पुस्तक परिचय

काबाचा पवित्र काळा पाषाण मुळात अल्-उझ्झा या अरबस्तानच्या आद्य मातृदेवतेचे प्रतीक होता —- ‘अरबस्तानची महादेवी सर्वसामान्यपणे अल्-उझ्झा या नावाने संबोधली जाई. अल्-किंदी आपल्याला सांगतो की, अल्-उझ्झा म्हणजे चंद्र. तिचे मुख्य मंदिर, आठा अरबस्तानचे सर्वांत प्रसिद्ध व पवित्र स्थान, मक्केचे काबा हे होते. या पवित्र स्थानाचे वतनदार असलेला कुरेश गण (कबीला) इस्लामपूर्व काळात तिचा पुरोहितवर्ण होता आणि म्हणूनच त्याला ‘अब्द अल्-उस्सा’, ‘अल्-उझ्झाचे दास’, अशी पदवी होती. पण मक्केच्या मंदिरात तिची प्रत्यक्ष सेवा वृद्ध पुजारिणी करीत. अजूनही काबाच्या पालकांना बनु साहेबाहू, ‘म्हातारीची मुले,’ असे ओळखले जाते…. काबात या महादेवीची पूजा एका पवित्र पाषाणाच्या रूपात केली जात असे, आणि इस्लामला पवित्रतम असलेला सुप्रसिद्ध काळा पाषण तोच आहे यात शंका नाही. सर्व अरबी गणांचे समान धर्मबंधनाद्वारे राजकीय ऐक्य घडवून आणायच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या मुहम्मदाने जरी जुन्या धर्माच्या सर्व जुन्या ‘मूर्ती’ नष्ट केल्या, तरी जुन्या धर्माची ही पवित्रतम वस्तू वा प्रतीक नष्ट करणे मात्र त्याने अनावश्यक व अव्यवहार्य मानले. जगाच्या कानाकोपऱ्यांतून मक्केला जाणाऱ्या मुस्लिम यात्रेकरूंचे अजूनही मुख्य उद्दिष्ट असते अरबस्तानच्या महादेवीच्या या प्राचीन प्रतिमेचे चुंबन घेणे. सेटिक व ग्रीक देशांधल्या इतर मंदिरांप्रमाणे या देवीचा शंकुआकारी पाषाण एका पवित्र जलस्रोतापाशी वा विहिरीपाशी : झम्झम्पाशी, उभा होता, जिचे पवित्र पाणी सर्व सच्चे मुस्लिम पीत असतात….
– शरद पाटील (दास-शूद्रांची गुलामगिरी मधून) ****** पुस्तकपरीक्षण/परिचय बाईमाणूस – करुणा गोखले अनुराधा मोहनी

बाईमाणूस हे करुणा गोखले ह्यांचे स्त्रीवादावरील पुस्तक नुकतेच वाचनात आले. बाई ही माणूस असते ह्याची आठवण पुन्हा एकदा करून देण्यासाठी ते लिहिले आहे. पुस्तकावर माणूस म्हणून जगण्याची बाईची धडपड समजून घेताना अशी तळटीप व रविमुकुल ह्यांचे आपल्याच हाताने कान बंद केलेल्या एका सामान्य भारतीय स्त्रीचे आकर्षक चित्र असलेले मुखपृष्ठ. त्यामुळे ते झटकन वाचायला उचलून घेतले.
स्त्रीमुक्तिवाद हा १९६० च्या सुारास जन्माला आला. फ्रेंच विदुषी सिमॉन दि बोहुव्हा हिने द सेकंड सेक्स हे बहुचर्चित पुस्तक लिहिले, तीच त्याची सुरुवात म्हणता येईल. त्या काळात जगावर मार्क्सवादाचा विलक्षण प्रभाव होता. औद्योगीकरणामुळे उत्पादन व अर्थव्यवस्था बदलून जगात बरीच उलथापालथ झाली होती. नव्या युगातील नवीन घटितांचा अन्वय लावण्यासाठी लोकांना मार्क्सवादाचा आधार वाटत होता. मार्क्सने भांडवलशाहीची शास्त्रीय समीक्षा करून कामगार हा शोषित वर्ग असल्याचे प्रस्थापित केले होते व जगातील कामगारांना, एक होऊन भांडवलशाही उलथून टाकण्याचे आवाहन केले होते. इतरही दलित-वंचितांचे लढे आकार घेत होते. अशा वेळी, मार्क्सवादातूनच प्रेरणा घेऊन स्त्रीवरील अन्यायाची व तिच्या दुय्यमत्वाची जाणीव करून देण्यासाठी स्त्रीमुक्तिवाद अवतरला. नंतर तो केवळ तिच्या मुक्तीपुरता न राहता अधिक व्यापक झाला. जगाकडे स्त्रीच्या नजरेतून बघा असा संदेश यूनोने दिला. तेव्हा त्या व्याप्तीचा निदर्शक म्हणून त्यासाठी स्त्रीवाद हा शब्द योजण्यात आला.
बाईमाणूस हे अभिजात स्त्रीमुक्तिवादावरचे किंवा नव्या भाषेत स्त्रीवादावरचे पुस्तक आहे. ह्या पुस्तकात अभिजात स्त्रीवादाची पद्धतशीरपणे मांडणी केली आहे. पहिल्या प्रकरणात विषयप्रवेश केला असून साध्या सोप्या शब्दांत स्त्रीमुक्तिवाद म्हणजे काय ते स्पष्ट केले आहे. त्यामध्ये तात्त्विक मांडणी व क्लिष्ट व्याख्या हे सर्व टाळून स्त्रीला मुक्तीची अनुभूती कशी येते व ती आणून देणारा विचार म्हणजे स्त्रीमुक्तिवाद असे म्हटले आहे. त्यानंतरची तीन प्रकरणे, स्त्रीमुक्तीचा लढा मुख्यतः ज्या तीन मुद्द्यांवरून छेडला होता, त्या संबंधात आहेत. स्त्रीदेह, कुटुंबसंस्था आणि स्त्रीशिक्षण. स्त्रीदेहाचे वस्तूकरण करण्याच्या विरोधात उभे राहून, कुटुंबसंस्थेत मुलीच्या आणि बाईच्या रूपातील स्त्रीवर होणाऱ्या अनन्वित छळास नकार देऊन आणि शिक्षणाचा आग्रह धरून स्त्रीमुक्तीवादाने आपली ध्वजा फडकवली होती. स्त्रीची निर्भर्त्सना ही स्त्रीदेहाच्या निर्भर्त्सनेपासून सुरू होते हे सांगून अनेक धर्मांनी मानवी प्रमाणदेह म्हणजे पुरुषाचा व स्त्रीदेह म्हणजे त्याचे विपथन (aberration) हाच समज कसा रुजवला आहे ते स्पष्ट केले आहे. स्त्री अबला कशी नाही, कष्टाची व श्रेयोहीन कामे तिच्याच माथी कशी मारली जातात, स्त्री ज्यांना बळी पडते अशा उपास, व्रतवैकल्ये, अंधाराच्या आत घरी परतण्याचे बंधन, पुनरुत्पादन, उपासमार व अॅनिमिया इ. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. त्याचबरोबर आजच्या युगात सडपातळ राहण्याच्या अवाजवी हट्टापायी स्त्रिया आपल्या तब्येतीचे कसे नुकसान करून घेत आहेत, तेही आहे. ‘कुटुंबसंस्था’ ह्या प्रकरणामध्ये स्त्रीमुक्तिवाद हा ‘कुटुंबसंस्था उद्ध्वस्त करायला निघालेला वाद’ आहे असे मानले जात असले, तरी १९६० ते ७५ मध्ये केलेले जहाल लेखन वगळल्यास नंतर असा अतिरेकी सूर काढलेला नाही हे सुरुवातीलाच स्पष्ट करून लेखिका कुटुंबसंस्था ही व्यावहारिक हेतूने निर्माण केलेली संस्था असून तीबद्दल अकारण भावुक न होण्याचे आवाहन करते. विवाहोपरांत एक स्त्री व तिचा पती (एक पुरुष व त्याची पत्नी) ह्यांनी बरोबर राहून त्यांच्या (च) अपत्यांना जन्म देणे हे कुटुंबसंस्थेचे चित्र खाजगी मालमत्तेच्या संकल्पनेतूनच साकार झाले. ती संपत्ती वडिलांकडून