बौद्धवाद आणि मेंदू

गेल्या अनेक दशकांपासून काही मेंदूवैज्ञानिक आणि बौद्धधर्मीय अभ्यासकांनी बौद्धवादाचा आणि मेंदूविज्ञानाचा संबंध जोडला आहे. मला मात्र खाजगीरीत्या हा संबंध मंजूर नव्हता आणि तो मी नाकारत आलेलो आहे. अशा प्रकारे विज्ञानाशी संबंध जोडण्याचा प्रकार इतर अनेक धर्मांबाबतही होत आलेला आहे आणि बौद्ध धर्माच्या बाबतीतही खोलात जाऊन वैज्ञानिकरीत्या तपासणी केल्यास त्यातला फोलपणा उघड होईल याची मला खात्री वाटत होती.

‘जेव्हा धार्मिक तत्त्वज्ञानाला वैज्ञानिक शोधाद्वारे पाठिंबा मिळतो तेव्हा त्या धर्मातील अनेकजण असा दावा करतात की पहा, आमचा अनुभव हा सत्यपरिस्थितीवर आधारलेला आहे. पण वैज्ञानिक पुरावा जर त्यांच्या पूर्वग्रहित धार्मिक मतांच्या कितीही विरोधी आला तर तो अशा धार्मिक लोकांना पटत नाही. ते वैज्ञानिक पुरावा मान्य करायला नाराज असतात. कोणालाही आपण जे करतो ते चुकीचे आहे असे वाटत नसते.

परंतु विज्ञान पूर्वग्रहित कामनांची कदर करत नाही. विज्ञान ज्याला आपण चांगले विज्ञान म्हणू-सांगते की जग आहे हे असे आहे ज्याच्या मनात जशी इच्छा आहे तसे ते नाही. काही वेळेला एखाद्या धार्मिक तत्त्वज्ञानाशी विज्ञान सुसंगत असेलही, परंतु बहुतांश वेळा तसे ते होत नाही.

माझी शंका असूनही बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाला मज्जातंतू-विज्ञान गंभीरपणे छेद देत आहे, असे काही दिसत नाही. मज्जातंतू-विज्ञान आपणाला असे सांगते की आपल्या सुसूत्रीय व एकसंघ मनाला जशा गोष्टी दिसतात तशा त्या नसतात, तो भ्रम आहे आणि आपले मन हे सुसूत्रीय नाही, एकसंध नाही. त्याचे अस्तित्व आहे की नाही याबद्दलही शंका आहे. सत्याचा आधार नसलेले अनुभव किंवा काल्पनिक आठवणी सांगून आपण ऐक्याची भावना निर्माण करतो किंवा भावनेवर नियंत्रण ठेवतो. ज्याला आपण मन म्हणतो किंवा ‘स्व’ म्हणतो. ते म्हणजे खरे तर असे काहीतरी जे सतत बदलत असते आणि ते इतके अनिश्चित आहे की आपल्या विज्ञानपूर्व भाषेत त्याचा अर्थ लागणे दुरापास्त आहे. बौद्ध अभ्यासक हेच तर सांगत असतात. जे कायम नाही, जे सतत बदलत असते, भ्रम निर्माण करते, त्याचे नाव ‘स्व’ आकलन आणि समज या दोहोंमधील समस्येवर उत्तर शोधण्यासाठी बौद्ध अभ्यासक एका वेगळ्या परिभाषेचा उपयोग करतात. ‘स्व’ला ते ‘अनाटा’ हा शब्द वापरतात. त्याचा अर्थ ते ‘स्व’ नसणारा असा करतात. एखाद्याने जरी ‘स्व’चा उच्चार केला तरी हा शब्द चतुरपणे आठवण करून देतो की ‘स्व’ नावाची अशी कोणीतीही गोष्ट नाही.

बौद्धवादी जेव्हा त्याच्या ‘स्व’ विषयी खोलात जाऊन विचार करतो तेव्हा तो धार्मिक शिकवण आणि त्याला झालेले आकलन याचा संबंध जोडत नाही. मंदिरात ध्यानधारणा करताना ‘स्व’ हा कल्पनाभ्रम असतो. परंतु जेव्हा बौद्धवादी बाजारात खरेदीसाठी जातो तेव्हा त्याला आपणा सर्वांसारखेच वाटते एकसंध, नियंत्रणात आणि प्रत्येक क्षण आणि क्षण बदलरहित वाटतो. प्रत्येक वस्तुविषयक जाणीव संशयास्पद वाटायला लागते. मज्जातंतू विशेषज्ञांना दर दिवशी याच प्रकारच्या गोष्टीशी संबंध येतो. याबाबतीत श्री लोगोश ह्या व्यक्तीचे उदाहरण पहा.

