संयत पण ठाम

एक मे महाराष्ट्र दिन. अलिकडे तो राजभाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्या दिवशी एक वाईट बातमी कळली. सामंत बाई गेल्याची… अगोदर राजभाषा मराठीची व त्यानंतर शेवटपर्यंत मराठी भाषेची निरलसपणे सेवा करणाऱ्या बाईंनी अखेर जाण्यासाठीही तोच दिवस निवडावा!
अभ्यास, करियर वा चळवळ करण्यासाठी ‘भाषा हा विषय अगदीच दुर्लक्षित व बिनमहत्वाचा वाटला जाण्याच्या काळात त्यांनी तो आपल्या आवडीचा विषय म्हणून स्वीकारला, जोपासला. सुसंस्कृत समाजाला चांगल्या भाषेची आवश्यकता का असते, ती कशी पूर्ण व्हायला हवी, तसेच तिचे संवर्धन न केल्यामुळे समाजाचे काय नुकसान होते ह्यावर त्यांनी जोरकसपणे मांडणी केली. भाषेच्या रणभूीवरील त्या एकांड्या शिलेदार होत्या.
सत्त्वशीला सामंत ह्यांच्याशी माझी पहिली भेट मंत्रालयाच्या नवीन प्रशासन भवनात झाली. तेव्हा मी भाषा संचालनालयात नुकतीच रुजू झाले होते. अनेकांकडून मी तेव्हा स्वेच्छानिवृत्त झालेल्या बाईंबद्दल ऐकत होते. नंतर अशाच एकदा त्या फोर्टध्ये आलेल्या असताना माझे ज्येष्ठ सहकारी मधुकर जोशी ह्यांनी मला मुद्दाम तेथल्या कॅन्टीनमध्ये नेऊन माझी त्यांच्याशी गाठ घालून दिली. लहानखुऱ्या बांध्याच्या, नीटनेटक्या राहणीच्या त्या बाई. आवाज अगदी मंद व मधुर. माझ्या कल्पनेतील भारदस्त व्यक्तिमत्त्वापेक्षा फारच वेगळे, लोभस रूप होते ते. तेव्हाची माझी भेट ही तर फक्त भेटच होती. नंतर अधूनमधून त्यांचे लिखाण मी वाचत होते. अनुवाद, संपादन, मुद्रितशोधन इ. भाषाव्यवहाराशी संबंधित सर्व कामांना त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यासाठी खूप संघर्ष केला. मुद्रितशोधन म्हणजे फक्त हस्वदीर्घाच्या चुका दुरुस्त करणे नसून त्याबरोबरच तपासणाऱ्याने मजकूर व भाषाशैली ह्यावरही नजर टाकली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. मराठीतील एका गाजलेल्या कादंबरीच्या मुद्रितशोधनाच्या निमित्ताने त्यांनी ‘मुद्रितशोधन की संहिता – शोधन असा एक विस्तृत लेख लिहून ह्या विषयाला तोंड फोडले होते. त्यावर वादविवादही झाला होता. त्या निमित्ताने हा विषय व ललित वा ऐतिहासिक वाययाचेही संहिता शोधन करायचे असते, चांगला मुद्रित शोधक हेही काम करू शकतो का इत्यादि मुद्दे चर्चेत आले.
