मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to Basic Technology- IBT)

विज्ञानाश्रम ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. तीमधील प्रयोग हे विविध चाचण्या, परीक्षण केल्यानंतरच स्वीकारले जातात. विज्ञानाश्रमातल्या एका वर्षाच्या DBRT (Diploma in Basic Rural Technology) अभ्यासक्रमातून मुले चांगली विकसित होतात, करियर घडवू शकतात असे लक्षात येत होते. मग मुलांनी नापास होऊन शाळेबाहेर पडूच नये यासाठी आश्रमाची अध्यापनपद्धत शाळेतच वापरता यावी आणि सर्व शालेय मुलांना तिचा फायदा व्हावा; अशा इच्छेने १९८७ पासून पाबळ गावातल्या शाळेत आठवी, नववी व दहावीच्या मुलांबरोबर काम करायला विज्ञान आश्रमाने सुरुवात केली. पुढच्या दोन वर्षांत आणखी दोन गावांत प्रयोग सुरू झाले. व त्यातून ‘ग्रामीण तंत्रज्ञान’ अभ्यासक्रम तयार झाला. अभ्यासक्रमासाठी SSC बोर्डाकडून परवानगी घेतल्यावर डॉ. कलबाग स्वतः शाळेत शिकवत असत. त्यांनी गणित, शास्त्र या विषयात मुलांची समज कशी वाढते याचा रीतसर नोंदी ठेवून ३ वर्षे अभ्यास केला. इ.स. १९९० मध्ये डडउ बोर्डाच्या समितीने केलेल्या ह्या प्रयोगाच्या परीक्षणातून, तो सर्वांसाठीच उपयुक्त असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ‘ग्रामीण तंत्रज्ञान’ हे नाव बदलून ‘मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ (Introduction to Basic Technology (IBT)) असे करण्यात आले. आश्रमाची मूलभूत तत्त्वे १) हाताने काम करत शिकणे २) बहुविध कौशल्यांचे शिक्षण ३) निदेशक हा उद्योजक असणे ४) शाळेतून गावाला लोकोपयोगी सेवा देणे
ही येथेही कायम होती. अभियांत्रिकी, ऊर्जा-पर्यावरण, शेती-पशुपालन, गृह-आरोग्य या चार विभागां धील मूलभूत कौशल्यांचे व तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण IBT मध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते. इ.स.१९९० मध्ये तो पथदर्शी प्रकल्प म्हणून १५ शाळां ध्ये राबवायचे ठरले तेव्हा विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने त्याला आर्थिक मदत केली.
अभ्यासक्रमाचे निदेशक:
गावाबाहेरून शिक्षक आणणे योग्य नाही, ते गावातूनच तयार व्हायला हवेत हे कळले. प्रत्येक गावात जाणकार शेतकरी, पशुपालक, लोहार, सुतार, कुंभार असे कसबी कारागीर उपलब्ध होते. ते औपचारिक शिक्षक नसले तरी त्यांच्याकडे अनुभवांतून आलेले ज्ञान होते. शाळेतील विषय शिक्षकांकडे पुस्तकी ज्ञान असले तरी कौशल्ये नव्हती. या दोहोंची सांगड घालून शाळेत आयबीटी अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली. तसेच गावातील काही तरुणांना व्यवसाय करायची इच्छा होती, पण पैसा-जागा-साधने-हत्यारे यांचे पाठबळ नव्हते. त्यांना शाळेने संसाधने पुरवली आणि शिकाऊ उद्योजक म्हणून शाळेतल्या मुलांना शिकवण्याच्या निमित्ताने, उत्पादक-कामात सहभागी करून घेतले. प्रशिक्षण-कार्यदर्शिका तयार झाली. मुलांशी कसा संवाद साधावा, स्वच्छता, सुरक्षितता कशी सांभाळावी ह्याची व्यवसायिक मानके बनली. शाळेतले बाक, खुर्ष्या, वॉश बेसिन, संडास, हातगाडी (व्हीलबॅरो) कसे बनवायचे त्याचे आराखडे, काही अवघड प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ बनवले गेले. विज्ञानाश्रमाच्या वातावरणातून आणि सहनिवासातून अनेक मूल्ये अनौपचारिकपणे निदेशकांना दिली जातात. सुरुवातीला आश्रमात डी.बी.आर.टी. केलेली मुलेच निदेशक म्हणून काम करत. नंतर गावात उपलब्ध असलेल्या कारागीरांनाच आश्रमात प्रशिक्षित केले जाऊ लागले. बरेच निदेशक हे स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी शाळा सोडतात. त्याचा अप्रत्यक्षपणे मोठा फायदा झाला. गावाला उद्योजक मिळाले व नवीन निदेशकां ळे नवीन कल्पना, लोकोपयोगी सेवांचा कार्यक्रमात समावेश होत राहिला. आयबीटी निदेशकांकडून, त्यांच्या बोलीभाषेध्येच प्रात्यक्षिकांसाठी पुस्तके लिहून घेतली. पुस्तक-तपासणी समितीतील एक तज्ज्ञ सदस्य पु. ग. वैद्य ह्यांनी ह्या धोरणाचे कौतुक केले.