मुलाकडे जावी ह्या उद्देशाने स्त्रीला तिच्या आईबापाच्या घरून उचलून पतीच्या घरी आणले जाते. त्याचबरोबर शासनसंस्था व समाजाचे अर्थकारण ह्यांतूनही ती आकार घेते. स्त्रीला प्रजनन-संगोपनाच्या आणि रांधा-वाढा-उष्टी काढाच्या चक्रात फसवून तिचे खच्चीकरण करणारी संस्था म्हणून तमाम स्त्रीवाद्यांनी तिला दषण दिले आहे. त्याविरुद्धच्या असंतोषाचा उद्रेक १९६० च्या सारास युरोप-अमेरिकेत झाला. एका परीने हा तेथील स्त्रीमुक्तिवादाचा जन्मकाळ म्हणता येईल. त्या काळात मध्यमवर्गीय गौरवर्णीय कुटुंबे उपनगरांत स्थायिक झाली होती. त्यातील पुरुष शहरांतील मध्यवस्तीत नोकरीला जात व बराच वेळ घराबाहेर असत. त्यामुळे स्त्रिया घरात डांबल्या गेल्या. घरकामासाठी त्यांच्याकडे यंत्रे बसवलेली असली, तरी ती चालवायला माणूस (बाई) लागतोच. “लग्नापूर्वी लैंगिक व आर्थिक स्वातंत्र्य अनुभवलेला व मातृत्वाच्या जबाबदारीमुळे घरात अडकून पडलेला हा स्त्रीवर्ग भौतिक सुख असूनही असमाधानी, चूल-मूल ह्या रहाटगाडग्याला कंटाळलेला, एकलेपणाला उबगलेला आणि त्यांना घरात डांबणाऱ्या समाजावर खवळलेला होता.” असे सांगून लेखिका हे शहरीकरण व औद्योगिकीकरणातून उद्भवलेले दुखणे असून भारतीय, कृषिप्रधान समाजात, लहान गावांध्ये, परंपरागत व्यवसायांध्ये असे होत नाही असेही नमूद करते. तसेच एकत्र कुटुंबपद्धतीत स्त्रीचे काही वेळा शोषण होत असले तरी ती एकटी पडत नाही, वडिलधाऱ्यांची सोबत, आधार असतो. हेही सांगते. पुढील प्रकरण स्त्रीशिक्षणावर आहे. स्त्रीमुक्तीची पहिली मागणी पुरुषासारखे स्त्रीला शिक्षण ही होती, हे नमूद करून भारतात तर स्त्रियांना व बहुजनसमाजातील पुरुषांनाही ज्ञानशाखेच्या शिक्षणापासून दूर ठेवले गेले, फक्त त्यांना आवश्यक ती कौशल्येच शिकवली जात होती. उदा. —- कुंभाराच्या मुलाला कुंभारकामाचे प्रशिक्षण व मुलींना घरकामाचे. स्त्रियांना शिक्षण देण्याच्या बाबतीत जगभरातील समाजांनी कसा अनुदार दृष्टिकोन ठेवला आहे याची अनेक उदाहरणे येथे दिली आहेत.
आजच्या शिक्षणाचे चित्र रेखाटताना लेखिकेने समानता, शीलसंवर्धन इत्यादी शिक्षणाची मूलभूत उद्दिष्टे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवली जात नसल्यामुळे खूपसे शिक्षण निरुद्देश राहते तसेच माहितीचा जरी विस्फोट झाला असला तरी प्रत्यक्ष जीवनात त्याचे उपयोजन न केल्यामुळे माहितीचे ज्ञानात रूपांतर होऊ शकत नाही तसेच आज मुख्यतः अर्थार्जनासाठी स्त्रीला शिक्षण दिले जात असल्यामुळे शिक्षणाच्या मूळ वैशिष्ट्यांचा पराभव झाला आहे असे म्हटले आहे. तसेच स्त्रियांचा चहबाजूंनी होणारा कोंडमारा व मानसिक गुलामगिरी ह्यांध्ये त्यांना मिळणारे निस्तेज शालेय शिक्षण काय करू शकणार ? तेव्हा त्याला सामाजिक संस्कारांची जोड दिली तरच काही घडू शकेल असेही म्हटले आहे. नंतरच्या प्रकरणांध्ये, जीवनाच्या विविध पैलूंध्ये स्त्रीमुक्तिवाद कसा येतो त्याचे विवेचन केले आहे. जसे प्रसारमाध्यमे, अश्लील साहित्य, राजकारण, समलिंगीसंबंध व कायदा.प्रसारमाध्यमांची भूमिका फार महत्त्वाची असल्यामुळे चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यावर फार बारकाईने लक्ष ठेवले आहे असे लेखिका म्हणते. धर्मकथा व पुराणकथा यांचा निर्देश करून झाल्यावर मात्र ह्या प्रकरणाचा बढेश भाग इलेक्ट्रॉनिक माध्यम अर्थात दूरचित्रवाणीवरच खर्च झाला आहे आणि त्यावरील स्त्रीची प्रतिमा एकतर घरकाम व सौंदर्य ह्यात अडकलेली किंवा दुष्ट, कपटी, मत्सरी अशीच दाखवली जाते. अशी नकारात्मक स्त्रीव्यक्तिरेखा स्त्रीमुक्तीवादीही दाखवली जाते. स्त्रीमुक्ती चळवळीला उदात्त मूल्यांचे वावडे आहे असाही समज करून दिला जातो, असे म्हटले आहे. १९८० च्या नंतर तर प्रसारमाध्यमांनी स्त्रीमुक्तिवादाच्या विरोधात भूमिका घेतली आणि प्रत्येक प्रकारचे आरोप करून बदनामी केली. आधुनिक स्त्री ही स्वतःच्याच महत्त्वाकांक्षेची बळी आहे, करिअरच्या मागे लागून ती स्वतःची दमछाक करून घेत आहे, घर-मुले ह्यांत रमणे हेच स्त्रीसाठी नैसर्गिक आहे, येथपासून तर स्त्रीवादी स्त्री ही आक्रस्ताळी व भांडकुदळ असते येथपर्यंत अनेक आरोप झाले आहेत, विशेषतः १९९० नंतर दूरचित्रवाणीचे जे खाजगीकरण झाले, तेव्हापासून तर चळवळीचा अपप्रचार फारच वाढला कारण लोकरंजन आणि नफेखोरी ह्या दोहोंच्या दावणीला ती बांधली गेली असे सांगितले आहे.
अश्लील साहित्यावरच्या लेखात आज आपण काय खायचे, कोणते कपडे घालायचे येथपासून तर काय पाहायचे हेदेखील बाजारच ठरवतो. चमचमीत, चटपटीत पदार्थ समोर आणून जशी नसलेली भूक चाळवली जाते, तशीच पोर्नोग्राफी दाखवून दाखवून कृत्रिम लैंगिक वासनाही अनिर्बंधपणे वाढवली जाते असे म्हटले आहे. पोर्नोग्राफी तयार करण्याकरिता त्यामध्ये काम करणाऱ्या स्त्रीच्या देहावर आणि ते पाहून एखादा पुरुष संभोग करतो तेव्हा त्याच्यासमोर असलेल्या स्त्रीच्या देहावर काय अत्याचार केले जातात त्याचेही भेदक वर्णन ह्या प्रकरणात आहे. “एखाद्या दगडाच्या मूर्तीवर छिन्नी चालवावी, त्याप्रमाणे स्त्रीच्या देहावर, ते अधिकाधिक कमनीय दिसावे म्हणून शस्त्रे चालवली जातात.” ह्याचा अत्यंत घातक परिणाम समाजावर होतो. पुरुषाला ‘मजा’ येण्यासाठी स्त्रीदेह कसाही हाताळला तरी चालतो, पुरुषाने केलेली जुलू जबरदस्ती स्त्रीला आवडते, तो मागेल ते, मागेल तशा प्रकारे देण्यातच स्त्रीला सुख आहे असे संदेश अश्लीलपटामधून दिले जातात. वास्तवात अनेक लैंगिक गुन्हे अशा पोर्नोपटांवर बेतलेले असतात, ते पाहून झाल्यावर थोड्याच वेळात ते घडतात, कित्येकदा गुन्हा घडत असताना ते साहित्य जवळ असते — एवढा थेट परिणाम त्याने होत आहे.