भाषा संचालनालयात उप संचालकाचे पद प्राप्त करूनही बाईंनी वीस वर्षांतच स्वेच्छानिवृत्ती घेतली. तेवढ्या काळातही तेथे त्यांनी अनेक चांगल्या कार्यप्रणाली प्रस्थापित केल्या व राबविल्या. विधि अनुवादाचा तर पायाच त्यांनी रचला असे म्हणावे लागेल. कायद्याचा मसुदा मराठीत आणणे वा कायदा मराठीतून उपलब्ध असणे आवश्यक कसे ह्यावर त्यांनी सरकारी सेवेत असताना व नंतरही पुष्कळ लिखाण केले. वीस वर्षांची सेवा व अभ्यासू वृत्ती ह्यांच्यामुळे चूक कुठे धोरणात की अंलबजावणीत हे त्या नेकेपणाने सांगू शकत. त्यावर सुचविलेल्या उपाययोजनेतही त्यांच्या प्रगल्भ व परिपक्व बुद्धिमत्तेचा प्रत्यय येई. भाषा संचालनालयाच्या न्याय व्यवहार कोशाचा कच्चा आराखडा बाईंनीच तयार केला होता. त्यावरच प्रक्रिया करून आजचा न्या व्य कोश तयार झाला आहे. शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्त झाल्यावर बाईंनी अधिक व्यापक अर्थाने आपले करियर पुढे चालविले. सुरुवातीच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांचे मुद्रितवाचन केले. (मुद्रितवाचनाचे त्यांनी मुद्रितशोधनात उन्नयन केले आणि त्यालाही संहिता शोधनाची जोड दिली हे वर लिहिलेच आहे.) पुस्तक लिहिणारी व्यक्ती जरी विषयाची जाणकार असेल, तरी तिच्याकडे चांगली शैली वा शब्दसंपदा असेलच असे नाही. अशा वेळी भाषेची जाणकार असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने त्यावर संपादकीय वा अन्य भाषिक संस्कार करून त्याला देखणे रूप प्राप्त करून द्यावे. अशा रीतीने मराठीच्या जाणकारांना रोजगाराचे चांगले साधन तर मिळेलच, शिवाय मराठी पुस्तकांचा दर्जा, खप व व्यवसाय वाढून भाषेस ऊर्जितावस्था येईल असे त्यांना वाटत असे. अर्थात बाई वाटून घेण्यावर थांबल्या नाहीत. त्यांनी स्वतः असे काग केले व अनेकांना तसे करण्यास प्रवृत्त केले.
बारा वर्षे खपून त्यांनी तयार केलेला शब्दानंद कोश हा त्यांच्या चिकाटीचा व अभ्यासूपणाचा नमुनाच म्हणता येईल. एक चतुर्थांश डेमी आकाराची तब्बल नऊशे पृष्ठे असलेला हा त्रिभाषात्मक कोश आहे. म्हणजे इंग्रजी शब्दांचे मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांध्ये पर्याय दिले आहेत. शेवटी समग्र सूची आहे, जीवरून आपल्याला हिंदी वा मराठी शब्दावरून इंग्रजी शब्द शोधता येतो. मूळ इंग्रजी शब्द विषयानुसार दिले आहेत. अशा सत्तर विषयांचा अंतर्भाव कोशात केलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा व राज्य हिंदी साहित्य अकादमीचा अशा तीन पुरस्कारांनी ह्या कोशाचा यथोचित गौरव केला आहे. बाईंचे शिक्षण बी. ए., एलएल. बी. होते. त्यानंतर त्यांनी भाषाशास्त्रातही पदविका संपादन केली होती. करियरमध्ये अनुवाद विशेषतः कायद्याचा अनुवाद, त्यानंतर त्रिभाषात्मक शब्दकोश अशी वाटचाल करताना त्यांच्या आधीपासूनच्या शुद्धलेखनाच्या आवडीने पुन्हा उचल खाल्ली असावी कारण त्यानंतर त्यांनी ह्या विषयावर जे काही रान उठवले, त्याला तोड नाही. ‘शब्दानंद प्रकाशित झाल्यापासून आजतागायत म्हणजे