लोगोश ही 37 वर्षंची व्यक्ती अचानक मेंदूमध्ये आलेल्या झटक्याने रोगग्रस्त झाली. मेंदूशी संबंधित हा पक्षाघाताचा झटका त्याला त्याच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर एक महिन्याने आलेला होता. खरे कारण काय असावे हे माहीत झाले नाही. केवळ कोलेस्ट्रॉलची पातळी थोडी जास्त होती आणि सिगरेटची सवय होती. काही वेळेला औषध विज्ञानाबाबतही हे असे घडते. पुरेशी कारणे माहीत नसतानाही वाईट गोष्टी घडतात. रोगनिदानामध्ये लक्षात आले की त्याची वाचाशक्ती नाहीशी झालेली आहे-बोललेले त्याला पूर्णपणे समजत होते, परंतु त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता आणि उजव्या बाजूचा चेहरा, हात व पाय यांची हालचाल होत नव्हती. पक्षाघातासाठी उपलब्ध असलेली उपचारपद्धती त्याला मी दिली. परंतु सुधारणा दिसली नाही. त्याला पुन्हा आयसीयूमध्ये पूर्वीच्या स्थितीत पाठवण्यात आले. नंतर सी.टी. स्कॅनमध्ये लक्षात आले की मेंदूतील मृत पेशींमध्ये रक्त जमा होऊ लागलेले होते. मेंदूतील ह्या मृत पेशींच्या ठिकाणी मेंदूच्या अर्धगोलात एक मोठे छिद्र सी.टी. स्कॅनमध्ये दिसले.

माझी निराशा झाली तरी मेंदूच्या कॉर्टेक्सच्या पृष्ठभागावरच्या थरावर नजर ठेवून मी स्वतःचे समाधान करून घेतले. या ठिकाणी नुकसान कमी झाले होते आणि अनेक मज्जातंतू अजूनही जिवंत होते. तरी मी फारसा आशावादी नव्हतो. ऐंशी वर्षाच्या माणसाने आपले उर्वरित आयुष्य वाचाशक्तीविण घालवणे आपण समजू शकतो. परंतु एखाद्या तरुण माणसाने उर्वरित कित्येक दशके निःशब्द व हालचाल न करता घालवणे ही खरेच मोठी शोकांतिका होय. परंतु तरुण वयात झालेल्या मेंदूच्या दुखापतीबद्दल आपण भाष्य करू शकत नाही. तरी मी आशा ठेवून होतो. शेवटी मी त्याच्यावर उपचार केलेले होते.

दुसऱ्या दिवशी लोगोश उठून बोलायला लागला. सुरुवातीला जास्त नाही, परंतु केवळ ‘हो’ आणि ‘नाही’. त्यानंतर ‘पाणी’, ‘धन्यवाद’, जरूर, ‘मला’ इ. आम्ही त्याला थोडेसे बोलण्याच्या परंतु पूर्ण समजू शकणाऱ्या अशा अवस्थेत पुनर्वसन केंद्रात पाठवले.

एक वर्षानंतर तो माझ्या कार्यालयात एक वेगळी मागणी घेऊन आला. त्याला ड्रायव्हिंगसाठी अर्ज करावयाचा होता आणि त्यासाठी माझ्या दाखल्याची गरज होती. तो थोडा उजव्या पायाने लंगडत चालत होता आणि बोलताना थोडा अडखळत होता. शब्दांची जुळवाजुळव करण्यात थोडा वेळ जात होता.

आपल्याला भाषेचा विचार करताना आपल्याला ती एकसारखी व अविभाज्य वाटते. आपण शब्द ऐकतो, त्याला अर्थ देतो आणि उत्तर देताना इतर शब्द वापरतो. यासाठी जास्त प्रयासाची आवश्यकता नसते. किती सहजपणे भाषेचे हे कौशल्य आपण हस्तगत केलेले असते. लोगोशची घटना आपणाला स्पष्ट करते की भाषेचे सुसूत्रीकरण हा भ्रम आहे. वरवर दिसणारे भाषेचे सुसूत्रीकरण म्हणजे मेंदूतील अनेक भागांचे मिळून ते काम आहे जे काळानुसार बदलते. भाषा ऐकून घेण्याचा व व्यक्त करण्याचा भाग हे वेगळ्या तुकड्यांनी बनलेले असतात. लोगोशबद्दल जे काही घडले ते बौद्धवाद किती सहजपणे स्वीकारतो हे लक्षात घ्या. ‘अनन्त’ ही गोष्ट सुसूत्र व न बदलणारे ‘स्व’ नाही. सतत बदलणारे विचार, भावना आणि आकलनशक्ती हे ‘स्व’ आहे एखाद्या संगीत जलशासारखे! आपले मन ही तुकड्या-तुकड्यांत विखुरलेले आणि कायमचे साचेबद्ध नसलेले असे आहे. संगीताच्या लयींमध्ये जसा बदल अपेक्षित असतो, तसाच बदल मनाच्या या लयीत होत असतो.

