श्रद्धा आणि अंधश्रद्धा

धर्माचा पाया श्रद्धा आहे हे खुद्द धार्मिकच मान्य करतात. फक्त त्याचे म्हणे असे असते की ती श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे, डोळस श्रद्धा असते. पण हे म्हणणे अनाकलनीय आहे. श्रद्धा म्हणजे ज्या गोष्टीच्या सत्यत्वाचा कसलाही पुरावा नाही तिच्या सत्यत्वावरील अढळ विशास. धर्मावरील श्रद्धा याच जातीची आहे. ईशर, पापपुण्य, स्वर्गनरक, परलोक, पुनर्जन्म, इत्यादि कोणत्याही गोष्टीचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही. या सर्व गोष्टींची साधक प्रमाणे देण्याचे असंख्य प्रयत्न मी-मी म्हणणाऱ्यांकडून आजवर केले गेले आहेत. परंतु त्यांपैकी एकही अंशतः देखील निर्णायक नाही हे असंख्य वेळा दाखवून झाले आहे. ज्याचा पुरावा असेल त्यावरच आणि तो ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणातच विशास ठेवावा हे जर विवेकवादाचे पहिले तत्त्व असेल तर धर्माच्या वरील अंगावरील विशास विवेकविरोधी आहे हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. अंधाहून अंध अशा श्रद्धेचाच तो प्रकार होईल.
आरंभी परस्परांत गुंतलेल्या धार्मिक आणि नैतिक प्रेरणांची फाटाफूट केव्हा व का झाली? त्याला उत्तर असे आहे की जेव्हा हे लक्षात आले की देवधर्म न मानताही मनुष्य नीतिमान असू शकतो, तेव्हा ही फाटाफूट झाली, आणि ती झाली याचे कारण त्या प्रेरणा वेगळ्या आहेत हे काही बुद्धिमंतांच्या लक्षात आले. ‘कष्टकरी सामान्य माणसांत दिसणारी व वेगळी करता न येणारी धार्मिकता व नैतिकता पाहता अशी फाटाफूट करणे सयुक्तिक ठरते काय?’ असा प्रश्न विचारला जातो. त्याला माझे उत्तर असे आहे की या प्रेरणा नुसत्याच भिन्न आहेत असे नाही. त्यांपैकी एक पूर्णपणे निराधार अशा केवळ मानीव गोष्टींवर विशास ठेवणारी असल्यामुळे अंधश्रद्धा आहे, आणि ती एक हिणकस, सुबुद्ध मनुष्याला न शोभणारी गोष्ट आहे. ती तशी आहे हे जर आपल्या लक्षात आले असेल तर तिच्यापासून मुक्त होणे ही निश्चितच फायद्याची गोष्ट होईल. त्या प्रेरणा वेगळ्या आहेत, एवढेच नव्हे तर त्या स्वतंत्र आहेत ही गोष्ट बुद्धिवंतांच्याही लक्षात यावयास शतके नव्हे सहस्त्रके लागली!
श्रद्धा नेहमी अंधच असते या माझ्या प्रतिपादनाचा प्रतिवाद म्हणतात की श्रद्धा डोळस असू शकते, आणि आपण लोकांकडे नवीन विचार घेऊन जातो यात ती व्यक्त होते. मला वाटते की असे म्हणताना ‘श्रद्धा’ हा शब्द फारच शिथिल अर्थाने वापरला जातो. स्थूलमानाने बोलायचे तर ‘श्रद्धा’ हा शब्द इंग्लिश “faith’ या शब्दाचा प्रतिशब्द आहे, आणि त्याची व्याप्ती “faith’ च्या व्याप्तीइतकीच आहे. “faith’ हा शब्द सामान्यपणे जे अतींद्रिय आहे, ज्याच्या सत्यत्वाचा पुरावा सापडत नाही, अशा गोष्टीवरील अढळ विशासाला लावतात. या अर्थी, श्रद्धा डोळस कशी असू शकेल ते मला कळत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ‘श्रद्धा’ या शब्दाचा दोन भिन्न क्षेत्रांत उपयोग होतो, आणि त्या दोन ठिकाणी त्यांचे अर्थही भिन्न