अंधश्रद्धेचे मानसशास्त्र

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निघृण हत्येनंतर त्यांनी पुढाकाराने चालविलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य पुढे कसे चालू राहील हा प्रश्न अनेक पुरोगामी सुधारक हितचिंतकाना थोडा चिंताग्रस्त करतो आहे, हे त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणातून दिसून येत आहे. अपार दु:खात बुडालेले असतानाही आम्हा कार्यकर्त्यांना हा मोठा दिलासा तर आहेच. त्याचबरोबर अंनिसचे कार्य जनमानसात किती आत्मीयता पाऊन आहे तेही आम्हाला पुन्हा एकदा जाणवत आहे. प्रथम या समयोचित पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे उचित ठरेल. महाराष्ट्रासोबत इतर राज्यातून देखील असा प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे. केंद्र व राज्य शासनही या प्रसंगी सुधारक पुरोगामी पावले उचलेल अशी आशा आहे.
अंधश्रद्धेविषयी आजवर खूप काही बोलून लिहून झालेले आहे. त्याची पुनरावृत्ती टाळून आपण पुढे जाऊया. प्रामुख्याने हतबलतेतून, आशेपोटी, भयापायी, विविध प्रचार-जाहिरातींना, अशास्त्रीय समजुतीना, चुकीच्या सल्ल्यांना वा पूर्वग्रहांना बळी पडून माणसे अविवेकी, अनैतिक, अशास्त्रीय,अव्यावहारिक, अंधश्रद्ध (प्रसंगी अघोरी) कृत्ये करतात. त्यात त्यांचा वेळ, पैसा, शक्ती तर वाया जातेच, वर शोषण, फसवणूक, दुखापत व नुकसान होते. प्रश्न अधिक जटिल होतो. तात्पुरते भ्रामक समाधान झाले तर मानसिक गुलामगिरी मनात जोपासली जाते. पुढे अधिक अंधश्रद्धांध्ये माणूस वाहवत जातो. अशा वेळी मदतीची हाक आल्यास, अथवा अशी गोष्ट लक्षात आल्यास आम्ही संघर्षाचा व प्रबोधनाचा आधार घेतो. जेथे लपून-छपून फसवणूक चालते तेथे प्रखर निषेध नोंदवितो, जरूर पडल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करतो, निर्भय संघर्ष उभारतो. जागोजागी ही काळजी घेतली जाते की या कार्यात लोकगानरा आगच्याकडून दुखावले जाऊ नये. यापुढे देखील याबाबत तत्परतेने, गैरसगाज उद्भवू नयेत, अधिक सजगपणे ही चळवळ चालविली जावी, त्यात अपप्रचाराला संधी मिळू नये असे मला प्रकर्षाने वाटते. कारण निष्कारण वादविवादात कार्य बाजूस राहते व वादच भीषण टोक गाठतात हेही अनेकदा दिसून आले आहे. शोषक तरीही हल्ले करीत राहतीलच, निदान लोक, इतर पुरोगामी, या कार्याबाबत आस्था असलेले, वाद टाळू पाहणारे हितचिंतक तरी अंनिस कार्यात अधिक साथसोबत करतील अशी आशा धरू. शासनाशी अधिक सजगतेने नाते जोडावे लागेल. या ने स्त भूमिकेत आपण पडती बाजू घेत नसून कार्य प्रभावी होऊन पुढे सरकावे असा विचार करीत आहोत हे समजून घ्यावे लागेल. डॉक्टर दाभोलकरांचे विचार, समृद्ध साहित्य, मार्गदर्शन आम्हासोबत आहेच. अंधश्रद्धा निर्मूलन ही त्रासदायक शस्त्रक्रिया नसेल, ते अतिशय झोंबणारे मलम नसेल, त्यात शोषिताबाबत करुणा व आत्मीयता असेल. अंधश्रद्धा निर्मूलन नेहमीच शोषिताचा दिलासा ठरेल याची आम्ही काळजी घेऊ. आम्हाला समजून न घेणाऱ्या विरोधकांशी आम्ही आजवर सतत संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आलो आहोत. आम्ही प्रस्तावित केलेल्या जादूटोणा व अघोरी प्रथा विरोधी कायद्यातील सुधारणांसंदर्भात वारकरी समाजाशी, विरोधकांशी अंनिसचे अविनाश पाटील, माधव बावगे, मिलिंद देशमुख, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्याशी श्याम मानव यांनी केलेली चर्चा, १९९२ मध्ये शोध भुताचा बोध मनाचा
