नाकारले वेदांचे प्रामाण्य
तर्काचा तो बंडखोर—चार्वाक
इंद्रियप्रत्यक्ष सत्य मानले
अनुमान-आगम बुद्धीचे खेळ
ईश्वर नाही, आत्मा नाही
परलोकही केवळ कल्पना
“यावज्जीवं सुखं जीवेत”
विवेकातून आनंदाचा झरा
चार महाभूतांचा संगम
चैतन्य म्हणजे देहाचा योग
सृष्टी स्वाभाविक, ईश्वर नाही
भौतिकतेतच जीवनाचा भोग
नाही पाप, नाही पुण्य
नाही पुनर्जन्माचा व्यापार
जगणे म्हणजे अनुभवांचा उत्सव
नैतिकतेचा स्वाभाविक आधार
आज विज्ञानाचे युग उजळते
अनुभववादाची महत्ता ठळक
अंधश्रद्धा, रूढी, कर्मकांड
नाकारण्यातच प्रगतीचा मंत्र
डेटा, तर्क, प्रयोगशीलता
ज्ञानाचे खरे दीपस्तंभ
चार्वाक नाही अंतिम सत्य
पण विचारांना देतो दिशा
सुख म्हणजे भोग नव्हे केवळ
तर समता, सहजीवनाचा अर्थ
चार्वाक सांगतो—जगणे म्हणजे
जागृत मनाने अर्थपूर्ण जीवन
चेंजमेकर, बहुभाषिक अभ्यासक व स्तंभ लेखक
छ. संभाजीनगर
सेल: 9850989998