विज्ञान-आश्रमाची कथा – लेखांक १

[पुणे जिल्ह्यातल्या पाबळ या गावामध्ये गेली तीस वर्षे विज्ञानाश्रम कार्यरत आहे. डॉ. श्रीनाथ कलबाग ह्यांनी भारतामधील एक नवीन शिक्षणप्रयोग येथे करून दाखवला. शिक्षणव्यवस्थेतून ग्रामीण विकास. आज विज्ञानाश्रमात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असणारे डॉ. योगेश कुलकर्णी यांच्याकडून आपण हा प्रयोग करण्यामागची विचारधारा जाणून घेऊ या. प्रयोग सुरू केल्यापासून आजपर्यंत त्यात कसकसा विकास होत गेला हे तपशिलात समजण्यासाठी पाच लेखांची मालिका द्यावी असा विचार आहे. त्यातील हा पहिला लेख.- संपादक]
डॉ. कलबागांनी १९८३ मध्ये चालू केलेल्या विज्ञानाश्रमाबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. काहींना वाटते, की ही नापासांची शाळा आहे, काहींना वाटते की हे लोक शाळांध्ये व्यावसायिक शिक्षण देण्याचा कार्यक्रम चालवतात, ग्रामीण भागात उपयुक्त तंत्रज्ञान शिकवतात, कमी खर्चात घरे बांधून देतात वगैरे. आणखी एक कल्पना अशीही आहे की विज्ञानाश्रमात काही कामे करून दिली जातात (कृत्रिम रेतन, फेब्रिकेशन, विजेच्या उपकरणांची दुरुस्ती) व त्याबद्दलचा मोबदलाही द्यावा लागतो. तर विज्ञानाश्रम म्हणजे नेके काय आहे, हे समजावून घेताना डॉ. कलबागांची त्यामागची कल्पना काय होती, याची पोर्शभूी आपण पाहू या.
हे काम चालू होण्यासाठी बऱ्याच घटना कारणीभूत ठरल्या असाव्यात. डॉ. कलबागांच्या लहानपणामध्येही याची काही कारणे असावीत. त्यांचे वडील केमिस्ट होते. ते घरी बरेच प्रयोग करत असत. ते पाहतपाहतच डॉ. कलबागांची जडणघडण झाली. इंजीनिअर झाल्यानंतर ते पीएच.डी. करायला अमेरिकेत गेले. त्या काळात तिथले शेतकरी कोणते तंत्रज्ञान वापरतात, त्यामुळे तेथे कशी प्रगती झाली आहे, याचे सखोल निरीक्षण त्यांनी केले होते. परत आल्यावर त्यांनी CFTRI (Central Food Technology Research Institute) मैसूर इथे काम केले, नंतर हिंदुस्तान लिव्हर या कंपनीत ‘इंजीनिअरिंग सायन्स’ विभागाचे मुख्य म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम बघितले. येथे नोकरी सुरू करतानाच त्यांनी मी आत्तापर्यंत २७ वर्षे ब्रह्मचर्याश्रमी होतो; आता पुढची २६ वर्षे गृहस्थाश्रम स्वीकारणार ; त्यानंतर ५३-५४ व्या वर्षी हे काम थांबवून वानप्रस्थाश्रम घेणार; म्हणजे माझ्याकडचे संचित समाजाला परत देणार. असे ठरवले होते, इतकेच नाही तर इतरांनाही सांगितले होते. अर्थात त्या वेळी