समर्पणबंधः एक सांस्कृतिक वैशिष्ट्य

मराठीवाङ्मयातील एक कुतूहलजनक सामाजिक विशेष म्हणजे ‘समर्पण सिंड्रो’. ‘सिंड्रो’ म्हणजे ‘पुनःपुन्हा घडून येणाऱ्या ठरावीक प्रकारच्या गोष्टींचा गट’. आपण याचे नामकरण ‘समर्पण-बंध’ असे करू या. समर्पण-बंध ज्या कथांध्ये फुलवलेला असतो त्या कथांध्ये समर्पणाच्या भावनेने भारावलेली एखादी व्यक्ती चित्रित केली जाते. उदाहरणांळे या सिंड्रोचे स्वरूप स्पष्ट होईल. त्याग, समर्पण या मूल्यांचे परम महत्त्व मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय संस्कृतीत फार पूर्वीपासून मानले गेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या मनोवृत्तीला विशेष बळ प्राप्त झाले. गांधीवाद, मार्क्सवाद या त्यावेळी प्रभावी असलेल्या विचारधारा समर्पण-सिंड्रोला पूरक होत्या. समर्पण-सिंड्रो सर्वांत ठळक बनला तो वि.स.खांडेकरांच्या कथात्म साहित्यात. ‘यज्ञकुंड’ ही त्यांची कथा समर्पण-बंधाचे सारभूत चित्रण करते. कथानायक वृद्ध आहे. ‘तीसच्या नि बेचाळीसच्या चळवळी’ त्याच्या मनात अजून जाग्या आहेत. दिलीप हा त्यांचा नातू अमेरिकेहून परत येतो आहे. आजोबा त्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. अमेरिकेत मिळवलेले ज्ञान आपला नातू समाजकारणासाठी कामी लावेल, अशी त्यांची आकांक्षा नव्हे खात्रीच आहे. “एक गोष्ट तू करायला हवीस घर बांधायचे नवे शास्त्र तू शिकून आला आहेस ना?.. तुझ्या या विद्येचा उपयोग तुझ्या गरीब देशबांधवांनाही व्हायला हवा. सकाळी फिरायला जाताना झोपडपट्टीत राहणारी माणसं मी रोज बघतो. त्यांचं जीवन पाहून माझ्या पोटात कालवाकालव होते…. जो गोरगरिबांच्या मदतीला धावून जात नाही तो शूर कसला?’ इ.स.२००० च्या जगात हा स्वप्नाळू आदर्शवाद भाबडा वाटेल. किंबहुना त्यापूर्वीच आजोबांचा नातू हा आदर्शवाद ठुकरावून लावतो. अमेरिकेतले आयुष्य किती समृद्ध, बुद्धीला वाव देणारे आहे याचा पुरस्कार करतो. दादांचे (आजोबांचे) स्वप्न भंग पावते. गांधीजींची आठवण काढण्याशिवाय ते दुसरे काही काही करू शकत नाहीत; “बापू, बापू, तुचं ते यज्ञकुंड विझत चाललंय ? काय करू मी?”
