विषय «खा-उ-जा»

कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग

कृत्रिम बुद्धिमत्ता, औद्योगिक विकास आणि निरूपयोगी समाजाचे वरदान

जोपर्यंत समाजातील सर्वांत वरच्या कुलीन वर्गाच्या हितसंबंधांना बाधा येत नाही, तोपर्यंत ती घटना चर्चेच्या केंद्रस्थानी येत नसते. कुलीन वर्गाचा विकास म्हणजे संपूर्ण समाजाचा विकास आणि कुलीन वर्गाचे नुकसान म्हणजे ते सर्व समाजाचे नुकसान, अशी एक धारणा जाणीवपूर्वक तयार करण्यात आलेली आहे. कुलीन वर्गातील एका व्यक्तीवरील संकट हे संपूर्ण देशावरील संकट असल्यासारखा प्रचार केला जातो. आपण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचे परिणाम याविषयी चर्चा करण्यापूर्वी हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. कुलीन वर्गाचे हितसंबंध धोक्यात येण्याची शक्यता दिसत नव्हती, तोपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) विकास आणि वापर सरळसोटपणे सुरू होता.

पुढे वाचा

लोककल्याणाचे खाजगीकरण अजून झाले नाही

गेले अनेक दिवस राज्यातील एस.टी. कामगारांचा संप सुरू आहे. विलीनीकरण व्हावे म्हणून हा संप सुरू आहे. एस.टी. सरकारची आहे. विलीनीकरण सरकारमध्ये हवे आहे. म्हणजे एस.टी. कामगारांना आपण सरकारचा भाग आहोत असे वाटत नाही. त्यांना तसे वाटावे ही सरकारची जबाबदारी आहे. कामगारांना तसे का वाटत नाही? याचे उत्तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळाले. विलीनीकरण करता येणार नाही असे तीन सदस्यीय समितीने सांगितले. मंत्री त्याच्यापुढे गेले आणि एस.टी.चे खाजगीकरण करू या म्हणू लागले. आपण सरकारी नाही असे कामगारांना का वाटते याचे उत्तर मिळाले. एस.टी.चे खाजगीकरण आधीच सुरू झाले आहे असे सांगितले गेले.

पुढे वाचा

कोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे

अरिष्टांच्या काळात माणसाला सुस्पष्ट आत्मविश्वासाची आणि डोळस आशावादाची गरज असते. कोविड-१९ अरिष्टाने आपल्या पूर्वश्रद्धा, विश्वास आणि समजुतींमध्ये आमूलाग्र बदल घडविला आहे. प्रत्येक अरिष्टाप्रमाणेच कोविड-१९ अरिष्ट हे सुद्धा ‘मानवी कृतीमागच्या प्रेरकशक्तीं’तून (Spring of human action) उद्भवले असून, मानवाने आपल्या ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या जोरावर भौतिक जगावर आणि निसर्गसृष्टीवर मिळविलेल्या आणि उत्तरोत्तर वाढतच जाणाऱ्या वर्चस्वाचे ते फलित आहे. या अरिष्टाच्या दीर्घकालीन व विशेषतः आर्थिक परिणामांविषयी तज्ज्ञांमध्ये विचारमंथन सुरू झाले असून, संभाव्य उपायांची मांडणी केली जात आहे. भारतात, अल्पकाळात लोकांना रोजगार देऊन दीर्घकाळात त्यांची क्रयशक्ती/मागणी वाढवणारे अर्थधोरण स्वीकारावे की आधी लोकांच्या जीविताला प्राध्यान्य द्यावे, हा एक मोठाच पेचप्रसंग आहे. हा प्रश्न राज्यसंस्थेच्या व अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाचा आहे. कोरोना महामारीनंतर जगात सामाजिक पुनर्रचना करताना अर्थव्यवस्थेचे कोणते ‘प्रारूप’ (model) स्वीकारावे याचा विचार सुरू आहे, यासंदर्भातच आता आपण प्रमुख व्यवस्थाप्रकार व त्यांचा व्यक्तीच्या मनोरचनेवर होणारा परिणाम अभ्यासूया आणि अगदी संक्षेपात त्यांची तपासणी करूया. 

