मानसशास्त्राच्या चौकटीतून

बाल-लैंगिक अत्याचार हे गुन्हे ‘आत्यंतिक गंभीर गुन्हा’ या प्रकारात मोडतात. अत्याचाराला बळी पडलेल्या बालकांसाठी हा संपूर्ण उद्ध्वस्त करणारा आणि खोलवर परिणाम करणारा अनुभव असतो. या विषयावरचे काही अभ्यास उपलब्ध आहेत, परंतु, विविध कारणांनी अश्या प्रकारच्या घटनांची गुन्हा म्हणून कागदोपत्री नोंद होण्याचे प्रमाण मात्र खूपच कमी आहे. बालकांशी कुणी या प्रकारे वागावेच का, त्यामागची कारणे काय असतात, तसेच बालमानसावर अश्या घटनांचे नेके कोणते परिणाम होतात याचा शोध घेणे एकूणात जरा कठीणच जाते. अत्याचाराच्या घटना घृणास्पद/लांछनास्पद आणि म्हणून त्याबाबत गुप्तता राखावी असा समज सामान्य लोकांध्ये असतो त्यामुळे अशा घटना नोंदवल्याच जात नाहीत. अत्याचाराला बळी पडलेल्या बालकांकडून गुन्ह्याचे वेगवेगळे कंगोरे समजणे अनेकदा सोपे नसते.
मुलांना त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतील असे विश्वासाचे, सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आपण बऱ्याचदा कमी पडतो. शिवाय लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील गुन्हेगार व्यक्ती, एरवी गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या अशा विशिष्ट गटातील नसतात; तर चारचौघांसारख्या आणि सर्व प्रकारच्या सामाजिक आर्थिक स्तरातल्या किंवा शिक्षण, जात, वगैरेंची कोणतीही पोर्शभूी असलेल्या असतात. होम्स आणि होम्स यांनी २००२ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार गुन्हेगार आणि त्यांच्या मानसिकतेचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. १. प्रासंगिकः विशिष्ट परिस्थितीत लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्ती. * मानसिक दृष्टीने पिछेहाट झालेल्या व्यक्ती (Regressed): या व्यक्तींची सामान्यपणे लहान मुलांसोबत लैंगिक संबंध करण्याची कल्पना नसते. परंतु अनावर मानसिक तणावाखाली त्यांच्या वागणुकीत वासना शमवण्यासाठी लहान मुलांचा उपयोग करण्याची विकृती डोकावते.
* अनैतिक विकृत व्यक्ती (Morally Indiscriminate): गुन्हेगारी वृत्ती असलेल्या ह्या व्यक्ती एकंदरीने जीवनात भरकटलेल्या असतात. वासनापूर्तीसाठी शक्य ते इतरही लैंगिक गुन्हे करण्याची त्यांच्याबाबतीत शक्यता असते.
* भोळसट व मानसिकदृष्टया विकलांग व्यक्ती (Naive/Inadequate): योग्यायोग्य मानसिक संदर्भ हरवलेल्या या व्यक्तींना लहान मुलांकडून फारसा धोका नाही असे वाटते त्यामुळे त्याच्याकडून असे गैरवर्तन घडते. २. प्राधान्याने लहान मुलांकडूनच लैंगिक सुख मिळवण्यात आनंद मानण्याची विकृती असलेल्या व्यक्ती. (Paedofiles)
* Mysoped – ह्या प्रकारच्या गुन्हेगार व्यक्ती हिंसक मनोवृत्तीच्या, दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद मानणाऱ्या असतात. परिसरातील बालकांच्या ऐवजी त्या अनोळखी बालकांना सावज करतात.