राजेंद्र बनहट्टी यांची ‘गंगार्पण’ ही कथा एक अभिजात समर्पण-कथा आहे. कथेचं शीर्षकच ‘समर्पण’ या शब्दाला मिळते-जुळते आहे. समर्पण-कथांच्या बाबतीत काही प्रश्न उभे राहतात याची जाणीव आपल्याला येथे होते. नायक ज्या ध्येयाने प्रेरित झालेला असतो ती तत्त्वप्रणाली वाचकाला कबूल नसेल, तर एका अप्रिय तत्त्वप्रणालीला सं ती मिळवण्यासाठी कथेचा उपयोग (दुरुपयोग ?) लेखकाने केला आहे, असा आक्षेप वाचक घेऊ शकेल. आजच्या संकुचित, लोभी वृत्तीच्या जगातही समर्पण-संस्कृती जिवंत आहे, याची ग्वाही ‘उदकाचिया आर्ती’ (१९९४) ही मिलिंद बोकील यांची कथा आपल्याला देते (ही कथाही संग्रहाची शीर्षक-कथा आहे.). कालमानाप्रमाणे कथेच्या संरचनेत काही बदल झाले आहेत, ते लक्षणीय आहेत. प्रथम म्हणजे आजच्या स्त्रीवादी वातावरणाला साजेशी मांडणी आहे : कथा दोन स्त्रियांविषयी (प्रौढ मुलगी व तिची आई) यांच्याभोवती विणली गेली आहे. कथेचा विषयही अद्ययावत आहे. धरणाच्या पाण्याखाली बुडणाऱ्या गावकऱ्यांचा आपली जमीन वाचवण्यासाठी चाललेला लढाव त्या लढ्याला पाठबळ देणाऱ्या दोन ध्येयवादी, स्वार्थत्यागी स्त्रिया. आई आणि प्रौढ मुलगी यांतले संबंध मध्यवर्ती असल्याने कथेला आर्द्र, भावनिक परिमाण सहजतेने लाभते. आई-मुलीचे कार्यग्न आयुष्य तपशिलाने चित्रित केले जाते : “थोडीशी उसंत खाऊन पुन्हा एकदा लढाई जोरात सुरू करायची तयारी. कार्यकर्ते तर रात्रंदिवस भोवताली होते. आसपासच्या गावांतूनही माणसं सारखी भेटायला येत.”
कथेत ‘संघर्ष’ आहे : धरण बांधणाऱ्या सरकारचा/कंपनीचा व गरीब गावकऱ्यांचा; गावकऱ्यांच्या पाठी नायिका (रोहिणी) व तिची आई आहेत. धरण बांधणाऱ्यांशी वाचकांचा परिचय होत नाही; एक दुष्ट, नाशकारी पण अदृश्य, अमूर्त शक्ती एवढेच या माणसांचे स्थान आहे; दुसरी बाजू गावकऱ्यांची ही बाजू थोड्या तपशिलाने रंगवली जाते. कथेतले गावकऱ्यांचे मुख्य काम म्हणजे आई-मुलगी यांच्या भलेपणावर, निःस्वार्थ सेवेवर प्रकाश टाकणे, या विशेषांचे उन्नयन करणे : “ते लोक नमस्कार करून परत गेले आणि रोहिणीचे मन नेहमीसारखे भरून आले.” माणुसकीचा गहिवर कथाभर पसरून राहिला आहे. तो पुरेसा झाला नाही, म्हणून उदात्त नम्रता, शालीनता यांचे अस्तर आहे : “बये, फार अहंकार ठेवू नकोस बरं. कर्ताकरविता तू नाही आहेस. लोक चालवतायेत तुला.” या सर्वांच्या पाठीमागे-विश्लेषण केले तर (१) राजकारणी, भांडवलदारी शक्ती आहे, (२) गरीब-किसान किंवा ‘डोंगरात वेडेबागडे भिल्ल’, किंवा काहीशा कालबाह्य झालेल्या भाषेत बोलायचे तर ‘प्रोलटॅरिएट’ आहे; आणि (३) या माणसांना पाठिंबा देणाऱ्या दोन स्त्रिया ज्या-आनुषंगिक रीत्या-उच्चवर्णीय मध्यमवर्गी आहेत.