पुढे वाचा

भांडवलशाही हीच एक मोठी समस्या

पृथ्वीच्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालणारी भांडवलशाही – मग ती कार्पोरेट भांडवलशाही असो की ग्राहक (consumer) भांडवलशाही की क्रोनी कॅपिटॅलिझम, वा social, liberal , market economy इत्यादींपैकी कुठलीही असो – हीच एक फार मोठी समस्या आहे. भांडवलशाहीला जोडलेल्या या विशेषणांना दोष न देता मूळ नामपदाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे त्यामुळे सयुक्तिक ठरू शकेल. भांडवलशाहीतील पाठभेदांकडे बोट न दाखवता मूळ व्यवस्थाच आपल्या पृथ्वीला गिळंकृत करण्याच्या मार्गावर आहे याबद्दल अजिबात शंका नाही. आपल्याकडे या व्यवस्थेला दुसरा पर्यायच नाही किंवा इतर पर्यायांचा विचारच करायचा नाही असे म्हणत गप्प बसणे हीसुद्धा आत्मवंचनाच ठरू शकेल.

खरे पाहता आता साठ-सत्तरीच्या वयोगटात असलेल्या पिढीने आपल्या तारुण्यात या पृथ्वीला भांडवलशाही व्यवस्थेस जुंपवून फळे चाखल्यामुळे आता या व्यवस्थेला नाव ठेवण्याचा अधिकारही ही पिढी गमावून बसली आहे.

पुढे वाचा

पत्रोत्तर – व्हायरस असा कसा? प्राची माहूरकर ह्यांच्या लेखावर सुभाष आठले ह्यांचे उत्तर

प्राची माहूरकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये ‘मेकॉलेने तसे भाषण केलेच नव्हते, जीएम फूडमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही व शेतीमध्ये वापरली जाणारी खते, जंतुनाशके किंवा इतर प्रकारची रसायने यांमुळे कॅन्सर होत नाही’ असे जे माझे प्रतिपादन होते ते कोठेही नाकारलेले नाही, त्याअर्थी या तीन गोष्टींना त्यांची संमती आहे असे धरून चालायला हरकत नाही.

प्रथम जीएम फुड्स विषयी. आतापर्यंत माणसाने स्वीकारलेल्या कोणत्याही तंत्रज्ञानाविषयी त्याचा तीन-चार पिढ्यांनंतर माणसावर काय परिणाम होईल असा अभ्यास करून मग ते स्वीकारले असे एकही उदाहरण नाही व तसे करणे मला तरी अशक्यच दिसते.

पुढे वाचा

विश्वाचे अंगण : मायाबाजार आणि बाजारमाया – अतुल देऊळगावकर

‘क्षण एक मना बैसोनी एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे?’ चारशे वर्षांपूर्वी नामदेवांनी हा प्रश्न विचारला होता. ‘शब्दवेध’ संस्थेच्या ‘अमृतगाथा’मधून चित्रकार, गायक व लेखक माधुरी पुरंदरे यांनी या प्रश्नातील काकुळती त्यांच्या आर्त स्वरातून महाराष्ट्रभर पोहोचवली होती. नामदेवांच्या या प्रश्नाची तीव्रता अद्यापि वाढतेच आहे. आज करोनामुळे संपूर्ण जगाला स्वत:च्याच घरात राहण्याची सक्ती झाली आहे. अशाच काळात अशा प्रश्नांना आपण सामोरं गेलं पाहिजे. ‘मी, माझं सदन आणि माझं बाहेरचं जग’ यासंबंधीचे प्रश्न स्वत:ला विचारले पाहिजेत. त्यादृष्टीने आपत्ती ही एक संधी असते. आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या व बाजूला पडलेल्या प्रश्नांना भिडा असंच नामदेव सुचवत होते.