बौद्धवाद आणि मेंदू-विज्ञान हे असाच प्रकारच्या मुद्दयावर एकत्र येतात. ‘ज्याप्रकारे आपणारा वाटते तसे ते नाही’. हाच तो मुद्दा दृष्टिआड, कायमचा व सातत्य राखणारा असा ‘आत्मा’ नसतो. आपल्या विश्वास ठेवता कामा नये. विशाल दृष्टिकोनातून पाहिल्यास मेंदू-विज्ञान आणि बौद्धवाद ‘स्व’ किंवा ‘अनत्त’ या कल्पनाविषयी सहमती दर्शवतात.

बौद्धवाद याबाबतीत कसा काय एवढा रास्त ठरत आहे? माझ्या मते बौद्धवादाची सुरुवात आनुभविक ज्ञानाद्वारे झालेली आहे. बौद्धवाद प्रस्थापित करणाऱ्यांचा काळ कदाचित विज्ञानपूर्व असेल. परंतु त्यांनी आनुभविक गोष्टींचा वापर केला. नैसर्गिक जगातील आनुभविक ज्ञान त्यांनी वापरले – सूर्य मावळतो, शेतात वारा वाहतो, एक कीटक दुसऱ्याला खातो. सतत बदल होतो आहे, घटक बदलत आहेत, कायमचे असे काही नाही. यास त्यांनी कायमचे नसलेले ‘अनिक्क’ म्हटले आणि बौद्धवादाच्या शिकवणुकीचा हाच मुख्य गाभा झाला.

नैसर्गिक जगाच्या दृष्टीने विचार केला तर हे योग्य वाटते. बौद्धवादी लोक ही कल्पना गणितातील सत्याची किंवा नैतिक मूल्यांची खात्री प्रस्थापित करण्यासाठी वापरत नाहीत, परंतु काही वेळेस, चातुर्याने ते आपल्याच शिकवणुकीसाठी वापरतात. वरवर दिसणाऱ्या ह्या विसंगतीवर काम करण्यास विचार करण्यास हजार वर्षे घालवावी लागली.

निसर्गातील होत असलेले भौतिक बदल, त्यातील भागांचे-घटकांचे होत असलेले विभाजन बौद्धवादाने सुरुवातीला लक्षात घेतले आणि ह्या गोष्टींचा त्यांनी मानवी मनाशी संबंध जोडला. आपण नैसर्गिक जगाचे भाग आहोत, आणि येथील कार्यपद्धती ही निसर्गातील खडक, झाडे, कीटक आणि मानव यांना सारखीच लागू आहे. सुरुवातीपासूनच बौद्धवादाने मानवालाही नैसर्गिक कार्यपद्धतीपासून अपवाद केला नाही. केवळ अपघाताने सत्याच्या एवढ्या जवळ बौद्धवाद पोचला हे मला असंभव वाटते. व्यक्तिगत धार्मिक अत्यानंदापासून सांगितल्या जाणाऱ्या सत्याबद्दल नेहमीच साशंक राहिले पाहिजे. जे अगोदरच ज्ञात आहे, तोच निष्कर्ष धार्मिक अत्यानंदाकडे जाणारे काढतात. दुसरे असे की जर ‘स्व’ हा भ्रम आहे तर ध्यानधारणेतून मिळणारे अंतःर्ज्ञानही भ्रमात्मक नसेल कशावरून? बौद्धवाद आणि मेंदू-विज्ञान ह्यांची जेथे फारकत होते त्या क्षेत्रात मला दुर्लक्ष करायचे नाही. मेंदूविषयी जे विज्ञानाला सध्या माहीत आहे त्यापासून काही बौद्धवादाची काही मते दूर आहेत याची मला कल्पना आहे. ‘स्व’ ही एक अमूर्त वस्तू जी मेंदूचा मृत्यू होऊनही जिवंत राहते आणि पुनर्जन्म पावते. माणसाच्या मृत्यूनंतर जाणिवेचा पुनर्जन्म होतो. अमूर्त स्व-सतत बदलत असतो ही कल्पना जर आपण स्वीकारली तर पुनर्जन्माची कल्पना ही वेडगळपणाची वाटते. जिवंतपणी मानसिक स्थिती सतत बदलत असते. त्याप्रमाणे जाणीवही बदलत असते. तेव्हा प्रत्येक नवा क्षण हा आधीच्या क्षणाचा पुनर्जन्म म्हटला पाहिजे. एक लहर जाऊन त्याची जागा दुसरी लहर घेते, वाळू आपली जागा सतत बदलत असते. तुम्ही तर चांगले असाल तर एखाद्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पडाल, जे तुम्हाला एक उच्च प्रकारचा अनुभव देईल. आणि तुम्ही चांगले नसाल, जर इतरांनी निर्माण केलेल्या लहरींची आवश्यकता भासेल, जी किनाऱ्यावरील कृमी, कीटक, व इतर सरपटणाऱ्या जीवजंतूच्या जाणिवेची तुम्हाला माहिती करून देईल समस्या ही आहे की, अमूर्त गोष्टींना मृत्यूनंतर पुनर्जन्म मिळतो ह्यास कोणताही पुरावा नाही. खरे तर ह्याच्या विरोधात पुरावा उपलब्ध आहे. पुनर्जन्म अस्तित्वात असण्यासाठी मेंदूच्या कार्याविना स्वतंत्रपणे एखादी गोष्ट अस्तित्वात असावी लागते. परंतु मेंदूचे कार्य प्रत्येक मानसिक कार्याशी (जाणीव, आकलन, भावना, स्वतःविषयी व स्व-विषयी नसलेले सर्व काही) जोडले गेलेले आहे की मानसिक कार्याशिवाय निव्वळ मेंदूचे असे काही शिल्लक राहत नाही. पुनर्जन्म ही काही बौद्धधर्मातील क्षुल्लक बाब नाही. उदाहरणार्थ – दलाई लामाचे अनुयायी दलाई लामाला निवडतात कारण त्यास ते सन्माननीय आचार्यं मोठ्या मालिकेमधील पुढील अवतार मानतात.

