अनवरत भंडळ (४)

मेंदूचे अंतरंग
डॉ. जिल टेलर या अमेरिकेतील सुप्रसिद्ध मेंदूरचना शास्त्रज्ञ (neuroscientist) आहेत. मानवी मेंदूतील पेशींचा मनोविकारांशी ने का काय संबंध असतो, या बाबतीत संशोधन करत असताना वयाच्या अवघ्या सदोतीसाव्या वर्षी डॉ. टेलर यांना स्वत:लाच ब्रेन स्ट्रोक आला. त्यांच्या मेंदू ध्ये रक्तस्राव होऊन मेंदूची डावी बाजू दुखापतग्रस्त झाली व त्यामुळे शरीराचा उजवा हिस्सा पांगळा झाला. त्यांच्या मेंदूची शल्यक्रिया करून लिंबाच्या आकाराची साकळलेल्या रक्ताची गाठ काढून टाकण्यात आली. त्यानंतर विलक्षण जिद्द, चिकाटी व परिश्रमांच्या परिणामी डॉ. टेलर सुमारे आठ वर्षानंतर पूर्ववत् (नॉल) होऊ शकल्या. त्या मेंदूतील बिघाडाच्या अवस्थेत त्यांना जे अनुभव आले त्यांचे वर्णन त्यांनी My Stroke of Insight (A Brain Scientists Personal Journey) या २००८ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात केले आहे. त्यांचे हे पुस्तक बेस्ट सेलर म्हणून जगभर गाजले व २००८ साली टाई मासिकाने जगतातील शंभर प्रभावशाली महिलां ध्ये त्यांचा समावेश केला. डॉ. जिल टेलर यांचे ते मूळ पुस्तक मला अद्याप मिळाले नाही; परंतु चित्रा बेडेकर यांनी डॉ. टेलर यांच्या अनुभवांची कथा ‘मेंदच्या अंतरंगात’ या पुस्तकात अतिशय समर्पक भाषेत सादर केली आहे. चित्रा बेडेकर या स्वत: संरक्षणखात्यातील संशोधनसंस्थेत वैज्ञानिक अधिकारी पदावर होत्या व लोकविज्ञान चळवळीशीही त्या निगडित आहेत. आपल्या मेंदचे जे वरचे आवरण असते त्याचे डावा व उजवा असे दोन अर्धगोल हिस्से असून ते दोन्ही भाग एका सेतूने एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे डाव्या व उजव्या अर्धगोलांत माहितीची सतत देवाणघेवाण सुरू असते व ते एकमेकांना पूरक असे कार्य करत असतात. मात्र ज्ञानेंद्रियां उर्फत मेंदूपर्यंत पोचलेल्या माहितीवर कशा प्रकारे संस्करण करायचे, याची प्रत्येक अर्धगोलाची कार्यपद्धती अगदी परस्परभिन्न असते. मानवी मेंदूच्या या वरच्या आवरणां ध्ये ज्या चेतापेशी (neurons) असतात, त्या इतर कोणत्याही प्राण्याच्या मेंदूत आढळून येत नाहीत. मानवी मेंदच्या या बाह्य आवरणाला पशे-लींश असे नाव आहे. आपल्या मेंदच्या आतल्या भागातील पेशी मात्र इतर सस्तन प्राण्यांसारख्याच असतात. मानवी मेंदच्या डाव्या व उजव्या अर्धगोलांच्या भिन्न-भिन्न कार्यपद्धतीचे सुरेख वर्णन चित्रा बेडेकरांनी डॉ. जिल टेलर यांच्या पक्षाघाताच्या घटनेच्या संदर्भात जे केले आहे, ते त्यांच्याच शब्दांत वाचणे योग्य राहील. त्या लिहितात :
