ऊर्जेचे झाड

अंतर्गोल भिंगातही वस्तूंचा आकार लहान दिसतो, आपल्या दृष्टिकोणात मावतो.
आपल्याला ऊर्जा हवी असते आणि ती वेगवेगळ्या मार्गांनी उपलब्ध होते. समजा, ऊर्जेचे एक झाड आहे. त्या झाडालाही एकूण 1000 फळे आहेत. सर्वजण ह्या ऊर्जेच्या झाडाकडे फळे गोळा करण्यासाठी जातात.
या फळांचे दोन प्रकार आहेत. एक व्यापारी ऊर्जेचा (कोळसा, तेल, वीज), आणि दुसरा अव्यापारी म्हणजे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या शेणगोवऱ्या, जळाऊ लाकूडफाटा इ.चा आहे. अर्ध्या लोकसंख्येला अव्यापारी- 450 फळे मिळतात.
उरलेल्या अर्थ्यांना 550 – व्यापारी ऊर्जेची फळे मिळतात. (140 कोळसा, 330 खनिज तेल उत्पादने व 80 वीज.) या व्यापारी ऊर्जाफळांपैकी 225 फळे उद्योग वापरतात, वाहतूकीला 95 मिळतात तर घरगुती वापराला 70, शेतीला 40 आणि इतरांना 120.
गरिबांच्या वाट्याला अव्यापारी ऊर्जाच येते.
भारतातल्या हजार लोकांपैकी फक्त 500 जण वीज म्हणजे वापरतात. याच लोकांनी तयार केलेले उत्पादन व दिलेल्या सेवा इतरही वापरत असतात. उदा. शेतीला पंपाने पाणी, रस्त्यांवर दिवे, रेल्वे, रुग्णालय इ.
आपल्या देशात तयार होणारी वीजफळे कशी तयार होतात, कशी विकली जातात कोण निर्मिती करते, कोण विकते हे आपल्याला समजलेच पाहिजे. तसेच या झाडाची निगा कोण राखते याकडेही आपले लक्ष गेले पाहिजे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.