कथेची मांडणी अशी केलेली आहे की क्र.१ दूरवर, अस्पष्ट आहे : क्र.२ ला थोडेफार प्राधान्य मिळते; व क्र. ३ वर अधिकतर प्रकाशझोत टाकला जातो, विशेषतः या स्त्रियांच्या निःस्वार्थ त्यागावर. ही मांडणी वाचकांना रुचेल अशी लेखकाची अटकळ आहे. ती बरोबर आहे. कारण वाचकवर्ग मध्यवर्गीय आहे आणि बराचसा अजूनही उच्चवर्णीय आहे. तेव्हा, उच्चवर्णीय मध्यमवर्गीय पात्रांचा उदात्त, निःस्वार्थ स्वभाव प्रकाशमान करणे, हा कथेचा मुख्य उद्देश आहे, असे म्हणता येते. पण कथेतील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे धर्माचा. सुरुवातीलाच याचे ठाशीव दर्शन घडवले जाते. आई ज्ञानेश्वरांच्या ओव्या सतत म्हणत बसते. “ऐक ग! ज्ञानोबा काय म्हणतो” : “ती ज्ञानेश्वरांचा ज्ञानबा, ज्ञानू, ज्ञान्या अशा लडिवाळ नावांनी उल्लेख करी.” ज्ञानेश्वर हा आईच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. अर्थात, फक्त ज्ञानेश्वर. तुकाराम नाही. का ते सांगण्याची गरज नाही. गराठी लेखक नेणिवेवर भिरत राखून लिहितात. हा धार्गिक घटक गहत्त्वाचा आहे. सगर्पण बंधाचा आपण वाङ्गयाच्या संदर्भात विचार केला, तर असा अभ्युपगग घडवता येतो की प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत त्याग, संन्यस्त वृत्ती वगैरेंना महत्त्व दिले गेलेले आहे. या पुराण त्यागप्रवृत्तीचाच आधुनिक आविष्कार म्हणजे समर्पण-बंध. १९२० नंतर गांधीवाद व विशेषतः मार्क्सवाद यांच्या प्रभावामुळे ही समर्पण-वृत्ती धार्मिक स्वरूप टाकून निधर्मी बनली; या वृत्तीकडे मुख्यतः समाजकारणाच्या संदर्भात पाहिले जाऊ लागले. वि.स.खांडेकरांच्या ‘यज्ञकुंड’मध्ये हे विशेष प्रतीत होते. अद्ययावत ‘उदकाचिया आर्ती’मध्येदेखील धार्मिक घटकाबरोबरच समकालीन सामाजिक-राजकीय समस्या अग्रि स्थान मिळवते. तेव्हा समर्पण-बंध आजच्या काळातह्न– जसा खांडेकरांच्या काळात — समाजकारणाचा झेंडा टाकून पुढे जाऊ शकणार नाही, असे वाटते. समर्पण-बंध मराठी वाङ्मयात इतका लोकप्रिय (लेखकप्रिय) का, याविषयी काही अनुाने करता येतात. इतर भारतीय भाषांतही समर्पण-बंध वैपुल्याने आढळण्याची शक्यता आहे. पाश्चात्त्य वाङ्मयात मात्र या बंधाचा आढळ क्वचितच होतो. तेव्हा समर्पण-बंध खास भारतीय वैशिष्ट्य म्हणता येईल. समर्पण सिंड्रो मराठी संस्कृतीमध्ये एवढ्या चिवटपणे प्रभावी असण्याची अधिक चिकित्सक मीमांसा करण्याची जरुरी आहे. समर्पण-बंध इतका दीर्घजीवी असणे यात