या आमच्या अनोख्या जनजागरण मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील जनतेशी या कायद्यातील सुधारणासाठी आम्ही साधलेला संवाद, पर्यावरण रक्षणासाठी, गणपती विसर्जन, होळी आदि सणांच्या वेळी सर्व भक्तांशी बोलून अं लात आणलेल्या सुधारणा, विज्ञान वाहिनी, युवा एल्गार, जात पंचायतीशी चर्चा, विवेक जागर, गेली काही वर्षे मी रुजवू पहात असलेल्या मानसिक आधार केंद्र व मानसमित्र या जनमानस आरोग्य (कम्युनिटी मेंटल हेल्थ) विषयक संकल्पना अशी अनेक उदाहरणे या सर्वांशी संवाद साधण्याच्या आमच्या प्रयत्नांची उदाहरणे आहेत. काल-ज्ञान-विवेक-सापेक्षता संपल्यावरही केवळ कृतज्ञतेपोटी, लोभापायी काही श्रद्धा, सोबत तीव्र भावभावनांचे इंधन घेऊन जाणिवेतून नेणीवेत उतरतात. हळूहळू ती नेणीव अस्मितेचे प्रतीक बनून, मानसिक गुलामगिरी रुजवीत, सारासार विचार-व्यवहार बाजूला ठेवून शोषक रूप घेते. अशी अंधश्रद्धा मग एक दुखरी गाठ बनून जाते. ती एकदम फोडता येत नाही. मग ती कुरवाळत बसण्यापलीकडे हाताशी काही उरत नाही. तो भाग बधीर झालेला परवडेल, पण शस्त्रक्रिया नको असाच जनमानसाचा कल असतो. दुसरीकडे वरवरच्या कातडीवर लक्ष खिळवून ठेवून डोकेदुखी विसरायला लावणारा बामही हवाहवासा वाटतो. अशावेळी समाजमान्यतेचा दिलासादायक हात बामचे काम करू लागतो. कालांतराने ही डोकेदुखीच प्रश्नांवरची पळवाट ठरू लागते. डोके दुखले की माणसे त्या निमित्ताने मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करू लागतात. डोके बधीर करणारी औषधे/कर्मकांडे वापरू लागतात. कालापव्यय करीत करीतच जगण्याची पळवाट शोधतात. धर्म ही दिलासा देणारी स्वस्त(?), वेदनाशामक, सवयीने हवीहवीशी वाटणारी गोळी म्हणून जनमानसात मान्यता मिळविते.
अंधश्रद्धा केवळ तात्पुरता भ्रामक उपाय राहात नाही, तर तो एक अमली पदार्थ बनून मनात भिनतो. सामाजिक प्रतिष्ठेचे वलय लाभलेली शोषक कर्मकांडे दागिन्यासारखी मिरविली जातात. आता ध्येयशून्य, यंत्रवत् कर्मकांड करीत जगणे त्या माणसाला सामाजिक प्रतिष्ठा बहाल करते. दारिद्र्यातही वायफळ खर्च करायला लावते. दुःखाच्या मुळाशी जाण्यापेक्षा, पूजापाठ, प्रार्थना, ध्यान आदि बौद्धिक शिथिलतेची तंत्रे लोकप्रिय होत जातात. काही काळातच, अंधश्रद्धेची दुखरी गाठ म्हणजे जणू काही उत्क्रांतीने लाभलेला उपयुक्त अवयवच आहे असे समजण्यापर्यंत मजल जाते. बौद्धिक गुलामगिरी ही स्वतंत्र प्रागतिक विचारपद्धत वाटू लागते. अशा गुलामगिरीला अस्मितेची, श्रेष्ठत्वाची जोड मिळाली की मग ही माणसे आजूबाजूच्या दुःख-क्लेशांबाबतही निर्विकार होत जातात. सामाजिक ह्रासाबाबतची जाणीव, संवेदनशीलता कमी कमी होत जाते. भ्रामक जगच तेवढे रमणीय व हवेहवेसे वाटते. थोडक्यात, अशी माणसे सुखोपभोगी यंत्रे म्हणून जगणे पसंत करतात. आता आपल्या पंथापलीकडील शेजारच्या पीडित, शोषित समाजबांधवाशी देणेघेणे उरत नाही. अपराधी भावनेचा ठणका विसरायला लावील इतपत समाजसेवा त्यांना पुरेशी वाटते. त्याची भीषणता इथेच संपत नाही. विरोधकांबाबत ती अमानुष होत जातात. पराकोटीचा अधर्म, टोकाची हिंसा करू लागतात इतकेच नव्हे तर ते करण्यात धन्यता मानतात. धर्मातील नैतिक मूल्ये दूर करून मग सरळ देवाशीच सौदेबाजी केली जाते. त्यासाठीचे दलाल जागोजागी आपले बस्तान बसवून असतातच!
