सहमती, असहमती आणि वादविवाद

वादविवादांचा उद्देश काय असावा? प्रतिस्पर्ध्याला ‘पराजित’ करणे की आपल्या व त्याच्या आकलनात भर घालणे? वाद-विवादाच्या प्रचलित स्वरूपावर प्रश्नचिन्ह उभे करणारा हा लेख.
—————————————————————————–

अमर्त्य सेन यांचे Argumentative Indian हेपुस्तकवाचून मी विचारात पडलो की, हे पुस्तक का लिहिले गेले असावे ? मग मला जाणवले की, भारतातील सार्वजनिक वादविवाद आणि बौद्धिक विविधतेचा वारसा दाखविण्याच्या उद्देशाने ते लिहिले गेले. तसेच, अनेकांना काहीसाआत्मकेंद्री, संकुचित आणि बुद्धिप्रामाण्यविरोधी वाटणार्‍या हिंदुत्वाविरुद्ध तो एक युक्तिवाद होता. अचानक मला उजव्या हिंदुगटांचा अमर्त्य सेनांविरुद्धच्या क्रोधाचा अर्थ समजला.
मला आणखी एका चित्तवेधक गोष्टीची जाणीव झाली की, अमर्त्य सेनहिंदुत्ववाद्यांच्या भारतासंदर्भातीलदृष्टिकोनाशी असहमत आहेत आणि हिंदुत्ववादी अमर्त्यांच्या भारतासंदर्भातील दृष्टिकोनाशी असहमत आहेत. माझ्यामते ’सहमती’, ’असहमती’ आणि ’युक्तिवाद’ यांचाअसावापरहीपाश्चात्त्यांचीदेणगीआहे. त्यात असे गृहीत धरण्यात येते की, बैाद्धिक लढाईतून, वादविवादातून ज्ञानाची निर्मिती होते. त्यातूनअसेही ध्वनित होते की, ज्ञानाची वर्गवारी सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट, योग्य आणि अयोग्य अशी करता येऊ शकते. तसेच असे सांगण्यात येते की, वादविवादाचा उद्देश सत्य, चांगल्या आणि योग्य अशा ज्ञानाची निर्मिती करणे हा असतो. म्हणूनच शैक्षणिक संस्थांमध्येतुम्हाला तुमच्या प्रबंधाचा ‘बचाव’ [Defend] करण्यास सांगण्यात येते.
हिंसा ही अनेक स्वरूपात व्यक्त होते – शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक. आपण जेव्हा‘अहिंसा’ म्हणतो तेव्हा आपण स्वतःलाशारीरिक हिंसेपुरतेच मर्यादित ठेवतो. अहिंसा ही दुसर्‍या जीवाला हानी पोहोचवणे किंवा मारणेइथपर्यंतच मर्यादित ठेवली जाते. परंतु जर मी मौन राहून बहिष्कार टाकला किंवा तुम्हाला रोजगार दिला नाही किंवा तुम्हाला गावामध्ये राहू दिले नाही किंवा तुम्हाला स्पर्श करण्याचे नाकारले, तर ही हिंसा नव्हे काय? तुम्ही जे विश्वास बाळगता त्यांना खोटे, वाईट आणि चुकीचे म्हणून नाकारणे, ही हिंसा नव्हे काय?
वादविवादाचा शेवट अखेरीस समजून घेण्यात आणि ज्ञानाचा विस्तार करणे यांत न होता, स्वत:च्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यात आणि दुसर्‍यावर विजय मिळविण्यात होतो. जसजसा वेळ जातो, तसतशायुद्धरेषा आखल्या जातात. अमर्त्य सेनआणि हिंदुत्ववादी परस्परांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत आणि एकत्र काम करू इच्छित नाहीत. त्यांचे अनुयायी दुसर्‍याचे म्हणणे ऐकू येऊ नये म्हणून कर्कश आवाजात ओरडतात. त्यांचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे एकाच सत्याचा विजय व्हावा, तुमच्या किंवा आमच्या!
असेआपल्या घरीकिंवा कार्यालयातदेखील घडते. आपण एखाद्या सिंद्धांताशी एकतर सहमत व्हावे नाहीतर असहमत तरी व्हावे अशी अपेक्षा करण्यात येते. त्यातूनच वाद निर्माण होतो. काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तुम्हाला जाणवेल की सहमती आणि असहमतीची भाषा ही बंदिस्त मनाला मान्यता देते. दुसर्‍याशी संवाद साधून मनोविकास करण्याऐवजी केवळ एकाच मताचा पुरस्कार करण्याचा हेतू त्यामागे असतो. सहमती, असहमती आणि वितर्क ही ‘विवादाची’भाषा आहे. ती संवाद, चर्चा आणि विचारविनिमयाची भाषा नव्हे. विवादामध्येप्रत्येक जण बोलण्यास उत्सुक असतो. संवादामध्येप्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले जाते.
जेव्हा लोक मला सांगतात का आदि शंकराचार्यानी मंडन मिश्रसारख्या बौद्ध आणि वैदिक पंडितांना वादविवादात ’पराजित’ केले, तेव्हा मी विचारात पडतो की, हे शहाणपणाचे लक्षण आहे की बौद्धिक सामर्थ्याचे? ते भारतीय न्यायालयातील वकिलांप्रमाणे ‘सत्य’शोधण्याचा प्रयत्न करत होते का? स्वत:चे वर्चस्व गाजवणे, जिंकण्याची अभिलाषा आणि ग्रीकांप्रमाणे सहमती, असहमती, वितर्क यासंदर्भातच आपण आदि शंकराचार्यांना समजून घेत आहोत का? कीभारतीय पंरपरेनुसार दुसर्‍याचे ऐकून घेणे, एखाद्या गोष्टीतील सत्य मान्य करणे, प्रशंसा करणे, सामावून घेणे आणि त्याचे, तिचे, माझे, तुमचे अशा विविध स्वरूपातील सत्याद्वारे मनोविकास करणे, याआधारे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत?
ज्ञानाच्या नावाखाली बौद्धिक आणि भावनिक अशा अदृश्य हिंसेचा गौरव जगातील मोठमोठ्या शैक्षणिक संस्थांमध्येकेला जातो. सहमती, असहमती, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वत:चे मत रेटणे तसेच, भावना दुखावल्या जातील किंवा दुर्बल घटकांना आक्षेपार्ह वाटेल यासबबीखाली प्रगतिशील राजकीय दृष्टिकोनाच्या बुरख्याआड इतरांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणे, अशा वृत्तीने प्रत्येकाचे मन व्यापून राहिले आहे. पहिलवानांचे कौतुक करावे त्याप्रमाणे आपण बुद्धिमान मनुष्यांचे कौतुक करतो. कारण आपल्याला त्यांची भीती वाटत असते आणि त्यांच्याप्रमाणे व्हावेसेदेखील वाटते. आपल्याला सामर्थ्याची आणि वादविवादात विजय मिळविण्याची उत्कंठा असते.
खरे तर आपल्याला ज्ञानाची पर्वा नसते. जर ती असती तर आपण अधिक स्थिर, अधिक जागृत आणि समाधानी झालो असतो.
(मूळप्रसिद्धी – मिडडे, १४फ़ेब्रुवारी२०१६अनुवाद: डॅा. श्याम पाखरे)