गेल्या वीस वर्षांत प्रमाणलेखन ह्या विषयावर महाराष्ट्रात किंवा किमान पश्चिम महाराष्ट्रात जे काही चर्चा- परिसंवाद झडले, त्यांध्ये बाईंचा आक्रमक सहभाग होता. आजचा सुधारक च्या मराठीकारण विशेषांकातही त्यांचा लेख होता. कमीतकमी लिखित शब्दांध्ये जास्तीत जास्त निश्चितार्थकता यावी म्हणून त्यांनी मराठीच्या जुन्या शुद्धलेखनाचा आग्रह धरला. त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी कोणतेही व्यासपीठ त्यांनी दवडले नाही. जुन्या पद्धतीने अनुच्चारित अनुस्वारही द्यावेत असे त्यांचे ठाम मत होते. मराठीशिवाय अन्य कोणत्याही भाषेचे लेखननियम इतके वारंवार बदलले नसतील. हिन्दीमध्ये अठरापगड बोली भाषा असल्या, कितीही विस्तीर्ण प्रदेशात ती बोलली जात असली, तरी खडी बोलीचे वा प्रमाण हिंदीचे लेखन अजूनही त्याच जुन्या पद्धतीने होत असते. मराठीत वारंवार झालेल्या ह्या नियमबदलjळे मूळ देवनागरी लिपीची तर्कशुद्धता हरपली. तिचा डौल व बांधेसूदपणा तर गेलाच, पण लहान मुलांसाठी व बिगर मराठी लोकांसाठी ती शिकणेही आपण अवघड करून ठेवले. लहानपणी जुने शुद्धलेखन शिकलेल्यांना मोठेपणी ही अतार्किक लेखनपद्धती अंगवळणी पाडणे दुष्कर झाले, वृत्तबद्ध-कवितादि साहित्यप्रकारांची हानि झाली अशा प्रकारे मांडणी करणारे दोनच लोक महाराष्ट्रात झाले. एक दिवाकर मोहनी आणि दुसऱ्या सत्त्वशीला सामंत. अलीकडे शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे ह्यांनी ह्या दोघांच्या मताला दुजोरा दिलेला आहे. मात्र ह्या सिद्धान्ताचे तर्कशुद्ध खंडनही अद्याप कुणी केलेले नाही.
जोडाक्षर व तोडाक्षर पद्धतीतील फरक लोकांच्या गळी उतरविण्यासाठी बाईंनी अक्षरशः रक्त आटवले आहे. तोडाक्षर हा शब्दही त्यांचाच. शास्त्रोक्तपणे जोडाक्षर न लिहिता मध्ये एक वर्ण हलन्त लिहिण्याच्या चुकीच्या पद्धतीला नाव देण्यासाठी त्यांना तो रूढ करावा लागला. एकापेक्षा अधिक वर्ण एकत्रितपणे उच्चारायचे असतील तेव्हा ते एकापुढे एक हलन्त करून (बोलीभाषेत पाय मोडून) न लिहिता एकाच स्वरचिह्नाला जोडावयाचे, असा देवनागरीचा नियम आहे. मराठी-हिन्दी-संस्कृत मुद्रणासाठी पूर्वापार खिळेही तशाच प्रकारे पाडण्यात आले होते. नंतर टंकलेखनाच्या युगात केव्हातरी जोडाक्षरे टंकित करणे अवघड झाल्यामुळे तोडाक्षराची पद्धत अनवधानाने रूढ झाली. ह्याचा अर्थ आता तीच शास्त्रीय पद्धत बनली असा नव्हता. परंतु महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाने (बाल भारतीने) तीच पद्धत अंगीकारली आणि मराठी भाषा व हाती पाटीपुस्तक घेऊन ती शिकण्यास सज्ज झालेल्या नव्या पिढीचे किंबहुना अशा काही पिढ्यांचे अपरिमित नुकसान केले. ह्या प्रकाराच्या विरोधात बाईंनी तीव्र मोहीम चालविली. अनेक ठिकाणी त्यांनी ह्याच्या विरोधात धडक दिली. त्याचाच काही अंशी परिणाम म्हणून सालचा शासन निर्णय (जी.