“माणसाच्या मेंदूचा डावा अर्धगोल ‘बुद्धिवादी’ असतो. बुद्धी वापरून परिस्थितीचा सतत अर्थ लावत असतो. उलट उजवा अर्धगोल अंत:प्रेरणेने,अंत:स्फूर्तीने चालतो. डाव्याला कालप्रवाहाचे भान असते तर उजवा वर्त नि क्षणातच मग्न असतो. डावा भाषा वापरतो, शब्दां उर्फत बोलत राहतो, उजवा नि:शब्दपणे अनुभव घेत असतो. डावा मेंदू परिस्थितीचे तुकडे करून विश्लेषण करतो तर उजव्याला समग्रतेचे सर्वसमावेशक भान असते. डाव्या मेंदच्या प्रेरणांच्या प्रभावाखाली आपण प्रत्येक क्षणी जगाशी व्यवहार करत राहतो, इतरांशी शब्दबंबाळ बोलत ऐकत राहतो, काल-आज-उद्याच्या चक्रात अविरत धावत राहतो. आपण एकटे आहोत, एकाकी आहोत, असुरक्षित आहोत आणि सतत धडपड केल्याशिवाय, स्वार्थ साधल्याशिवाय टिकू शकणार नाही असे आपल्याला वाटत असते. जिलच्या मेंदूचा डावा अर्धगोल जेव्हा निकामी झाला तेव्हा तिला उजव्या मेंदूच्या प्रभावाखाली एक वेगळा विलक्षण अनुभव आला. जणु एक साक्षात्कार झाला! मी संपूर्ण विशाशी एकरूप आहे असा समग्रतेचा अफाट अनुभव तिला आला. तो कालातीत होता, ‘स्व’च्या पलीकडचा होता, शब्दांच्या पलीकडचा होता. एका असीम आंतरिक शांततेचा तो अनुभव होता.”
आपले हे उजवे मन म्हणजेच उजव्या अर्धगोलाची कार्यपद्धती कोणताही सुटा, अलग क्षण अगदी स्पष्टपणे जसाच्या तसा आठवण्याची क्षमता आपल्याला देते. आपल्या अवतीभवतीच्या गोष्टींचे एकमेकांशी कसे नाते आहे हे लक्षात ठेवण्यासाठीच आपल्या या उजव्या मनाची म्हणजेच मेंदच्या उजव्या अर्धगोलाची योजना झालेली आहे. निरनिराळ्या वस्तूं धल्या सीमारेषा धूसर होऊन मनाने चितारलेले एकच विशाल, व्यामिश्र चित्र आपण आठवू शकतो. दृश्य, हालचाली, गुणधर्म यांची सरमिसळ असणारे प्रत्येक क्षणाचे ते परिपूर्ण चित्र असते. आपल्या उजव्या मनाला वर्तान क्षणाशिवाय दुसरा कोणताच काळ ठाऊक नसतो. उजव्या मनासाठी प्रत्येक क्षण विविध संवेदनांनी ओतप्रोत भरलेला असतो. आनंदाचा अनुभवसुद्धा त्या वर्तान क्षणातच नांदत असतो. आपल्यापेक्षा विशाल असणाऱ्या कशाशी तरी आपण जोडलेले आहोत याचा अनुभवसुद्धा वर्त नि क्षणातच येत असतो. आपल्या उजव्या मनासाठी आदि-अंतविरहित, समृद्ध असा वर्त नि क्षण म्हणजेच सर्व काही असते.
कोणतीही गोष्ट योग्य प्रकारे करण्यासाठी ने न दिलेली नियमांची आणि बंधनांची जी चौकट असते ती उजव्या मनासाठी जणु अस्तित्वातच नसते. त्या चौकटीबाहेर अंत:प्रेरणेने विचार करायला हे मन मुक्त असते. प्रत्येक नव्या क्षणासोबत येणाऱ्या शक्यतांचा हे उजवे मन सर्जनशीलपणे वेध घेते. कोणत्याही अडथळ्याशिवाय, न्यायनिवाड्याशिवाय आपल्यातल्या कलात्मक प्रवाहांना मुक्तपणे हे मन वाहू देते.