सत्यशोधनाचा, सुखप्राप्तीचा, मानसिक उत्थानाचा मार्ग खडतर असतो, हे व्यवहार व नीती दोन्ही सांभाळण्याची कसरत करणाऱ्यांना स्पष्टपणे माहीत असते. रोजच्या व्यवहारात कसातरी जमाखर्च भागविणाऱ्या, विचारासाठी उसंत व संधी नसलेल्यांना ही दुःखचिकित्सा कोठून झेपणार! त्यांना ती टाळावीशी वाटते. स्वयंपाकापेक्षा ‘रेडी टू इट मील’चे पॅकेट बरे वाटते! बर्फाळ भागात कमी त्रासात झटपट शिजवून खाता येईल अशी मॅगी नूडल्स रोजच्या धावपळीत ‘पोषक आहाराची’ जागा मिळवितात ! प्रिझर्व्हड फूड इतकेच कालौघात टिकून राहिलेले जुने पॅकेज्ड आहार आचार विचार ‘झटपट खाद्य’ म्हणून सर्वाना पसंत पडतात. फक्त मूर्ती झेपेल तेवढी असण्यात मजा नाही, ती अहंभाव, अस्मितेच्या प्रतीकात्मक रूपाइतकी प्रचंड असायला हवी. मिरवणूक डोळे दिपवणारी हवी आणि स्वप्रतिमा रो न युद्धखोरांच्या प्रतिमांसारखी अवाढव्य दिसायला हवी. जमिनी विकाव्या लागल्या तरी चालेल, पूजापाठ, विवाह, धर्मकृत्ये आजूबाजूच्यांचे डोळे दीपवणारी (आणि वाद्ये कान किटवणारी ) असलीच पाहिजेत. संभ्रमित मनाला विचार नको असतात, बधिरता परवडते, सवयीने हवीहवीशी होते. त्यात गर्वाची भर टाकली कि ते सारेंच मिश्रण स्फोटक ठरते. आता अविचार सर्व न्यि होतो. अविवेक प्रतिष्ठित ठरतो. बेभान असंतुलित प्रसंगी अश्लील हालचाली नृत्ये ठरतात. हे सारे मुद्दाम केले जाते असेही नाही. ते सर्व न्यि, लोकप्रिय असते म्हणून केले जाते. मग गोविंदाचे थर घातक उंची गाठतात. अशा वेळी खालच्या उन्मादाला विवेक वा कायदा कुणीच सारासार विचार सांगू शकत नाही. प्रतिकूल काळ, अज्ञान, तणावग्रस्त परीस्थितीनुसार नवनव्या अंधश्रद्धा निर्माण होत रहातात.
आवेगाच्या आहारी जाऊन उतावीळ कृत्य करण्याआधी संस्कृतीतून संक्रमित झालेले, काल, ज्ञान, निती, वास्तव सापेक्ष शहाणपण वेळीच जागे व्हावे, हा विवेक कार्यान्वित व्हावा असा अंनिस चळवळीचा प्रयत्न सतत रहायला हवा. असा No man’s land जाणीव नेणीवेच्या आदान प्रदानात (आणि अनियंत्रित आवेग व वस्तुस्थिती यात between uncontrolled impulses and ground reality) प्रबोधनाद्वारे तयार करण्याचा प्रयत्न आम्हा कार्यकर्त्याकडून व्हायला हवा. जाणीवेतून नेणिवेतील अंधश्रद्धा प्रथम surface वर आणाव्या लागतील. सातत्यपूर्ण प्रयत्नांनी जाणीव-नेणिवेतील पडद्याची वीण सैल करावी लागेल. अंतर्मनातील अंधश्रद्ध विचार जाणीवेच्या पातळीवर आणण्याचे काम अतिशय हळुवारपणे करावे लागते. प्रसंगी पड खाऊन आपल्या कर्मठ शास्त्रशुद्ध कार्यकारणभावाला थोडीशी मुरड घालून ही कुशल शस्त्रक्रिया करावी लागेल. येथे शस्त्रे चालणार नाहीत, कुशल शब्द, संवेदनशील जाणीव उपयोगी ठरू शकेल. अविवेकी उन्माद सहन करावा लागेल, भूल न देता, भूलीतून बाहेर काढीत दुःखाला वाट करून द्यावी लागेल. खूप काही शांतपणे ऐकून घ्यावे लागेल. औषधाची कटुता सहन होईल इतकी सौम्य करावी लागेल. उपाय त्वरित आराम देईल व त्याचवेळी दीर्घ काळ रोगप्रतिबंध करील असा असायला हवा. तात्पुरते भोंदू आधार बाजूला करताना सदसद्विवेकी आचार-विचार, संतुलित जीवनशैली, वस्तुनिष्ठ शास्त्रीय दृष्टिकोण, विवेकी विचार पद्धतीचे भक्कम आधार त्या मनाला मिळतील असे पहायला हवे.