* Fixated – ह्या प्रकारच्या व्यक्तींचे वागणे वयाला साजेसे नसते. वयाप्रमाणे येणारी विचारांत परिपक्वता नसते किंवा बालिशपणे वागतात. लैंगिक अत्याचार सहसा क्षणिक ऊमीत किंवा उन्मादात घडत नाहीत. गुन्हेगार व्यक्ती बालकांच्या परिचयातील असतात. आणि ओळखीचा चतुराईने उपयोग करून बालक जाळ्यात येईल अशी परिस्थिती निर्माण करतात. या व्यक्ती मित्रत्वाच्या आणि खेळीमेळीच्या वागण्याने बालकांशी विशासाचे नाते प्रस्थापित करतात. बालकाच्या जवळच्या नातेवाईकांध्ये सभ्य, चांगली व्यक्ती अशी स्वतःची छाप पाडतात. योजनाबद्ध रीतीने आणि सोयीस्कर नातेसंबंध निर्माण करून काही काळानंतर बालकावर लैंगिक अत्याचार करतात. गुन्हेगार व्यक्ती बालकाबरोबर इतके दाट संबंध निर्माण करते की अत्याचाराची शिकार झालेले बालक घटनेला आपण स्वतःच जबाबदार आहोत असे समजू लागते. गुन्हा केल्यानंतर, बालकाने झाल्या प्रकारची वाच्यता करू नये म्हणून त्याला धमकी देतात. किंवा त्यालाच दोषी ठरवतात. दबावतंत्राचा वापर करून पीडित बालकाचे तोंड गप्प करणे हाही त्यांच्या गुन्ह्याचाच भाग असतो. गुन्हेगार व्यक्तींचे वरील प्रकार लक्षात घेता अत्याचाराच्या घटना घडण्याला कारणीभूत होणारे घटक हा गुन्हेगाराची मानसिकता आणि भोवतालची परिस्थिती यांचा एकत्रित परिणाम असतो असे दिसून येईल. अतिरिक्त आणि विकृत लैंगिक आवडी असलेल्या गुन्हेगार व्यक्ती लहान किंवा पौगंडावस्थेतील मुलांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होतात. त्यांच्याबरोबर अकारण जास्त वेळ काढतात किंवा काहीवेळा त्याहीपुढे जाऊन अश्लील चाळे/शारीरिक जवळीक करतात. समाजविरोधी वर्तन करण्याकडे कल – कायदा तोडणे, इतरांचा गैरफायदा घेणे यात काही वावगे आहे असे त्यांना अजिबात वाटत नाही. स्वतःच्या मौजमजेसाठी मुलांना वापरताना आपण काही चुकीचे करत आहोत याची त्यांना माहिती असूनही जाणीव नसते. इतरांच्या भावना समजून घेणे, त्यांची कदर करणे यापेक्षा आपल्या मनाला जे हवे असेल ते ओरबाडून घेण्याची त्यांची बेपर्वा वृत्ती असते. इतर अनेक गुन्हेगार व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तींचा भूतकाळ काळवंडलेला असू शकतो. बालवयात वा प्रौढ वयात लैंगिक अत्याचाराला बळी पडण्याचा, इतरांकडून दुर्लक्षित राहण्याचा, तसेच अपमानास्पद वागणूक मिळण्याचा पूर्वेतिहास असलेल्या व्यक्तींध्ये नकारात्मक भावना बळावतात. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा अशा सर्वस्वी गैर आणि हिंस्र पद्धतीने, निष्पाप बालकावर सूड उगवण्याचा विचार त्यांच्या मनात तरळू लागतो. तशात आसपासच्या लोकांकडून, परिस्थितीकडून कोणतेही नियंत्रण नसल्याचे त्यांच्या ध्यानात येते. बालक व नातेवाईकांच्या हालचालींचे निरीक्षण करून हे गुन्हेगार त्यांचा विशास संपादन करतात. आणि अश्या पद्धतीने खेळी रचतात की गुन्हा करण्याची व त्यातून सहीसलामत सुटण्याची संधी त्यांना आपसूक मिळते. गुन्हेगार व्यक्ती अत्याचारपीडित बालकापेक्षा वयाने, शक्तीने मोठी असते. त्यामुळे बालक अनेकदा त्यांचा प्रतिकार करू शकत नाही. लहान मुलांना वासनेची शिकार बनवणाऱ्या व्यक्तीला मूल घडल्या प्रसंगाची कुठे वाच्यता करणार नाही, याची खात्री असते. त्यातून तो/ती काही कुणाशी बोललेच तर त्यांच्यावर कोणी विशास ठेवणार नाही; आणि जरी विशास ठेवला तरी विरोधी कृती तर कुणी करणारच नाही, अगदी एखाद्या ठिकाणी कोणी विरोधी कृती केलीच तर सुटण्यासाठी कायद्यातल्या अनेक पळवाटा तर आहेतच असा संपूर्ण विचार अनेकदा या गुन्हेगारांनी केलेला असतो. बाल-लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील गुन्हेगार व्यक्ती वागण्याचे समर्थन करण्यासाठी पुढीलप्रमाणे बचावात्मक भूमिका घेतात. १) नकार – पुरावा नाकारणे आणि गुन्हा केल्याचे कबूल न करणे. २) तर्कसंगत समर्थन – पीडित व्यक्तीला, लोकांना, परिस्थितीला दोष देऊन त्यांच्यामुळे असे कृत्य करायला भाग पडले असे भासवणे. उदा. मी खूप दारू प्यायली होती आणि नशेत काय घडले ते मला माहीत नाही. किंवा बालकानेच तसा पुढाकार घेतला, माझी काहीच चूक नव्हती, इत्यादी. ३) घटनेचे गांभीर्य कमी करणे – अपराधी व्यक्ती गुन्हा केल्याचे कबूल करते, पण पीडित व्यक्तीला झालेला त्रास किंवा घडलेल्या घटनेत तसे गंभीर काही आहे हे मान्य करत नाही. सहज चेष्टेत, मस्करीत केले असे म्हणते.