उजव्या मनासाठी वर्त न क्षण म्हणजे जणु प्रत्येक जण, प्रत्येक वस्तू एकात्मिकपणे एकमेकांशी जोडलेले असण्याची वेळ असते. मानवजात नामक एका व्यापक कुटुंबाचे आपण सर्व सदस्य असल्याप्रमाणे उजवे मन सर्वांना समान लेखते. विशातल्या या सुंदर ग्रहावर माणसाचे जीवन टिकून राहण्यासाठी माणसामाणसांतल्या नात्याची या मनाला जाणीव असते. सर्व माणसां धली सामाईकता हे मन ओळखून असते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी कशी जोडलेली असते आणि आपण सर्व जण एकत्र येऊन कसे एक पूर्णत्व आकारलेले असते याचे एक विशाल रेखाटन या मनाला दिसत असते. दुसऱ्याविषयी सहानुभाव वाटण्याची, त्याच्या भूमिकेत शिरून त्याच्या भावना जाणण्याची क्षमता आपल्या मेंदूच्या उजवीकडच्या कॉर्टेक्सच्या पुढच्या भागामुळे आपल्याला लाभलेली असते. यांच्या तुलनेत आपल्या मेंदूचा डावा अर्धगोल म्हणजे अगदी दुसरे टोक असते. माहितीवर संस्करण करण्याची त्याची तहासुद्धा संपूर्णपणे वेगळी असते. उजव्या अर्धगोलाने निर्माण केलेल्या प्रत्येक समग्र, संपन्न क्षणाला कालक्रमानुसार एकत्र गुंफण्याचे काम डावा अर्धगोल करतो. हा क्षण ज्या तपशिलांनी बनलेला आहे त्याची तुलना क्रमाने आधीच्या क्षणातल्या तपशिलांशी तो करतो. सलगपणे, पद्धतशीरपणे त्या तपशिलांची जुळणी करून आपला डावा अर्धगोल वेळ किंवा काळ ही संकल्पना तयार करतो. त्यामुळेच भूतकाळ, वर्त निकाळ, भविष्यकाळ अशी त्या क्षणांची विभागणी आपण करत असतो. अशा कालदर्शक रचने ळे कोणती गोष्ट कशाच्या आधी घडायला हवी हे आपण ठरवू शकतो. म्हणजे आपल्या बूट आणि मोज्यांकडे पाहिले तर बूट घालण्याआधी मोजे घालायला हवेत हे ठरवायला आपला डावा अर्धगोल मदत करतो. कोणत्याही कृतीचे निगामी पद्धतीने (deductive method) तो आकलन करून घेत असतो. म्हणजे अ हा ब पेक्षा मोठा आहे, ब हा क पेक्षा मोठा आहे. म्हणून अ हा क पेक्षा मोठा आहे असे निगामी तर्कशास्त्र आपला डावा अर्धगोल वापरत असतो.’ मानवी मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांच्या वेगवेगळ्या कार्यपद्धतीबाबत डॉ. जिल टेलर यांना प्रत्यक्ष आलेल्या अनुभवाचे चित्रा बेडेकर यांनी केलेले आणखी वर्णन आपण पढील लेखात पाह.
