ब्रेन या शब्दाचा कालानुक्रमी विकास

ब्रेन या शब्दाचा विकास कसा होत गेला हे पाहणे उद्बोधक आहे. प्रथम शृब्दाची व्युत्पती होते. तेव्हा शब्दाची कळी असते. पुढे ती उमलत जाते. शब्द विकसित होत जातो. त्याच शब्दाला निरनिराळे अर्थ प्राप्त होतात. शब्द सिद्ध व समृद्ध होत जातो. शब्द बहुविध रूपात वापरला जातो. शब्दाच्या विकासाचा इतिहास हा मानवी विचारांचा, प्रज्ञेचा, प्रतिभेचा व संस्कृतीचा इतिहास असतो. इंग्लिश शब्दांचा असा मागोवा घेणारा हिस्टॉरिकल थिसॉरस
ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसने 2009 साली प्रकाशित केला आहे. त्यात ब्रेन या शब्दाचा धांडोळा घेतला. ब्रेन हा शब्दनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अशा रूपात पूर्वापार इंग्लिश भाषेत वापरलेला आहे.
ब्रेन म्हणजे सेंटर ऑफ सेंसेशन्स’संवेदनांचे केंद्र या अर्थाने 1230 च्या सुमारास वापरला होता. त्याच सुमारास ब्रेन या शब्दाचा अर्थ ‘इंटलेक्ट’ बुद्धी असाही होता. 1552 मध्ये ‘मसल सबस्टन्स’ म्हणजे स्नायूचा मांसल भाग असा अर्थ ब्रेन या शब्दाला मिळाला होता. 1601 मध्ये ब्रेनचा अर्थ ‘मॅरो’ ‘इंटर्नल टिशु’ ‘पल्प’ म्हणजे हाडाचा आतला मगज’ ‘आतल्या उती’ ‘लगदा’ असा होता.
1630 ते 1816 या या कालखंडात ‘ब्रेन’ हा कवटीत असलेला महत्त्वाचा अवयव असा अर्थ रूढ होऊ लागला. ‘सीट ऑफ माइंड’, मन जेथे वसते तो अवयव म्हणजे ब्रेन हा अर्थ या शब्दाला प्राप्त होणे हे प्रगामी पाऊल होते. त्या काळात शरीरशास्त्रात शोध लागत होते. त्याचे परिणाम ब्रेनच्या शब्दार्थावर होत होते.शब्द एका विशिष्ट अर्थाने सिद्ध झाला म्हणजे त्याचे प्रतिबिंब बोलीभाषेतही पडते. इंग्लिश बोलीभाषेत, 1905 मध्ये ‘थिंकटॅक’, 1911 मध्ये ‘थिंकिंग बॉक्स’ 1917 मध्ये ‘थिंक बॉक्स’ म्हणजे ब्रेन असे समानार्थी शब्द वापरले गेले. 1988, 1941, 1977 या काळात इंग्लिश स्लँग’ (अशिष्ट बोलीत) फेदर ब्रेन’ ‘पी ब्रेन’ असा उपरोधिक अर्थानेही ब्रेन वापरला गेला. तोपर्यंत ब्रेनचा आकार, वजन याबद्दलची माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे पिसासारखा हलका ब्रेन, वाटाण्यासारखा छोटा ब्रेन म्हणजे मुर्ख माणसाचा ब्रेन, असे उपहासाने संबोधले जाऊ लागले.
विज्ञान-तंत्रज्ञानाची वेगाने वाढ होत होती. संगणक हे प्रभावी यंत्र आकारास येत होते. 1934 मध्ये संगणकाला ‘इलेक्ट्रॉनिक ब्रेन’ असा शब्दप्रयोग करण्यात आला. 1950 मध्ये इंग्लिश बोलीभाषेत ‘थिंकिंग मशीन’, ‘लर्निंग मशीन’, असे इलेक्ट्रॉनिक ब्रेनला समांतर शब्द तयार झाले.
विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण या रूपात ब्रेन या शब्दाचा कसा विकास झाला हेसुद्धा सांगता येईल. नामरूपात ब्रेनच्या विकासाचा हा संक्षिप्त आढावा.

आजचा सुधारक चे बांधीव खंड उपलब्ध
आजचा सुधारक चे पहिल्या एकवीस वर्षांचे बांधीव खंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या पूर्ण संचाची किंमत (पोस्टेजसह) रु. 6500/ (अक्षरी रु. साडेसहा हजार फक्त) आहे. इच्छुकांनी कृपया डिमांड ड्रॉफ्ट, मनी-ऑर्डर द्वारा रक्कम खालील पत्त्यावर पाठवावी. चेक स्थानिक ठिकाणी वटणारा नसल्यास रू.75/- वटणावळीपोटी जास्तीचे द्यावेत. बाविसाव्या वर्षाचा बांधीव खंड तयार होत आहे.
पत्ता : आजचा सुधारक,
गौरीवंदन, 123, शिवाजीनगर,
नागपूर – 440010. संपर्क : 982273688, 9881968

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.