अपराधी व्यक्तींवर मानसोपचार करताना त्यांच्या असाधारण लैंगिक स्वारस्यात बदल घडवणे, गुन्ह्याचे समर्थन करण्याच्या मानसिकतेत, वर्तनात सुधारणा करणे आणि पीडित बालकाची व्यथा समजून घेण्यासाठी सहानुभूतीची जाणीव त्यांच्या मनात जागी करणे यावर भर दिला जातो.
लैंगिक अत्याचाराचे बालकांवर होणारे मानसिक परिणामः
लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सर्व वयोगटातील बालकांवर अशा घटनांचे अत्यंत भयंकर मानसिक परिणाम होतात. मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या, मानसिक व वर्तनविषयक समस्या त्यांच्यात उद्भवतात. त्या कधी तात्कालिक स्वरूपाच्या असतात, तर काही ठिकाणी दीर्घकाळपर्यंत या घटनांच्या आठवणींच्या ओझ्याखाली मुलाच्या जीवनातली अत्यंत आनंदाची, शिक्षणाची वर्षे वाया जातात. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार बालकांना भिन्नलिंगी व्यक्तींविषयी किंवा इतर लैंगिक विषयांसंदर्भात भीती किंवा तिरस्कार निर्माण होऊ शकतो. अत्याचाराची घटना घडल्यानंतर किमान २ वर्षांपर्यंत बालकावर अशा घटनांचे परिणाम जाणवत राहतात. या परिणामांची तीव्रता गुन्ह्याच्या वेळची परिस्थिती आणि त्या वेळचा बालकाच्या वाढीचा, विकासाचा टप्पा यावर अवलंबून असते. काही बालकांध्ये अंगठा चोखणे,अंथरूण ओले करणे यासारख्या लहानपणच्या सवयी कुमारवयात पुन्हा उचल खातात. झोपेतून दचकून जागे होणे, भूक न लागणे, शाळेत, अभ्यासात मागे पडणे, घेपणाने वागणे, नातेवाईक-मित्रमैत्रिणींशी संभाषण टाळणे अश्या वर्तनसमस्या निर्माण होऊ शकतात. संवेदनशील मुलामुलींना या परिणामांचा त्रास अनेक वर्षांनंतर अगदी प्रौढवयातही जाणवू शकतो. उदा. नैराश्याचे झटके येणे, सततची चिंता, अशांत झोप, दारू आणि अमली पदार्थांचे व्यसन, भयगंड, झोपेत व्यत्यय, अचानक छातीत धडधडणे, धाप लागणे इत्यादी मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अत्याचाराचे बळी ठरलेल्या अनेक जणांना पुढे जोडीदाराशी नातेसंबंध विकसित करताना तसेच लैंगिक संबंध अनुभवतानाही या तणावामुळे अडचणी येतात. काही मुले घडलेल्या घटनेचा तसा फारसा ताण जाणवत नाही असे सांगतात, परंतु अनेकदा तसे प्रत्यक्षात नसते. ही बालके एकतर त्यांच्या भावना व्यक्त करायला घाबरतात किंवा परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत या भावना नाकारतात. अश्या काही बालकांना तातडीने नाही तरी भविष्यात गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यांपैकी काही मुलांना ज्याला मानसशास्त्रीय परिभाषेत ‘स्लीपर इफेक्ट’म्हणतात, म्हणजे भीती, चिंता यांसारख्या भावना त्यांच्या अंतर्मनात सुप्तावस्थेत राहतात व कालांतराने उग्र रूप धारण करतात; अश्या मानसिक समस्येला तोंड द्यावे लागते. विशासातल्या प्रौढ व्यक्तीला अत्याचाराबद्दल सांगता येणे ही या आघाताची तीव्रता काहीशी कमी करणारी बाब आहे. आपल्या सांगण्यावर विशास ठेवला जाईल अशा खात्रीचे, प्रोचे प्रौढ माणूस ज्या बालकांच्या जीवनात असते त्यांना वर उल्लेखलेले सर्व परिणाम तुलनेने कमी जाणवतात. कुटुंबाचा आणि इतर जवळच्या नातेवाईकांचा आधार, स्वतःवरचा ठाम विशास ह्या गोष्टी आघातातून सावरायला मोलाची मदत करतात. असे विशासाचे नाते बालकाच्या मनात दृढ करणे, त्याचे भावनिक उन्नयन करणे आणि नेहमीचे जीवन पूर्ववत जगण्यासाठीची हिम्मत त्याच्या ठायी विकसित होण्यास मदत करणे हेच आपल्याला साधायचे आहे. [मंजिरी दीक्षित दीनानाथ मंगेशकर इस्पितळात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ] [ वैशाली डोंगरे ह्या प्रयास या संस्थेच्या प्रयोगशाळेत कार्यरत आहेत.- संपर्कासाठी फोन : ०२०२५४४१२३० ]
इ-मेल : manjiridixit@hotmail.com फोन : ९८२२२६४८६३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.