प्रमुख पाश्चात्त्य धार्मिक परंपरेतील कायमचा स्वतंत्रपणे अस्तित्व असलेले स्व किंवा आत्मा एवढा चुकीचा का ठरला? परिवर्तनाची नोंद घेणे हे केवळ बौद्ध परंपरेपुरतेच मर्यादित नव्हते. पाश्चात्त्य धार्मिकतेत कधी कधी दिसून येते ते. सॉक्रिटीसच्या अगोदर हेराक्लायट्स म्हणाला होता-या जगात टिकून राहते ते केवळ परिवर्तनच परंतु हे निरीक्षण पुढे टिकवून ठेवण्यात आले नाही. ही कल्पना एक परमेश्वरीय अस्तित्व मानणाऱ्या धर्मांनी स्वीकारली नाही किंवा त्यास मध्यवर्ती नैसर्गिक सत्य मानले नाही. प्रमुख विद्वान किंवा तत्त्वज्ञानांनीसुद्धा मानवी आत्मा (स्व) अपवादात्मक आणि अव्यवहारी मानला. पाश्चात्त्य धर्मांनी मानवी वर्गाला निसर्गाच्या पलीकडे मानले आणि त्यास उच्च स्थान दिले. ज्युडिओ ख्रिश्चनांची शिकवणही विज्ञानाच्या विरुद्ध जाते. मानवाची निर्मिती ही विश्वाच्या केंद्रस्थानी झाली असे ह्या धर्मात मानले जाते. विज्ञानाने आपणाला दाखवून दिले आहे की आपण आपल्या गॅलेक्सीच्या एका कडेला टोकाला आहोत आणि विश्वामध्ये आपली जागा ही काही एवढी महत्त्वाची जागा आहे असे नाही. आपली मानव-प्राण्याची जात ही माकडासारख्या पूर्वजांपासून विकसित झालेली आहे. आपल्याला मिळालेला मेंदू हा मानवी भावना आणि मानवी विशेष गुणांचा अनुभव आणि त्यांचे स्पष्टीकरण करण्यास समर्थ आहे. आपला मेंदू जी गोष्ट निर्माण करतो त्याला आपण मन म्हणतो, तो आत्मा नाही.

लोगोशसारख्या एखाद्या माणसाच्या मेंदूला जर दुखापत झाली तर त्याच्या मनात उलथापालथ होते, मनामध्ये बदल होतात आणि ही गोष्ट पाश्चात्त्य धर्मांना आह्वान आहे. अमूर्त आत्म्याचे स्थान केवळ पक्षाघाताने वाया ठरवल्यामुळे किती डळमळीत झाले हे आपण पाहिलंच. एक परमेश्वरीय धर्म आपली आत्म्याची कल्पना नवीन माहितीच्या आधारे बदलतील का? तसा प्रयत्न तरी करतील काय ? शंका वाटते. धार्मिक शिकवणूक घट्टपणे बसल्यामुळे ती बदलणे अवघड वाटते. बौद्धवादी मज्जातंतू विज्ञानाचा अंगीकार करून पुनर्जन्माची कल्पना रद्द ठरवतील काय? दलाई लामा केवळ पूर्वीच्या आचायांच्या मालिकेतील प्रतीकात्मक पुनर्जन्माचा अवतार आहेत, हे दलाई लामा आणि त्यांचे अनुयायी ठरवतील काय ?

tbkhilare@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.