ऊर्जेचे गतिशास्त्र
मानवी मेंदच्या निओ कॉर्टेक्स नावाच्या वरच्या आवरणातील डावे व उजवे अर्धगोल कशाप्रकारे काम करतात, हे डॉ. जिल टेलर या प्रसिद्ध अमेरिकन मेंदूरचना-शास्त्रज्ञाने तिला स्वत:ला तरुण वयात जेव्हा पॅरॅलिसीसचा झटका आला. त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवले व तिच्या अनुभवांचे कथन चित्रा बेडेकर यांनी ‘मेंदच्या अंतरंगात’ या पुस्तकात अतिशय समर्पक भाषेत सामान्य वाचकांना समजणाऱ्या पद्धतीने केले आहे. वैज्ञानिकांसाठी असा प्रत्यक्ष अनुभव अत्यंत दुर्मिळ असतो. मेंदूतील असंख्य मज्जातंतूच्या क्लिष्ट जाळ्याची रचना समजून घेणे व बाहेरून ज्ञानेंद्रियांार्फत ग्रहण केलेल्या माहितीवर प्रक्रिया होत असताना मेंदूतील हे मज्जातंतूंचे वेगवेगळे सर्किटस् कशाप्रकारे उद्दीपित होतात, याचे निरीक्षण व परीक्षण दुसऱ्या व्यक्तींवर प्रयोग करून शास्त्रज्ञांकडून केले जाते. परंतु मेंदूच्या एका भागात बिघाड झाल्यावर दुसरा भाग कार्यरत असताना ने का कसा अनुभव येतो, हे डॉ. जिल टेलर यांना स्वत:च्या आजारपणात अनुभवता आले व आपल्या शास्त्रीय माहितीचा प्रत्यक्ष अनुभवासोबत पडताळा घेऊन त्यांनी मेंदूच्या डाव्या व उजव्या अर्धगोलांची कार्यपद्धती जगाला विशद केली. त्या अगदी भिन्न-भिन्न कार्यपद्धती चित्रा बेडेकर यांच्याच शब्दांत मागील लेखांकापासून आपण वाचत आहोत. कोणत्याही घटनेचे डावा अर्धगोल सुट्या-सुट्या तुकड्यांद्वारे भूतकाळाशी त्या घटनेला जोडून विश्लेषण करतो व याउलट उजवा अर्धगोल मात्र समग्रपणे केवळ वर्तानात व सर्व विशाशी जुळवून ती घटना समजून घेतो, असा मूलभूत फरक आपण पाहिला. त्या संदर्भात चित्रा बेडेकर पुढे लिहितात,
‘दोन अर्धगोलांध्ये दडलेल्या आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या दोन भिन्न प्रवृत्ती कोणत्याही गोष्टींचा भिन्न प्रकारे विचार करतात, भावनांवर वेगवेगळ्या प्रकारे संस्करण करतात आणि आपल्या शरीरावरसुद्धा वेगळ्या प्रकारचे परिणाम घडवून आणतात. डाव्या आणि उजव्या अर्धगोलांळे दिसून येणाऱ्या प्रवृत्तींचा ढोबळमानाने आढावा घेतला तरी त्यांच्यातला फरक प्रकर्षाने जाणवतो. ‘आपल्या मेंदच्या उजव्या अर्धगोलाला जगाची पर्वा नसते. तो फक्त वर्तान क्षणाचाच विचार करतो. म्हणून उजव्या मनाची प्रवृत्ती आनंदी, उत्साही, स्नेहमय असते. उजवे मन कृतज्ञतेने भरलेले असते. ते मन समाधानी, दयाळ, संर्वधन जोपासणारे आणि चिरंतन आशावादी असते. तुलना करणे, न्यायनिवाडा करणे ही त्याची प्रवृत्ती नसते. उजव्या मनासाठी सर्व काही सलग, अखंड, एकमेकांपासून वेगळे न करता येण्याजोगे असते, त्यामुळे उजवे मन सर्व काही, सर्वजण यांना समान लेखते.
‘उजव्या मनाची प्रवृत्ती धाडसी, समृद्धीची स्तुती करणारी, सामाजिकरीत्या जुळवून घेणारी असते. ते मन शब्दांपलीकडच्या संवादाला अतिशय संवेदनशील असते, सहानुभाव बाळगणारे असते, दुसऱ्यांच्या भावना बिनचूक ओळखणारे असते. आपण ज्याला दैवी शक्ती, अंत:प्रेरणा किंवा सर्वोच्च जाणीव म्हणतो त्याचे अधिष्ठान आपल्या उजव्या मनात असते. नेहमीच्या चौकटीच्या आणि बंधनांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची उजव्या मनाची प्रवृत्ती असते. त्यामुळे वर्तान क्षणातल्या सर्व शक्यता पडताळून नवा दृष्टिकोन बाळगण्याची त्या मनाची वृत्ती असते. उजवे मन अतिशय सर्जनशील असते आणि गोंधळ ही सर्जनशीलतेची पहिली पायरी असते याचा ते मन स्वीकार करते. ते अतिशय चपळ, चंचल असते. शरीरातल्या पेशींकडून येणाऱ्या सूक्ष्म संदेशांना, सूक्ष्मातिसूक्ष्म सूचनांना उजवे मन अतिशय संवेदनशील असते. अनुभवातून आणि स्पर्शातून ते मन सतत काहीतरी शिकत असते. ‘उजव्या मनाला भूतकाळाचे ओझे बाळगण्याची गरज नसते आणि भविष्यात काय घडेल याची चिंता नसते. त्यामुळे वर्त नि क्षणातले स्वातंत्र्य ते मन साजरे करते. आपल्या केवळ शरीराचेच नव्हे तर मनाचेसुद्धा स्वास्थ्य सांभाळण्याची जबाबदारी उजव्या मनावर सोपवलेली असते. उजवे मन सृष्टीतल्या सर्व गोष्टींत,प्राणिमात्रांत समानता शोधत असते. माणुसकीला ते मन सर्वाधिक मौल्यवान मानते.