राजकारणात स्त्रियांचे स्थान, सत्तेत त्यांचे प्रतिनिधित्व आजही कमी आहे असे राजकारणावरील प्रकरणात म्हटले आहे. कायदा करण्यामध्ये जोपर्यंत स्त्रियांचा सहभाग नसेल तोपर्यंत त्यांना खरे हक्कही मिळू शकणार नाहीत असे स्त्रीमुक्तिवादींचे म्हणणे आहे. आज एकविसाव्या शतकातही ते दुरापास्त आहे; परंतु बचतगट स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून त्या संघटित होत आहेत ही समाधानाची बाब आहे, उद्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत जाऊ शकतील असे लेखिका म्हणते. सगलिंगी संबंधांबद्दल बोलताना पुरुषांबरोबरच्या सहजीवनाबद्दल भ्रनिरास होऊन अनेक स्त्रीवादी स्त्रिया सगलिंगी संबंधांकडे वळल्या असाव्यात असे मत लेखिका व्यक्त करते. स्त्रीवादींच्या दुसऱ्या एका गटाच्या मते, जोडीदाराच्या लिंगाबाबत एवढी आग्रही भूमिका घेणे म्हणजे लिंगनिरपेक्षतेच्या तत्त्वालाच हरताळ फासणे होय. शेवटी विरोध हा पुरुषीपणाला असला पाहिजे. पुरुषाला नव्हे. काहींना जैविकदृष्ट्याच समलिंगीसंबंध अधिक सुखकारक असू शकतात, पण असे म्हटले की त्याच आधारावर भिन्नलिंगी संबंधांचेही समर्थन करावे लागते, अशी गोची आहे. समलिंगी आकर्षण नैसर्गिक असते का आणि नसल्यास ते कोणत्या परिस्थितीत उद्भवते त्याचा समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र ह्यांच्या अंगाने अभ्यास झाला पाहिजे असे लेखिका म्हणते. रोजच्या व्यवहारात स्त्रीमुक्तीशी संबंधित मुद्दे कसे येतात व त्याबाबत किती पूर्वग्रहदूषित मनाने विचार केला जातो ह्याची अनेक उदाहरणे देऊन लेखिका वाचकांची खात्री पटवते — त्या नावाच्या वेगळ्या प्रकरणात. ‘बहुतांची अंतरे’मध्ये स्त्रीवादी चळवळीशी संबंधित स्त्रियांचे व कॉर्पोरेट जगातील पुरुषांचे स्त्रीमुक्तीबद्दलचे विचार नमूद करून लेखिकेने त्याला उत्तरही दिले आहे.
स्त्रीवादी समीक्षा’मध्ये वाययाकडे स्त्रीवादी दृष्टिकोनातून कसे पाहायचे ह्यांचा सांगोपांग, ऊहापोह केला आहे. रामायण महाभारतामधील अनेक मुद्द्यांवर स्त्रीवादींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच आधुनिक वाययातील नाच ग घुा हे माधवी देसाईंचे आत्मचरित्र निवडून त्यावरील दोन प्रकारच्या समीक्षांची (तारा भवाळकर ह्यांची स्त्रीवादी तर म.वा.धोंड ह्यांची बिगर स्त्रीवादी समीक्षा) तुलना करून स्त्रीवादी समीक्षेचे महत्त्व पटवून दिले आहे. एकूण, ह्या समाजात बाईाणसाची अवहेलना कशी होते ह्याविषयी सविस्तर मांडणी केली आहे. अकरा पैलू घेऊन प्रत्येकासाठी एकेक प्रकरण लिहिले आहे. त्यामध्ये असंख्य तपशील भरले आहेत. अनेक उदाहरणे दिली आहेत. पुस्तकातील भाषाशैली सुंदर आहे. गरजेप्रमाणे नवीन, अर्थवाही शब्द घडवण्याचे लेखिकेचे कसब वाखाणण्यासारखे आहे; परंतु अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला असला, तरी स्त्रीवर होणारा अत्याचार हाच पुस्तकाचा मुख्य प्रवाह आहे आणि त्याचे वर्णन अगदी पुनरुक्तिपूर्ण नसले तरी पाल्हाळिक व एकसुरी आहे. स्त्रीवर अन्याय होतो खरा, पण कोणाकडून? ह्याचे उत्तर पुस्तकात सर्वांत अधिक वेळा पुरुष तर काही वेळा समाज किंवा व्यवस्था असे दिले आहे. समाज हा स्त्री-पुरुषांचा मिळून बनलेला आहे. त्यांपैकी स्त्रियांचा (शोषितांचा) वर्ग वजा केला तर राहिले पुरुषच. त्यानंतर व्यवस्था. पुस्तक म्हणते की पूर्वीपासून तीन सत्ता जगात चालत आलेल्या आहेत. धर्मसत्ता, राजसत्ता व पुरुषसत्ता. ही धर्मसत्ता व राजसत्ता ह्या पुरुषच चालवतात. ह्या सर्वाचा अर्थ असा, ‘पुरुष’ हे एकजुटीने स्त्रियांवर अत्याचार करतात. स्त्रीमुक्ती चळवळ ही पुरुषांच्या पुरुषीपणाच्या विरोधात आहे. हे स्त्रियांचे आद्य शत्रू.
