शेतीची भावी दिशा

श्रीमंत तसेच गरीब देशातील शेतीमध्ये एकलपीक पद्धतीऐवजी बहुपीक पद्धतीचा स्वीकार, रासायनिक खते व शेतीतील अन्य निविष्टे ह्यांचा कमी वापर, लहान शेतकऱ्यांना अधिक साह्य आणि उत्पादन व वापर ह्यांच्या बाबतीत स्थानिक बाबींवर भर, असे परिवर्तन करणे आता अपरिहार्य झाले आहे. त्यासाठी छोट्या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणाऱ्या आणि ग्रामीण विकासास चालना देणाऱ्या, शेतीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या शाश्वत उत्पादनपद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात यावा असे आम्ही सुचवितो. एकलपीक पद्धत व औद्योगिक शेतीमुळे गरज आहे तेथे पुरेसे अन्न लोकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. अश्या पद्धतीमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान मात्र वाढत चालले आहे व ते जगाला परवडणारे नाही. (युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट युएनसीटीएडीच्या व्यापार व पर्यावरण आढावा २०१३ मधून )

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.