या तुलनेत मेंदूच्या डाव्या अर्धगोलाच्या प्रवृत्तीत खूपच फरक असतो. आपले डावे मन बारीकसारीक तपशिलांनी ओतप्रोत भरलेले असते आणि आयुष्याला घड्याळाच्या काट्यावर चालवणारे असते. माणसाच्या एकूण प्रवृत्तीची गंभीर बाजू या डाव्या मनाकडे सोपवलेली असते. भूतकाळ लक्षात घेऊन वर्त नि क्षणात निर्णय घेणारे ते मन असते. वेगळेपणाच्या, भिन्नतेच्या काटेकोर मर्यादा सदैव लक्षात घेत चांगले/वाईट, बरोबर/चूक या संदर्भात निवाडा करत असते. वर्तान क्षणाची उजव्या मनाने जमवलेली सर्व माहिती आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन डावे मन त्या माहितीला व्यवस्थित हाताळण्याजोग्या पद्धतीने रचून ठेवते. ‘भाषा हे डाव्या मनाचे विचार करण्याचे माध्यम असते आणि खुद्द डावे मन हे माणसाचे बाहेरच्या जगाशी संवाद साधण्याचे माध्यम असते. सतत चालणाऱ्या आत्मसंवादातून आपण इतर जगापेक्षा अलग आहोत याचे भान आपल्यामध्ये डावे मन सदैव जागृत ठेवत असते. आपल्याकडे येत राहणाऱ्या माहितीचे उत्तम व्यवस्थापन करण्याची आणि चिकित्सकपणे त्या माहितीचे काटेकोर विश्लेषण करण्याची प्रचंड क्षमता डाव्या मनाकडे असते. ते मन पूर्णतावादी (पर्फेक्शनिस्ट) असते.
एकाच वेळी अनेक कामे करण्याची विलक्षण हातोटी डाव्या मनाकडे असते. क्रमवारीने विचार करण्यात वाकबगार असल्यामुळे प्रत्यक्ष जबाबदाऱ्या हाताळण्याचे त्या मनाचे कौशल्य वाखाणण्याजोगे असते. वेगवेगळी न्यूरोसर्किट्स ओळखण्याची निसर्गदत्त देणगी डाव्या मनाला लाभलेली असते. अशा न्यूरोसर्किट्सच्या मदतीने प्रचंड माहितीचा क्षणार्धात फडशा पाडण्याचे कसब त्या मनाकडे असते.
‘डाच्या मनाकडे आणखी एक अजब गुण असतो. बाहेरच्या जगाकडून अव्याहत येत असलेल्या माहितीचा अर्थ लावण्यासाठी त्या माहितीला सूत्ररूपात गुंफण्याचे किंवा त्यातून कथासूत्र रचण्याचे चातुर्य त्या मनाकडे असते. पण प्रत्यक्ष मिळणाऱ्या माहितीत जर कुठे त्रुटी असतील तर स्वत:च त्या त्रुटी भरून काढण्याची चलाखी डाव्या मनाकडे असते. बे लू कथानक रचून तेच सत्य म्हणून पुढे रेटण्याची विलक्षण हातोटी या मनाकडे असते. त्यामुळे आपल्याला खरे किती ठाऊक आहे आणि ‘आपल्याला ठाऊक आहे’ असे आपल्याला किती वाटते या दोन्हीत प्रचंड तफावत असू शकते.’