नव्या काळाने मात्र स्त्रियांचे प्रश्न आणखी बिकट केले आहेत. जागतिकीकरण व मुक्त अर्थव्यवस्था ह्यांमुळे जाहिरातींचा सुकाळ झाला आणि त्यामध्ये मॉडेल म्हणून स्त्रियाच दिसू लागल्या. निव्वळ घरकामाच्या उपकरणांसाठी नव्हे तर रेझर, बनियन्स यांसारख्या वस्तूंच्या जाहिरातींमध्येही अल्पवस्त्रांकित स्त्रिया दिसतात. निव्वळ शोभेसाठी असतात. घरकामात अडकवण्यापेक्षा त्यांचे वस्तूकरण करणे ही अधिक वाईट गोष्ट आहे. तसेच आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय व अश्लील साहित्यनिर्मितीचा उद्योग ह्यांनाही उदारीकरणाच्या धोरणानेच चालना दिलेली आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे. पुस्तकात जागतिकीकरण वगैरे शब्द अधूनमधून येतात, नाही असे नाही. पण तरी त्यांच्यावर थेट हल्ला केलेला नाही. ह्यावर तेथेही धोरण ठरविणारे, निर्णय घेणारे पुरुषच असतात असे कदाचित म्हटले जाईल; परंतु ते पटण्यासारखे नाही. खाउजा धोरण ही आधुनिक काळाची देणगी आहे. ते धर्मसत्ता-राजसत्ते इतके दृढमूल नाही. सर्व प्रकारची लौकिक शिखरे पादाक्रांत करणाऱ्या स्त्रियांना तेथे प्रवेशास मनाई नाही. उलट एम.बी.ए. होऊन मोठमोठ्या उद्योगां ध्ये शिरणे हे आजची स्त्री अभिमानाने करून दाखवीत आहे. तेव्हा तिने अशा उद्योगांमध्येही आपला वचक निर्माण करणे कठीण नाही. तिने तिथे कर्तृत्वाबरोबरच आपल्या विचारांचाही ठसा उमटवावा. हे पुस्तक मराठीत लिहिले आहे म्हणजे मराठी माणसाने ते वाचावे अशी अपेक्षा आहे. शिवाय काम बंद करून डोळे उघडे ठेवलेली मुखपृष्ठावरील स्त्रीही भारतीयच आहे. ह्यावरून, भारतीय परिप्रेक्ष्यातील स्त्रीवाद वाचायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती. भारतीय संदर्भ पुस्तकात आहेत. पण मुख्यार्थाने तो युरोप- अमेरिकेतील स्त्रीवाद आहे. तो मुळापासून, सविस्तरपणे मराठीत मांडला गेला नाही म्हणून ह्या पुस्तकाचा प्रपंच केला असेल तर त्यालाही हरकत नाही. स्त्रीवाद हा जागतिक मानवतावादी चळवळीचा उद्गार आहे असेही त्यात म्हटले आहे. अडचण एवढीच आहे की ‘संस्कृती’ नावाची एक गोष्ट आहे. ती देशकालपरिस्थित्यनुसार भिन्न असते. स्त्रीच्या जीवनाला पूर्णपणे वेढून दशांगुळे उरणारी ती गोष्ट असते त्यामुळे तिच्याशिवाय निव्वळ बाईचा असा वेगळा विचार करता येत नाही. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाच्या शिरोभागी स्त्रीवादाचे एक एक सुभाषित । उद्धृत केलेले आहे. त्यांध्ये एक यहुदी धर्मगुरू सोफेर ह्यांचा अपवाद सोडला तर इतर सर्व सुभाषिते स्त्रीवादी स्त्रियांची आहेत. मजकुरातही स्त्रीवादींनी दिलेल्या घोषणा आणि त्यांची उद्धृते ह्यांची पखरण केलेली आहे. परंतु त्यांपैकी बहुतेक युरोप- अमेरिकेतील आहेत. भारतामध्येही अनेकांनी येथील परिस्थितीला अनुलक्षून स्त्रीवादी विचार मांडला आहे. केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही तो मांडला आहे. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे व विधवा व कुमारी मातांच्या अपत्यांचे संगोपन करणारे म. जोतीबा फुले; त्यांना उच्च शिक्षण देऊन विशाल विशाचे दरवाजे खुले करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे; स्त्रीचे शरीर हे पापाची खाण किंवा लज्जेने झाकून ठेवण्याची वस्तू नाही हे सांगणारे व कामशास्त्र व कुटुंब नियोजनाचे शिक्षण देणारे त्यांचे सुपुत्र रघुनाथ धोंडो; भारतीय संविधानात स्त्रीला समान स्थान देणारे व हिंदू कोड बिलाच्या रूपाने तिला वारसा हक्क प्राप्त करून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर; सतीची चाल बंद पाडण्यासाठी प्रबोधन करणारे राजा राममोहन रॉय, धर्मांधतेकडून विवेकाकडे समाजाला खेचून नेणारे डॉ. रामस्वामी पेरियार ; स्त्रियांनी केवळ चूल-मूल ह्यात अडकून न पडता आपली अंतर्गत मातृत्वशक्ती ओळखून विशबंधुत्वाचे व स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीचे कार्य करावे असे आवाहन करणारे व त्यासाठी पवनार येथे ब्रह्मविद्या मंदिराची प्रत्यक्ष स्थापना करणारे आधुनिक संत आचार्य विनोबा भावे, स्त्री-पुरुषांचे सहजीवन सौख्यमय असावे व स्त्रीने बलात्काराला घाबरू नये, त्याला सामाजिक कलंक न मानता निव्वळ एक अपघात मानून पुढे सामान्य जीवन जगावे असे स्त्री-पुरुषांना आवाहन करणारे आचार्य दादा धर्माधिकारी; लैंगिक अत्याचाराची भीती ही सर्व वयाच्या स्त्रियांना ग्रासून टाकते व तीमधून बाहेर पडण्यासाठी तिला विवाहनिरपेक्ष लैंगिक स्वातंत्र्य असलेच पाहिजे असे आग्रही प्रतिपादन करणारे दिवाकर मोहनी ह्या सर्वांनी भारतीय स्त्रीचळवळ पुष्कळ पुढे नेली आहे. ते पुरुष असल्यामुळेही असेल कदाचित, पण त्यांनी प्रतिक्रियात्मक नव्हे तर मूलभूत मांडणी केली आहे. स्त्रीभोगाचे बळी न पडताही त्यांनी ते भोग आपल्या संवेदनशीलतेने जाणून घेतले आहेत. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे स्त्रीचळवळीचे कर्तव्य आहे असे मला वाटते. त्यांची काही मते न पटण्यासारखी, टोकाची वगैरे असू शकतील, परंतु मुहूर्त ढ रोवण्याचे श्रेय त्यांना जाते. सिग्मंड फ्रॉइड ह्यांची कामभावाविषयीची मते आपल्याला टोकाची वाटू शकतात तरीदेखील त्यां ध्ये बदल करावासा, भर टाकावीशी वाटू शकते. त्यांनी त्या विषयाकडे जगाचे लक्ष वेधून घेतले ह्याचे श्रेय आपण त्यांना देत नाही का? पुस्तकात फक्त महात्मा गांधी व महर्षी कर्वे ह्या दोघांचे उल्लेख आले आहेत, पण ते नकारात्मक. म्हणजे अपश्रेयाचेच वाटेकरी. गांधीजींनी स्त्रियांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेतले पण राजकारणात येण्यास त्यांना मनाई केली. ह्याचे कारण ते राजकारणाला वाईटच समजत असावे व त्याहून अधिक व्यापक नेतृत्व त्यांनी हाती घ्यावे असे त्यांना वाटत असावे. असे मला वाटते. (लेखिकेच्या भाषेत दुरित. (हा चांगला शब्द आहे)) महर्षी कर्वे ‘मी स्त्रियांना शिक्षण, अर्थार्जनाची क्षमता दिली, परंतु त्यांच्यात उत्साह निर्माण करू शकलो नाही’ हे विधान पुस्तकात दोन ठिकाणी उद्धृत केले आहे.
भारतातील जातिव्यवस्थेचा विचारही महत्त्वाचा आहे. तिच्या चौकटीत बसवून स्त्रीवाद तपासून पहायला पाहिजे. भारतीय समाजाचे सवर्ण, बहुजन व दलित असे अगदी ढोबळ तीन भाग केले, तरी प्रत्येक वर्गातील स्त्रियांचे प्रश्न वेगळे होते व ते जातिव्यवस्थेने बाधित होते. बहजनसमाजातील स्त्री अधिक धडाडीची, पुरुषाशी स्वतःच दोन हात करणारी होती. ती सवर्ण स्त्रीसारखी डोक्यावर पदर घेऊन घरात दडून बसणारी नव्हती. लैंगिक स्वातंत्र्य, पुनर्विवाह ह्या बाबतीत ती अधिक मुक्त होती. परंतु पुढे सवर्णांचे अनुकरण करता करता वाईट प्रथांचेच अनुकरण झाले व त्यामध्ये स्त्रीला आणखी कमकुवत व्हावे लागले. जागतिकीकरणानेही जातिव्यवस्थेवर आघात केले. शेतकरी समुदायामध्ये स्त्रीला विशिष्ट कामे ने न देण्यात आली होती. ती निव्वळ पुनरुत्पादनाचे यंत्र नसून तिला उत्पादनप्रक्रियेत स्थान होते. औद्योगिकीकरणानंतर जी कुटुंबे शेती-वाडी सोडून नोकरी धरून शहरात स्थिरावली, तेथे मात्र तिला ते मिळणे शक्य नव्हते. कारण नोकरी ही एकट्याचीच असते. मग तेथे गेल्यावर ‘मलाही नोकरी करू द्या’ असा हट्ट धरणेच तिच्या हाती राहिले. शेतीचा शोध लागला आणि स्त्रीचा आत्मसन्मान संपला असे लेनिनने जरी म्हटले असले, तरी भारतात तो टप्पा नंतर आलेला आहे. जागतिक स्त्रियांची सरासरी काढून भारतीय स्त्रीला तिच्याबरोबर बसवणे योग्य नाही. ‘भारतीय स्त्रीला सर्व बाबतीत एवढा संघर्ष करावा लागला नाही’ असा एक धागा पुस्तकात आहे, पण तो फार क्षीण आहे.