त्या लोकांनी हे फारसे गांभीर्याने घेतलेले नसेलही. पण प्रत्यक्षात डॉ. कलबागांनी ५०-५१ व्या वर्षी नोकरी सोडायची आणि पुढे समाजासाठी काम करायचे या दृष्टीने पूर्वतयारी सुरू केली. हा काळ होता १९७८- ७९ चा. काम शिक्षणाबद्दलचे असणार होते. वंचितांसाठी असणार होते. पण नेके काय असावे हे ठरवण्याच्या दृष्टीने ते प्रथम ही भाभा सायन्स सेंटरबरोबर काम करू लागले. तिथल्या कार्यक्रमांच्या निमित्ताने शाळांध्ये काय चालते, ह्याचा अदमास घेऊ लागले. सेंटरचे संचालक श्री. वि. ग. कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांच्या चर्चा चालत. पुढे ते काही दिवस होशंगाबादला किशोरभारतीमध्येही जाऊन राहिले. तिथे शाळांध्ये प्रत्यक्ष अनुभवांधून विज्ञानशिक्षण कसे दिले जावे, याचे उपक्रम सुरू होते. आपल्या सभोवतालचे सेवा देणारे अनेक जण उदा. गवंडी , शेतकरी, गाड्या दुरुस्त करणारे तंत्रज्ञ, विक्रेते इ. अनुभवाच्या शाळेत शिकलेले असतात. त्यांनी कुठल्याही औपचारिक शाळेत शिक्षण घेतले नसले तरी त्यांच्याकडे अनेक कौशल्ये असतात; त्यांना गणित-व्यवहार अतिशय चांगला येत असतो. ते सर्व जण प्रत्यक्ष काम करत शिकलेले असतात. हाताने काम करताकरता शिकणे ही शिक्षणाची नैसर्गिक पद्धत आहे, हा डॉ.कलबागांचा विशास होता. लहान मूल याच पद्धतीने मातृभाषा शिकते. अशा शिक्षणाचे त्यांना ओझे होत नाही. शिकण्याची ही नैसर्गिक पद्धत इतकी परिणामकारक आहे, की ती अगदी शाळेत न गेलेल्यांना पण सहज शिकवू शकते. विविध शास्त्रे व अनेक महत्त्वाचे शोध लावणारे संशोधकही याच पद्धतीने शिकलेले होते. आपण आपल्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिकवले तर आपली लोकसंख्या ही आपली ताकद बनेल असा त्यांना विशारा वाटत होता.
भारत खेड्यात राहतो आणि शाळा मध्येच सोडणारी बहसंख्य मुले ग्रामीण भागात राहतात, त्यामुळे आपण आपले काम ग्रामीण विभागातच करायला हवे हेही ठरल्यासारखेच होते.
डॉ. कलबाग संशोधक होते. संशोधनाच्या पद्धतीनुसार कुठलाही प्रयोग हा प्रथम प्रयोगशाळेत केला जातो, तो यशस्वी झाला की मोठ्या प्रमाणावर करताना काही प्रश्न येत नाही ना, हे आजमावले जाते व मग ते संशोधन सिद्ध होते. यानंतर त्याचा प्रसार करण्याची योजना आखली जाते. कलबागसरांचे कुठलेही काम असेच शास्त्रशुद्ध पद्धतीने चाले. त्यामुळे डॉ.कलबागांनी शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणूनच कामाची आखणी करायला सुरुवात केली.