आर.) संत झाला. त्यामध्ये, जोडाक्षरे ही जोडाक्षर पद्धतीनेच लिहावीत ह्यावर शासनाने शिक्कामोर्तब केले होते. हा शासन निर्णय घेऊन बाईंनी पुन्हा बालभारतीचे दार ठोठावले व आपल्या पाठ्यपुस्तकांधील चुकीची लेखनपद्धती बदलण्याचा त्यांच्याकडे कळकळीने आग्रह धरला, परंतु भाषेशी एकनिष्ठ राहून कोणतेही तर्कशुद्ध कारण न देता सरकारी पद्धतीची उत्तरे देऊन आजवर तो उडवून लावला आहे. ह्याला बाईंचे अपयश न म्हणता बालभारतीचा बालिश हट्टच म्हणावे लागेल. बाईंनी तर त्या विषयाचा तपशीलाने अभ्यास व चिकाटीने पाठपुरावा केला. विभिन्न सरकारी संस्था व जनसामान्य ह्यांच्याकडून वारंवार होणारी अवहेलना व दुर्लक्ष ह्यांचा आपल्या मनोधैर्यावर मुळीच परिणाम होऊ दिला नाही. कायम विवेकी व संयत भाषा वापरली. कोणी आपले भक्त, अनुयायी वा सोबती असतील अशी अपेक्षा ठेवली नाही. त्यामधून त्यांना आर्थिक लाभ, नाव, कीर्ती असे काहीही मिळणार नव्हते तरीही निव्वळ भाषेच्या कल्याणासाठी त्या एकाकी झुंजत राहिल्या. भाषेचा विषय विशेष आवडीचा असला तरी इतर अनेक चांगल्या गोष्टींची त्यांनी दखल घेतली व त्याचे कौतुक केले. मग ते त्यांचे बालमित्र दिलीप प्रभावळकर ह्यांचे आत्मचरित्र असो, की बडोद्याचे संस्कृत तज्ज्ञांचे भारतीय बैठ्या खेळावरचे पुस्तक. मानस सरोवराचे मानसरोवर असे चुकीचे नाव रूढ झाले. त्यासाठीही त्यांनी पत्रव्यवहार केला. संबंधितांचे नाव त्याकडे वेधून घेण्याचा खूप आटापिटा केला. त्यावरून काही थोर लोकांनी त्यांची टिंगलटवाळीही केली होती, पण ह्या कशाचीच त्यांनी पर्वा केली नाही. भाषेच्या वापराबाबत कुठेही काही चुकीचे दिसले की संबंधितांना फोन करून वा पत्र लिहून ते कळविण्याचा उपद्व्याप त्या करीत. आपल्या निवासी गृहनिर्माण संस्थेध्ये जागेबाबत झालेल्या अन्यायाचे निराकरण त्यांनी आपले कायद्याचे ज्ञान वापरून केले. इंग्रजीवरही त्यांची चांगली हुकमत होती. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निवाडा देताना त्यांच्याच अर्जातील भाषा जशीच्या तशी वापरली हे त्यांनी एकदा सहज गम्मत म्हणून मला सांगितले होते.
बाईंचा जनसंपर्क दांडगा होता. भाषा ह्या शब्दाची व्याप्ती सध्या साहित्य व वाङ्मयापुरती मानली जाते. त्याविषयी बाईंना असलेले प्रे त्यांनी बा. भ. बोरकर ह्यांच्या कवितांचे दोन खंड संपादित करून जाहीर केले होतेच, परंतु त्याचबरोबर, सर्व साहित्यिक गटांशी त्यांनी चांगले संबंध ठेवले होते. त्याच्याही पलीकडे, दादरच्या त्यांच्या शारदाश्रम शाळेपासून तर अगदी अलीकडील तरुण पिढीपर्यंत सर्वांशी त्यांचा संपर्क- संवाद-मैत्री असायची. भाषा संचालनालयातील सर्व जुन्या व अनेक नव्या लोकांशी त्यांचा संपर्क होता. सर्वांविषयी त्यांना समान आस्था होती. एखाद्या व्यक्तीबद्दल अधिक चांगले व दुसरीबद्दल कमी चांगले बोलताना मी कधीही त्यांना ऐकले नाही. सगळ्यांच्या अडचणींची त्यांना कल्पना असायची व त्यामध्ये त्या होईल तेवढी मदत करीत. मानवी संबंधांतही तोडाक्षर नाकारून नेहमी जोडाक्षरावर भर दिला असेच म्हणावे लागेल. एकीला दुसरीबद्दल चांगले सांगून, तिच्या अडचणींची कल्पना देऊन त्यांना एकमेकींशी जोडण्याचे पुण्यकर्मही त्यांनी केले.