स्त्रीवादाचे व स्त्रीचळवळीचे अनेक लाभ जगभरच्या व भारतातल्याही स्त्रिया घेत आहेत यात शंकाच नाही. मी स्वतःपुरता विचार करते तेव्हाही ‘आजचे हे माझे आयुष्य म्हणजे स्त्रीवादाची देणगी आहे असेच मला वाटते; परंतु तरीही अनेक स्त्रियांना ही चळवळ आपली वाटत नाही. शिकलेल्या, सुजाण स्त्रियाही ‘आम्ही नाही बाई त्यातल्या’ असे म्हणतात हे खरे आहे. पुस्तकात ह्याविषयी तक्रारीचा सूर आढळतो, परंतु निव्वळ त्यांच्यावर कृतघ्नपणाचा शिक्का मारण्याऐवजी चळवळीचे थोडे आत्मपरीक्षण ह्यामध्ये आले असते तर हे पुस्तक निव्वळ प्रचारकी थाटाचे बनले नसते. उदाहरणार्थ – Sisterhood is powerful हा चळवळीचा नारा आहे. ह्याचा उल्लेख थेटपणे पुस्तकात नसला तरी पण भारतात तरी वर्ग-वर्णाच्या पलीकडे जाऊन स्त्रियांना एक होऊन समष्टिरूप धारण करता आलेले नाही. तसे झाले असते तर वर्ग-वर्ण निराकरणाच्या लढ्याचा एक खूप मोठा टप्पा स्त्रियांनी सर केला असता. त्यांच्या लढ्यातील एक मोठा जय त्यांच्या पदरात पडला असता. दुर्दैवाने तसे झाले नाही. आज देशात अनेक छोट्या छोट्या स्त्रीसंघटना रुटुखुटू काम करताना दिसतात. त्यांच्यावर त्यांच्या जातीचे, राजकीय पक्षाचे किंवा प्रादेशिकतेचे शिक्के मारलेले असतात. स्त्री म्हणून एकमेकांशी जोडून घेण्याची प्रेरणाच कुठे दिसत नाही. आजच्या नवबौद्ध स्त्रिया हिंदू दलित स्त्रियांपेक्षा अधिक प्रगत व प्रगल्भ असतात असे पुस्तकात एके ठिकाणी म्हटले आहे. त्याचे श्रेय आंबेडकरांना दिलेही आहे. प्रत्यक्षात मात्र वंचितांच्या म्हणून ह्या दोन (स्त्रीमुक्ती व दलितमुक्ती) चळवळी हातात हात घालून चालताना दिसल्या नाहीत. पुस्तकाच्या अखेरीस एका प्रकरणात काही निवडक व्यक्तींनी आपले स्त्रीमुक्तीबद्दलचे विचार मांडले आहेत. ते सर्वजण समाजाच्या एका स्तरातले व गटातले आहेत. त्यामध्ये जर इमा व अजा, अज, भटके, विमुक्त व पुण्यामुंबईच्या पलिकडचे लोक आणले असते, तर ती खऱ्या अर्थाने ‘बहुतांची अंतरे’ झाली असती. मुद्दा हा, की महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळ हीदेखील एका विशिष्ट वर्गात अडकून पडल्यामुळे ही ती सर्वांची होऊ शकलेली नाही.
सत्ता; किंवा सौम्य शब्द वापरायचा तर व्यवस्था ही पुरुषांची बनलेली असून स्त्रियांचा लढा त्यांच्याशी आहे असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा पुरुषांच्या जगात सारे काही आलबेल आहे असे त्यांना म्हणायचे असते का ? पुरुष घराबाहेर पडतात. आर्थिक स्वातंत्र्य उपभोगतात, पत्नीला मारतात, घरकामाची जबाबदारी टाळतात. हवे त्या स्त्रीशी संबंध ठेवतात अशी विधाने पुस्तकात पदोपदी आढळतात. ती खोटी नाहीतच. खरीच आहेत. पण खरेच त्यांचे आयुष्य इतके सोपे व मौजमजेचे आहे काय ? हिंसा करून त्यांना खरोखर किती आनंद मिळतो व तो किती वेळ टिकतो ह्याचे कुणी मोजमाप केले आहे का? अपराधगंड त्यांच्या मनाला पोखरत नाही का ? न्यूनगंड आणि असुरक्षितता यांनी वेढलेल्या आयुष्यात त्यांना सुखाचा शास घेता येतो का? स्त्रियांना मोठ्याने हसण्यास पूर्वी बंदी होती. पण याचा अर्थ पुरुष मनापासून, मोकळेपणाने हसत होते असा नाही. (आसुरी आनंदाने विकट हसणे वेगळे) उलट मानवाचे व्यवच्छेदक लक्षण जे हसणे ते आजच्या स्त्री व पुरुष दोघांनाही लाभलेले नाही. राजकारणासाठी, स्त्रियांचा कसा वापर केला गेला हे सांगताना पुस्तकात शत्रुराष्ट्राशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांची मुलगी आपली पत्नी करून घेण्याच्या प्रथेचा उल्लेख करण्यात आला आहे. अशी प्रथा होती हे खरेच. त्या काळात राजाला अनेक स्त्रिया करण्याचा पर्याय होता हेही खरे. पण राजकारण, कुटुंबकारण, जात वगैरे नावाखाली पुरुषाला त्याच्या आवडीची स्त्री न मिळू देण्याची व नको असलेल्या स्त्रीबरोबर जबरदस्तीने आयुष्य घालवण्याची शिक्षा आजवर अनेक पुरुषांच्या माथी मारली आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी नेपाळचा राजपुत्र दीपेन्द्र ह्याने त्याच्या देवयानी नामक प्रेयसीशी विवाह न करता आल्यामुळे बेभान होऊन आपल्या आईबापांसकट सर्वांचा खून केला व स्वतःवरही गोळी झाडून घेतली. आवडीचा जोडीदार न मिळण्याच्या तणावाचा बळी तेव्हा संपूर्ण राजपरिवार झाला होता. इंग्लंडची आजची महाराणी दुसरी एलिझाबेथ हिच्या काकाने पूर्वाश्रमीच्या घटस्फोटित अशा आपल्या प्रेयसीशी विवाह करण्यासाठी राजेपदावरचा हक्क सोडला होता. तेव्हा ते राजपद त्याच्या धाकट्या भावाला म्हणजे एलिझाबेथच्या बापाला मिळाले. तात्पर्य, आवडीचा जोडीदार मिळणे हे कोणासाठीच स्वस्त किंवा सहजसाध्य नाही. जशा स्त्रियांना आवडीनिवडी असतात तश्या पुरुषांनाही असतात. त्यांनाही त्या सोडाव्या लागतात. एखाद्या स्त्रीला तिच्या आवडीची लसूण घातलेली कढी सासरी कधीच मिळत नाही, (पृष्ठ १५५) त्याप्रमाणे एखाद्या पुरुषालाही बायकोपेक्षा आईच्या हातची आमटी अधिक आवडत असली, तरी तिच्या हट्टापायी वेगळे घर केल्यानंतर आईच्या हातच्या आमटीवर पाणी सोडावे लागते. तेव्हा, समाजाचा गाडा चालण्यासाठी व्यक्तिगत आवडीनिवडींचा त्याग करणे हा काही मोठा इश्यू नसावा.