विज्ञानाश्रम कुठे सुरू करावा हा विचार करताना एक गोष्ट निश्चित होती की एक खेडे यासाठी निवडायचे होते. कामासंबंधी त्यांचा श्री. जे. पी. नाईकांशी पत्रव्यवहार चालू होता. मग दोघांनी मिळून पाबळ हे प्रातिनिधिक खेडे निवडले. इथे फारश्या सुखसोयी नव्हत्या, पाण्याचा प्रश्न होता; एस.टी. शिवाय जाण्याची सोय नव्हती, बँक नव्हती, फोनही नव्हते, मुख्य रस्त्यावर हे गाव नव्हते. सर्वसाधारण खेड्यातील सर्व प्रश्न इथे उपस्थित होते. त्यामुळे भारतातल्या ६ लाख खेड्यांधले एक असे प्रातिधिनिक गाव म्हणून पाबळ गाव निवडले गेले. पाबळमधील शाळेचे मुख्याध्यापक जे. पी. नाईकांच्या परिचयाचे होते, एवढा फायदा मात्र होता. १९८१ पासून कलबागसर दर शनिवार – रविवार पाबळला जाऊन तिथल्या लोकांशी बोलू लागले. लोकांना काय हवे आहे, काय शिकायचे असेल, ‘गावाचा विकास’ म्हणजे काय, याबद्दल त्यांची काय संकल्पना आहे, काय अपेक्षा आहे वगैरे, वगैरे. वस्त्या पाड्यांवर जाऊन ते लोकांशी बोलले, लोकांना बांधकाम, फॅब्रिकेशन, टायर रिपेअर शिकायचे होते, शेतामधल्या पिकावरच्या किडीवर उपाय करायचे होते. काही शेतकऱ्यांकडे बटाटा पिकत होता, त्यांना त्याचे वेफर्स करायला शिकायचे होते. थोडक्यात शहरात ज्या काही गोष्टी असतात त्या सर्व खेड्यातही हव्या होत्या. मात्र दुसरी एक गोष्ट त्यांच्या अशी लक्षात आली, की इथल्या मुलांना ‘मोठेपणी काय व्हायचेय’ हे स्पष्ट नव्हते. सभोवतालच्या संधी माहीत नव्हत्या. त्यांनी वेगवेगळ्या कामांचे जगही फारसे पाहिलेले नसल्यामुळे ‘आपल्याला काय करायला आवडेल’ हे कळायला मुलांकडे काही मार्गच नव्हता. त्यामुळ खढख प्रमाणे ट्रेड अनुसार ठराविक अभ्यासक्रम करून उपयोग नव्हता. त्यातून बहुविध कौशल्याचा अभ्यासक्रम करायचा असे ठरले. निसर्ग हा अभ्यासाचे क्षेत्र मानून त्यातील सजीव व निर्जीव या दोन्ही घटकांचा अभ्यास आवश्यक मानला. सजीवांच्या अभ्यासाचे मुख्य भाग म्हणजे – शेती, पशुपालन आणि गृह – आरोग्य आणि निर्जीवांच्या अभ्यासाचे उपघटक म्हणजे अभियांत्रिकी आणि ऊर्जा पर्यावरण यांचे शिक्षण देण्याचे ठरले. समाजाच्या या गरजांचा विचार लक्षात घेऊन नव्या शिक्षणकार्यक्रमाची आखणी होत गेली. यातून आश्रमाचा, १ वर्षाचा ग्रामीण तंत्रज्ञान अभ्यासक्रम तयार झाला. या अभ्यासक्रमाची मुख्य तत्त्वे खालील प्रमाणे तयार झाली.
१. हाताने काम करायला शिकणे. २. बहुविध कौशल्ये आत्मसात करणे. ३. शाळा हे उत्पादक केंद्र असायला हवे.
विज्ञानाश्रमाच्या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे लोकोपयोगी सेवा हे आहे. शाळेने लोकांच्या गरजेनुसार सेवा द्याव्यात, त्या सेवांचे मोल लोकांकडून शाळेला मिळावे. याचा फायदा म्हणजे मुलांना व्यवहारातले कौशल्य व प्रशिक्षण मिळेल. व लोकांच्या बदलत्या गरजांनुसार अभ्यासक्रमही ताजा, बदलता राहील. ४. शाळेतील निदेशकदेखील उद्योजक असावा. त्याच्या उत्पन्नाचा काही भाग हा लोकोपयोगी सेवांधून मिळावा.
