भांडवलशाही टिकते कशी?

एकोणिसाव्या शतकात युरोपात सुरू झालेली भांडवलशाही, विसावे शतक संपता संपता केवळ युरोपीय देशातच नव्हे, तर सर्व खंडांत, सर्वनैव नांदू लागली. खऱ्या अर्थाने ती जागतिक अर्थव्यवस्था झाली. भांडवलशाही ही अर्थव्यवस्था म्हणून राष्ट्राच्या सीमा ओलांडणार व जागतिक होणार हे मार्क्सने आधीच लिहून ठेवले आहे. तेव्हा प्रश्न भांडवलशाही जागतिक होण्याचा नाही, तर ती इतक्या वेळा अरिष्टात सापडूनही त्यातून बाहेर कशी येते किंबहुना पूर्णपणे बाहेर न येताही कशी टिकते, हा आहे. त्याचबरोबर भांडवली लोकशाही असो, लष्करी हुकूमशाही, की एकधर्मीय हुकूमशाही, इतकेच काय चीनच्या तथाकथित कम्युनिस्ट पक्षाचे शासन जरी असले, तरी भांडवलशाही कुठल्याही राज्यव्यवस्थेत आपली अर्थव्यवस्था अंलात आणते. हे भांडवलशाहीचे सामर्थ्य आहे; तसेच तिचा लवचिकपणाही. भांडवलशाही रोज क्रांतिप्रवण होत असते भांडवलशाहीचे कौतुक करताना एक गोष्ट सांगायलाच हवी. ती अशी की मार्क्सने कम्युनिस्ट जाहीरनाम्यातच, भांडवलशाही जर रोज क्रांतिप्रवण झाली नाही तर ती टिकू शकणार नाही असे स्पष्टपणे म्हटले आहे. भांडवलशाही टिकते कशी याचे हे एका वाक्यात उत्तर आहे.

भांडवलशाही टिकविण्याचे रहस्य असे की आपले वर्गीय हितसंबंध आणि वर्गीय सत्ता अबाधित ठेवायची असेल तर आपल्या वर्गीय हितसंबंधांना बाधा न आणता उत्पादनप्रक्रियेत सतत बदल करत राहायचे. तेही असे की आपला प्रतिपक्ष म्हणजे कामगार वर्ग, स्त्रिया दलित, आदिवासी, कृष्णवर्णीय, इस्लामधर्मीय, त्या त्या देशातील अल्पसख्याक ह्यांच्यावर एकाच वेळी अत्याचार करून हिंसा, दहशत पसरवायची. त्याचबरोबर त्या वर्गातील किंवा त्या समाज विभागातील काही व्यक्तींना आपल्या व्यवस्थेत सामावून घ्यायचे व आपल्या व्यवस्थेचे खंदे समर्थक बनवायचे. सगळ्यांत महत्त्वाचे हे की ह्या सर्व गोष्टी एकाच वेळी करायच्या. तसेच मध्यमवर्ग नावाच्या वर्गाचा आर्थिक स्तर खूप वाढवायचा. त्यात समाजशास्त्रीय परिभाषेतील उच्च मध्यमवर्गही तयार करायचा, जो पुन्हा या भांडवली समाजवव्यवस्थेचा समर्थकच होईल. या सर्वांनी मिळून बाजार, जुगारी भांडवल, स्टॉक एक्सचेंज हे सर्व प्रकार शोषित, पीडित वर्गांना स्वीकारायला लावायचे. आणखी एक करायचे. परशुरामाने जशी पृथ्वी निःक्षत्रिय करण्याचा पण केला होता तसा, ही पृथ्वी कामगारविरहित करण्याचा भांडवलदारवर्गाने पण करायचा आणि रोज नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अं लात आणायचा. हे सारे करणे म्हणजे भाडवलशाहीने रोज क्रांतिप्रवण होणे होय. भांडवलशाहीतील क्रांती ही जेव्हा त्यांचे हितसंबंध राखण्यासाठी असते, तेव्हा ती अशाच पद्धतीने जगभर घडत असते. एकाच नाण्याच्या दोन बाजू.