असतात, त्या श्रद्धेचे एक क्षेत्र म्हणजे सत्य-असत्याचे क्षेत्र. हे क्षेत्र विधानांचे क्षेत्र आहे, आणि महणून या क्षेत्रातील श्रद्धेचा अर्थ एखादे विधान सत्य आहे असा दृढविशास. उदा. ‘ईशर आहे’, किंवा ‘आपल्या कृतकर्माची फळे आपल्याला भोगावी लागतात’. श्रद्धेचे दुसरे क्षेत्र म्हणजे मूल्यांचे क्षेत्र, उदा. अहिंसेवर माझी श्रद्धा आहे’ याचा अर्थ अहिंसा सदैव पाळली पाहिजे, एवढेच नव्हे तर मी ती पाळीन असा निर्धार असा आहे. या दुसऱ्या अर्थी श्रद्धाविषय एखादा कर्मप्रकार असतो, म्हणजे तिचे क्षेत्र ज्ञानाचे नव्हे, तर कर्माचे क्षेत्र असते. या दुसऱ्या अर्थी ‘श्रद्धा’ शब्दाऐवजी ‘निष्ठा’ हा शब्द वापरणे इष्ट होईल. ही दुसरी निष्ठा चिकित्सक किंवा डोळस असू शकेल. (ह्या विषयाच्या सविस्तर विवेचनाकरिता आजचा सुधाकर च्या मार्च ९१ अंकातील ‘श्रद्धेचे दोन प्रकार : विधानांवरील आणि मूल्यांवरील’ हा लेख पाहावा.) आता मला श्रद्धा या शब्दाने फक्त पहिल्या प्रकारची श्रद्धा अभिप्रेत आहे.
श्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीवियीची पक्की खात्री, अविचल विशास, पण एवढ्याने श्रद्धेचे स्वरूप पुरेसे स्पष्ट केले असे होत नाही. एखाद्या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपला असा अभिप्राय. असतो की त्या गोष्टीला मुळीच किंवा प्रेसा पुरावा नाही. एखाद्या गोष्टीला पुरेसा पुरावा आहे म्हणून जर आपण तिच्यावर विशास ठेवला, म्हणजे ती खरी मानली, तर त्याला कोणी श्रद्धा म्हणत नाहीत. ‘२+२=४’ अशी माझी श्रद्धा आहे किंलवशा ‘पृथ्वी गोल आहे’ अशी माझी श्रद्धा आहे असे आपण म्हणत नाही, कारण ही विधाने सत्य आहेत हे आपल्याला ज्ञात असते, त्या विधानांची सत्यता स्वयंसिद्ध असते, किंवा पुराव्याने सिद्ध झालेली असते. याचा अर्थ असा आहे की श्रद्धेची भाषा आपण जे सिद्ध करू शकत नाही किंवा ज्याला पुरावा नसतो अशा गोष्टींविषयीच आपण करतो. आता वर सांगितल्याप्रमाणे पुराव्यावाचून कोणतेही विधान स्वीकारणे अविवेकी, असमंजस आहे. अर्थात् श्रद्धा ही एक अविवेकी गोष्ट आहे, हे मान्य केले पाहिजे.
* * *
‘कारण’ म्हणजे कर्ता हा अर्थघेऊनही जगताना कर्ता असला पाहिजे हे निष्पन्न होऊ शकत नाही. कारण समजा आपण म्हालो की जगताचा कर्ता म्हणजे ईह्नवर, तर लगेच असा प्रश्न उद्भवेल की मग ईशराचा कर्ता कोण ? आणि या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. जॉन स्टुअर्ट मिल् आपल्या आत्मचरित्रात म्हणतो की, ‘माझ्या वडिलांनी मला शिकविले की “मला कोणी निर्मिले?’ या प्रश्नाचे उत्तर ‘ईशराने’ असे देणे व्यर्थ आहे, कारण त्यातून लगेच ‘ईशराला कोणी निर्मिले?’ हा प्रश्न उद्भवतो.’ यावर असे उत्तर दिले जाईल की ईशर अनादि आहे किंवा स्वयंभू आहे, त्यामुळे त्याला कर्ता किंवा निर्माता लागत नाही. पण त्यावर असा प्रतिप्रश्न संभवतो की ‘जर ईशर अनादि असू शकतो तर जग का असू शकत नाही ? सारांश आदिकरणाचा युक्तिवाद सपशेल फसतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.