बहुविध कौशल्यांपैकी वर उल्लेखलेली चारही कौशल्ये प्रत्येक मुलाला यायला हवीत असा डॉ. कलबागांचा आग्रह होता. मुलींनी वेल्डिंग करायला पाहिजे, फ्यूज बदलला पाहिजे हे पण एक प्रकारचे सबलीकरण आहे. मुलांनी खाद्यपदार्थ बनवणे आवश्यक आहे, कारण त्याने सामाजिक जाणिवा वाढतात, श्रमाची किंमत कळते. लिंगभेद दर व्हायला मदत होते. ते फार महत्त्वाचे आहे. विविध कामे केल्याने कोणते काम करायला आपल्याला आवडते ते समजून घेण्याची संधी मिळते. शिवाय, भविष्यात केव्हाही गरज पडू शकते म्हणून त्या कामांचा अदमास असणे एरवीही आवश्यक असते. शेती करणाऱ्याला आपल्या शेतीतल्या उत्पादनावर प्रक्रिया कशी करायची ते समजले पाहिजे. शेतातल्या पंपाची मोटर बंद पडली तर चालू करता आली पाहिजे. कोंबडीपालन करायचे असेल, त्यासाठी शेड उभारायची असेल तर त्याचे ड्रॉइंग/आरेखन समजले पाहिजे. हे झाले कामाचे. याशिवाय मुलग्यांना प्रत्यक्ष स्वैपाक समजा करायचा नसेल, तरी त्यात काय काय करावे लागते, तो करताना आईला – बहिणीला काय कष्ट पडतात ह्याची जाणीव तर हवीच.
शाळाः ग्रामविकासाचे केंद्रः
शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामविकास-ही त्यांची कल्पना होती. विकासाची गती वाढवायची, तर त्यासाठी तंत्रज्ञान वापरले पाहिजे आणि ते तंत्रज्ञान शिक्षणात आणले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या वापरासाठी लोक तंत्रज्ञानसाक्षर असायला लागतात. तंत्रज्ञान स्वीकारायचे तर ते समजावून घेण्याची, त्याचा वापर करण्याची, त्याचे उपयोजन करण्याचीही क्षमता आपल्यात असायला लागते. शिवाय ते तंत्रज्ञान लोकांना उपलब्धही करून द्यावे लागते. त्यासाठी गावात उद्योजक उभे रहावे लागतात. निरीक्षण-मापन- विश्लेषण या क्षमता तयार व्हाव्या लागतात. या गोष्टी होण्यासाठी शिक्षण आणि उद्योजकताविकास यांची योजना डॉ. कलबागांच्या तत्त्वज्ञानात प्रामुख्याने होती. पाबळच्या प्रयोगात त्यांनी सुरुवातीला, शाळा सोडलेल्या मुलांधून उद्योजक तयार केले. शाळा सोडलेली मुले जर उद्योजक होऊ शकतात, तर शाळेत शिकणारी मुले याहून कितीतरी पुढे जाऊ शकतील असे दाखवले. हे दाखवण्यासाठी सर्वांत ‘कमजोर कडी’ घेऊन त्यांनी प्रयोग केला.
एखाद्या प्रयोगाचा पुढचा भाग म्हणजे तो समाजात मोठ्या प्रमाणावर करून दाखवणे. नेहमीच्या औपचारिक शाळांधून इ.८ वी ते १० वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी वरील तत्त्वाच्या आधारे ‘मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ Introduction to Basic Technology (IBT)’ या अभ्यासक्रमाची आखणी केली गेली. ही संकल्पना पाबळजवळील तीन शाळांध्ये १९८७ ते ९० च्या दरम्यान आश्रमाने राबवली. त्याला SSC बोर्डाने मान्यता दिली. पुढे १९९५ पर्यंत हा प्रयोग चालवणाऱ्या १५ शाळा झाल्या. २००१ पर्यंत २३ शाळा झाल्या. २००४ पर्यंत हा कार्यक्रम टिकाऊ (Sustainable) आहे का, याची चाचपणी केली गेली व नंतर हा प्रयोग आता प्रसारासाठी तयार आहे, असे पाहून तो सर्वत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पूर्वी या शाळा महाराष्ट्राच्या प्रगतिशील भागात होत्या. आता कोकण, विदर्भ, धुळे, नंदुरबार याशिवाय छत्तीसगड, कर्नाटक इ राज्यातील १२२ शाळांत (४ भागात आणि १४ राज्यांत) IBT कार्यक्रम चालू आहे. विज्ञान-आश्रमाच्या कार्यक्रमाचे महत्त्वाचे अजून एक अंग म्हणजे तंत्रविकास होय. ग्रामीण विकासाची गती वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे असा आश्रमाचा विशास आहे. अशी तंत्रे अधिकाधिक कार्यक्षम कशी बनवता येतील, कमीत कमी खर्चाध्ये कशी बसवता येतील. याबाबतचे प्रयोग आश्रमात नेहमीच चालू असतात. विद्यार्थ्यांना प्रकल्प म्हणून, लोकोपयोगी सेवा म्हणून नवीन प्रयोग आश्रमात व IBT शाळात नेहमी चालू असतात.