वाचनाच्या ओघात कधीही एखादा अपरिचित संदर्भ आल्यास त्याच्या मुळाशी जाऊन पूर्णपणे त्याचा छडा लावल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. एकेका शब्दासाठी अनेक शब्दकोश, संदर्भग्रंथ त्या पालथे घालीत. अन्योन्यसंबंध पडताळून पाहात. त्यात्या विषयातील तज्ज्ञांकडून खात्री करून घेत. संशोधन ह्या शब्दाचा अर्थ पीएच. डी. एवढाच असण्याच्या काळात बाईंनी डिग्रीच्या मोहात न पडता हे काम केले. त्यांचा व्यासंग व अभ्यासातील शिस्त पाहून अनेकदा त्यांना डॉक्टर संबोधले जाई, तेव्हा त्या आपण डॉक्टर नसल्याचे नम्रपणे सांगत.
अप्पा, म्हणजे श्री. विठ्ठलराव सामंत ह्याच्याबद्दल सांगितल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही. अप्पा व बाई ह्या दोघांचीही राहणी अगदी साधी होती. तसेच त्यांचे घरही. त्या घरात ते दोघे समाधानाने राहत. आपली पात्रता खूप जास्त आहे आणि त्या मानाने आपल्याला काही मिळाले नाही असा भाव चुकूनही त्यांच्यात कधी दिसला नाही. मात्र माझे व माझ्यासारख्या अनेकांचे ते मनातले बोलून तणावमुक्त होण्याचे, पुण्यासारख्या शहरात हक्काच्या विसाव्याचे आणि भाषाविषयक वा जीवनविषयक अन्य कोणत्याही अडचणींवर मार्गदर्शन घेण्याचे ठिकाण व केंद्र होते. अप्पांचा मूळ स्वभाव व छंद-आवडी बाईंपेक्षा भिन्न असूनही त्यांनी बाईंना त्यांच्या आवडीच्या कार्यात सदैव साथ दिली. मदत केली. त्यांच्या कामाची इत्थंभूत माहिती ठेवणे, त्याची व्यवस्था सांभाळणे, महत्त्वाच्या गोष्टींच्या नोंदी करून ठेवणे, बाहेरची सर्व कामे करणे, घरात परोपरीने मदत करून बाईंना वेळ उपलब्ध करून देणे हे सर्व त्यांनी अथकपणे केले. त्यांच्या घरातील इंग्रजीतील टिप्पण्या व पत्रे तर मी अनेकदा अप्पांच्याच हस्ताक्षरात पाहिली आहेत. स्वभावधर्म भिन्न असतानाही एवढे समंजस सहजीवन क्वचित पाहायला मिळते. त्यांच्या घरून निघताना अप्पाआता पुण्यात किती दिवस मुक्काम आहे, तेवढ्या वेळात कोणकोणती कामे करायची आहेत, आता येथून कुठे वा कोणाकडे जायचे आहे ह्याची व्यवस्थित चौकशी करीत. पुढील स्टेशनचा पत्ता आपल्या सुवाच्य हस्ताक्षरात लिहून ती चिठ्ठी आपल्या हातात ठेवीत. तेथूनच रात्रीची शिरपूर बस गाठायची असेल तेव्हा तर त्यांनी मला शनिवारवाड्याला पोहोचवूनही दिले आहे. खरे तर मी त्यांची काळजी घेण्याचे हे त्यांचे वय. तरीसुद्धा….. बाई आजच्या पिढीतल्यासारख्या तंत्रस्नेही नव्हत्या. शब्दानंद कोशाचे डोंगराएवढे काम त्यांनी संगणक-पूर्व काळात हातानेच पत्रिका वगैरे तयार करून केले