“धोकादायक पाणी!”

पण मौजेची गोष्ट अशी, की पाणी जरी थंडगार, मधुर आणि पारदर्शक असले तरी त्याच्या मालकीचा किंवा वाटपाचा प्र न मात्र अत्यंत स्फोटक, कडवट आणि गुंतागुंतीचा होऊ शकतो, एवढेच नाही तर समाजव्यवस्थेत फार मोठी उलथापालथ त्यामुळे होऊ शकते. प्राचीन इराकमधली वैभवशाली संस्कृती पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन उजाड होऊन नष्ट झाली, असे मत एरिक एकहोल्म ह्या पर्यावरणशास्त्रज्ञाने मांडले आहे. सिंधू संस्कृतीचा नाश परकीय आक्रमणामुळे झाला नसून त्यांचे पाणी व्यवस्थापनाचे तंत्र बिघडल्यामुळे झाला असे मत नवीन संशोधनाद्वारे सध्या पुढे येत आहे. शाक्य आणि कोलीम या दोन गणराज्यांमधल्या ‘रोहिणी’ नदीच्या पाणीवाटपाच्या संघर्षाचे निमित्त होऊन गौतम बुद्धाला राजत्याग करावा लागला, असे डॉ. आंबेडकरांनी आपल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकात म्हटले आहे; तर पौर्वात्य देशांमध्ये व्यापक आणि केंद्रीभूत पाणीव्यवस्थापनाच्या गरजेतून एकछत्री राजसत्ता निर्माण झाल्या, असा सिद्धान्तच कार्ल विटफोगेल नावाच्या शास्त्रज्ञाने मांडलेला
आहे.
(जनाचं अनुभव पुसतां, लेखक : मिलिंद बोकील यामधून प्रस्तुत)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.