डॉ. कलबागांचे द्रष्टेपणः
लोकांकडून आलेल्या मागण्यांनुसार तंत्रज्ञान विकासामध्ये अनेक गोष्टींची भर पडली आहे. उदाहरणार्थ, कमी खर्चात घरे बांधण्यासाठी जिओडेसिक डो, भूकंपविरोधी बांधकाम, पाण्यासाठी कूपनलिका कुठे घ्याव्यात ते ठरवण्यासाठी ‘अर्थ रेझिस्टिव्हिटी मीटर’; छोट्या शेतकऱ्याला परवडण्याजोगा, बैलापेक्षा स्वस्त पडणारा छोटा ट्रॅक्टर-मेकबुल (mech bull) तयार झाला. या गोष्टी म्हणजे आश्रमाच्या कामाचा ‘बाय प्रॉडक्ट’ आहे. आश्रमाचे मुख्य काम म्हणजे नवी शिक्षण-प्रणाली हेच आहे. डॉ. कलबागांचे असे विशेष संशोधन म्हणजे ही नवी शिक्षण-प्रणाली. यामध्ये तंत्रज्ञान तर आहेच, गांधींच्या ‘नई-तालीम’चा विचारही आहे, शिवाय शाळेच्या व्यावहारिक मर्यादत हे कसे बसवता येईल, त्याचा प्रयोग यशस्वीरीत्या करून दाखवलेला आहे.
नवीन शिकण्याचा तासः
डॉ. कलबागांचा एक विशेष होता. ते रोज अर्धा तास काहीतरी नवीन गोष्ट शिकण्यासाठी द्यायचे. असे सतत नवीन शिकल्यामुळे त्यांचे मन सदैव तरुण राहिले. सतत नवीन कल्पना – नवीन अभ्यास चालू राहिला. ७३ व्या वर्षी ते आणि मी मिळून html शिकलो. २००० मध्ये आम्ही विज्ञान-आश्रमाचे वेबपेज तयार केले. मी पुण्यात आणि ते मुंबईत बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायला शिकलो. IBT शाळांना तंत्रज्ञानाविषयी सल्ला देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करता येईल हे लक्षात आल्याने त्या विषयी विचार सुरू केला गेला. मात्र ९८-९९ मध्ये पाबख मध्येच इंटरनेट मिळत नव्हते..
मग आम्ही IIT मद्रास ने तयार केलेले WLL (वायरलेस लोको लूप तंत्रज्ञान) वापरायचा करार केला. ५० कि.मी. त्रिज्येच्या क्षेत्रात संपर्कासाठी हे तंत्रज्ञान वापरले. त्यातून वायरलेस फोन आणि इंटरनेट सेवा सुरू केली. भीमाशंकरच्या डोंगरातही फोनसेवा दिली (२००२ ते ०६). त्यासाठी घेतलेले कर्जही फेडले. त्यातून विज्ञान-आश्रमला इंटरनेट तंत्रज्ञानाचा अनुभव घेता आला.
