मासिक संग्रह: जुलै, २०२३

मनोगत

सादर निरोप

नंदा खरेंनंतर एका वर्षाच्या आत ‘आजचा सुधारक’ने आणखी दोन खंदे विचारवंत गमावले.

सुनीती देव

लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता, विवेकी विचारवंत, आणि ‘आजचा सुधारक’च्या संपादकमंडळात अनेक वर्षे कार्यरत सुनीती देव ह्यांचे २ मे २०२३ ला निधन झाले. अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात त्या तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापिका होत्या. परंतु नागपुरात त्यांची ओळख फार वेगळी होती. सुनीतीताई जगन्मित्र होत्या. त्यांचे सोबत असणे अतिशय आश्वासक वाटे. त्यांचे हास्य केवळ त्यांच्यापुरते नसून संपूर्ण वातावरणात आह्लाद पसरवणारे होते.

‘आजचा सुधारक’च्या अगदी सुरुवातीपासून (तेव्हाचा, नवा सुधारक) त्या संपादकमंडळात तर होत्याच, पण तेव्हा वर्गणीदारांची यादी बनवण्यापासून, पत्ते आणि तिकिटे चिकटवून अंक पोस्टात टाकण्यापर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. 

पुढे वाचा

तंत्रज्ञानाचा समाजावरील परिणाम

हल्ली मुले स्मार्टफोनला चिकटून असतात म्हणून जे पालक चिंतित असतात त्यांच्या पालकांना तीसेक वर्षांपूर्वी टीव्हीचीही तशीच भीती वाटत होती. त्याआधीच्या पिढीतील तरुण मुले रेडिओमुळे बिघडतील अशीही भीती त्यांच्या पालकांनी व्यक्त केली होती. तंत्रज्ञानाविषयी लोकांची प्रतिक्रिया कशी बदलते त्याविषयी प्रतिभावंत विज्ञानकथालेखक डग्लस अ‍ॅडम्स यांनी सांगितलेल्या ठोकताळ्यांचा स्वैर अनुवाद काहीसा असा करता येईल: “तुमच्या बालपणापासून प्रचलित असलेले तंत्रज्ञान तुम्हाला स्वाभाविक आणि जीवनावश्यक वाटते. तुमच्या तरुणपणात जे शोध लागतात ते तुम्हाला क्रांतिकारक वाटतात आणि त्यांवर तुम्ही चरितार्थही चालवू शकता. परंतु, तुमच्या म्हातारपणी लागलेले शोध मात्र विकृत असतात, तरुणाईला वाईट नादाला लावून जगबुडी आणणारे असतात.”

पुढे वाचा

गुणाकाराची बेरीज – वजाबाकी

लहानपणी आजी एक गोष्ट सांगत असे. भस्मासुराची गोष्ट. त्यात म्हणे भोळ्या शंकर महादेवाने भस्मासुराला एक वरदान दिले. आणि त्यात त्याला अशा काही शक्ती प्राप्त झाल्या की तो भस्मासूर ज्या कोणत्याही वस्तूवर, गोष्टीवर किंवा प्राण्यावर हात ठेवेल तो तात्काळ नष्ट होईल, जळून भस्म म्हणजे राख होईल. ही गोष्ट ऐकताना त्या भस्मासुराबद्दल राग येत होता की त्याला मिळालेल्या त्या शक्तीबद्दल त्याचा हेवा वाटत होता? हे आजतागायत ठरवता आलेले नाही. आपल्याला अशी शक्ती मिळाली तर कित्ती मज्जा! असा विचार मनात येत असतानाच आजी त्या भस्मासुराला दोन शिव्या हासडत विष्णूला मोहिनी रूप घ्यायला लावून त्या भस्मासुरालाच संपवून टाकत असे.

पुढे वाचा

कृत्रिम बुद्धिमत्ता : आळं की आळा

नोव्हेंबर २०२२ च्या शेवटी जन्म झालेल्या चॅटजीपीटीने कृत्रिमप्रज्ञेच्या जगतात खळबळ उडवली. चॅटजीपीटीची महती हा हा म्हणता बहुतांश सांख्यीक-साक्षर जगतात पोचली आणि उलट-सुलट चर्चांना ऊत आला. चॅटजीपीटी हा तुमच्यासोबतच्या चर्चेतून तुमच्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे देणारा तुमचा सखा आहे(१). लार्ज लॅंग्वेज मॉडेलवर (LLM) आधारित असल्याने निबंध लिहिणे, कविता करणे, ज्या ज्या विषयांची माहिती उपलब्ध आहे त्या विषयांवर संभाषण करणे यात तो तरबेज आहे. OpenAI च्या या प्रारूपापाठोपाठ बाजारात अनेक प्रारूपे आली. आधी आकाराने गलेलठ्ठ असलेली ही प्रारूपे फाईन-ट्युनिंगद्वारे हळूहळू रोड होताहेत.

पुढे वाचा

कृत्रिमप्रज्ञा आणि सर्जनशीलता

अवघ्या सात-आठ महिन्यांपूर्वी लाँच झालेले चॅटजीपीटी आणि पर्यायाने कृत्रिमप्रज्ञा हे क्षेत्र आज जगभरात सर्वांत मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात बेरोजगारीची सर्वात मोठी लाट येणार, तब्बल तीस कोटी रोजगार यातून बाधित होऊ शकतील असे काही अहवाल सांगत आहेत. मानवी सर्जनशीलतेवर कृत्रिमप्रज्ञेचा हा हल्ला आहे असे काही चिंतातूर जंतू ओरडत आहेत, तर तंत्रज्ञानाचे बहुतेक जाणकार, तज्ज्ञ तिचे स्वागतही करत आहेत. चॅटजीपीटीमार्फत ओपनएआय कंपनीने जगभरातील भाषा आणि सर्जनशीलता क्षेत्रात आघाडी घेतली आहे. त्यांनी असे एक चॅटबॉट बनवले आहे जे तुमच्यासाठी लेखनिकाचे काम करते.

