विज्ञान व वैज्ञानिक दृष्टी

विज्ञान व वैज्ञानिक दृष्टी
विज्ञान हेच एकमेव असे मानवी ज्ञानाचे स्वरूप आहे असा आक्रमक विवेकवाद (सायंटिसिझम) आणि अतीत तत्त्व माणसांतच अंतर्भूत असते हे मानणारा विवेकवाद यांत फरक आहे. हे न जाणल्याने विज्ञान व आत्मज्ञान यांची एकता तर सोडाच, पण शांततामय सहजीवन मान्य करणे अनेक पुरोगाम्यांना जड जाते. मुळात नीतिनिरपेक्ष असलेल्या विज्ञानाला आत्मज्ञानच योग्य ते सामाजिक वळण लावू शकते. या आत्मज्ञानाचा मंत्रतंत्रसिद्धी, गूढविद्या, पारलौकिक विश्व यांच्याशी तिळभरही संबंध नाही हे परत एकदा सांगितले पाहिजे. विज्ञान जेवढे वाढेल, तेवढे वाढवले पाहिजे. त्याची विनाशशक्ती रोखून विधायक शक्ती जोपासण्याचे काम आपण सांभाळले पाहिजे. ते जर नीट पार पडले नाही, तर भांडवलशाहीत होते त्याप्रमाणे विज्ञान आपल्या अंगावरच उलटते. विज्ञानाने एखादी क्रयवस्तू वा सेवा सहजी उपलब्ध होते. अशा वेळी त्या गोष्टीला जवळ करायचे की नाही याचा निर्णय विज्ञानाने किंवा वैज्ञानिकांनी करावयाचा नसतो, तर समाजाने, सर्वहितबुद्धी राखून, सर्व जडजीव सृष्टी विषयी कृतिशील आस्था अंगी बाणवून.

– राम बापट

राज्यसंस्था, भांडवलशाही आणि पर्यावरणवाद मधून साभार

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.