जागतिक धार्मिकता सूचकांक (Global Religiosity Index)

लॅप इंटर नॅशनल या संस्थेने केलेल्या एका पाहणीचा आजच्या सुधारकच्या वाचकांसाठी घेतलेला एक आढावा. 57 देशात घेतलेल्या या पाहणीत सुमारे 52000 पुरुष आणि स्त्रियांचा यात समावेश होता. प्रत्यक्ष मुलाखत, टेलिफोन व इंटरनेट या तिन्ही माध्यमांचा वापर करण्यात आला.
ह्या पाहणीत सर्व स्त्री पुरुषांना एकाच प्रश्न विचारण्यात आला: तम्ही धार्मिक स्थळांना भेट देता किंवा देत नाही याला महत्त्व न देता, तुम्ही स्वतःला धार्मिक, अधार्मिक वा नास्तिक संबोधता?
या पाहणीनुसार 59% लोक स्वतःला धार्मिक, 23% लोक स्वतःला अधार्मिक व 13% लोक स्वतःला पूर्णपणे नास्तिक समजतात. (इतर 5% लोकांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.)
जगातील सर्वात नास्तिक लोकसंख्या असलेले देश (टक्केवारी)
देश धार्मिक अधार्मिक नास्तिक स्पष्ट उत्तर नाही
चीन 14 30 47 9
जपान 16 31 31 22
झेक गणराज्य 20 48 30 2
फ्रान्स 37 34 29 1
दक्षिण कोरिया 52 31 15 2
जर्मनी 51 33 15 1
हॉलंड 43 42 14 1
ऑस्ट्रिया 42 43 10 5
आईसलड 57 31 10 2
ऑस्ट्रेलिया 37 48 10 5

जगातील सर्वात धार्मिक लोकसंख्या असलेले देश (टक्केवारी)
देश धार्मिक अधार्मिक नास्तिक स्पष्ट उत्तर नाही
घाना 96 2 0 1
नायजेरिया 93 4 1 2
आर्मेनिया 92 3 2 3
फिजी 92 5 1 2
मासिडोनिया 90 8 1 1
रुमेनिया 89 6 1 3
इराक 88 9 0 3
केनिया 88 9 2 1
पेरू 86 8 3 3
ब्राझील 85 13 1 1
जे स्वतःला धार्मिक किंवा अधार्मिक म्हणतात त्यांची धर्मानुसार वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे : हिंदू (82% धार्मिक, 12% अधार्मिक), ख्रिश्चन (81%, 16%), मुस्लीम (74%, 20%) आणि ज्यू (38%, 54%).
या पाहणीचे आणखी काही निष्कर्ष :
सर्वांत गरीब (तळाचे 20%) गटात 66% स्वतःला धार्मिक तर सर्वात श्रीमंत (वरील 20%) गटात 49% स्वतःला धार्मिक समजतात.
उच्च शिक्षित व्यक्तींमध्ये 52% तर ज्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नाही अश्या व्यक्तींमध्ये 68% वक्ती स्वत:ला धार्मिक समजतात.
भारतासाठी हे आकडे पुढीलप्रमाणे आहेत : 81% धार्मिक, 13% अधार्मिक, 3% नास्तिक, 3% स्पष्ट उत्तर नाही.
2005 ते 2007 या कालावधीत धार्मिक सूचकांक 77% वरून 68% वर खाली आला व नास्तिक सूचकांक 3% ने वाढला.
अधिक माहितीसाठी आजचा सुधारकच्या वाचकांनी पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी: http://www.wingia.com/web/files/news/14/file/14.pdf
स्वीट होम, ए-7, पाली रोड, बान्द्रा, मुंबई 400050.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.