पुढे वाचा

जननशील कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रश्न सोडवू शकत नाही

बुद्धिमत्ता म्हणजे काय?

अवजारे वापरणे हे बुद्धिमत्ता असण्याचे एक लक्षण मानले जाते. आपण माणसेही ज्या वानरगणाचा भाग आहोत, त्यातले चिंपांझी काडी वापरून मुंग्या पकडून खातात.

माझ्या एका मित्राकडे कुत्रा आहे. काही वर्षांपूर्वी तो मला सांगत होता की त्याच्या कुत्र्याची प्रजाती कुत्र्यांमधली दुसऱ्या क्रमांकाची आहे, हुशारीच्या बाबतीत. मी त्याला म्हणाले, “माझ्याकडे मांजर आहे. तिला कॅल्क्युलस येत नाही; कोडिंग करता येत नाही; तिची भाषा अत्यंत मर्यादित आहे. मला कॅल्क्युलस येतो, कोडिंग येते. त्यामुळे दोघींच्या पोटापाण्याची सोय मला लावता येते. आणि आपल्याला खायला कोण घालते, कुणावर विश्वास ठेवता येतो हे तिला बरोबर समजते.

पुढे वाचा

कृत्रिमप्रज्ञा आणि सर्जनशीलता 

दिलेल्या उत्तरांच्या आधारे जर एखाद्या मानवी परीक्षकाला, ती उत्तरे मानवाने दिली आहेत की यंत्राने हे ठामपणे निश्चित करता आले नाही तर ते यंत्र मानवासारखे आणि मानवाएवढे विचारी आहे असे म्हणता येईल अशी ही यंत्राची बुद्धिमत्ता/प्रज्ञा तपासण्याची परीक्षा अ‍ॅलन टुरिंग ह्या ब्रिटिश गणितज्ञाने १९५० मध्ये सुचवली. २०२२-२३ मध्ये ChatGPT, Bard आणि ह्यांसारख्या माध्यमांद्वारे सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून दिलेली कृत्रिमप्रज्ञा टुरिंगच्या परीक्षेत उत्तीर्ण होते. म्हणून आजच्या कृत्रिमप्रज्ञेला मानवाएवढी बुद्धिमत्ता/प्रज्ञा आहे म्हटले जाते. मात्र मानवी मेंदूच्या माहितीच्या साठवण आणि प्रक्रिया करण्याच्या क्षमतेच्या तुलनेत आजच्या कृत्रिमप्रज्ञेची क्षमता अफाट असल्याने आजची आधुनिक कृत्रिमप्रज्ञा मानवाहून जास्त बुद्धिमान ठरेल आणि (नजीकच्या?)

पुढे वाचा

कृत्रिमप्रज्ञेच्या युगात भविष्यातील शिक्षण

सगळीकडे आर्टिफिशिअल इंटलिजन्सची चर्चा सुरू आहे. Chat-GPT, AI हे शब्द विविध समाजमाध्यमांत, न्यूज चॅनेल्सवर ऐकू येत आहेत. काही जणांच्या मते हे खूळ आहे. तर काही जणांना वाटते की यामुळे जग बदलेल. पण खरे सांगू का? तुम्हाला-आम्हाला काय वाटते ते आता महत्त्वाचे राहिलेले नाही. त्या AI रोबोट्ला काय वाटते ते महत्त्वाचे आहे. हो, बरोबर वाचताय तुम्ही. कारण माणसांनी जरी AI रोबो बनवले असले तरी त्यांना माणसाची बुद्धिमत्ता प्रदान करून दिल्यामुळे हे माणसांपेक्षा जलदगतीने आणि अचूक निर्णय घेऊ शकतात. म्हणून तर मोठ्या मोठ्या आस्थापनांमध्ये बरेच ठिकाणी CEO म्हणून AI रोबोट्सना नियुक्त केले गेले आहे. 

पुढे वाचा

तंत्रज्ञान आणि नीतिमूल्य

कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि त्यावर आधारित ChatGPT सारख्या अनेक प्रभावशाली प्रणालींचा गेल्या एक-दोन वर्षांतच माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात जोरदार प्रवेश झाला आहे. अशा प्रकारच्या साधनांमुळे व्यवसायक्षेत्रात मोठे बदल होतील. कृत्रिमप्रज्ञेच्या वापरतून जर मानवी बुद्धिमत्तेचा वापर कमी झाला तर त्याचे अनेक फायदे आहेत – त्यातून खर्च कमी होईल, चुका कमी होतील, दिवसातले २४ तासही काम करता येईल आणि आर्थिक वृद्धीला गती मिळेल. म्हणजे उद्योगधंद्यांचा आणि देशाचा फायदा. आज प्रत्येक मोठ्या कंपनीतून कृत्रिमप्रज्ञेचा वापर चालू झाला आहे. पण कृत्रिमप्रज्ञेमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील ही भीती आहे. 

पुढे वाचा