ऊर्जाक्षेत्राचे भवितव्य

ऊर्जाक्षेत्राचे भवितव्य
जनतेला ऊर्जासेवा देण्यासाठी अनेकविध तंत्रविज्ञानात्मक संधी आता उपलब्ध आहेत. त्यामुळे विकसनशील देश विकसित देशांनी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळून सरळ पुढच्या टप्प्यावर पोहोचू शकतात. त्यांच्या सर्जनशील प्रयत्नांमधून जगाला लक्षवेधी वाटावे असे तंत्रज्ञानही निर्माण होऊ शकते.
विकसित देशांत नवीन ऊर्जा प्रतिमान अंमलात आणले गेले तर कमी ऊर्जावापराची शक्यता निर्माण होईल व त्याद्वारे विकसित व विकसनशील देशांच्या ऊर्जावापरातील दरी कमी होत जाईल.
मुख्य म्हणजे आजवरच्या सामान्य समजुतींपेक्षा वेगळा असला तरी समुचित उद्दिष्टांवर आधारित योग्य धोरणात्मक दृष्टिकोण ठेवला तर आपल्याला दिसून येईल की ऊर्जाक्षेत्राचे भवितव्य हे नियतीवर नसून आपल्या निवडीवरच अवलंबून आहे. शाश्वत विकासाधारित जगासाठी आवश्यक असणारे ऊर्जाक्षितिज मानवाच्या कक्षेत आहे. आमच्या प्रयत्नांचा आनंद एवढाच आहे की आम्हाला विनाशाची भविष्यवाणी करणारे द्रष्टे व्हावे लागले नाही तर आशेचे अग्रदूत होता आले.
(प्राध्यापक अमूल्य रेड्डी यांच्या Citizen Scientist या पुस्तकातील संक्षिप्त आत्मचरित्रातून.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.