स्त्रियांच्या विशात एक वेगळीच चातुर्वर्ण्यव्यवस्था असते – जसे की पुत्रवती,कन्यावती, अपत्यहीना, परित्यक्ता अथवा विधवा. नंदिनी दिवाण ह्यांच्या पुस्तकातील हे वाक्य उद्धृत केले आहे. परंतु बरेचदा पुरुषांध्येही चातुर्वण्यव्यवस्था असते, ती याहीपेक्षा कृत्रिम व ढिसाळ पायावर उभारलेली असते व खालच्या वर्गातील पुरुषाला वरच्या वर्गात प्रवेश नसतो. तेव्हा पुरुषाचे सारे आलबेल व स्त्रीच तेवढी दुःखाच्या खाईत, असेही मानण्याचे कारण नाही. पुरुष = हिंसा हे समीकरण सगळीकडे दिसते. त्यावरून शोषित शोषक हे समीकरण आणखी बळकट होते. हिंसा हे फार मोठे दुरित आहे. ते करणाऱ्यालाही समाधान देत नाही. ह्यावर उपाय पुरुषाला दूर लोटणे किंवा स्वतः त्यापासून दूर जाणे हा कसा होईल ? पुरुष आणि स्त्री दोघेही समाजाचे अविभाज्य घटक आहेत. एकमेकांशिवाय ते दोघेही अपूर्ण आहेत. म्हणून पुरुषी हिंसेवर प्रतिक्रिया देण्याऐवजी तो असे का वागतो ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढी संवेदनशीलता स्त्रीने दाखवण्यास काही हरकत नाही. हे जर केले नाही तर दोघेही हिंसा-प्रतिहिंसेच्या दुष्टचक्रात फसतील. किंबहुना आज ते तसे फसलेच आहेत. स्त्रीवादी विचार स्त्रीला स्वातंत्र्य देतो की सुख देतो ह्यावर पूर्वी वाद झडला होता. आज असे म्हणावेसे वाटते की पुरुषाला त्याच्या असुरक्षिततेतून आणि न्यूनगंडातून बाहेर काढले, तर स्त्रीला स्वातंत्र्य व सुख दोन्ही प्राप्त होईल. स्त्री-कल्याणाचा विचार सामाजिक संदर्भ सोडून एका पोकळीत करणे कसे शक्य आहे? पुरुषांना समजून घेऊन, त्यांना विशासात घेऊन, ह्या लढ्यात सहभागी करून घेऊनच खरी स्त्रीमुक्ती शक्य आहे. स्त्रीमुक्तीचा पहिला उद्गार १९६० च्या सुारास निघाला. तेव्हा तो विचार बहुतांशी प्रतिक्रियात्मक होता हे आपण समजू शकतो. पण हे पुस्तक २०१० साली प्रकाशित झाले. तेव्हा पन्नास वर्षांनंतरही तेवढेच पुरुषद्वेष्टेपण, पुरुषाशी शय्यासोबत म्हणजे शत्रूला फितूर होण्याचा प्रकार वगैरे विधाने येणे सुबुद्ध स्त्रियांना खचितच भूषणावह नाही. स्त्रीची मूल प्रकृती शांत, विचारी, समंजस, वात्सल्यपूर्ण अशी आहे. एवढा द्वेष मनात भरून घेतल्यानंतर कोणती स्त्री सामान्यपणे जगू शकेल ? अहिंसेप्रमाणे सेवा हेदेखील उदात्त मानवी मूल्य आहे ही गोष्ट पुस्तकातही मान्य केली आहे. मात्र पुढे तेथे असे म्हटले आहे की “स्त्रियांध्ये निहित असलेल्या सेवाभावाचा गैरफायदा घेऊन समाज तिच्यावरील बंधने अधिक घट्ट व जाचक बनवतो.’ यावरून असे व्यक्त होते, की जाचक बंधनांतून मुक्त होणे अत्यंत आवश्यक आहे (व त्यासाठी सेवाधर्माचा त्याग करावा लागला तरी चालेल.) वरील वाक्याचा पूर्वार्ध बरोबर व योग्यच आहे. पुरुष सेवा करीत नाहीत, तर स्त्रीने तरी कशाला त्याची पंचाईत करावी ? म्हणजे पुरुषासारखे मुक्तपणे जगायचे असेल, तर स्त्रीसारखे ते सेवाबीवा करणे सोडा. कुणी म्हणतील, सेवा करणे हा तसा सद्गुणच आहे हो, पण स्त्रीच्या बाबतीत तिला अडकवणारा दुर्गुण हटला. म्हणजेच स्त्रियांनी आपल्याजवळील एका उदात्त गुणाला पुरुषी मोकाटपणापेक्षा हीन लेखले. हे बरे झाले नाही. याउलट जो सेवा करतो, ज्याच्यामध्ये सेवाभाव आहे तो प्राणी श्रेष्ठ व ज्यामध्ये नाही तो कनिष्ठ असे म्हणायला हवे होते व आहे. सेवाभावाच्या उदाहरणावरून एकूणच स्त्रीपुरुषांच्या गुणांचा तौलनिक विचार केला तर लक्षात येते की दोघांचा पिंड वेगळा आहे. त्यांची कार्ये भिन्न आहेत. तरीही नैसर्गिकतः त्यांचादर्णा समान आहे व तो व्यवहारातही तसाच ठेवायला हवा, मात्र त्यासाठी स्त्रीच्या कामांची, तिच्या श्रमांची, तिच्यातील सेवाभावाची प्रतिष्ठा वाढवली पाहिजे. हा विचारच कुणाला सुचलेला दिसत नाही. स्त्रीला मुक्त करायचे म्हणजे काय तर समानता द्यायची. कोणाशी समानता तर पुरुषाशी. कशी द्यायची तर पुरुषासारखे बनवून. त्यासाठी काय करायचे तर तिचे स्त्रीत्व छाटून टाकायचे. अशा रीतीने ही चळवळ वेगळ्याच दिशेला भरकटल्यासारखी वाटते. पुरुषाने सत्ताकेंद्रे काबीज करून आमच्यावर अत्याचार केले. त्या अत्याचारापासून मुक्त होण्यासाठी आम्हीही तीच सत्ताकेंद्रे काबीज करणार. त्यासाठी पुरुषासारखे बनणार. पुरुषाबद्दल शत्रुत्व, वैनस्य, द्वेष बाळगण्याचा व दुसरीकडे स्वतः तेच बनायचे. हा स्त्रीमुक्तिचळवळीतला सगळ्यांत मोठा अंतर्विरोध आहे. स्त्रीवादी चळवळीची पहिली मागणी आम्हाला पुरुषासारखे शिक्षण द्या ही होती त्याच्या पाठोपाठ पुरुष घराबाहेर पडतो तर आम्हीही पडणार. तो नोकरी करून पैसे कमावतो तर आम्हीही कमावणार. तो अपत्यसंगोपन करीत नाही म्हणून आम्हीही करणार नाही. पुरुषांसारखी वेषभूषा व पुरुषांसारखी दारू सिगारेट ह्यांचे वर्णन पुस्तकात अर्थातच नाही. पण अनेक ठिकाणी अनुकरण त्या पातळीला पोहोचले होते हे आपल्याला माहीत आहे. येथे तिने पुरुषाच्या अनुकरणाचा अतिरेक केला. अतिरेक हा तर केव्हाही वाईटच असतो पण येथे मुळात अनुकरणाची दिशाच चुकली होती. स्त्रीमुक्तिचळवळ स्त्रीसामान्यांपासून दूर जाण्याचे हे एक महत्त्वाचे कारण होते, की त्यांचा आपल्याला स्त्रीत्वावर जास्त विशास होता व ते त्यांना सोडायचे नव्हते.