हे केवळ भावनिक आवाहन कारणस्वरूप झाले, असे म्हणणे भोळेपणाचे होईल. मानवी वा प्राणिज अस्तित्वात केवळ भावनिक शक्ती प्रमुख नसतात. काहीतरी बळकट जीवितेच्छा असल्याशिवाय मानव वा प्राणी कृतीला उद्युक्त होत नाही. तेव्हा समर्पण-बंधाचा याहून विश्वसनीय कार्यकारणभाव शोधण्याची गरज आहे. वरवर पाहता समर्पण-बंध हा प्राणिज सहजप्रवृत्तीला छेद देतो. परोपकार, दुसऱ्यासाठी स्वतःचे समर्पण करणे या उदात्त प्रवृत्ती आहेत. पण ‘सुपर-ईगो’ने एवढे स्वामित्व गाजवावे हे पटण्यासारखे नाही. या ऐवजी काही वास्तवदर्शी कारणमीमांसा करणे उचित होईल. पुन्हा आपण मराठी समाजजीवनाच्या मूळस्वरूपाकडे वळू. समर्पण-भाव मुख्यत्वे (किंवा संपूर्णतः) उच्चवर्णीय घटकांत आढळतो. उच्चवर्णीय समूह अल्पसंख्यक आहे. अल्पसंख्यकांना नेहमीच आपल्या तगण्याची (‘सहर्हायव्हल’) चिंता असते. ‘सर्वायव्हल’ ही आदिम सहजप्रेरणा आहे. अल्पसंख्यकांना नेहमी वेढित होण्याची व जिवे मारले जाण्याची धास्ती असते. गांधीहत्येच्या (‘वधा’च्या) प्रसंगी यासारखा उद्रेक होऊ शकतो. अगदी साध्या ‘अभ्यंकर-हत्याकांडा’चा (पुण्यातील घटनेचा संदर्भ) अर्थ या दृष्टीने लावला जाऊ शकतो. तेव्हा ‘सहायव्हल’ हे साऱ्याच मानवी (वा प्राणिज) समूहांचे प्राथमिक लक्षण असते. अल्पसंख्य गटांचे तर विशेषच. ‘सर्हायव्हल’ नंतर ‘पॉवर’ बळ. प्रत्येक प्राण्याला ‘पॉवर’हवी असते. ‘सहायव्हल’ आणि ‘पॉवर’ या दोन उपजत प्रेरणा वास्तविक एकापाठोपाठ येत नाहीत. त्या एकात एक गुंतलेल्या असतात. तगून राहिले तर बळ मिळवण्याची ईर्ष्या वाढते. बळ प्राप्त झाले तर तगून राहण्याची शक्यता वाढते. या पोर्शभू ीवर आपण मराठी अल्पजन समूहाचे अस्तित्व व त्यांच्या ‘सायव्हल’ची ‘स्ट्रॅटेजी’ (अनुसंधान ; लष्करी डावपेचांची कला) समजून घेतली पाहिजे. उच्चवर्णीय अल्पजनांनी क्वचितच पाशवी बळाचा अंगीकार केला. आपले शक्तिस्थान बौद्धिक व नैतिक बळामध्ये आहे, हे त्यांनी ओळखले. १९२० नंतर मराठी बहुजन व दलित समूह जागृत झाले. त्यांनी लढाऊ हालचालींना प्रारंभ केला. उच्चवर्णीय अल्पजनांची वेढित मनोभावना तीव्र झाली. याच वेळी भारतात गांधीवाद, मार्क्सवाद, समाजवाद इत्यादी संकल्पना फोफावल्या. या तत्त्वप्रणालींचा आधार म्हणून अल्पजनांनी वापर केला. या तत्त्वप्रणालींना कवटाळल्यामुळे अल्पजनांना मुळातच एक ‘सर्हायव्हल स्ट्रॅटेजी’ मिळाली. “आम्ही तर गोरगरिबांच्या, निरक्षर लोकांच्या उद्धारासाठी