शेतकऱ्यांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून सल्ला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.. सरकारी कृषिविद्यापीठे व कृषिविज्ञानकेंद्राकडून, सल्ला मिळेना. तेथील तज्ज्ञांनापण हे नवीन होते. मग IIT मुंबई व KVK बारामती बरोबर आम्ही www.aaqua.org http://www.aaqua.org (almost All Question and Answers) अशी वेबसाइट तयार केली. हे तंत्र व्यवहारात उपयुक्त होईपर्यंत पाठपुरावा केला. उदाहरणार्थ-विशिष्ट किडीवर कुणीतरी उपाय विचारला होता. त्यावर उत्तर देणाऱ्याने जे औषध मारायला सांगितले, ते काही येथे मिळेना. मग KVK च्या तज्ज्ञांना बाजारात उपल्ब्ध औषधे कळवली आणि मग त्यातील एक त्यांनी सुचवले. अश्या case study तयार करून aaqua चा प्रसार झाला. २००६ मध्ये aaqua साठी grocom नावाची कंपनी तयार झाली. सध्या २९० जिल्ह्यांध्ये त्यांचे १३०००-१४००० सभासद आहेत. चालू उपक्रमः १. DBTR – नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ओपन स्कूलिंग या संस्थेचा ‘डिप्लोो इन बेसिक रूरल टेक्नॉलजी’ : हा एक वर्षाचा अभ्यासक्रम विज्ञान-आश्रमात राहून मुले करतात. ८ वी पास झालेला व प्रत्यक्ष हाताने काम करून शिकण्याची तयारी असलेला कोणीही हा अभ्यासक्रम करू शकते. २. IBT – ‘इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी’ ह्या विषयाला एस.एस.सी. बोर्डाने मान्यता दिलेली आहे. आठवी ते दहावी या काळात दर आठवड्याला एक तास मुले बहुविध कौशल्ये शिकण्यासाठी देतात. ३. कमी मदतीचे अभ्यासक्रम: वितळ-जोडकाम (वेल्डिंग), इलेक्ट्रिकल्स, शेळीपालन, कोंबडीपालन, दुध उत्पादन, शेतीमाल प्रक्रिया, शेती तंत्रज्ञान इ. ४. एकेक दिवसाचे प्रशिक्षण – काही शेतकरी किंवा बचतगटातील महिला मिळून, त्यांना हव्या त्या विषयावर प्रशिक्षण घ्यायला येतात. उदाहरणार्थ, अझोला लागवड, टोंटो सॉस बनवणे, पुरणाची तयार पाकिटे बनवणे, इत्यादी. याशिवाय वेगवेगळ्या संस्थांधील (IIT Engg.) विद्यार्थ्यांना विविध प्रकल्प देऊन नवीन तंत्रे विकसित करणे चालू असते.
आश्रमाचे व्यवस्थापन:
आश्रमाच्या व्यवस्थापनामागे अम्मांचा (डॉ. कलबागांच्या पत्नी) मोठाच आधार आहे. ती आश्रमाची न दिसणारी शक्तीच आहे. विज्ञानाश्रमात विज्ञान म्हणजे डॉ. कलबाग आणि आश्रम म्हणजे अम्मा असे म्हणता येईल. १९८३ मध्ये आश्रमाची सुरुवात झाल्यापासून अम्मा त्यात सहभागी झालेल्या आहेत. त्यांच्यामुळे इथले व्यवहार अत्यंत काटेकोर असतात. स्वैपाकघरही अत्यंत शिस्तीने चालते. इथे पन्नास माणसांचे जेवणही अगदी नेक्या प्रमाणात बनवले जाते. तुम्ही आधी सांगाल तेवढे आणि तितकेच तुम्हाला मिळेल. तुम्ही जेवणार नसाल तर वेळेतच तशी कल्पना द्यावी लागते. तसे न केल्यास, म्हणजेच अन्न वाया घालवल्यास दंड पडतो. आपल्या देशात बहुसंख्य जनता उपाशीपोटी झोपते ही वस्तुस्थिती असताना, अन्न वाया घालवणे हा येथे गुन्हा ठरतो. यातून पाहुण्यांची/परदेशी लोकांचीही सुटका नसते. (इथल्या दोन कुत्र्यांच्या नावानेही बील तयार होते व संस्था ते भरते.) दिलेल्या वेळेतच जेवायला येणे, जेवणानंतर ताट नीट धुणे, स्टूल जागेवर ठेवणे, एका हातानेच पोळी खाणे इत्यादी गोष्टी ‘विसरता’ येत नाहीत.