अभ्यासक्रम आणि मूल्यशिक्षणः
हाताने काम करताना अनेक मूल्ये विकसित होतात. सर्व संतांचे साहित्य आपल्याला मूल्यविचार देते. चोखामेळा, कबीर, जनाबाई, गोरा कुंभार, सांवतामाळी, बहिणाबाई ह्या सर्वांना झालेली अनुभूती ही त्यांच्या कामातूनच झाली होती. आयबीटीच्या शिक्षक/निदेशकांनी, गटागटाने काम करून, गावाला सेवा देऊन मोबदला मिळवला. त्यामुळे संघभावना तयार झाली. एकमेकाला मदत करणे, एखाद्याची ताकद कमी असेल, तर त्याचे दुसरे एखादे कौशल्य शोधून काढणे, संघात प्रत्येक जण महत्त्वाचा आहे व प्रत्येकाला एकमेकाची गरज असते हे समजणे ही ‘मूल्ये’ आहेत. जळगावजवळच्या खिरोदा गावात आयबीटी शाळा आहे. एकदा आम्ही शाळेत गेलो असताना भिंतीला प्लास्टर करायचे काम चालले होते. पँट गुडघ्यापर्यंत गुंडाळून, बाह्या वर सारून एकजण प्लास्टर करत होते. आणि मुले त्यांच्याकडून शिकत होती. नंतर कळले की ते शाळेचे मुख्याध्यापक होते. प्लास्टर चांगले कसे करायचे ते शिकवत होते. श्रमप्रतिष्ठा ही अश्या वर्तणुकीतून रुजते.
शाळा आणि समाज :
‘गावाला सेवा देणे’ हे आयबीटी चे मुख्य तत्त्व आहे. सेवा देताना विद्यार्थ्यांना गावातील परिस्थितीचे / गरजांचे भान येते. उदा. आयबीटीत गावातल्या लहान मुलांच्या आरोग्याचा सर्व्हे केला जातो. त्यात त्यांची वजन-उंची-हिमोग्लोबिन मोजून नोंदवून त्याचा आलेख काढला जातो. शाळेतली मुले जेव्हा हा सर्व्ह करायला वस्त्यां ध्ये जातात, तेव्हा ती वेगवेगळ्या परिस्थितींतील मुले पहातात, त्यांची वजने घेतात तेव्हा त्यांना वास्तव दिसते, त्यांच्या मनात प्रश्न उभे राहतात. आपोआपच एक जाणीव निर्माण होते. शोषखड्डे करणे, अर्थिंग तपासणे, विहिरींच्या पाण्याची पिण्यायोग्यता तपासणे अशा सेवाही आयबीटीतून दिल्या जातात. इ.स. १९९५ पर्यंत अशा प्रकारे आयबीटी अभ्यासक्रम व अंलबजावणीची योजना पूर्णपणे तयार झाली आणि २००१ पर्यंत तेवीस शाळांत आयबीटी कार्यक्रम राबवला गेला.