ह्या पंचेंद्रियांच्या पलीकडे असणारे एक सहावे इंद्रिय म्हणजे आपल्या मेंदूचा उजवा अर्धगोल. त्याचा पुरेपूर अनुभव जिलने स्ट्रोकनंतर सात-साडेसात वर्षे घेतल्यामुळे ऊर्जेचे गतिशास्त्र (एनर्जी डायनॅमिक्स) आणि अंत:स्फूर्ती याविषयी ती स्वानुभव सांगते. जिलच्या म्हणण्यानुसार आपण सर्व जण ऊर्जायुक्त सजीव आहोत. विशातल्या ऊर्जेचे आकलन करून तिचे न्यूरॉन्सच्या सांकेतिक लिपीत रूपांतर करण्यासाठी आपल्या मेंदची रचना झाली आहे. आपल्या पंचेद्रियां उर्फत ऊर्जेचे आकलन करून घेण्याच्या कामात डाव्या अर्धगोलाची मर्यादा आडवी येते. परंतु अंत:स्फूर्तीने सूक्ष्मातल्या सूक्ष्म ऊर्जेचे गतिशास्त्र आकलन करून घेण्यासाठी उजव्या अर्धगोलाची रचना झाली आहे. स्ट्रोकच्या अनुभवानंतर आपल्या अंत:प्रेरणेचा पुरेपूर वापर जिल करत असते.’ डॉ. जिल टेलर यांच्या मते दुसऱ्याच्या जखमेवर हात ठेवून आपण ध्यानधारणा करून ती जखम बरी व्हायला मदत करू शकतो. रेकी, फेंगशुई ह्यांसारख्या पद्धतींमध्ये ऊर्जेच्या गतिशास्त्राचे विज्ञान दडले असावे, असे त्याचे मत दिसते. अंत:प्रेरणेने ऊर्जेच्या गतिशास्त्राचे कसे आकलन आणि उपयोग करायचा याची आपल्या उजव्या मनाला संपूर्ण स्पष्टता असते असा डॉ. जिल टेलर यांचा ठाम विशास आहे. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या हे पचनी पडणे कठीण आहे, अशी स्वत:ची वेगळी टीप चित्रा बेडेकर यांनी पुस्तकाच्या अखेरच्या भागात जोडली आहे.
परपीडक ईशर ?
या विशाची निर्मिती का व कशासाठी झाली, या प्रश्नांचा वेध विज्ञान घेत नाही. हे विश कसे निर्माण झाले व त्यातील पदार्थांच्या/ऊर्जेच्या विशिष्ट स्थिती व हालचाली ह्यां गे कोणते नियम/सूत्र दडले असतात, हे शोधण्याचे कार्य विज्ञान करते. प्रत्येक शास्त्राने स्वत:भोवती एक मर्यादा आखून घेतली असते आणि त्या मर्यादळेच संशोधनात शिस्त बाळगून नेक्या दिशेने वाटचाल करता येते. असे असले तरी आपापल्या विषयातील काही गूढ समस्यांची उकल होण्यासाठी इतर विषयांच्या सहाय्याने संशोधन करणे भाग पडते. जसे पदार्थ विज्ञान व रसायनशास्त्र यांना एकमेकांच्या व गणिताच्याही मदतीची गरज नित्य भासते. त्याचप्रमाणे जीवशास्त्राला (Biology) देखील पदार्थविज्ञान (फिजिक्स) व रसायनशास्त्राची (केमिस्ट्री) मदत घेतल्याशिवाय पुढचे पाऊल टाकता येत नाही. सृष्टीचे अधिक गुंतागुंतीचे व्यवहार शोधण्यासाठी नवनव्या विज्ञानशाखा देखील उघडण्यात आल्या आहेत.