या कडक शिस्तीमध्ये प्रोला वाव असतो, मुलांना उदंड प्रे मिळते. आश्रमात प्रवेश घेताना मुलांचे वजन, हिमोग्लोबिन तपासले जाते. मुले परत जातात तेव्हा इथल्या समतोल आहाराने ते वाढलेले दिसून येते. येथे प्रत्येकाने आपापले काम करायचे असते. अगदी डॉ. कलबाग स्वतःची खोली झाडत, धूळ पुसत. आजही तीच प्रथा चालू आहे. अभ्यागतांना पाणी आणून देण्यासाठीही येथे शिपाई नाही. आश्रमाचे असे वाहनही नाही. डॉ. कलबागांपासून एस.टी.ने प्रवास करण्याचीच पद्धत कायम आहे. आश्रमातील घरे, कार्यालय अगदी साधे आहे. बसायला खुर्त्यांऐवजी साधे बाक आहेत. येणाऱ्या गावकऱ्यांना ते आपले, आपल्यासारखे वाटावे यासाठी डॉ. कलबागांनी ते तसे ठेवलेले होते. इतके सगळे बारीक विचार त्यांनी केलेले होते. अम्मांनी सरांच्या कामात स्वतःला पूर्णांशाने वाहून घेतलेले होते. सरांच्या मागेही त्यांचा तसाच सहभाग कायम आहे. त्या कधीच पुढाकार घेत नाहीत. आजही त्यांना विचारले तरच त्या सल्ला देतात. पूर्वी त्या पाबळमधील महिलांसाठी शिवण-वर्ग चालवीत. त्यानिमित्ताने त्यांना महिला भेटत, सल्ला घेत, अशा बऱ्याच गोष्टी होत. आता त्या वर्ग चालवत नाहीत तरी त्यांना भेटायला, त्यांचा सल्ला घ्यायला महिला येतातच. जाळे विणायचे का मासे मारायचे?
विज्ञान-आश्रमाबद्दल समजावून घेताना डॉ. कलबागांच्या द्रष्टेपणाचा उल्लेख आवर्जून करायला हवा. आपण काय करायचे आहे आणि तेही का, हे त्यांना अतिशय स्पष्ट होते. स्वत:ची वेगळी संस्था न करता त्यांनी भारतीय शिक्षण संस्थेच्या अंतर्गत एक स्वतंत्र व स्वायत्त विभाग म्हणून आश्रमाची स्थापना केली. मात्र या स्वायत्ततुळे आलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी एक व्यवस्थापकीय यंत्रणा आश्रमात तयार झाली. उदा. दरमहा अहवाल देणे. १ जाने.८३ पासूनचे सर्व अहवाल आश्रमात आहेत. कोणी, कुठे, काय काम केले, कोण पाहुणे आले, कोणती कामे मिळाली, त्या त्या महिन्याच्या पावसाच्या नोंदी वगैरे सर्व गोष्टी आजही त्यांनी लिहून ठेवलेल्या दिसतात. त्यांचे म्हणणे होते की हाताबरोबर डोकेही काम करत असले पाहिजे. हाताने काम करताना नोंदी घेणे, त्यांचे निरीक्षण करणे, विश्लेषण करणे हे करायला हवे. जेव्हा, कारागिरांनी काम करायचे आणि ऋषींनी ज्ञाननिर्मिती असे वर्गीकरण झाले, तेव्हाच अधोगतीला सुरुवात झाली. ते बदलले तरच प्रगतीचा मार्ग दिसेल.
विज्ञान आश्रम, एस. ६८, जे.पी.नाईक सेंटर फॉर एज्युकेशन, एकलव्ये पॉलिटेक्निकमागे, कोथरूड डेपो, पुणे ४११०३८

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.