आमचे जीवन वाहिले आहे ; आमच्यावर कसला आरोप करता? आम्ही तुचे मित्र आहोत, हितचिंतक आहोत,’ असे अल्पजनांचे अध्याहृत सांगणे होते. तेव्हा धोरणी व तल्लख उच्चवर्णीयांनी मार्क्सवादी, समाजवादी, स्वजनवादी (संयुक्त महाराष्ट्राचा लढा) इत्यादी सामाजिक चळवळींचे नेतृत्व हस्तगत केले. समाजाचे ‘नेतृत्व’ करणे हा ‘सहायव्हल’ व ‘पॉवर’ प्राप्त करण्याची हुकमी मार्ग होता. वि.स.खांडेकरांसारख्या लेखकांनी त्याग हे आपले प्रधान शस्त्र बनवले. तीच ‘स्ट्रॅटेजी’ आजतागायत चालू आहे. खांडेकरांनी पेटवलेले ‘यज्ञकुंड’, ‘गंगार्पण’, ‘उदकाचिया आर्ती’ अशा कथांधून अजून तेवत ठेवले आहे. नेहमीप्रमाणेच यात नेणिवेचा भाग किती व जाणिवेचा किती, हा प्रश्न उभा राहतो. नेणीव अबोधरीत्या कार्य करत असते. नेणिवेपाठीमागे सातत्य असते. कित्येक वर्षे, दशके वा शतके नेणीव आपला कार्यभाग उपजतरीत्या साध्य करते. परंतु शेवटी आपण हे जाणले पाहिजे की नेणिवेतले हे बंध व्यक्तीच्या वा विशिष्ट समूहाच्या स्व-हितासाठी, स्व-अर्थासाठी कार्य करतात. ‘नागडा स्वार्थ’ असे याचे वर्णन केले, तर ते धक्कादायक व अरुचिकारक (‘इन बॅड टेस्ट’) वाटेल. पण नेणिवेत खोल गेले तर याच सत्याला आपणाला भिडावे लागेल. अखेरीस समाजाचे नैतिक नेतृत्व–संख्या, शारीरिक बळ, यांसारख्या शक्तिकेंद्रांना वगळून-कोणत्या समूहाने केले ? अल्पजनांच्या व बहजनांच्या नेणिवेत अदृश्य वा निद्रिस्त असलेल्या वस्तुस्थितीला जाणिवेच्या प्रकाशात आणणे, हाच खरा उपाय आहे. नेणिवेच्या भूगर्भात जोवर या शक्ती अदृश्य कार्य करत असतात, तोवर या शक्तींचे फावते. जाणिवेचा प्रकाशझोत सातत्याने या शक्तींवर केंद्रित केला तर या शक्ती थोड्याच काळात निष्प्रभ होतील.
वाङ्मयासारख्या क्षेत्रात इतिहास, परंपरा, संस्कृती या गोष्टी अजून स्थान टिकवून आहेत. या क्षेत्रांध्ये बदल घडून यायला वेळ लागतो. त-हेत-हेच्या स्थैर्यवादी विचारसरणी आपल्यापुढे ढकलल्या जातात. त्यांचे काय होणार आहे, असे विचारायची गरज नाही. “किती वेळ’ हाच खरा प्रश्न आहे. जितका जास्त वेळ तितके आपण जगाच्या मागे राहू. पण जगाच्या मागे राहणे याचीच आपल्याला सवय झालेली असेल व त्यातच आपल्याला समाधान वाटत असेल. परंतु ‘आपण’ एकात्म संघटित अवयवयुक्त जीव नाही आहोत व आपल्यामधले इतर घटक-जीव वेगळ्याच वाटांनी अवकाश आक्रमत असतील. तेव्हा वस्तुस्थितीचे चित्र
आखीव, रेखीव नाही व ते यापुढे तसे असणार नाही.