सर्वसामान्य माणसांनाच काय तर बऱ्याच विचारवंतानादेखील एक नवीन जग जन्माला आलेले आहे, एक नवीन जागतिक व्यवस्था जन्माला आली आहे असे वाटते, त्याचबरोबर एका इतिहासाचा, एका विचारसरणीचा अंत झाला आहे असेही वाटते. खरे तर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुन्हा एकदा हे मार्क्सचे मोठेपणच आहे की एका ग्रंथात, एका वेगळ्या संदर्भात तो म्हणतो, की विचारसरणीशी निगडित जाणीव ही खोटी जाणीव आहे. ह्या विचारसरणीचा अंत झाला आहे असे ज्यांना वाटते त्यांच्यासमोर जी विचारसरणी असते, किंवा आहे असे त्यांना वाटत असते, जी त्यांच्या दैनंदिन व्यवहारात स्पर्श करून जात असते, तिची जाणीव ही खोटी जाणीव आहे. ती शास्त्रीय समाजवादी जाणीव नाही. ती बाजाराभिमुख भांडवली जाणीव आहे.

भविष्यवाणी
भांडवलशाही इतिहासजमा झाल्यानंतरही, तिचे नुसतेच वर्तान नव्हे तर भविष्यही शाबूत राहावे ह्या विचाराने पछाडलेल्या भांडवली अर्थतज्ज्ञांनी व विचारवंतानी इतिहासाचा अंत झाला आहे, विचारसरणीचा अंत झाला आहे’ अशी वानवाणी करायला सुरुवात केली. ही वर्त निवाणी कुठल्याही ज्योतिषाने केलेल्या भविष्यवाणीइतकीच अशास्त्रीय व अस्थानी श्रद्धेला खतपाणी घालणारी आहे. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. भांडवलशाहीतील पैस नुकतीच बातमी आली आहे, की शमी या काश्मीरी गोलंदाजाने वेस्ट इंडीजविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली. आता जम्मू काश्मीर हा तसा ज्वलंत प्रश्न आहे. त्यातील अस्थिरता, अशांतता, दहशतवाद, अतिरेकी हल्ले, सैन्याचे हल्ले, प्रतिहल्ले, खरे-खोटे एनकाऊंटर्स, या पोर्शभू ीवर शमीसारख्या काश्मीरी तरुणाची भारतीय क्रिकेट चमूत निवड होणे आणि गोलंदाज म्हणून त्याचा सन्मान होणे हा भांडवलशाहीनी शमी या मुस्लीम तरुणाला दिलेला पैस आहे. दोन हजार दोनमध्ये गुजरात दंगलीच्या पोर्शभू ीवर बडोद्याच्या इरफान पठाण या मुस्लिम गोलंदाजाला तसाच पैस मिळाला होता. आजही दलितांवर अत्याचार होत आहेत, दलित स्त्रियांवर बलात्कार होत आहेत. काही गावांत तात्कालिक का होईना, दलितांवर बहिष्कार टाकला जात आहे. या पोर्शभू विर अर्थतज्ञ म्हणून नरेंद्र जाधव, अर्थतज्ज्ञ व राजकारणी म्हणून भालचंद्र मुणगेकर हे जागतिकीकरणाचे पण निधर्मवादाचे मुखंड म्हणून पुढे येत आहेत. त्याच वेळी रामदास आठवले भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी करून सत्तेत येण्याची स्वप्ने पहात आहे. केवळ प्रज्ञा दया पवार वा ऊर्मिला पवार नव्हे तर मराठी दलित लेखिका मराठी साहित्यात महत्त्वाचे योगदान करीत आहेत. युसुफ मलाला सारखी मुलगी मुस्लीम भांडवलीजगाचा विरोध पत्करून, शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द बाळगून त्यासाठी बरीच मोठी किंमत चुकवीत आहे. चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा व उच्चशिक्षित स्त्रिया कॉर्पोरेट जगतात उच्च पदावर पोहोचरा असल्याच्या बातम्या आपण एकाच वेळी वापराऐक त आहोत.