स्त्रीवादी चळवळ स्वतःला लोकशाहीवादी, मानवतावादी, समताकांक्षी म्हणते व दुसरीकडे सत्ताकांक्षेतून पुरुषांशी स्पर्धा करते. त्याऐवजी ती स्त्रीचे मोल वाढवणारी व्हायला हवी. स्त्रीपुरुषांच्या समान दर्जासाठी चळवळ जरूर करावी. परंतु त्याचा रोख स्त्रीत्वाचा आदर करण्याकडे असावा. प्रसूती व अपत्यसंगोपन ह्या मुद्द्यांवरूनही पुस्तकात बरीच भवति न भवति झाली आहे. एकदोन ठिकाणे वगळता सर्वत्र ह्याबाबत नकारात्मक, प्रसूति ही स्त्रियांना नकोशी गोष्ट आहे असाच एकूण सूर आहे. काही स्त्रियांना काही काळासाठी तर काहींना नेहमीसाठी मूल नको असू शकते. सर्वच स्त्रिया सारख्या नसतात हे विधान सत्य आहे. पण अनेक स्त्रीपुरुषांना ते हवेही असते. तो आनंदाचा भाग असतो. पुस्तकात अपत्यजन्माचे वर्णन स्त्रीला घरात अडकवून ठेवणारी, तिच्या व्यक्तिमत्त्वविकासास मोडता घालणारी तिच्या अर्थार्जनाच्या आणि मुख्य म्हणजे स्वातंत्र्याच्या आड येणारी एक कटकट म्हणून आले आहे. वास्तविक हाही विषय एवढा बाऊ करण्यासारखा नाही. बाळाला स्तनपान आणि शी-शू, लंगोट-दपटी हा वेळ खाणारा व कधी कंटाळवाणा प्रकार असतो हे खरे, पण एक-दोन मुलांसाठी आयुष्यातला असा किती वेळ घालवावा लागतो? त्यातही आनंदाचे क्षण अनेक येतात. आईच्या सर्जनशीलतेला त्यामध्ये भरपूर वाव असतो. आपण घडवलेली एक चांगली कलाकृती म्हणून त्यांच्याकडे पाहताना ऊर भरून येतो. बाळाचे (नवजात) मुखावलोकन केल्यावर मातृवेणांचा विसर पडतो. तद्वतच थोडे मोठे झालेले, शहाणे सुरते पोर बघून त्याच्या बालपणात त्याच्यासाठी खाल्लेल्या खस्तांचाही विसर पडतो. अपत्यासाठी ‘आपल्या रक्तामांसाचा’ नऊ महिने उदरात वाढवलेला’ ‘पोटचा गोळा’ वगैरे काव्यमय वाक्प्रयोग न करताही मला असे म्हणायचे आहे की माता झाल्याने तरुणी सतर्क राहणे, काळजी घेणे, आपल्या घासातील घास दुसऱ्याला देणे, दुसऱ्याला आपला म्हणणे, त्याच्या सुखदुःखाचा विचार करून त्याच्याशी समरस होणे इत्यादी गोष्टी शिकते व करू लागते. हा तिचा व्यक्तिमत्त्वविकासच नव्हे काय ? असाच व्यक्तिमत्त्वविकास आतापर्यंत एकटा, लाडाकोडात वाढलेल्या तरुणाचाही, पिता झाल्यावर होतो आणि दोघांनीही तो आवर्जून करून घेतला पाहिजे.
ह्या मार्गाने होणारा विकास हा अनेकदा ऑफिसमधील पदोन्नती, परदेशप्रवास किंवा संगीताची परीक्षा (पृ.१५८) ह्याने होणाऱ्या विकासापेक्षा अधिक असतो. असेही मला वाटते कारण मी माझ्या अवतीभवती अशा अनेक तरुण-तरुणी पाहिल्या आहेत. दोन पिढ्यांपूर्वी, स्त्रिया नव्यानेच नोकऱ्या करू लागल्या होत्या तेव्हा अशा गोष्टी घडत — जसे की त्या वेळी प्रसूति/गर्भारपण आल्यामुळे नोकरीत वरची जागा मिळवता आली नाही किंवा एखादा छंद पूर्णत्वास नेता आला नाही. परंतु सध्याच्या काळात ते शक्य झाले आहे. मुलांना सांभाळून ह्या गोष्टी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यासाठी मात्र दोन गोष्टींची आवश्यकता असते. आपले आरोग्य उत्तम राखणे त्या बाबतीत आळशीपणा करून चालत नाही आणि दुसरे, आपल्या ध्येयाचे सतत चिंतन करणे. एवढे सांभाळले तर उत्तरायुष्यातही संधी मिळते. कुटुंबसंस्था ही स्त्रीच्या सर्व प्रकारच्या अपकर्षास कारणीभूत असल्याचे स्त्रीमुक्तिवादाने परोपरीने व पदोपदी मांडले आहे. त्यावर उपाय म्हणून स्त्रीने घराबाहेर पडून मोकळा शास घ्यावा व अर्थार्जन करून स्वतःच्या पायावर उभे राहावे असा त्यांचा आग्रह आहे. घराबाहेर पडून अर्थार्जन करणे हे विकासाचे, प्रगतीचे लक्षण. त्यानेच बाईला आत्मविशास येतो. ‘टर्स डिक्टेट’ करता येतात. आजच्या काळात पैसे न कमावणाऱ्या व्यक्तीला कोण विचारतो? अशा स्वरूपात तो विचार फार झपाट्याने पसरला. आजच्या पिढीच्या तर तो इतका बोकांडी बसला आहे, की कुटंब हे एक ‘यनिट’ आहे. नवयाचा पैसा हा आपला पैसा आहे, किंवा पैशाशिवाय इतरही काही संसाधने असतात. ती कमावणे किंवा जतन करणे हीसुद्धा कमाईच आहे ह्याचा स्त्रिया व पुरुष दोघांनाही विसर पडला आहे. काटकसरीने, नेटका संसार करणे हा बाईचा गुणच नाही तर दोषच मानला जातो आणि ज्या बाईला असा संसार करता येत असेल, तिच्यावरही घराबाहेर पडून ‘अर्थार्जन’ करण्याची सक्ती ‘समाज’ करतो. ‘एखाद्या गोष्टीसाठी नवऱ्यासमोर ‘तोंड वेंगाडावे’ लागू नये म्हणून तू नोकरी कर’ अशी वाक्ये मला अवतीभवती ऐकू येतात. बरे हे एवढ्यावरही थांबत नाही. पुस्तकात असे म्हटले आहे की नोकरी न करणाऱ्या बाईला आपण गृहिणी आहोत हे सांगण्याचा संकोच होतो. आपण घर सांभाळतो हे ती अभिमानाने सांगत नाही. वगैरे. पण घर सांभाळण्याचे मूल्यच नाकारल्यावर ती ते कसे सांगू शकेल ? गर्भपात हाही स्त्रीचा व स्त्रीमुक्तिवादाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. स्त्रीचा तिच्या शरीरावर पूर्णांशाने हक्क आहे व म्हणून गर्भपाताचा निर्णय तिला स्वतःला स्वतंत्रपणे घेता यावा असे स्त्रीवादाचे म्हणणे आहे. भारतात तसा तो कायद्याने आहेही. विवाहांतर्गत गर्भपाताचे प्रमाण सर्वांत अधिक आहे असे पुस्तकात म्हटले आहे. त्यामुळे सध्या त्याचाच विचार करू. मूल होणे ही माझी एकटीचीच जबाबदारी व मला मूल केव्हा हवे ते मीच ठरवणार असे म्हणण्यापेक्षा, मानवी मूल वाढवणे हे गटकार्य आहे हे समजून, जोडीदाराला, इतर अपत्यांना, आजीआजोबांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले पाहिजे. त्यांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. स्त्री ही माता होण्याच्या फक्त एकाच भूमिकेत नसते. एखाद्या अपत्याची माता होण्यापूर्वीपासून इतर अनेक नाती निभावत असते. येणारे मूलही केवळ तिचेच अपत्य नसते तर ते त्याच्या पित्याचेही अपत्य, घरातील इतर मुलांचे भावंड, आजी आजोबांचे नातवंड असते. त्यामुळे हे संदर्भ दर करून एका वेगळ्या पोकळीत सगर्भा स्त्रीचा विचार करणे योग्य होणार नाही. व्यक्तिवादाचा आत्यंतिक आग्रह सगळ्यांनाच घातक ठरतो. विसाव्या शतकात संपूर्ण समाजच व्यक्तिवादी बनला असे (पुस्तकात) म्हणतात. पण म्हणून पुरुषापेक्षा अनेक बाबतींत श्रेष्ठ असलेल्या विचारी, सुबुद्ध स्त्रीने स्वतः व्यक्तिवादी बनण्याची मुभा घ्यायची की कुटुंब टिकवून ठेवायचे ? समाज बांधून ठेवायचा? मानव हा सामाजिक प्राणी आहे.स्त्री मानव आहे. म्हणून स्त्री ही सामाजिक प्राणी आहे.