पुढे वाचा

व्हायरस असाही तसाही – प्राची माहूरकर

( ऑक्टोबर २०१९ च्या अंकात डॉ. सुभाष आठले ह्यांच्या ‘मेकॉले, जी एम फूड्स आणि कॅन्सर एक्सप्रेस’ ह्या  लेखावरील प्रतिक्रिया)

फार पूर्वी शेतीवर झालेल्या भयानक संक्रमणाचा कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने आढावा

ऑक्टोबर २०१९ च्या अंकात डॉ. सुभाष आठले ह्यांनी लिहिलेला ‘मेकॉले, जी एम फूड्स आणि कॅन्सर एक्सप्रेस’ ह्या  शीर्षकाचा एक अतिशय एकांगी असा लेख वाचनात आला. त्यात त्यांनी मेकॉले ह्यांच्या नावावर फिरत असलेल्या एका भाषणाचा उल्लेख करून, हे भाषण मेकॉले ह्यांचे नाही व तरीही त्यांच्या नावानिशी फिरत असल्याचा उल्लेख करताना हा अफवांचा व्हायरस भारतभर पसरला असे म्हटले आहे.

पुढे वाचा

सावरकर हे नवभारताचे राष्ट्रपिता, गांधी सावत्रपिता

सावरकर, गांधी, हिंदुत्ववाद, हिंदुधर्म, जागतिकीकरण

——————————————————————————–

         प्रख्यात मनोविश्लेषक-राजकीय भाष्यकार आशिष नंदी ह्यांची ही ताजी मुलाखत त्यांची मार्मिक निरीक्षणे, वादग्रस्त विधाने ह्यांनी भरलेली आहे. पण त्यापलीकडे जाऊन विचार केला तर तीतून आपल्याला परंपरा व भविष्य ह्यांच्याकडे बघण्याची मर्मदृष्टी सापडू शकते. वाचक ही चर्चा पुढे नेतील अशी अपेक्षा आहे.

——————————————————————————–

अश्रफ : आपले पुस्तक ‘Regions of Naricism, Regions of Despair’ याची सुरुवातच अशी आहे की, ‘या निबंधामध्ये मी अशा भारताबद्दल लिहिलेले आहे, जो 40 वर्षांपूर्वी मी ज्या भारताबद्दल लिहायचो त्याच्याहून खूप भिन्न आहे’.

पुढे वाचा

जागतिकीकरणाच्या आवारात खेडे

येत्या काळात चार मोठे औद्योगिक कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. पहिला दिल्ली ते मुंबई कॉरिडॉर, दुसरा अमृतसर ते कोलकाता, तिसरा चेन्न ते बंगलोर आणि चौथा मुंबई ते बंगलोर. यामद्ये देशाची 40 टक्के जमीन सामावलेली आहे. ही सर्व जमीन संपादित होणार नसली तरी त्या पट्ट्यात 100 शहरे नव्याने वसवली जाणार आहेत. त्यासाठी प्रचंड जमीन लागणार आहे. एकट्या दिल्ली ते मुंबई कॉरिडॉरचे प्रभावित क्षेत्र आहे 4 लाख 34 हजार 486 चौ.कि.मी. यामध्ये 24 विभाग पाडण्यात आले आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी जमीन संपादन होऊ घातले आहे.

पुढे वाचा

नवउदारमतवादाचा डांगोरा जरा जास्तच पिटला गेला आहे का?

खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खा-ऊ-जा)ने संपूर्ण जगाचा इतिहास बदलला व भौगोलिक सीमारेषा पुसून टाकल्या. नवउदारमतवादी अजेंडा स्वीकारून जगातील सर्व देशांनी एकाच पद्धतीने व एकाच दिशेने विकास साधला पाहिजे असा आग्रह धरणारे धुरीण आता ह्या अजेंड्याचा पुनर्विचार करून समुचित तेचस्वीकारण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. आय एम एफ ह्या शीर्षस्थ संस्थेतील तीन अतिशय ज्येष्ठ तज्ज्ञांनी विकासाच्या महामार्गाचा केलेला हा पुनर्विचारतुम्हाला अंतर्मुख करेल व तुमच्या मनात अनेक प्रश्नही जागवेल.
___________________________________________________
मिल्टन फ्राईडमनने १९८२ मध्ये चिलीचा गौरव ‘आर्थिक चमत्कार’ ह्या शब्दांत केला होता. त्यापूर्वी एक दशक आधीच चिलीने असे धोरण राबवायला सुरुवात केली होती, जिचा कित्ता आता जगभर गिरवला जात आहे.

पुढे वाचा