दहा बाय बाराच्या खोलीत राहाणारे धीरुभाई अंबानी मोठे उद्योगपती होतात, शिवाजी साटम हा गिरणीकामगारांचा मुलगा मोठा नट, तर भरत जाधव हा टॅक्सीवाल्याचा मुलगा सुपरस्टार होतो. शिवाजी पार्कच्या साध्या मध्यमवर्गीय ब्लॉकमधून मातोश्रीपर्यंतचा बाळासाहेबांचा प्रवास हा तर भांडवलशाहीचा चमत्कारच आहे. नारायण राणे, मनोहर जोशी, छगन भुजबळ यांचा प्रवास तर रॅग्ज टू रिचेस अमेरिकन रो न्स या शैलीचा आहे. म्हणजे भांडवलशाही जागतिक झाल्याचे हे चिह्न आहे. ती अमेरिका वा युरोपपुरती सीमित नाही. तसेच मदर टेरेसा, सिंधुताई सकपाळ, बाबा आमटे, विकास आमटे हे सर्व प्रामाणिक,तळमळीचे लोकसेवकही भांडवलशाही टिकवण्यास कारणीभूत ठरतात. हा पैस भांडवलशाहीच्या कुठल्याही राज्यव्यवस्थेत त्या-त्या देशातील सर्व समाजसेवकांना मिळतोच मिळतो. त्याला वैधानिक, संसदीय, न्यायालयीन, कायदेशीर आधारही असतो. वैशिष्ट्ये आणि सर्वसामान्यता भांडवलशाही प्रत्येक देशातील वैशिष्ट्ये आणि सर्वसामान्यता ओळखण्यात अतिशय वाकबगार असते. अमेरिका-युरोपमधील वैज्ञानिक संशोधनवृत्ती भांडवलशाहीने बरोबर ओळखली. म्हणून तर तिने स्टीफन हॉकिन्ससारख्या बहुविकलांग शास्त्रज्ञाला तंत्रदृष्ट्या सुसज्ज करून संशोधन करायला प्रोत्सहित केले. वंशभेद, वर्णभेद, लिंगभेद पेटत ठेवणारी हीभांडवलशाही कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या स्त्रियांना अवकाशात पाठवते. तसेच भारतातील प्रज्ञा ही संगीत-नृत्यातून अभिव्यक्त होते हे जाणून, पंडित रविशंकर, झकीर हुसेन यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संगीतकारांचा मान देते. बंगाली चित्रपट काढणाऱ्या सत्यजित रे यांना आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून देते. इतकेच काय, तालिबानी प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या भांडवलशाही इराणी सिने निाही आंतरराष्ट्रीय सन्मान देते. कृष्णवर्णीय मायकेल जॅक्सनला ती आपला रंग बदलायला लावते, पण सेरेना विल्यम्स व तिच्या बहिणीला त्यांची कृष्णवर्णीयता कायम राखून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे टेनिसपटुत्व बहाल करते. कृष्णवर्णीय मरियम मकेबाला मोठी गायिका म्हणून मान्यता देते. नेल्सन मंडेलाना तीस वर्षांचा तुरुंगवास भोगायला लावून मुक्त करते व पाठोपाठ दक्षिण ऑफ्रिकेलाही गोऱ्यांच्या मक्तेदारीतून सोडविते. ऑफ्रिकेतला वर्णभेद कायमचा कायदेशीररीत्या मिटवते. ही व्यवस्था मार्टिन ल्यूथर (ज्युनिअर)चा खून करते. मात्र त्याचबरोबर ऑफ्रिकन अमेरिकनांना सकारात्मक कृतीतून समावेशकता मिळवून देते. जगातील सर्व मोठी शहरे — मग ते न्यूयॉर्क असो, लंडन वा मुंबई — बहुभाषिक, बहुधर्मीय, एवढेच नव्हे तर बहुदेशिक करते. हे करत असताना मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात शिवसेनेसारख्या प्रांतिक अस्मितावादी संघटनाही निर्माण करते.

वचक आणि प्रतिवचक
भांडवलशाहीत कितीही आंतर्विरोध असले, शत्रुभावी आंतर्विरोधांना तात्पुरते का होईना अशत्रुभावी करण्याची कितीही ताकद असली, तरीही भांडवलशाही टिकते ती तिच्याभोवती आपल्याच व्यवस्थेवर वचक आणि प्रतिवचक ठेवणाऱ्या, तिनेच निर्माण केलेल्या संस्थास घटना ळे. त्यात छापील व इलेक्ट्रॉनिक माध्यमे महत्त्वाची. पर्यायी माध्यमे, गैरसरकारी संस्था ह्या भांडवलशाहीच्या आभासी विरोधात उभे केलेल्या आहेत. त्यामुळे भांडवलशाही स्वतःमध्ये सतत बदल घडवून आणू शकते. भांडवलशाही रोज क्रांतिप्रवण ह्याचा अर्थ हाच.