‘एकं सत विप्रा बहुधा वदन्ति’ हे आहे वेदांचे सर्वोत्तम सूत्र. एवढे एकसूत्र जरी आपण आत्मसात केले तरी सज्जनांच्या विचारांत कधी विरोध दिसणारनाही. वाद एवढ्यावरून उभे होतात की एक विचारक दुसऱ्या विचारकास खोटा मानतो.ह्याऐवजी असे जर मानण्यात आले की ‘सत्यविचार सर्वत्र एकच आहे, आपल्याध्यानात त्याचा एकच अंश आला आहे आणि दुसऱ्याला दुसरा अंश ध्यानात आला आहे, आणि अशा रीतीने विचारांची अनेक अंगे असू शकतात’ तर ह्या सर्वांचा मेळ होऊशकेल आणि सर्वसमन्वय साधू शकता येईल. आपल्याकडे असे झाले की वेदांचासमन्वय उपनिषदांनी केला आणि उपनिषदांचा समन्वय गीतेने केला. ही तिन्हीमिळून प्रस्थानत्रयी बनली आणि त्यांवर भाष्ये लिहिली गेली. अशा रीतीने एकासमन्वय प्रक्रियेचा आपल्याकडे विकास झाला. त्यामुळे समाजात श्रद्धेचा संचयझाला. नाहीतर सर्व अस्ताव्यस्त झाले असते. समन्वयाची अशी विकसित प्रक्रियाही भारताची सर्वांत मोठी देणगी आहे.

(विनोबा भावे: आज सर्वात अधिक जरूरी आहे समन्वय दृष्टीची – ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ या पुस्तकातून)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.