘शिंगां’शीही (horms) समानार्थी आहे, गॉथिक haurn, लॅटिन cornu, cerebrum च्या जवळ आहे. जुन्या ग्रीकमधील डोक्यासाठी keras, kara आणि कवटीसाठी kranion, इंग्रजीत cranium; याचे इंडो-युरोपियन मूळ ker आहे आणि डोक्यासाठी मूळ संस्कृत शब्द शीर्ष किंवा सृग असा आहे.अभिजात ग्रीकमधला ‘encephalon’ हा शब्द मेंदूचे वर्णन नेमकेपणाने ‘कवटीतील’ (पदार्थ) असे करतो. वैद्यकीय परिभाषेत आजही वापरला जाणारा हा शब्द दोन हजारांहून जास्त वर्ष टिकून आहे. ग्रीकसारखेच स्लॅव्हिक भाषेतही कवटीतील पदार्थाला मगज (marrow) म्हणतात; रशियन भाषेत MO3r (mozg) झेकोस्लोव्हाकियन भाषेत mozek, संस्कृत भाषेतील ‘मज्जन्’ वरून.
जर्मन भाषेत मेरुरजूसाठी Ruckenmark (marrow) असा शब्द वापरला जातो, यावर जेकब रफ याने 1581 मध्ये त्याच्या ‘Hebammenbuch’ (सुईणकाम) या पुस्तकात अशी टीका केली आहे, “मेंदूच्या पुढे पाठीच्या कण्याचा मगज सुरू होतो त्याचे स्वरूप जवळजवळ मेंदूसारखेच आहे, म्हणून त्याला मगज म्हणणे अयोग्य आहे. इंडो-युरोपियन भाषा : एकोणिसाव्या शतकात ग्रिम बंधूंनी संकलित केलेल्या बत्तीस खंडांच्या व्युत्पत्तिकोशात आपल्याला आढळते की Brain हा आधुनिक शब्द जुन्या इंग्रजी Braegen पासून आला आहे. हा शब्द अजूनही इतर पश्चिम जर्मनिक भाषांमध्ये अस्तित्वात आहे. उदाहरणार्थ, डॅनिश आणि फ्रीजन भाषांमधला Brain. उत्तर जर्मनीतील बोलीभाषांमध्ये Bregen हा शब्द वापरला जातो खरा पण तो कत्तल केलेल्या प्राण्यांच्या मेंदूंसंदर्भात. (जर्मनीतल्या) लोअर सॅक्सनी प्रांतांत Bregenwurst या सॉसेजच्या प्रकारातला खाद्यघटक म्हणून (डुकरे किंवा गुरांचा) मेंदू वापरला जातो.
जुन्या हाय जर्मन भाषेतील Bregan किंवा Bragma पासून आलेला जुन्या इंग्रजीतला Braegen या शब्दाचे जुन्या ग्रीक भाषेतल्या Brechmos (bpexuoc) शी चांगलेच साम्य आहे. Brechmos म्हणजे डोक्याचा पुढचा भाग किंवा शरीरशास्त्रानुसार कवटीच्या करोनल आणि सजायटल सांध्यांचा संधिबिंदू (ब्रह्मरंध्र!).
‘कवटीतला मगज’ या स्लॅव्हिक संकल्पनेपेक्षा मेंदूचे चिनी रूप फारसे वेगळे नाही. मेंदूसाठी असलेल्या संक्षेपचिन्हाचे त्याच्या चित्रघटकात असे विश्लेषण करता येईल : डाव्या बाजूचे शिडीसारखे चिह्न शरीरासंबंधीच्या अनके चिह्नांमध्ये आढळते आणि त्याचा अर्थ ‘मांस’ असा होतो. (जसा पाय आणि हात यांमध्ये) उजव्या बाजूचा चौकोन म्हणजे डोके, त्यातली फुली म्हणजे आतला पदार्थ आणि चौकोनावरच्या तीन रेघा म्हणजे केस. अशा त-हेने आपण या चिनी चित्राकृतीचा अर्थ ‘कवटीतील मांसल पदार्थ’ असा लावू शकतो.
लेखक : डॉ. जॉर्ज क्रूट्झबर्ग
मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोबायॉलॉजी, जर्मनी. Kopf Carrier September 2007

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.