वैश्विक दृष्टिकोन
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवलशाही हा एक वैशिक दृष्टिकोन आहे. त्याला एकच एक विचारसरणी किंवा तत्त्वज्ञान नाही. ती स्वतःसाठी सर्व प्रकारच्या विचारसरणी वापरू शकते. हीच तिची ताकद आहे. म्हणून बेकारी, आर्थिक अरिष्ट, सामाजिक हाहाकार, रानटीपणा हे सारे असूनही, या सर्वांसोबत सभ्यता व सुस्कृतता आपल्या व्यवस्थेत नांदू शकेल अशी एक आभासी वास्तवता ती सतत पुढे आणत असते. त्यासाठी ती कधी महात्मा गांधींचा आधार घेते तर कधी मार्टिन ल्युथर किंगचा. कधी येशू ख्रिस्ताचा, कधी गौतम बुद्धाचा, तर कधी पैगंबराचा. एवढेच काय तर मार्क्सचादेखील उपयोग करता येईल का याची चाचपणी ती सतत करत असते. म्हणून तर राम जेठमलानीसारखे साम्यवाद-विरोधी विचारवंत वकील म्हणतात, भांडवलशाहीला साम्यवाद्यांनी मानुष केले आहे. हे त्यांचे योगदानच म्हणावे लागेल. परंतु मार्क्सवादी म्हणून आम्ही राम जेठमलानींनी आम्हाला दिलेले प्रशस्तीपत्र नाकारतो. कारण भांडवलशाहीइतकाच शास्त्रीय समाजवाद, समाजशाही हा पण एक वैशिक दृष्टिकोन आहे. लोकाना वाटते तसे त्यांच्याकडे फक्त एकच एक विचारसरणी वा तत्त्वज्ञान नाही, तर जगातील अनेक पुरोगामी विचारसरणी व तत्त्वज्ञाने एवढेच नव्हे तर प्रत्येक धर्माचे मुक्तिदायी धर्मशास्त्र, आपल्यामध्ये सामावून घेण्याची ताकद शास्त्रीय समाजवादात आहे. म्हणूनच जगातील सर्व जातीच्या, सर्व वर्णाच्या, सर्व वंशाच्या स्त्रिया, दलित, कृष्णवर्गीय व प्रत्येक देशातील अल्पसंख्याक ह्यांना बरोबर घेऊन, त्याचबरोबर समलिंगी, शारीरिक व मानसिक अक्षमांना सोबत घेऊन, बौद्धिक व शारीरिक श्रम करणाऱ्या कामगार वर्गाच्या पुढाकाराने भांडवली वैशिक दृष्टिकोनाला आह्वान देऊन, चेकमेट करण्याची क्षमता शास्त्रीय समाजवादी वैश्विक दृष्टिकोनात आहे.

एक समस्यामात्र — तात्पुरती का होईना, पण आहे. ती म्हणजे आज जगातील भांडवलदार एक झाले आहेत. जगातील कामगार मात्र देशातच नव्हे तर गावा-गावांत विखुरलेले आहेत. या सर्वाना एक व्हायलाच हवे. व ते होणारच. कारण यात केवळ त्यांचेच नाही तर समाजाचे हित आहे. शास्त्रीय समाजवाद हा समाजवाद आहे, कामगारवाद नाही. म्हणून लेखाचा शेवट करताना रोझा लुक्झेंबर्गला उद्धृत करतो. कामगारवर्गाने स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी समाजवाद आणणे आवश्यक आहे; नाहीतर भांडवलशाही रानटी अवस्थेत जाईल. आज आपण ही रानटी अवस्था अनुभवीत आहोत. म्हणून मार्क्स काय म्हणतो ते नीटपणे समजून घेतेले पाहिजे. तो म्हणतो, समाजाला मुक्त करूनच कामगार आपली मुक्तता करू शकतात. म्हणून जगातील कामगारांनो, एक व्हा.

३३५/ए, अनंत निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई -४०००२८.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.