वाङ्मयक्षेत्रात गतिमानतेला सतत प्रतिकार होत असतो, ही गोष्ट आपण (‘आपण’ !) धरूनच चालली पाहिजे. पण नवीन दिशा शोधणे जमले नाही, तरी ‘परंपरा’ या नावाची प्रचंड अहिल्याशिळा आपल्या पाठीमागे आहे, त्यासंबंधी खूप काही करण्याजोगे आहे. आपणाला जी ‘आपली परंपरा’ म्हणून सांगितली जात होती, ती ‘आपली’ आहे की नाही, किंवा कितपत आहे. याची चिकित्सा करण्याची जरुरी आहे. कारण ‘आपण’ या शब्दाचा गर्भितार्थ गेल्या पन्नास वर्षांत बदलला असण्याची शक्यता आहे. एवंच, ‘परंपरा’ सर्वथैव तपासून घेण्याची गरज आहे. नीत्शे-देरीदा वगैरेंपासून आपण एक गोष्ट शिकतो आहो : “जे आपल्याला सांगितले जाते, त्याच्या बरोबर उलट सांगितले जाते आहे.” (हे एक अतिशय उपयुक्त बोधवचन आहे.) किमानपक्षी काही दुसरेच दुसऱ्याच हेतूने सांगितले जात आहे. यांचे चांगले उदाहरण आपल्या समोरच आहे. ‘समाजशास्त्र’ म्हणजे समाजाचे, समाजाच्या घटकांचे, त्यातील व्यक्तीचे अवलोकन व अभ्यास (बराचसा संख्याशास्त्रीय) अशी आपली कल्पना असते. पण यात समाजाच्या मानसिकतेचा क्वचितच विचार होतो. आणि सामाजिक मानसिकतेत जाणिवेखेरीज सामूहिक नेणीव किती महत्त्वाची होऊ शकते, याच्याकडे आपले अवधान जात नाही, फ्रेडरिक जेसनसारख्या आधुनिक विचारवंताने सामाजिक/राजकीय नेणीव किती कार्यशील असते, याकडे आपले लक्ष वेधले आहे. मराठी/भारतीय समाजरचना पुराणकाळची आहे एवढेच नव्हे, तर असंख्य विभाजनांनी हा समाज शतशः भंगलेला आहे. वर्ण व जाती या जगात इतर कुठे नसलेल्या सामाजिक विशेषांनी हा समाज खास प्रकारचा बनलेला आहे. अशा समाजात नेणिवेचे कार्य अधिकतर प्रभावी व गंतागंतीचे असल्यास नवल नाही. मागे म्हटल्याप्रमाणे मराठी सामाजिक नेणिवेचा अधिक सातत्याने व अधिकतर खोलात जाऊन विचार होण्याची गरज आहे. नेणिवेवर जास्तीत जास्त प्रकाश पाडून, चिकित्सक दृष्टीने तिचा अभ्यास करून तिचे स्वरूप उघड केले पाहिजे. बहजनांनाच नव्हे तर अल्पजनांनाही दृष्टीवरची जळमटे काढून टाकण्याचा फायदा होईल. सामाजिक नेणिवेकडून जाणिवेकडे प्रगती करणे, हाच मुक्तीचा मार्ग आहे. नकारात्म वृत्तीमुळे मराठी कथेची (कथा म्हणून) प्रगती होत आहे की स्थिरतावादी अचलता (मूढता ?) वाङ्मयाला येत आहे, असा प्रश्न आपण विचारू शकतो. १९९० नंतर लिहिल्या गेलेल्या ‘उदकाचिया आर्ती’ या कथेकडे या दृष्टीने पाहता येते. या कथेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत धोपटमार्गी निवेदन आहे, यात आश्चर्य करण्याजोगे काही नाही. कारण समर्पण-संकल्पनेवर लेखकाचे सर्व लक्ष केंद्रित झालेले आहे. यातही आश्चर्य करण्याजोगे काही नाही. जैविक-मानसिक स्थितीकडे लक्ष दिले, तर याचे कारण सापडते. जैविक-मानववंशशास्त्रीय दृष्ट्या माणसाचे (यात लेखकही आला) उद्दिष्ट सर्वस्वी ‘सहायव्हल’ आणि ‘पॉवर’ या गोष्टींवर केंद्रित झालेले असते. अल्पसंख्यक अल्पजन या नात्याने लेखकाचा प्रधान उद्देश या स्वस रक्षणात्म कृतिव्यूहावर सर्व भर देतो. त्यापायी त्याला विशुद्ध वाङ्मयीन (‘कलात्मक’ – आजचा एक शिवी-शब्द) बंधावर व त्याच्या प्रगतीवर ध्यान देण्यात स्वारस्य नाही. तात्पर्य, या कथेला कथा म्हणून काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व नाही. इतर अनेक धोपटमार्गी ‘वास्तववादी’ कथेसारखी ही कथा आहे. ‘वास्तववादी’ हा शब्द अवतरण चिह्नांध्ये टाकला आहे, कारण या कथेचे खरे उद्दिष्ट वास्तववाद नाही. ते ‘आदर्शवादी’ म्हणता येईल. त्यापुढे जाऊन या कथेध्ये मूलत: जैविक हेतुप्रवणता आहे असे म्हणता येईल. आपल्या अल्पसंख्य समूहाचे समर्थन करणे व त्या समूहाचा निष्पापपणा, इतरेजन समाजाविषयी निःस्वार्थ सहानुभूती इत्यादी गुणांचे स्वरूप स्पष्ट करणे, हा या कथेचा मुख्य हेतू आहे.
