मासिक संग्रह: जुलै, २०२३

नव्या प्रश्नांची उत्तरे कधी शोधणार?

जुलै २०२२ मध्ये ब्लेक लेमोईन या इंजिनीयरला गूगलच्या गुप्ततेच्या कराराचा भंग केल्याबद्दल प्रथम सक्तीच्या रजेवर पाठवले आणि नंतर बडतर्फ केले. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (यापुढे आपण ए.आय. किंवा कृत्रिमप्रज्ञा म्हणू) विभागात काम करत होता. गूगलचे लार्ज लॅंगवेज मॉडेल (दीर्घ भाषा प्रारूप) ‘लामडा‘सोबत केलेली विविध संभाषणे त्याने प्रसिद्ध केली आणि ‘लामडा’ ही कृत्रिमप्रज्ञा असूनही संवेदनशील आहे असे त्याने जाहीर केले. 

२ मे २०२३ रोजी कृत्रिमप्रज्ञेचे पितामह आणि ट्युरिंग पारितोषकाचे मानकरी जॉफरी हिंटन यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी गूगलचा राजीनामा दिला. राजीनामा देताना ते म्हणाले, “वातावरणबदलाच्या धोक्यापेक्षा कृत्रिमप्रज्ञा जास्त धोकादायक आहे.”

पुढे वाचा

मार्क्सची अर्थमीमांसा : भाग १

जगाच्या इतिहासात जी प्रतिभावंतांची मांदियाळी होऊन गेली, त्यांपैकी मूलगामी विचारवंत म्हणून संपूर्ण जगाला परिचित असलेल्या कार्ल मार्क्सच्या अर्थशास्त्राची अन्वेषणा करण्याचे येथे योजले आहे. ही अन्वेषणा मुख्यत: मार्क्सच्या अर्थशास्त्रीय दृष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न करते.

मार्क्सला स्वीकारण्या अथवा नाकारण्याऐवजी त्याला समजून घेण्यात ज्यांना रस आहे, केवळ अशा व्यक्तींच्या दृष्टीनेच ह्या लेखमालेस काही मूल्य असू शकेल.

प्रस्तुत लेखनाचा हेतू हा मार्क्सच्या अर्थशास्त्रीय विश्लेषणाची विद्यमान अर्थशास्त्राशी तुलना करणे आणि मार्क्सच्या अर्थविचारांवर भाष्य करणे, असा आहे. मार्क्सविचारातील क्षमतास्थळे व कमकुवत स्थळे कोणती याची जाणीव करून घेत, अर्थशास्त्राच्या आधुनिक वैचारिक परंपरेच्या प्रकाशात मार्क्सविचाराचा वेध घेणे, हा या लेखनाचा उद्देश आहे.

पुढे वाचा