अभ्यासक्रमाची गुणवत्ता :
शिकवण्याचा दर्जा कसा राखण्यासाठी मल्टिमीडिया सीडी तयार करण्याचा नवा प्रयोग सुरू झाला. त्यासाठी आश्रमातून मराठी, हिंदी भाषेत अशा सीडी तयार करण्यात आला. शिक्षकांना स्वत:चा पाठ तयार करता यावा यासाठी “Reality Learning Engine (RLE)’ हे सॉफ्टवेअर बनवले. संगणकाच्या पडद्यावर काम करून बघता येईल अशी रचना केली. ‘पॉवर पॉइंट लेसन’ बनवले. हिमोग्लोबिन कसे तपासावे, रक्तगट कसा तपासावा, ‘स्टोव्ह’चे कार्य कसे चालते, असे धडे तयार होऊ लागले. संगणकाची देखभाल, दुरुस्ती, वापर, बेसिक इंग्लिश अशा विविध सीडी आश्रमाने बनवल्या. विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्याची सोयसुद्धा या सॉपरटवेअरमध्ये होती. दुसरीकडे निदेशकांच्या अडचणी सोडवण्याचेही प्रयत्न चालू केले. दहा शाळां गे एक क्षेत्रीय अधिकारी, शाळांना भेट देऊन अडीी सोडवण्यासाठी नियुक्त केला. शाळांसाठी एक ‘आय.बी.टी वार्तापत्र’ चालू केले, त्यातून संवाद होऊ लागला. इंटरनेटच्या माध्यमातून शाळांसाठी संपर्क व तांत्रिक सल्ला देणारी यंत्रणा राबवण्याचा प्रयोग सुरू झाले. पुढे www.aaqua.org नावाची वेबसाईट या प्रयत्नातून २००६ मध्ये सुरू झाली. प्रयोगाकडून सार्वत्रिकीकरणाकडे इ. स. २००१ मध्ये टाटा ट्रस्टचे अनुदान संपले. तेव्हा डॉ. कलबागांनी शाळांना सांगितले की यापुढे आयबीटी अभ्यासक्रम शाळांनी स्वबळावर चालवावा.
त्याप्रमाणे शाळांनी स्वतः होऊन तो चालू ठेवला. उपयोगी असेल तर तो टिकेल अशी आमची भूमिका होती. २००३ मध्ये वर्ल्ड बँकेच्या Development marketplace स्पर्धेत, आयबीटी या कार्यक्रमासाठी भाग घ्यायचा असे आम्ही ठरवले. १००० शाळांधे हा कार्यक्रम राबवण्यासाठी प्रकल्प तयार केला. आयबीटी कार्यक्रम विविध टप्प्यांवर — आधी आश्रमात, मग तीन शाळांत मग २३ शाळांत राबवला गेला होता. संपूर्ण महाराष्ट्रातील १८,००० शाळांध्ये तो राबवण्याची ही पहिली पायरी होती. स्पर्धेध्ये तो स्वीकारला गेला नाही असे जुलै २००३ मध्ये समजले. पण डॉ. कलबागांचा याबद्दलचा उत्साह कायम होता. Though we could not make it to the final, I have not lost zeal for the program. Its my life’s mission. असे ते म्हणाले. त्यानंतर सहा दिवसांत ३० जुलैला मुंबईत डॉ.कलबागांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी सुचवल्याप्रमाणे माझी संचालक म्हणून नेणूक झाली. नंतर केलेल्या पाहणीत असे आढळले की २३ पैकी १६ शाळांनी तो अभ्यासक्रम अनुदानाशिवाय, स्वबळावर, तीन वर्षे चालू ठेवला होता. म्हणजे आम्हाला ७०% पेक्षा जास्त यश हे Sustainability वर मिळाले होते. आयबीटी पुढे नेणे हे आता नक्की झाले होते. डॉ. कलबागांनी हजार शाळांचा प्रकल्प केला होता, तरी त्यांच्या पश्चात शंभर शाळांचा प्रकल्प करायचे मी ठरवले. महाराष्ट्रात अनेकांना खइढ अनेक प्रकारे माहीत झाले. बऱ्याच शाळांनी संपर्क साधला. नेहमीच्या शाळेतसुद्धा ‘काम करत शिकवता’ येते हा विशास हळूहळू तयार होऊ लागला. २००७ ते ११ पर्यंत अशा ४५ शाळांना लेन्ड अ हॅण्ड ह्या अमेरिकेन संस्थेने व नंतर इतर संस्थांनीही मदत दिली. नंदुरबार-धुळे भागातल्या २५ शाळांना ‘सुझलॉन’ ने मदत दिली. त्या भागात त्यांच्या पवनचक्क्या होत्या.