पाश्चात्य तत्त्वचिंतक रेने देकार्त याने, गृहीतकाला ‘का?’ हा प्रश्न विचारून सत्याला भिडण्याचा चिकित्सात्मक मार्ग सुचविला. (Skepticism Vo Spinoza) त्याच पद्धतीने वेगळ्या ‘देव’ ह्या संकल्पनेचा विवेकपूर्ण रीतीने स्वीकार करावा लागेल. अंधश्रद्धा नेणीवेतून जाणीवेत परत परत वापरल्याने, ती जणू एक प्रिय आप्त स्वकीय बनते. ती सोडताना त्रास होणार. withdrawal symptoms येणार! त्याचा उपचार rational scientific outlook ने करता येईल. ते कसे करावे याचे प्रशिक्षण चळवळीने घ्यायला हवे, त्याचा सराव करायला हवा. जात पंचायतींच्या कामाबाबत, भूमिकांबाबत अंनिस चे धोरण नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे. (माननीय रावसाहेब कसबे यांच्या विवेचनाप्रमाणे) मुळात ब्राह्मणेतरातील जाती वरच्या वर्गाचे अनुकरण करण्याच्या नादात परस्परात भेद निर्माण करीत स्वतःच्या चौकटीत बंदिस्त झाल्या असाव्यात. जाणिवेपेक्षा नेणीवेत या घडामोडी घडल्या असाव्यात, ज्यामुळे आजही जातीचा जन्म व प्रसार पूर्णतः कळत नसावा. गेल्या काही वर्षांत पुन्हा एकदा जातींची प्रतीके धर्माभिमानात प्रतिक्षिप्त झाली, असे जाणवते. त्यामुळे जातिअंताचा लढा तीव्रतेने थेट धर्मचिकित्सेला व भ्रामक अस्मितेला भिडतो, असे दिसते. त्यामुळे, धर्माचा वृथा अभिमान बाळगणारे लोक जातचिकित्सेने दुखावले जाणे साहजिक आहे. ‘लोकराज्य’ वा ‘आमच्या गावात आमचे सरकार’ हा विचार वा ही चळवळ लोकशाही मूल्यांना अनुसरून आहे. पण ‘आमच्या जातीत आमचे सरकार’ हा विचार मात्र तसा नाही. तो स्वातंत्र्य, समता व बंधुत्व तीनही मूल्यांना हरताळ फासतो. त्यामुळे घटनेतील व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह हाही जातिअंताचा लढा ठरू शकतो. विज्ञानाचा प्रसार व लोकशाही तत्त्वांचा प्रसार यासोबत नेणीवेशी ओळख व मनोव्यापारांचा अभ्यास ही दोन्ही मानसिक आरोग्याची अंगेदेखील जातिअंताला पूरक ठरू शकतील असे मला वाटते. स्व-ओळख व स्वभान नसते तेव्हा जातिधर्माचे ओळखपत्र मनाला ओशासक वाटते. जागतिकीकरणाच्या धुराळ्यात माणसांची जगातली ओळख हरवण्याचा धोका निर्माण झाला, पाश्चात्यांच्या अंधानुकरणाचे तोटे लक्षात आले, तसतसे आधुनिक तुर्कस्तानही पुन्हा एकदा पारंपरिक मुस्लिम ओळखीकडे वळले. त्यामुळे सध्या, आरशात चेहरा दिसला नाही तर आपण जसे भयभीत होऊ तसे भारतातील जातिधर्मपंथांचे झाले आहे. अतीव सुखोपभोगाची लालसा काहीना अपराधगंड तर काहीना न्यूनगंड देते आहे त्यामुळेही कर्मकांडात आत्मक्लेशांचा (उपासतापास इ) अंतर्भाव केला जात आहे.