आता शेवटच्या सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊ. तो म्हणजे, स्त्रीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या समाजाचे — पक्षी पुरुषाचे — काय करायचे? अभिजात स्त्रीवादाने त्याला अगदीच नालायक, बिनकामाचा ठरवले. व त्याच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी लग्न न करणे, समलिंगी संबंध ठेवणे, स्त्रियांचा गट करून एकत्र राहून केवळ लैंगिक सुखासाठी पुरुषाकडे जाणे, घराबाहेर पडणे, लैंगिक स्वातंत्र्य उपभोगणे, अर्थार्जन करून त्याच्यावरील परावलंबनातून बाहेर येणे, मूल न होऊ देणे, एकटे राहून हव्या त्या पुरुषापासून मूल होऊ देणे व त्याला एकट्याने वाढवणे इ. त्यांना सुचले व शक्य झाले ते ते मार्ग त्यांनी अवलंबले. त्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. उलट आजही ते मार्ग स्त्रियांना उपलब्ध असले पाहिजेत असेच मला वाटते. परंतु त्या सर्वांना खूप मर्यादा आहेत. फारच कमी स्त्रिया ते चोखाळू शकतील. त्यांनाही त्यासाठी बरीच किंमत मोजावी लागेल. मग काय करायचे? दुसरे असे की आजही, सर्वसामान्य स्त्रीचे स्वप्न काय, किंवा तिला काय हवे आहे एकाकीपणा नको. जोडीदार, सखा, सोबती हवा. आपले मन जाणून घेणारा, आपल्याला आधार देणारा मित्र हवा. तो आयुष्यभर ज्याच्या बरोबर सुखाने राहता येईल असा ‘स्थिर शासन’ देणारा तो हवा. अनेकींना त्याच्यापासून एक किंवा दोन अपत्ये असावीत असेही वाटते. आयुष्याकडून एवढी अपेक्षा म्हणजे स्वाभाविक किंवा माफकच म्हणावी लागेल. पण एवढेही त्यांना सहजपणे मिळत नाही. त्यासाठी बरीच मोठी किंमत मोजावी लागते. कधीकधी तर आयुष्याचे बलिदानही करावे लागते विवाहाच्या वेदीवर. पुरुष हा स्त्रीच्या जीवनात पती, बाप, भाऊ कोणत्याही रूपात आला तरी तिचे अवमूल्यनच करतो. तरीही एक नाते आहे. एक असे नाते अजूनही शिल्लक आहे, जेथे स्त्री पुरुषाच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देऊ शकते ते म्हणजे आई व तिचा मुलगा. त्याच नात्यावर आपल्याला काम करावे लागणार आहे. सुदैवाने बालसंगोपनाची जबाबदारी अजूनही स्त्रियांवर आहे. जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगातें उद्धारी. तिने ठरवले आणि आपली एकजूट केली, तर आजच्या मुलग्यांना घडवून ती उद्याचे चांगले पती निर्माण करू शकते. हा उपाय काही लोकांना भाबडा किंवा बालिश वाटण्याची शक्यता आहे. कारण मुलगा हा फक्त आईचा नसतो असे मीच वर म्हटले आहे. त्याच्यावर आजुबाजूचे अन्य लोक, शाळेतील शिक्षक,प्रसारमाध्यमे इ. अनेक घटक आपला प्रभाव टाकत असतात. परंतु तरीही मला असे वाटते की मुलींना परक्या घरी जाणाऱ्या म्हणून आपण जश्या काळजीपूर्वक घडवतो, तसेच किंवा त्यापेक्षाही अधिक काळजी घेऊन मुलग्यांना घडवले पाहिजे. ते उद्याचे पती आणि बाप होणार आहेत. त्यासाठी त्यांना पुरेसे संवेदनशील बनवले पाहिजे. योग्यायोग्यतेचा विवेक करण्यास शिकवले पाहिजे. काही गुण तुझ्याकडे आहेत,काही तुझ्या पत्नीकडे असतील. दोघेही समान आहात व दोघांनी एकमेकांची काळजी घ्यायची आहे असे शिकवायचे आहे. आपण जर घरातील गुला गुलींगध्ये सगता राखली तर पुढे जाऊन ती पति पत्नीच्या सगतेध्ये परिवर्तित होईल. आजपर्यंत कधीच आपण पुरुषांच्या वाढीकडे लक्ष दिले नाही. गेल्या शतकात फक्त स्त्रिया बदलल्या व पुरुष तसेच राहिले असे म्हणत राहिलो फक्त. पण पुरुषांना जर ते पुरुष असल्याचे सर्व फायदे मिळत असतील तर कशाला बदलायला बसलेत? त्यातून आपणही स्वतःकडे इतका कमीपणा घेतला की आपण बायका पुरुषांना (मुलांना – – – तेही आपल्या) काही शिकवू शकतो असे आपल्याला वाटतच नाही. .. हा न्यूनगंड आपण कधीचा कवटाळून बसलो आहोत तेव्हा, तो सोडून आधी आपल्याला शहाणे व्हावे लागेल. एकदा हा मुलगा मोठा झाला की त्याची पत्नी व मुले ह्यांचे एक सुंदर विश तयार होईल. ते प्रोचे आगर असेल. सगळ्यांना घरकामात वाटा उचलावा लागेल. त्याचबरोबर प्रत्येक जण आपला स्वतंत्र अवकाश जपेल. कुटुंबाचा विचारच आपल्याला आधी करावा लागणार आहे कारण प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजा कुटुंबात भागतात व त्या भागल्यानंतरच त्याला ‘दिवे लावायला’ बाहेर पडता येते. प्रे व जिव्हाळ्याच्या सूत्राने बांधले गेल्यावरच पती व पत्नी दोघांचीही मानसिक सुरक्षितता वाढीला लागेल. निर्भय व स्थिरचित्त होत्साते ते सुदृढ प्रजेची निर्मिती करतील.
स्त्रीवादी विचारांचे मोल मला पूर्ण पटलेले आहे. ‘बाईपणाचे भोग भोगताना’ ह्या विचाराने मला खूपच दिलासा दिलेला आहे. सुरुवातीला निव्वळ प्रतिक्रियात्मक असलेल्या स्त्रीवादाने आता पुढची मजल गाठली पाहिजे आणि स्त्रीकल्याणाची विधायक, रचनात्मक मांडणी केली पाहिजे. मात्र स्त्रीवादावरचे पुस्तक वाचून स्त्रिया चांगले काही काम करायला उद्युक्त झाल्या पाहिजेत. तसे न होता ते वाचून मन खिन्नतेने व विषादाने काळवंडून जाते. क्वचित कुठे “पुरुषांच्या अंधानुकरणाची प्रक्रिया संपून आता स्त्रीवाद प्रगल्भ होत आहे.” किंवा ‘सुजाण पालकत्वाची चळवळ करण्याचा स्त्रीमुक्तिवादींचा प्रयत्न आहे.” अशी वाक्ये आहेत; पण बाकीच्या कर्मकहाणीपुढे त्यांचा काही उजेड पडत नाही. हे पुस्तकाचे थोडे अपयश आहे असे मला वाटते. म्हणून ह्या काही गोष्टी मला सुचल्या, त्या येथे मांडल्या आहेत. माझे निरीक्षण भारतीय परिप्रेक्ष्यात केले असल्याचे मी म्हटलेच आहे, शिवाय ते मी ज्याची सदस्य आहे त्या मध्यमवर्गापुरते मर्यादित असल्याचीही मला जाणीव आहे. परंतु तरीही विचारात घ्यावे.
anumohoni@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.