विशाची निर्मिती का व कशासाठी झाली? आमच्या जीवनाचे प्रयोजन काय ? ह्यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या शास्त्राला तत्त्वज्ञान म्हणतात. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात धार्मिक विचारांचा जो शिरकाव आहे, त्याला तूर्त बाजूला ठेवून आपण या विशाच्या व जीवनाच्या प्रयोजनाबाबत केवळ दोन परस्पर-विरुद्ध प्रवाह जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ते दोन मतप्रवाह भौतिकवाद व अध्यात्मवाद या नावांनी ओळखले जातात. या दोन्ही विचारसरणींना पुन्हा अनेकानेक शाखाही फुटलेल्या आहेत. त्यांपैकी आपल्या बुद्धीला व अंत:करणाला काही अंशी समाधान प्राप्त करून देणाऱ्या शाखां धील उत्तम व उन्नत अंश एकत्रित करून आपण प्रथम भौतिकवादी तत्त्वज्ञानाचा विचार करू. भौतिकवाद असे मानतो की या सृष्टीच्या मुळाशी कोणतीही चैतन्यमय, ज्ञानयुक्त शक्ती नसून केवळ जड पदार्थ/ऊर्जा आहे. प्राण, मन, बुद्धी हे तत्त्व जडातूनच विकसित झाले असून पदार्थ य भौतिक देहाच्या बाहेर त्यांचे वेगळे अस्तित्व नाही. त्याचप्रमाणे या सृष्टीत ईशराचे अथवा आत्म्याचे तर मुळीच अस्तित्व नाही. मृत्यूनंतर सर्व प्राण्यांचे अस्तित्व संपते; पुनर्जन्माच्या कल्पनेला कोणताही आधार नाही. सृष्टीचे संचालन तिच्या पदार्थांच्या अंगभूत गतितत्त्वांनी व नियमांनी होत असते. बाहेरून सृष्टीचे नियमन वा विकास करणारी शक्ती कोणतीही नाही. जड पदार्थातून पृथ्वीवर जीवन उगवले, ते पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या विशिष्ट अंतरामुळे व येथील वातावरणामुळे. तसेच प्रतिकूल पर्यावरणाशी झुंजत झुंजत येथे प्राण्यांचे अनेकानेक प्रकारचे देह घडत गेले व स्वाभाविकपणे त्यापैकी काही प्राणि जातींमध्ये मनाचा व बुद्धीचा विकास होत गेला. मनाशी व बुद्धीशी संबंधित प्रक्रिया मेंदूध्ये घडत असतात. मानवाचा मेंदू सर्वांत मोठा असल्यामुळे त्याला इतर प्राण्यांच्या तुलनेत भावभावना, कल्पकता व बुद्धी अधिक आहे. मनुष्येतर प्राण्यांना त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचे भान नसते. त्यांच्या सर्व प्रेरणा उपजत व नैसर्गिक असतात. त्यामुळे ते सर्व प्राणी निसर्गाचाच एक अभिन्न भाग असल्यासारखे जगतात, त्यांच्यात व बाह्य सृष्टीत आंतरिक एकत्व असते. परंतु मानवामध्ये मन-बुद्धीच्या विकासाने एक वेगळाच टप्पा गाठला. मी व बाह्य जग या वेगवेगळ्या वस्तू आहेत, असे भान मानवाला त्याच्या आदिम अवस्थेपासून प्रकर्षाने आले. बाह्य जग सुंदर, कृपाळू आहे तसेच ते प्रसंगी हिंस्र व क्रूरही वागत असल्याचा नित्य अनुभव मानवाला येतो. आईच्या गर्भात एकत्वाची अनुभूती घेत पहुडलेले बालक जसे बाहेर येताच असुरक्षित वाटून भयभीत होते, तसे काहीसे निसर्गापासून तुटल्याच्या जाणिवेने मानवाचे झाले. त्याला