महाकवी पीयूष मिश्रा आणि एक रविवार

एकाच दिवशीच्या वृत्तपत्री थळ्यांनी इतकं अस्वस्थ व्हावं? लढाईचे दिवस नाहीत, बॉम्बवर्षाव नाही, त्सुनामी, महापूर, ज्वालामुखीचा उद्रेक नाही……सारं कसं शांत शांत! मग नेहेमीच्या मध्यमवर्गी स्वस्थतेचा आज मागमूसही का नाही? गुरु लोक म्हणतात तसा आपल्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट तर नाही? असेल बाबा!

माझ्या गावाजवळचं, माझ्या ओळखीतलं गाव अमरावती. भारत स्वतंत्र व्हायच्या सत्तावीस वर्षे आधी ऑलिम्पिकला प्रतिनिधी पाठवणाऱ्या हनुमान आखाड्याचं गाव. श्रीकृष्णरुक्मिणीच्या प्रेमकथेचं गाव. दादासाहेब खापर्डे, सुदामकाका देशमुख, मोरोपंत जोशी, के.व्ही. आणि ताराबाई मोडकांचं गाव. पंजाबराव देशमुख आणि शिवाजी महाविद्यालयांच्या विदर्भभर पसरलेल्या संस्थांच्या जाळ्याचं गाव. का जळतं आहेदूर कुठेतरी त्रिपुरामध्ये म्हणे काही पूजास्थानांची कोणी नासधूस केली. देश मोठा, अत्यंत विभागलेला. जातीच म्हणे तीस हजारांवर आहेतधर्मही शेकड्यांत तर असतीलच. पूजास्थानं? कोटींमध्ये? बरं, देशाची, समाजाची, संस्कृतीची ख्याती सहिष्णू अशी. “मेणाहूनि मऊ, आम्ही विष्णुदास!” मग माझी अमरावती जळते कशासाठी? कोणासाठी?

यवतमाळ. अश्राप गाव. शामादादा कोलामांपासून, लोकनायक अण्यांपासून; जवाहरलाल दर्डांचं आणि जांबुवंतराव धोट्यांचं गाव. एका डॉक्टरचा खून, की गावभर दंगा, बंद, कर्फ्यू. कोणी नेता म्हणतो म्हणे, “कॉलेज उघडा तर खरं, गाव पेटेल!”. अरे राजेहो, तुम्ही कुठे आहात तेही माहीत नसल्याचं गर्वानं सांगतात, ते सुसंस्कृतलोक! त्यांना आपलाच प्रांत माहीत नसल्यानं ओशाळं वाटत नाही. त्यांना ना राजाची भाम्ब माहीत, ना अरुणावतीचक्रावती नद्या. ना दारव्हादिग्रस, ना खारं पाणी. माहूर माहीत असेल…..नसेलही. ‘प्रगतविचारांच्या नावाखाली देवस्थानंही विसरली जाऊ शकतात. का शिणवता लहानथोर भांडणातून स्वतःला? नाही, अन्याय झाला असेल, होतही राहील. तुम्ही भाग का घेता?

गडचिरोलीत म्हणे घाऊक २६ आदिवासी मारले गेले. कट्टर नक्षलवादी होते! त्यांच्यात एल्गार परिषदेचा सूत्रधारही होता म्हणे. आणि ह्या २६ जणांना मारण्यात चार पोलीस जखमी झाले. किती विषम लढाई असेल ती? “त्यांच्याकडे लेटेस्ट हत्यारं आणि संपर्कसेवा असतातअशी कीर्ती असलेले २६ लोक मरतात. त्यांचा नेताही म्हणे एक यूएपीए (UAPA ) दर्जाचं कांडआयोजित करणारा चतुर सेनानी. पोलीसही मुळात स्थानिकच. कधीकाळी त्यांच्याही जमिनी लुटल्या जाऊन त्यांनी वर्दी चढवली, पोटापाण्यासाठी. ते २६ मरतात; हे चार जखमी होतात. “गोलियां छे और आदमी तीन! बहुत नाइन्साफी है!” कोण नाचवतं आहे कळसूत्री बाहुल्या?