व्यक्तिस्वातंत्र्य झेपेनासे झाल्याने धर्मार्तंड व काही जात पंचायती नवीन फतव्यांद्वारे आपल्या अनुयायांवरील निर्बंध जाचक करीत आहेत. हाच संरक्षक दृष्टिकोण आहे असे सांगितले जात आहे. अशा वेळी धर्म श्रद्धा, जात पंचायत लोकशाही विरोधक व शोषक कठे/ कशी होते हे सांगण्यावर चळवळीचा जास्त भर असावा. भक्तीत व्यावहारिक अवधान कसे सांभाळावे याचे साधे सोपे उपाय लोकांच्या लक्षात आणून द्यावे लागेल, शोषणाचे स्वरूप नीट उघडकीस आणून द्यावे लागेल. शोषितांना समाजाचा आधार व संरक्षण मिळेल असे प्रयत्न करावे लागतील. धर्मचिकित्सेचा व्यावहारिक अर्थ विचारात घ्यावा लागेल. व्यवहारचिकित्सा ही जीवनचिकित्सेची प्राथमिक पण महत्त्वाची पायरी असू द्यावी असे मला वाटते. व्यवहारचिकित्सेची सामान्य जनांसाठी उदाहरणे – महागाई का वाढते आहे ? त्यावर उपाय काय ? पर्याय काय ? पगार का पुरत नाही ? नातेसंबंधांचे काय होते आहे ? बेकारी का आहे ? आजचे प्रयत्न म्हणजेच उद्याचे नशीब, हे कसे काय सांगता येईल ? मनःशांती कशी मिळविता येईल ? माणसे अस्वस्थ, चिंताक्रात, दुःखी , निराश, रागीट का होत आहेत ? चंगळवाद बाजाराने पसरविलेले व्यसन नाही काय? अतिरिक्त उपभोग का घातक आहे ? चंगळवाद टाळणे आर्थिक नियोजनाचे गहत्त्वाचे अंग कसे काय ? वैज्ञानिक दृष्टिकोन प्रश्न । कसे सोडवून देऊ शकेल ? इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चिंतन व चर्चा व्हावी.
पंचवीस वर्षाच्या अंनिसच्या वाटचालीत मी या विचारांशी, चळवळीशी, संघटनांशी कार्यकर्ता व वैयक्तिक पातळीवर एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून सतत जोडलेला राहिलो आहे. अंनिस चा मेळ मानसिक आरोग्याशी कसा जोडावा यासाठी शोध भुताचा बोध मनाचा’ मानसिक आधार केंद्र’, इत्यादी उपक्रम राबविले आहेत. गेल्या वर्षात मानसमित्र’ ही नवी संकल्पना रुजविण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. हे मानसमित्र समुपदेशक नसतील, पण प्रसंगी मदत, मार्गदर्शन, साथसोबत, देणारा मानसमित्र’ गावागावात उभा रहावा असा प्रयत्न आहे. त्यात अंनिसच्याच नव्हे तर कुणाही सुजाण,संवेदनशील व्यक्तीला सहभागी होता येईल. मानसमित्राला मानसिक आरोग्यातील अशास्त्रीय, अविवेकी, अनैतिक अंधश्रद्धा ओळखता येतील, शोषण जाणता येईल, सर्वाना सोबत घेऊन त्यावरील प्रथमोपचार सुचविता येतील, मानसिक आरोग्यासाठी शासकीय सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध व्हाव्यात यासाठी सतत प्रयत्न करता येतील,तालुक्यात मानसिक आधार केंद्र चालविता येईल. शोषणाबाबत समाजात ‘जागल्याचे’ काम करणारा मानसमित्र हा या समाजाचा विवेकी चेहरा म्हणून रॅशनल चळवळीत अग्रणी राहील, असा मला विशास वाटतो. असे प्रशिक्षण मानसमित्राला देण्याचा माझा प्रयत्न राहील. आपणा सर्व मानवतावादी वाचकांसोबत विचारविनिमय करीत ही चळवळ या पुढेही चालू ठेवू या.
patkar.pradeep@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.