‘बायर क्रॉप सायन्सेस’ने कर्नाटकातल्या ७ शाळांना मदत दिली. तिथे बालमजूर मुलांचा प्रश्न होता. आता छत्तीसगढ, गोवा इथेही आयबीटी राबवणाऱ्या शाळा आहेत. काही संस्था तर स्वतंत्रपणे आयबीटी राबवत आहेत. कुठल्याही संस्थेला सहजपणे अनुकरण करता येईल या टप्यावर आयबीटी आला आहे. नित्य नयी आयबीटी दोन हजार पाचचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार होत असताना ‘कार्य आणि शिक्षण’ या कार्यगटासमोर आम्ही आयबीटी चे सादरीकरण केले. डॉ.अनिल सदगोपाल यांनी सांगितले की तुचा हा कार्यक्रम ‘नई तालीम’च्या । दिशेने चालला आहे, परंतु तेथपर्यंत पोहोचण्यासाठी अजून बरेच काम करायला लागेल. मग मी कामाला लागलो. डॉ. कलबागांच्या काही लेखां ध्ये गांधीजींच्या शिक्षणविचारांचा संदर्भ होताच. मग भाषा, इतिहास, मूल्यशिक्षण या अभ्यासक्रमातील गोष्टींचा, नवीन तंत्रज्ञानावर आधारित ‘उत्पादक कामांशी’ समवाय करायचा प्रयत्न करू लागलो. पाबळमध्ये प्रयोग करू लागलो. त्यातून सध्या ‘ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस’ (मुक्त अध्ययन स्रोत) जएठ तयार होऊ लागले आहेत. कोणताही पाठ्यांश हा समाजाशी आणि कामाशी कसा जोडायचा याचे काम आता चालू झाले आहे. उत्पादक-कामातून शिकवणे हे बऱ्याचदा शिक्षकाच्या सर्जनशीलतेवर, कल्पकतेवर अवलंबून असते. मात्र जएठ मुळे शिक्षकाला मदत मिळू शकते. यासाठीची वेबसाइट .learningwhiledoing.in आता तयार होत आहे. एकूणात आयबीटीचा प्रवास आता ‘नई तालीम’ च्या दिशेपर्यंत आलेला आहे. मी ‘उत्पादक-कामातून शिक्षण’ या विषयात जेवढे काम करत आहे, तेवढा माझा या संकल्पनेवरील विशास दृढ होत चालला आहे. आता आयबीटी राबवणाऱ्या १२२ शाळा झाल्या आहेत, पण महाराष्ट्रात १८००० आणि भारतात २ लाख शाळा आहेत हे वास्तव लक्षात घेता, आत्मसंतुष्ट राहणे शक्यच नाही. प्रत्येक कल्पना ‘साकारण्या’ची एक वेळ असते, तशी आयबीटी या कल्पनेची वेळ आलेली आहे असे मला वाटते. ‘लक्ष्य’ किती जवळ आहे, ते मात्र सांगता येत नाही. विज्ञान आश्रम, पाबळ योनिशुचितेच्या कल्पनेचा पहिला परिणाम म्हणजे जन्माबरोबर चिकटून येणारी जात आणि दुसरा प्रभाव म्हणजे स्त्रियांचा दुय्यम दर्जा व त्यांच्या मनावर असलेले भीतीचे राज्य. कोणीही पुरुष आपल्यावर बलात्कार करील आणि कोणी आपली खोटी बदनामी करील ह्याची भीती. द्वा दोन भीतींमधून कोणत्याही वयाच्या व सांपत्तिक स्थितीच्या स्त्रिया सुटल्या नाहीत. मुलींना जरा समजू लागल्यावर त्यांच्या बोकांडी जी भीती बसते, ती मरेपर्यंत त्यांची सोबत करते. निष्ठेबद्दल शंका घेऊन कोणालाही वाकवता येते. स्त्रियांना सतत नम्र ठेवण्यासाठी पुरुषांनी हा डाव रचला आहे असे माझे मत आहे. – दिवाकर मोहनी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.