क्रिप्टोकरन्सीवर सभा होते. त्या विषयाबाबत जाहिराती खूप (खूपच) असतात आजकाल. प्रत्येक जाहिरातीनंतर काहीतरी गडबडगुंडा मंत्र म्हटला जातो. त्याचा गाभा असतो क्रिप्टोकरन्सी उर्फ गुप्तनाणी वापरणं अवैध आहे. बेकायदेशीर आहे. It is not legal tender”. पण जाहिरात करणं वैध असतं, बरं! ते असो. सभेत काय सूचना येतात? “या प्रश्नावर प्रागतिकदृष्टीनं विचार करा.” म्हणजे काय करा? आहे उत्तरकोणतंही समाजोपयोगी काम न करता बिटकॉईन व त्याचे भाईबंद कमावता येतात. भारतात अघोषित‘, undeclared अशा तस्करीच्या सोन्यामोत्यांनाही नाण्याचा, legal tender चा दर्जा नाही. पण आपल्या ओळखीत अवैध सोन्यामोत्यांनी सौदे होतात ना? पकडता येतात का ते? नाही ना? मग क्रिप्टोनाणी अवैध आहेत, हे लागू कोण करणार? प्रागतिक विचार करणारे? स्मार्ट फोनटॅब्लेटलॅपटॉपडेस्कटॉप असल्यानं शिकलेले? इतरांचं काय, हा प्रश्नही न पडलेले?

नागभूमीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणं ‘आसाम रायफल्स’ हे सैनिकी बल करत असतं. त्याचे मोठे अधिकारी तीन किंवा जास्त वाहनांच्या जत्थ्यानंच प्रवास करतात. त्याचा प्रमुख आणि काही सहकारी स्फोटात मारले गेले. काही वर्षांपूर्वी माझा मामेभाऊ होता त्या पदावर. आग्रह करायचा, “अरे, येऊन जा! भारताच्या या भागात यायला Inner Line Permit नावाचा पासपोर्टसारखा, पारपत्रासारखा परवाना लागतो. मी मिळवून देतो सहज. ये!” आपल्यापैकी किती लोकांना भारताच्या काही भागांत जायला पारपत्र लागतं, हे माहीत असतं? का नसतं?

आणि COP २६ समिट! बोल्सोनारो भडकले. सज्जन माणूस. खोटं तरी नाही बोलले. इतर अनेक जण वाट्टेल ते कबूल करत मनांत म्हणाले, “बोलाचीच कढी, बोलाचाची भात | जेवोनिया तृप्त कोण झाला?||”

तर सध्याचा महाकवी पीयूष मिश्रा याची गुलालचित्रपटातली गाणी आठवली. एका गाण्यात सामाजिक हळवेपणाचा उद्धार आहे. (गीत : ओ री दुनिया)

जैसी बची है, वैसी की वैसी
बचा लो ये दुनिया
अपनी समझ के अपनों के जैसी
उठा लो ये दुनिया
छुट्पुट सी बातों में जलने लगेगी
सम्हालो ये दुनिया
कटपिट के रातों में पलने लगेगी
सम्हालो ये दुनिया

का एवढे हळवे झालो आपण? टीचभर गोष्टींतही “ईंट का जवाब पत्थर से” का द्यायला लागलो आहोत आपण? तो कटपिट के रातों मेंप्रकार कोण पाळतं आहे?

बरं, सोबतच महत्त्वाच्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्षही सातत्यानं होतं आहे. पुन्हा मिश्राजी ऐका, ‘गुलालमध्येच. (गीत : सरफरोशी की तमन्ना)

आज के जलसों में बिस्मिल
एक गुंगा गा रहा
और बहारों का ये रेला
नाचता महफिल में है

नाही. अनेक जण, अनेक माध्यमं महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताहेत. तात्कालिक घटनांचे अर्थ लावायला मदत करताहेत. मूलभूत ज्ञानापर्यंतही पोचताहेत. लोकशाहीसाठी सुजाण, सुशिक्षित नागरिक आवश्यक आहेत, हे ओळखून वागताहेत. पण आपल्या दुर्दैवानं(?) सरकारं आणि इतर व्यवस्था तसे करत नाही आहेत. उलट ते म्हणतात की साध्यासाध्या नागरी संस्था, Civil Society ह्या आज आघाडीवर उभं ठाकून लढण्याजोग्याझाल्या आहेत. आणि तसं गीत गाणाऱ्या मुक्यांपुढे बहिऱ्यांचे मोठमोठे जत्थे नाचताहेत.

अभिप्राय 4

  • सलाम पियूष मिश्राजींना आणि नंदा खरेजींना!