हे वेगळेपण नकोसे वाटते. त्यामुळे तो एका विशव्यापी ईशराची कल्पना करून त्याच्याशी तादात्म्य साधू पाहतो. आपल्या एकाकीपणावर व दुर्बलतेवर मात करण्यासाठी त्या काल्पनिक विशेशराची भक्ती हा चांगला उपाय त्याला वाटतो. शिवाय वादळवारे, अतिवृष्टी, वणवे, भूकंप, ज्वालामुखींचे स्फोट, पूर यांसारखे निसर्गाचे रौद्र रूप आणि इंद्रियांना सुखावणारे लोभस रूप अशी दोन्ही रूपे न्याहाळताना प्रत्येक प्राकृतिक शक्तीचे नियंत्रण करणारी एखादी देवता असावी व त्या देवतेचा रोष झाल्याने नैसर्गिक संकटे येत असावी, अशीही आदि-मानवाची समजूत झाली. त्यामुळे मरुत्, वरुण, सूर्य, अग्नी, इंद्र अशा देवता विविध नैसर्गिक शक्तींच्या कारक असल्याचे कल्पून यज्ञासारख्या विधीने त्या देवतांना आवाहन करणे व आपल्याला प्रिय असलेल्या वस्तूंची आहुती देऊन त्या देवतांना प्रसन्न करून घेणे, अशांसारखे उपाय मनुष्य करू लागला.
ईशराचे अथवा देवतांचे अस्तित्व कल्पून त्यांची पूजा करणे, भक्ती करणे ही मानवी मनाची वरील कारणांळे गरज होती. प्रतिकूल सृष्टीत जिवंत राहण्यासाठी या कल्पनेने त्याला भक्कम आधार दिला. या सृष्टीत शोशत असे काही असेल तर ती केवळ भौतिक पदार्थ य ऊर्जा होय. जीवन अशोशत असते. जीवनापूर्वी व मृत्यूनंतर प्राण्यांचे कोणतेही अस्तित्व नसते. आत्मा-परमात्मा नावाची कोणतीही वस्तू व शक्ती नाही. सृष्टीचा कोणी निर्माता नाही. असा कोणी निर्माता असता तर ब्रह्मांडात व पृथ्वीवरसुद्धा जी अतिशय उधळमाधळ आढळून येते तशी ती राहिली नसती. उत्क्रान्ती ही एका सरळ रेषेत व्यवस्थितपणे आखीव स्वरूपात झाली असती. पृथ्वीवरची निसर्गाची एकूण उत्क्रान्ती ही झोकांड्या खात, चाचपडत, धडपडत, चुकतमाकत, आंधळ्याने वाट शोधावी तशी झालेली दिसते. ईशराला जीवनाचा विकास जर सृष्टीत करावयाचा होता, तर हे करोडो-करोडो ग्रह-तारे, बहुतांश जीवरहितच दिसतात. आपल्या सूर्य आलेत तर फक्त पृथ्वीवरच जीवन उमलल्याचे दिसते. शिवाय जीवन कष्टमय, यातनादायी आहे. भोवतालचे पर्यावरण हे जीवनास पोषक कमी व मारकच जास्त आहे. शिवाय क्रौर्य, हिंसा, दुष्टावा, मत्सर, दारिद्र्य, शोषण – या बाबी ईशराने का निर्माण कराव्या ? तो परपीडनात आनंद घेणारा sadist आहे काय ?
ईशर, आत्मा, परमात्मा, देवदेवता यांच्या असण्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. भ्रामक शक्तींवर विशास ठेवून मनुष्य हतबल व परावलंबी होतो. जी शक्ती अस्तित्वातच नाही, ती आपले सहाय्य कशी करणार? कोणत्याही अतिभौतिक शक्तीच्या असण्यावर विशास ठेवणे व आपल्या समस्या सोडविण्यासाठी अशा शक्तीच्या सहाय्याची याचना करणे म्हणजे अंधश्रद्धेपायी आत्मवंचना करून स्वसामर्थ्य गमावून बसणे होय.
१२, विनोद, स्टेट बँक कॉलोनी, कॅम्प, अमरावती.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.