आहे. त्यांचा इ-मेल आय डी तर शेवटपर्यंत नव्हताच. तरीही सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीचे साहित्य, आपले स्वतःचे लेख इत्यादि झेरॉक्स करून पाकिटावर आपल्या सुंदर अक्षरात पत्ता घालून पोस्टानेच पाठवीत असत. मात्र हे काम त्या व अप्पा दोघे मिळून झपाट्याने करीत. कंटाळा त्यांना ठाऊक नव्हता. त्यांच्या घरचा टीव्हीदेखील, मी पाहिला आहे तोपर्यंत तरी कृष्ण-धवल होता व बातम्या पाहण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. लिफ्ट नसलेल्या घरात राहून त्या शेवटपर्यंत जिन्याने चढल्या-उतरल्या व सार्वजनिक वाहनातून फिरल्या. बाई सगळा व्यवहार लँडलाईन फोनवरून करायच्या. म्हणजे घरी असतानाच फोन घ्यायचा. गेली काही वर्षे निकडीपुरता मोबाईल फोनचा वापर त्यांनी केला, पण त्याच्या अधीन झाल्या नाहीत. ऐषारामाचा, छानछोकीचा स्पर्श त्यांनी आपल्या । आयुष्याला होऊ दिला नाही. त्याची कधी वाच्यताही केली नाही. चणे-कुरमुरे खाऊन कोशकार्य करणाऱ्यांची महान परंपरा महाराष्ट्राला आहे म्हणतात. बाई त्याच्या एकविसाव्या शतकातल्या पाईक होत्या. बाई नेहमी स्वतंत्रपणे विचार करीत. पूर्ण विचारान्ती आपले मत बनवीत आणि मग प्राणपणाने त्यासाठी लढत. त्या अर्थाने त्या उच्च कोटीच्या स्त्रीवादी होत्या असे मला म्हणावेसे वाटते.
बाईंनी त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकल्प हाती घेतले. ते पूर्ण होण्याच्या किंवा एका ठोस टप्यापर्यंत किंवा मार्गी लागण्याच्या अगोदरच काळाने त्यांना उचलून नेले आहे. त्यांच्या आयुष्याचे यशापयश किती प्रकल्प पूर्ण झाले ह्यापेक्षा त्यांनी ते का निवडले, कसे हाताळले व मिळालेल्या काळाचा त्यांनी कसा उपयोग केला त्यावरून ठरणार आहे. दुसरे म्हणजे भाषेचे भवितव्यही,पुढची पिढी ते प्रकल्प कसे पूर्ण करते
ह्यावर ठरणार आहे. हे लक्षात घेऊन मी तरी त्यामध्ये होईल तेवढे अंशदान करण्याचा संकल्प ह्याद्वारे सोडत आहे. बाईंबद्दल आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे त्या माझ्या बाबांची मैत्रीण होत्या…कदाचित त्यांची एकमेव मैत्रीण…. मैत्री म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतं ते फक्त भावनिक नातं. मात्र इथे वेगळा प्रकार होता. बाबांशी बौद्धिक पातळीवरूनदेखील मैत्री निभावणाऱ्या सामंत बाई मला फार थोर वाटतात. ३०३, स्टाफ क्वार्टर्स, NMIMS-SPTM, मुंबई-आग्रा महामार्ग, तापीकाठ, बाबुळदे, ता.शिरपूर, जि.धुळे ४२५४०५.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.