मासिक संग्रह: जानेवारी, २०१७

आम्ही का जावं पाकिस्तानात ?

हा देश तुमची मालमत्ता आहे
की आमच्यापेक्षा अधिक घाम-रक्त वाहवलंय तुम्ही
तुमच्या श्वासात आमच्यापेक्षा अधिक विरघळली आहे इथली हवा
तुमच्या मातीत इथला सुवास अधिक आहे
की नसांतून जरा जास्तच दौडतय इथलं पाणी
नाही ना, मग आम्ही का जावं पाकिस्तानात?
ज्यांना जायचं होतं, ते गेले निघून पाकिस्तानात
त्यांना तुमच्या पाकिस्तानची भीती वाटत होती
म्हणून त्यांनी बनवला त्यांचा त्यांचा पाकिस्तान
पण काय झालं ?
धोक्यात आहे त्यांचे अस्तित्त्व
आपल्याच पाकिस्तानात भयग्रस्त आहेत ते,
खरं तर सर्वांनाच माहित आहे
की प्रत्येक पाकिस्तानचा शेवट सारखाच असतो
म्हणून आम्ही पाकिस्तानात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

पुढे वाचा

दोन टिपणे

१. मी!डिजिटल! होणार! नाही!

डिजिटल, नोटबंदी, क्रेडिट-डेबिट कार्ड, एटीएम
——————————————————————————
नोटबंदीच्या अव्यवस्थेतून उद्भवलेल्या त्रासाबद्दल अतिशय समर्पक व त्रोटक भाष्य!
——————————————————————————
माझी बँक तशी चांगली आहे. वीसेक वर्षे माझे खाते तिथेच फक्त आहे, आणि माणसे ओळख ठेवून सभ्यपणे वागतात. पण हे माणसांचे झाले, ज्यांच्या वर आता एटीएम-डेबिट कार्डे आणि संगणकचलित ‘सिस्टिम्स’ येऊन डोईजड होताहेत.
पहिला त्रास मात्र बँकेच्या नव्हे तर माझ्याच यंत्रावर होऊ लागला. माझ्या खात्यात काहीही व्यवहार झाला की माझ्या मोबाईलवर त्याची सूचना येऊ लागली. माझ्या मनात आले, “चला, आता पासबुक अप्टुडेट नसले तरी खात्यात किती पैसे आहेत ते कळत राहील!’’

पुढे वाचा

काश्मीरचे वर्तमान (भाग २)

काश्मीर, हिंसा, काश्मिरी पंडित, मुस्लिमप्रश्न
—————————————————————————–
भारत-पाक फाळणीला आता 70 वर्षे होतील. पण काश्मीरमधील पेचप्रसंगानेही जखम अजूनही भळभळतीठेवली आहे. गेले सहा महिने तर तेथे कर्फ्यूच लागलेला होता. लष्करी बळावर आपण काश्मीर भारतात भौगोलिक दृष्ट्या राखू शकू. पण त्यातून उद्भवणारे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न आपली पाठ सोडणार नाहीत. थेट काश्मीरला जाऊन तेथील विविध जनसमुहांशी थेट संवाद करून तेथील परिस्थितीचा एका पुरोगामी कार्यकर्त्याच्या दृष्टीने धांडोळा घेणाऱ्या रिपोर्ताजचा हा उत्तरार्ध.
—————————————————————————–
4 ऑक्टोबर, श्रीनगर
तीन तारखेसच याकूबकडून कळले की, एस.एन.सुब्बारावजी 1 ऑक्टोबरपासून श्रीनगरला आलेले असून ते 4 ऑक्टोबरला परतणार पण त्याआधी ते मला भेटायला लग्नघरी येणार.

पुढे वाचा

चलनबंदी: एक अर्थाभ्यासीय दृष्टिकोन (भाग-२)

चलनबंदी, पैसा, अर्थव्यवस्था, विनिमय
——————————————————————————–
मोदीसरकारने घेतलेल्या चलनबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रश्नाशी संबंधित मूलभूत संकल्पना समजावून देणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध.
——————————————————————————–
रिझर्व बँकेच्या गव्हर्नरचे स्वप्न
समजा आपण आज देशाची अर्थव्यवस्था सुरू करतो आहोत. आपण RBI चे गव्हर्नर आहोत, म्हणजे या अर्थव्यवस्थेचे हृदय आहोत. आपल्या हातात देशभरातील बँकांचे जाळे आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या आहेत आणि आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेत चलनरूपी रक्तपुरवठा करायचा आहे. पण तो मिळणार कुणाला? तर या देशातील नागरिकांना. मग आपली अपेक्षा काय असेल?
आपली पहिली अपेक्षा असेल की प्रत्येक नागरिकाने त्याची संपत्ती जाहीर करावी.

पुढे वाचा

भारतीय चर्चापद्धती (भाग ५)

चरकसंहिता : वाद आणि वादपरिभाषा

चर्चापद्धती, चरकसंहिता, वादविद्या, परिभाषा
भारतीय चर्चापद्धतीचा इतिहास सांगणाऱ्या ह्या लेखमालेच्या ह्यापूर्वीच्या भागांमध्ये आपण आन्वीक्षिकीचा परिचय करून घेतला.ह्या पद्धतीचे उपयोजन तज्ज्ञ मंडळींमध्ये मानवी आरोग्यविषयक चर्चा घडविताना प्रभावी पद्धतीने कसे केले जात होते ह्याचे दाखले चरकसंहितेत अनेक ठिकाणी मिळतात. त्यांतील वादांचे स्वरूप व परिभाषा ह्यांचा परिचय ह्या लेखात करून दिला आहे.

चरकाचार्यांनी परिषदेचे स्वरूप सांगून नंतर प्रत्यक्ष चर्चा कशी करावी, यासाठी न्यायदर्शनातील ‘वाद’ संकल्पनेत काही बदल केले. त्यासाठी वादाची परिभाषा तयार केली. आयुर्वेदाचा संदर्भ वगळला तर ती आज किंवा कधीही इहवादी दृष्टिकोनातून उपयुक्त ठरू शकेल इतकी लवचीक आहे.

पुढे वाचा

जातिअंत : विचार आणि व्यवहार

जातिअंत, वर्ग-जाति-पुरुषसत्ता
—————————————————————————–
जात्यन्ताचा प्रश्न आज कोणत्याही पक्ष-संघटनेच्या अजेंड्यावर प्राधान्याने व ठोसपणे असल्याचे दिसत नाही, ह्या वास्तवाची मीमांसा करून तत्त्वज्ञान व व्यवहार ह्या दोन्ही पातळींवर काही उपाय सुचविणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध
—————————————————————————–
सद्यःकालीन राजकारणाच्या पटलावर जातजमातवादी फॅसिझमच्या विरोधात अनेक डावे, फुले-आंबेडकरवादी आदी समाजपरिवर्तक पक्षसंघटना एकत्रित येऊन महाराष्ट्रभर जात्यन्ताच्या परिषदा-मेळावे घेत आहेत. रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या प्रश्नावर आणि जेएनयूतील प्रकरणानंतर मार्क्सवाद्यांमध्येही जातिविरोधी लढ्याविषयीची भाषा सुरू झाली आहे. परंतु जातिव्यवस्था व तिच्याशी संलग्न असलेली पितृसत्ता आणि भांडवलशाही यांच्या गुंतागुंतीच्या अविभाज्य अन्योन्यसंबंधाबद्दल वास्तवदर्शी क्रांतिकारी भान अद्यापही डाव्यांकडे आलेले दिसत नाही.

पुढे वाचा