यातून जे निष्कर्ष निघतात ते चिंताजनक आहेत : मराठी कथेच्या (कथा म्हणून) विकासासाठी काही प्रयत्न वा प्रयोग करणे यात लेखकाला रस नाही. कथा म्हणून मराठी कथा कुठे जात आहे, याचे निराशाजनक चित्र यातून उभे राहते. संक्रमणकाळामध्ये मराठी कथा व कादंबरी या दोन्ही बंधांनी आपला विकास साधला. गंगाधर गाडगिळांनी ही जी प्रयोगशीलता दाखवली तिचा मागमूसही १९९० नंतर लिहिलेल्या या कथेत आढळत नाही. चिं.त्र्यं. खानोलकर, श्री. दा. पानवलकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कथांकडे पाहा व या समकालीन कथेकडे पाहा. आपण कुठून कुठे आलो आहोत याविषयी गंभीर चिंतन करण्याजोगी ही बाब आहे. ‘गराठी कथा : विसावे शतक’ या प्रातिनिधिक व व्याख्यात्गक संग्रहातील विसाव्या शतकाच्या सुरुवातीची कथा आहे श्री. ग. गाट्यांची, ‘बन्सीधर ! तू आता कुठे रे जाशील?’ या संग्रहातील विसाव्या शतकाच्या अखेरची कथा-थोडे नाव बदलून-आपण अशी आहे, असे म्हणू शकतो : “धरणग्रस्ता, तू आता कुठे रे जाशील?” यात केवळ नामसाधर्म्यच नाही; तर कथेच्या विषय-बंधातही साम्य आहे. गरीब, गांजलेले समूह; त्यांच्याविषयी कणव, दयाबुद्धी इत्यादी भावनात्मक सामग्री. फरक एवढाच की माट्यांची कथा ही काहीशी, ‘भोळेपणाने’ लिहिलेली आहे. लेखक म्हणून आपला वर्ग/वर्ण त्यांनी कथेत धोरणीपणाने विणलेला नाही. याचे कारण बहुधा १९०० च्या जवळपास धोक्याची काही सूचना अल्पजन उच्चवर्णीयांना भासत नव्हती. या शतकाच्या प्रवासात अशी धोकासूचना स्पष्ट दिसू लागली होती. तेव्हा १९९० च्या आगोगे लेखक स्वतःचा वर्ग/वर्ण कथेत चाणाक्षपणे गुंफू लागला व अध्याहृत समर्थन व मनमिळवणी करू लागला. इ.स.२०००च्या जवळपास नवीनतेने लक्ष वेधून घेणाऱ्या कथा इतरेजन कथाकारांनी लिहिल्या आहेत. (उदा., जी.के.ऐनापुरे,) पण त्यांची दखल घेण्याची संग्रहाच्या संपादकांना जरुरी वाटली नाही. मराठी साहित्याची कोंडी फोडण्यासाठी आधी मराठी सामाजिक परिस्थितीचा गुंता सोडवला पाहिजे. अशा सोडवणुकीचे पहिले पाऊल म्हणजे आपण डोळसपणे नेणिवेतून जाणिवेकडे प्रवास करणे, हे आहे. विाङ्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव ह्या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश, (मौज प्रकाशन, २०११) मधून साभार

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.