  • श्री. पीयुष मिश्रा आणि नंदा खरें यांनी या लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काहीशी आहे हे मान्य; पण ती तशी का आहे या साठी स्वतंत्र प्राप्तीनंतर देशात प्रथम सत्तेवर आलेल्या सरकार ची कार्यप्रणाली पहावी लागेल. आपल्या राज्यघटनेतील कलम १४,१५,१६ ही खासकरून समाजातील जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद मिटवण्यासाठी आहेत. पण डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्षानुवर्षे दलित समाजावर झालेल्याआत्याचाररांमुळे त्यिंचे मागासलेपण मिटवण्यासाठी मर्यादित काळासाठआरक्षणाचाची तरतूद करून ली होती. पण त्यावेळी निर्विवाद बहूमतांनी सत्तेवर आलेल्या पक्षाने ती तरतूद नुसती बेमुदत वाढवली नाही तर इतर मागास जातिंचा ही समावेश करून भेदाभेदांना खतपाणी घातले. जातींवर आधारित राज्य निर्माण करून समस्या वाढविल्या. मूलभूत विकासाकडे दुर्लक्ष केले. पूर्वसीमेवररील राज्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या लेखकद्वयांनी वर्णन केलेली परिस्थिती उद्भवलेली आहे. पण आता सत्तेवर आसलेल्या सरकारने मूलविकासासाठीला प्राधान्य दिले आहेपूर्वांचलालाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. गेल्या जवळजवळ दोन वर्षांपासून जगभरात उद्भवलेल्या करोना महामारीमुळे औद्योगिक विकासात उद्भवलेल्या अडचणिंवर मातकरण्यातसाठी मेकइन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतची घोषणा करून कामाला सुरुवात केलेली आहे. भारतातील मतदार पूर्वीपेक्षा जागृत झाले आहेत. त्यामुळे भारताचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल असणार इहे.

  • आभार रमेश वेदकजी,
    ”पण आता सत्तेवर आसलेल्या सरकारने मूलविकासासाठीला प्राधान्य दिले आहेपूर्वांचलालाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. गेल्या जवळजवळ दोन वर्षांपासून जगभरात उद्भवलेल्या करोना महामारीमुळे औद्योगिक विकासात उद्भवलेल्या अडचणिंवर मातकरण्यातसाठी मेकइन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतची घोषणा करून कामाला सुरुवात केलेली आहे. भारतातील मतदार पूर्वीपेक्षा जागृत झाले आहेत. त्यामुळे भारताचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल असणार इहे.”
    मेक इन इंडिया म्हणजे वाढते बेरोजगार, भुकेले, भविष्याची उर्मी, स्वप्ने हरवलेली तरूणाई विकासाच्या सर्व प्रांतात जगभरच्या आकडेवारी नुसार बांगला देसच्या पेक्षा खली नंबर गेलेला भारत.

  • स्वातीजाजी, माझ्यप्रतिक्रियायेला आपण दिलउपरांतरोधी उत्तर वाचले. आपली मानसिकता पी हळद हो गोरी अशी वाटते. स्वातीजाजी आपला देश आवाढव्य असून आपली लोकसंख्याही खूप आहे हे आपण मान्य कराल. गेल्या बहात्तर वर्षातसुरुवाततीला चार दशकं निर्विवाद बहूमतांनी आणि पुढे अनेक वर्ष आघाडी च्या रुपात अनेक वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता होती. या काळात देशाचा विकास झाला असला तरी मूलभूत विकासाकडे तसे दुर्लक्ष झाले होते. त्यातच मतांच्याराजकारणातसाठी हिंदू-मुस्लिम, जाती-जातीत फूट पाडण्याचे राजकारण, यामुळे देशांतील लोकांची परिस्थिती सुधारली नाही. शेतकय्रांचा कैवारी म्हणवणाय्रा या पक्षानशेतकऱ्यांनाची परिस्थिती सुधारली नाही. पूर्वांचलातील सीमेवरील सात राज्यांकडे दुर्लक्ष केले. भाजप सत्तेवर येऊन सात वर्ष झाली, त्यात गेली दोन वर्ष करोनाचा उद्रेक. त्यांतूनही मोदीजी मेकइन इंडिया, आत्मनिर्भर भारत या योजनांतून विकास करत आहेत. पण आपल्या खंडप्राय देशात ययोजनानांची फळं दिसायला काही काळ लागेल की नाही? त्यात सत्ता गमावलेल्या, आणि पुन्हा सत्तेवर येण्याची शाश्वती नसल्यानविपक्षीयांनाचे राजकारण. पजनतेलाचा मोदीजिंवर विश्वास आहेमोदीजिंनीची देशविकासाची स्वप्न नक्कीच फलद्रुप होतील.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.