विषय «परीक्षण»

गोमंतकातील रसोत्सव

गर्दीचा निकष लावला तर गेल्या महिन्यात गोव्याला झाले तसे साहित्य संमेलन आधी कधी झाले नाही. या गर्दीचे मानकरी तिघे. साहित्य, सृष्टिसौंदर्य आणि शेवाळकर. वऱ्हाड आणि मराठवाड्यातले जुने प्रियजन कितीतरी वर्षांनी तिथे भेटले. शेवाळकरांचे अध्यक्षपद आपल्याच माणसाचा बहुमान समजून आलेले.
खुद्द गोंयकराची तर सत्त्वपरीक्षेची वेळ होती. कोंकणी ही तिथली बोलभाषा, ती राजभाषा झाली आणि मराठीला मात्र मज्जाव. सर्वोच्च न्यायालयाने भलेही न्याय दिला, तरी सरकार दाद देत नाही. त्यामुळे तो चिडलेला. मराठीभाषिकांचे विराट शक्तिप्रदर्शन करून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला हा शेवटचा धक्का द्यायचा असा निर्धार केलेला.

पुढे वाचा

चारचौघी

चारचौघी पाहिले त्यावेळी त्या नाटकाने बऱ्यापैकी वादळ उठविले होते. मिळून साऱ्याजणीने चर्चा घडवून आणली होती. उत्तरे शोधत असणाऱ्या या चौघी प्रश्नच जास्त उभे करतात असे वाटले. या चौघीतली आई एक सुविद्य शिक्षिका. तीन मुलींची अविवाहित माता. मुलींचे वडील आबा स्वतःचा स्वतंत्र संसार सांभाळून या तीन मुलींचे जन्मदाते होतात. त्यांच्या आईशी लग्न न करता.

बहिणींतली मोठी विद्या. नावाप्रमाणे शिकून एम्. ए., पीएच.डी झाली. कॉलेजात प्राध्यापक म्हणून यशस्वी झालेली. तिचा नवरा आशिस हा पत्रकार. त्याचे एका सहव्यावसायिकेबरोबर लफडे सुरू असल्याचे पाहून त्याच्याशी भांडून विद्या आईकडे माघारी आलेली.

पुढे वाचा

अकुतोभय गीता साने -२

विनोबांची पदयात्रा होऊन गेल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर ६१ मध्ये गीताबाई चंबळ-घाटीत गेल्या. जिथे जिथे विनोबा गेले तिथे तिथे बाई गेल्या. सोबत अर्थात् विनोबांनी स्थापन केलेल्या शांतिसमितीच्या कार्यकर्त्यांची होती. घाटीतील जनता अशा प्रकारच्या चौकश्यांना सरावली होती. ठरीव साच्याची पढविल्याप्रमाणे उत्तरे येत. म्हणून गीताबाईंनी आपला मोर्चा अस्पृश्य आणि स्त्रिया यांच्याकडे वळवला. कारण आचार्यांच्या पदयात्रेवेळी खरा पीडित अस्पृश्य वर्ग अलक्षित राहिला होता. स्त्रियांशी संवाद साधल्यामुळे त्यांना सत्याच्या अधिक जवळ जाता आले.
चंबळ घाटीत जाण्यापूर्वी डाकूच्या प्रश्नावरचे साहित्य त्यांनी धुंडाळले, तेव्हा त्यांना दोनच पुस्तके मिळाली.

पुढे वाचा

मुळासकट उखडलेल्या- (रक्त पहाट)

सत्तेचाळीस साली स्वातंत्र्याबरोबर फाळणी आली. दोन्हीकडचे अल्पसंख्यक, विशेषतः पंजाबात बळी गेले. संपत्तीइतकीच-किंवा जास्तच-स्त्रियांची लूट झाली. सुजल, सुफल पंजाब “आँधी गम की यूँ चली, बाग उजड़ के रह गया” असा झाला. ‘मारो-काटो’चे वादळ थोडे शमले तेव्हा घरादारांना मुकलेल्या स्त्रियांची आठवण नेते मंडळींना झाली. त्यांचा शोध घेण्यासाठी उभय देशांनी करार केले. पाकिस्तानात लाहोरला आणि भारतात जालंधर येथे मुख्य छावण्या उघडल्या. मिळालेल्या तक्रारींचा तपास करून अपहृत स्त्रियांच्या पुनःप्राप्तीसाठी तळ उभे केले. लाहोरच्या तळावर प्रमुख म्हणून कमळाबेन पटेल या कार्यकर्तीची योजना झाली. सत्तेसाळीस सालच्या डिसेंबरपासून पुढील २ वर्षे त्या तिथे होत्या.

पुढे वाचा